आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The printing, according to officials, began in August-September and nearly 480 million notes of Rs 2,000 denomination and an equal number of Rs 500 denomination were printed.
>> बहूदा गवर्नरची सही प्रिंट करायची ठेवली होती. ६ सप्टेंबरला गवर्नर झाल्यावर लगेच प्रिंट केली.
छोट्टीशी मिश्टेक झाली प्रिंट करताना. देशात नाहीतरी उर्दु कोणाला येतं?
http://m.timesofindia.com/city/chennai/wrong-urdu-text-on-new-rs-2000-no...

निर्णय चांगला आहे पण २००० च्या नोटांमुळे परत काळा पैसा जैसे थे होईल असे वाटते. पंतप्रधानांनी काल अजून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. ते काय असेल आणि त्याने पुन्हा काळ्या पैश्याना कसा अटकाव होणार ते काळच सांगेल.

मुळात भ्रष्टाचाराची वृत्तीच नाहिशी व्हायला हवी पण ते अशक्य आहे.

>>>> श्री | 13 November, 2016 - 01:22

झाडू येवढ्या खालच्या पातळीला उतरुन पोष्टी टाकायची खरचं गरज आहे का ? ह्या ठिकाणी कोणी दुसरा असता तर अ‍ॅडमीननी त्याला नक्कीच वॉर्निंग दिली असती , आठवा बेफींना दिलेली वॉर्निंग <<<<

Lol

श्री,

मी झाडू ह्यांच्याइतक्या खालच्या पातळीच्या पोस्ट्स कधीच लिहिल्या नाहीत. उगाच भलतीच तुलना करू नका. माझ्या काही विशिष्ट पोस्ट्स प्रशासकांना कुरापतखोर वाटल्या होत्या. त्यानंतर मी अतीव व्यग्र झालो आणि नंतर आठ दिवस प्रवासात होतो. त्यामुळे माझी येथे असलेली अनुपस्थिती ही एखाद्या उदाहरणासारखी इतरांना दाखवून त्यांना त्यांचे जालीय वर्तन सुधारण्यास सांगण्याची काहीच गरज नाही. विशेषतः हे झाडू अनेक अवतार जालार्पण करून इथे येऊन पुन्हा तसेच वागत, बोलत आहेत. त्यांना काही सांगताना माझ्या पोस्ट्सचे उदाहरण कृपया देऊ नये.

ह्या धाग्याबाबत जी मते आहेत ती नंतरच्या प्रतिसादात लिहितो. वैद्यबुवांशी सहमत!

-'बेफिकीर'!

१. एटीएमला रांगा लावून तिष्ठत बसावे लागत आहे.
२. फकत २००० रुपये एका ट्रॅन्झॅक्शनवर मिळत आहेत.
३. दोन हजारच्या नोटांसाठी एटीएम्स योग्य झालेली नाहीत.
४. पाचशेच्या नोटा अजून यायच्याच आहेत.
५. रांगेत उभा असलेला एक म्हातारा मेला. (नेमका कशाने ते नीटसे समजलेले नाही)
६. आजारी माणसे, वृद्ध, लग्नसमारंभातील माणसे ह्या सर्वांना भयंकर मनस्ताप झालेला आहे.
७. मोदी स्वतः जपानला गेले
८. राहुल गांधींसारख्यांनाही रांगेत उभे राहावे लागले.
९. सर्जिकल स्ट्राईक म्हणता म्हणता सामान्य माणसाचेच रांगेत उभे राहून कंबरडे मोडले
१०. देशभक्तीच्या नावाखाली सामान्य माणसालाच नाडवले गेले. काळा पैसावाले तसेच आहेत.
११. नेमका किती काळा पैसा जमणार ह्यातून?
१२. जो काळा पैसा जमेल तो भल्यासाठी वापरला जाईल हे कशावरून?
१३. अजून जुन्या नोटा का घेतल्या आणि दिल्या जात आहेत?
१४. ८० टक्के नागरिकांचा क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंटशी सुतराम संबंध नाही. त्यांनी काय करायचे?
१५. काळा पैसावाल्यांनी आधीच सगळे सेटिंग केलेले आहे.
१६. पाचशेच्या जुन्या नोटांची मुदत ३ दिवस वाढवली म्हणजे यू टर्न घेतलाच ना?
१७. दोन आठवडे एटीम व्यवहार सुरळीत होणार नाहीत.
१८. जगातील एवढी मोठी अर्थव्यवस्था अशी अचानक एका रात्रीत खिळखिळी करून सोडणे निषेधार्ह आहे.
१९. आम्हीही देशभक्ती करू ह्या उक्तीतील जोर कमी होत आहे व नागरिकांचा संयम सुटत आहे.

