Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36
आज मध्यरात्रीपासूनच!
लागला घोडा काळ्या पैश्याला
- श्री नरेंद्र मोदी !!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केपी (किंवा इतर कोणीही), मला
केपी (किंवा इतर कोणीही), मला त्याबद्दल विचारायचं होतं. ते ४,००० ची जी लिमिट आहे, ती विना चौकशी, सरळ बँकेत किंवा पोस्टात जाऊन जुन्या नोटा देऊन नवीन घेऊन यायच्या अशी आहे का? बॅंकेत स्लिप भरावी लागेल पण आयडी कार्ड मागतात का? आणि त्याही पेक्षा महत्वाचं, एकच माणूस परत परत आला तर? की नोंदी होत आहेत आणि दर वेळी वेगळी बँक/पोस्ट ऑफिस गाठावं लागतय?
४००० रु. दोन प्रकारे मिळतात.
४००० रु. दोन प्रकारे मिळतात. आपल्या खात्यातून पैसे काढणे. आणि दुसरे जुन्या नोटा बदलून.
जुन्या नोटा बदलण्यासाठी खाते असण्याची गरज नाही. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागतं. पोस्टात सुद्धा जाता येते. पण या पद्धतीने पैसे घेण्यासाठीच मोठ मोठ्या रांगा होत्या. काही ठिकाणी तीन रांगा होत्या. फक्त डिपॉझिट करणारांची वेगळी. फक्त पैसे काढणा-यांची वेगळी आणि बदलून घेणा-यांची वेगळी.
मी नोटा घेऊन गेले होते. आजही एटीम बंद. बँकांसमोर दोन तीन किमी रांगा. मग जुन्या घरापर्यंत (कल्याणीनगर) गेले. तिथला स्टाफ ओळखीचा आहे. त्यांनी एटीम कार्ड आणलंय का विचारलं. बदलून घ्यायच्या तर चार पाच तास थांबावे लागेल, एटीम कार्डवर मात्र एक तासात पैसे मिळाले.
एटीम फक्त आयसीआयसीआय बँकेचं ते ही एक दोन ठिकाणीच चालू आहे. तिथेही पैसे संपले म्हणून बोर्ड लागलेले पाहीले. आज पुण्याचे एक टोक ते दुसरे टोक एव्हढा प्रवास झाला. रांगेत मात्र मध्यमवर्गीय, गरीब लोकच जास्त दिसले.
कुणीही कितीही वेळा 4K रक्कम
कुणीही कितीही वेळा 4K रक्कम बदलू शकतं.
फक्त एकाच बँक्येच्या ब्रांच मध्ये दिवसाला एकदाच. सोबत फॉर्म आणि आयडी प्रूफ झेरॉक्स.
सगळे सोपस्कार पार पाडले कि म्हणजे साधारण डिसेंबर नंतर सगळे ट्रांसाक्शन लिंक्ड करतील बहुतेक. मग त्यावेळी सापडला कुणी तर दंड.
इति एक बँक मॅनेजर.
कुणीही कितीही वेळा 4K रक्कम
कुणीही कितीही वेळा 4K रक्कम बदलू शकतं. >>> काही पण. पैसे बदलून एकदाच , ५० दिवस मुदतीत एकदा, मिळणार आहेत. त्यानंतर खात्यात भरायचे आहेत.
केजरी असा आरोप करतोय कि अजून
केजरी असा आरोप करतोय कि अजून काळा पैसा बाळगून असणाऱ्या बड्या धेंडांना होम डिलिव्हरी मिळणार नव्या नोटांची. फक्त 10-15% कमिशन.
>>साहेब स्थावर मालमत्तेचे ९९
>>साहेब स्थावर मालमत्तेचे ९९ व्हवहार रेकनरपेक्षा जास्त किंमतीचेच होतात हे तुम्हाला माहीत नाही काय..<<
हाच प्रकार मुळातुन नष्ट झाला नाहि तर मोदिच काय, गांधीजी नोटेतुन बाहेर आले तरी काळ्या पैश्याला रोकु शकणार नाहित. करायला कठिण आहे पण सुरुवात कोणीतरी करायलाच हवी. प्रत्येक व्यवहारात 'वरचे' पैसे द्यावेच लागतात हि जनतेने आपापल्या सोयीसाठी निवडलेली पळवाट आहे - पुढच्या दुष्परीणामांची पर्वा न करता...
केजरी असा आरोप करतोय कि अजून
केजरी असा आरोप करतोय कि अजून काळा पैसा बाळगून असणाऱ्या बड्या धेंडांना होम डिलिव्हरी मिळणार नव्या नोटांची. फक्त 10-15% कमिशन. >>> त्यांना