ह्या व अश्या प्रकारच्या सगळ्या आक्षेपांनंतर '१३० कोटी नागरीक असलेल्या देशातील काळ्या पैश्यावर नियंत्रण यावे म्हणून सरकारने घेतलेला निर्णय' सरकारने घ्यायलाच नको होता असे म्हणणे केविलवाणेपणाची कमाल आहे.

हा निर्णय इतक्याच धाडसीपणे कोणत्याही सरकारला घेता आला असता, का घेतला नाही ह्याची कारणे उघड आहेत.

मला कणभरही त्रास न पडता काळ्या पैश्यावर नियंत्रण यावे हा मनामनांत मुरलेला फुकटेपणा उघडा पडला आहे.

बाकीच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक, सहिष्णूता-विषयक इश्यूजचे काय झाले आहे सध्या?

-'बेफिकीर'!

काल संध्याकाळी सोसायटी मध्ये आम्ही पाच सहा जाणं गप्पा मारत होतो. त्यातले दोघे अगदी तावातावाने आदरणीय मोदीजींच्या चुका दाखवत होते. त्यातला एकजण म्हणाला की साध्या चहा भज्यांचे वांधे झालेत म्हणून. मी तत्परतेने सहा चहा आणि दोन प्लेट भजी मागवली. देशभक्ती दाखवायची संधी मिळाल्यामुळे माझी छाती छप्पन इंचाची झाल्यासारखे वाटले. शंभर ची नोट गेली तरी बेहत्तर, थोडा त्रास तर सगळ्यांनाच सोसावा लागणार ना. गरीब चहावाला खुश झाला आणि त्याने मला दोन एक्ष्ट्रा भजी देऊ केली. मी बाणेदार पणे त्या गरीबाच्या परिस्थितीचा फायदा घेणे नाकारले पण आमच्यातल्या भुक्कड खांग्रेजीने ती भजी मधल्यामध्ये गटाकावली. तिकडे आपले सैनिक सीमेवर गोळ्या खात असताना यांना भजी खावीशी वाटतात याचंच आश्चर्य वाटायला हवं.
करोडो लोकांना देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय मोदीजींचे मनापासून आभार.
नमो नमः नमो नमः

१०० च्या नोटा साठवाल्याने लोकांना त्रास
आज आठवड्याची भाजी घ्यायला गेलो होतो.
नेहमीच्या गिर्हाईकांना क्रेडीट मिळत होते.
तरीही बरेच लोक १०० च्या नोटा घेउन्दिसात होतेत्या भाजीवाल्याकडे १०० च्या नोटांचा भला मोठा ढीग होता.

दुसर्याशी बोलताना तो म्हणाला, आता मी हे पैसे बँकेत भरले तर ते माझ्या खात्यात जाणार, आणी मला लूज कॅश म्हणून ४००० रुपये मिळणार ( ATM मध्ये पैसे नाही आहेत), मग मी धंदा कसा चालवू?
म्हणून मी हे पैसे माझ्या कडेच ठेवणार.

उघड आहे , उद्यापन त्याच्या कडे असाच ढीग जमणार आहे, आणी तो ते पैसे त्याच्याकडेच ठेवेल.

पैसे न मिळण्याच्या भीती पोटी छोटे व्यावसाईक लिक्विड कॅश त्यांच्या कडेच ठेऊन देत राहिलेतर लवकरच बँकेत जमा होणारे/ आणि मार्केट मध्ये फिरणाऱ्या १००/ ५०/२० च्या नोटा लक्षणीय रित्या कमी होतील, आणी सामान्य लोकांना अजून फटका बसेल असे मला वाटते

काही व्यावसायिकांनि असे पैसे साठवाल्याने (कायदेशी चल)/ कायदेशीर मार्गाने आलेले, मात्र बँकेत न जाता त्यांच्या कडेच राहणारे) तर बाकीच्या लोकांना याचा फरक पडू शकेल का?

नोटा रद्द करण्याची भूमिका गेली १७ वर्षे मांडणारे श्री. बोकील यांची मराठीतील मुलाखत पहा. अर्थशास्त्रातल्या अनेक गोष्टी अगदी सोप्या करून सांगितल्या आहेत आणि त्याही मराठीतून. मुख्य म्हणजे आकस्त्राळे पणाचा अभाव व तरीही मांडणीतला ठामपणा व सोपी भाषा भावली

८ तारखेला घरखर्चासाठी पैसे कढले.अर्थात ५००च्या नोटा होत्या.नवर्‍याने ,९ तारखेला १० मिनिटे,१० तारखेला १५ मिनिटे बँकेत घालवून एकूण२० हजार नॉर्थ कॅनरा कोऑप बँकेतून काढले.९ तारखेला अपना बजारमधे १०० आणि ५०० च्या दोन्ही नोटा घेऊन गेलो होतो.त्यांना ११ तारखेपर्यंत जुन्या नोटा स्वीकारायचे आदेश असल्यामुळे ५०० च्या नोटा ,आधी विचारुनच दिल्या.
माझ्या आईच्या बर्‍याच कमकम मदतनीसाने तिच्याकडे १०० च्या हजार नोटा आपणहून दिल्या.अरे आहेत माझ्याकडे म्हटले आईने. तरीही आजी ठेवा तुमच्याकडे, लागतील.म्हणून सांगितले.१२ तारखेला मी ,आईला १० हजार नेऊन दिले.
१२ तारखेला सकाळी ८ वाजता मात्र, प्रत्येक बँकेच्या पुढे मोठी रांग होती.नवर्‍याला २ दिवसांपूर्वीचा अनुभव चांगला असल्याने तो नोटा बदलायला ९ वाजता बँकेत गेला आणि ह्ही रांग बघून परत आला.त्या दिवशीफक्त १०००/ रू.च देत होते.

शाम भागवत, लिंक बद्दल धन्यवाद, माहीत होते हे, बघायचेही आहे. आठवण करून दिलीत. बघतो आता

http://headline24.in/national/%E0%A4%AC%E0%A5%9C%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A...

भाजपा नेत्याना नवीन नोटांबद्दलबद्दल आधीच माहीत होते. वा वा ! काय ही ट्रान्परन्सी.

https://www.thequint.com/business/2016/11/11/before-pms-announcement-rum...

http://www.firstpost.com/politics/bjp-leader-sanjeev-kamboj-to-firstpost...

---

...

New raga for all music lovers

राग धनखलास
From- modi gharana

म नी वर्ज्य

आरोह -- सा रे ग प

अवरोह - ग प सा रे..

ते वरचे राग - व्हाट्सप वर आले.

माझे ओरिजिनल उवाच हे आहे...

मोदी निवडणूक जिंकले .... पवारांकडे चहाला गेले.

नोटा बदलल्या ... मोदी पवारांच्या साखर संस्थान की कुठल्या संस्थेत पुण्यात लंचसाठी !

आता पुढच्या निवडणुकीपूर्वी मोदी पवारांकडे डिनरला जाणार.

श्री कृष्ण हस्तिनापूरला गेला की कौरव पांडवांकडे जेवायला जात नसे, तो विदुराच्या घरी जायचा.. तसे मोदीही महाराष्ट्रात आले की पवारांकडे जेवायला जातात. मोदींचे खरे लाडके भक्त शरद पवार आहेत .

नोटा पिरिऑडिकली रद्द करणे हा काळा पैसा बाहेर काढण्याच्या अनेक मार्गापैकी एक आहे आणि तो प्रथम वर्ष कॉमर्स च्या विद्यार्थ्यापासून पंतप्रधानाण्पर्यन्त सर्वच वेळोवेळी माण्डतच असतात. बाबासाहेब आंबेडकरांनीही मांडला होता. त्यात नवीन काय आहे. बोकीलांनीही तो मांडला होता . मात्र बोकीलांच्या सूचनेवरूनच मोदींनी तो अमलात आणला असे म्हणणे,म्हणजे वेडगळपणाच्या जवळपास पोचणे आहे. मग आता बोकीलाना अर्थमंत्री करता?

मोदींचे खरे लाडके भक्त शरद पवार आहेत .
>>
टायपो झालाय . शरद पवारांचे लाडके भक्त मोदी आहेत. मध्यंतरी म्हणजे १३ ऑक्टोबर २०१६ ला एक मोठ्ठे साहेब मोदीना भेटले आणि त्यानी सांगितले माझ्या सगळ्या नोटांची विल्हेवाट लावून झाली आहे आता उडवा बार !!!

पुढचा इतिहास अने वर्तमान तुम्हाला माहीतच आहे.
आज १३ नोव्हेम्बरला आभाराची सभा पुण्यात मांजरीला आहे येणेचे करावे.

असो .. तसेही भक्त अन ईश्वर हे अद्वैत आहे.

राम अन शंकर हे दोघेही एकमेकाला दैवत व स्वतःला भक्त मानत होते.

कोण म्हणतं उपाशीपोटी अध्यात्म सुचत नाही?

नमो नमो

@ ऋन्मेश
नक्की वाचा.
अनेक नवीन धागे काढण्यासाढी खूप मुद्दे मिळतील.:))
उदा.
१) रागा नमो तुलना
२) ममो नमो तुलना
३) मोदींचा स्वभाव
४) मोदिंनी केलेल्या चुकीच्या गोष्टी ( अर्थक्रांन्तीच्या धोरणाच्या संदर्भात)
५) अशा योजनांच्या संदर्भात भारत अमेरिका तुलना. किंवा
६) नमो मोरारजी तुलना
७) इंटरनेटची प्रगती जरूरी आहे का?
८) नवीन २००० च्या नोटा कधी रद्द होणार?

बघा माझ्यासारख्याला सुध्दा इतके धागे सुचले. तुम्हाला तर कितीतरी सुचतील.
कृपया हलके घ्या.
ही मुलाखत बऱ्याच जणांनी वाचावी व त्यावर चर्चा व्हावी म्हणून कुतुहुल निर्मितीचा थोडासा प्रयत्न केलाय.

झाडू येवढ्या खालच्या पातळीला उतरुन पोष्टी टाकायची खरचं गरज आहे का ?
<

श्री,

खालची पातळी? म्हणजे कशी? कुठे अपशब्द उच्चारलाय? गरीबाकडे नष्ट झालेल्या नोटा खपवायचा प्रयत्न सभ्य लोकानी करणे हा सलज्जपणा आहे का?? वा! कस्ली राष्ट्रभक्ती आहे नैका?

समोरच्याचा खोटारडेपणा कॉपीपेस्टून दाखवणे म्हणजे खालची पातळी असते का तुमच्या भक्तिसंगीतात?

त्या 'बाइंनी' नंतर झपझप स्क्रीनशॉट डकवलेत. पण त्यातला एकही माझ्या "एडिटेड" सो कॉल्ड "खालच्या" पातळीच्या पोस्टीचा आहे का? किंवा स्वतःच्या "सका़ळी सकाळी मूड घालवला" वाला? Wink

#अजेंडा क्या है भाई?

उगंच कुण्यातरी एका स्लीपरसेल आयडीने "खालची पातळी आहे" असं डिक्लेअर करायचं. मग ते व्यग्र, व्यस्त, विमनस्क वगैरे येऊन काही लिहिणार. तिसरे स्लीपर आयडी पुन्हा खालची पातळी म्हणणार.

प्लीजच. कोणती पोस्ट खालच्या पातळीची आहे ते इथेही लिहा, अन मा. अ‍ॅडमिन यांच्या विपुतही.

त्यानंतर तुम्ही माझ्या पातळीबद्दल खोटे बोलताहात असे सिद्ध झाले, तर स्वतःची आयडी बंद करण्याची विनंतीही तिथेच लिहा.

झाडू, तुम्ही इब्लीस आयडी आहात का? नसाल तर काही नाही. पण तेच असाल तर तुम्ही खरं अभ्यासू लिहिता. खुप माहिती मिळुन जाते. पण तुमचा बहुतेक वेळ रागावण्यात जातो. आता पण तेच करत आहात. राग बाजुला ठेऊन व हा निर्णय कोणी घेतलाय ते बाजुला ठेऊन, या निर्णयाचे काय चांगले परिणाम होऊ शकतात ते लिहाल का प्लिज? शेवटी जितके होतील तितके पैसेचोर काही ना काही कारणाने संकटात यावेत हे सर्वानाच वाटतय. देशाबाहेरील लोकांना पण.
यात काही लोकांना झळ लागली हेही वाईट आहेच. पण तुम्ही फक्त आणि फक्त या निर्णयबद्दल सुरुवातीपासून वाईटच बोलत आहात तर मग जेव्हा त्या लोकांच्या त्रासाबद्दल लिहिता तेव्हा मग या निर्णयाने आनंद झालेले लोक त्यावर काही प्रतिक्रिया देणे अवघडच की हो.
आणि सपना यांनी पेट्रोल पंपावर नोटा दिल्या व कोणत्यातरी फर्निचरच्या दुकानात. तेही मुदत वाढवलेली असताना. मग त्यावर का राग बरे? ते लोक गरीब नाहीत. त्यांनी विचार करुनच नोटा घेतल्या असतील की हो.

दुसरे म्हणजे, दवाखान्यात या नोटा घ्यायला सरकारने सांगितल्यात त्यालाही कारण आहेच ना? त्यावर राग का? दवाखाने/डॉ म्हण्जे लोकांचे जीवन. फार महत्वाचे. तुम्हाला नाही घ्यायचे तर नाही घेत सांगा. पण तुम्हाला झळ लागलेल्या लोकांची इतकी कळकळ आहे तर याची का नाही? ते तर कष्टाचे पैसे, लीगल. बँक घेणारच. फुकट ट्रिटमेंट करावी लागेल मग.
तुम्हाला उपदेश करायचा नाही पण अभ्यासू व्यक्तीने फक्त रागावण्यात व ख्वचट बोलण्यात शक्ती घालवू नये असे मनापासुन वाटते.

Pages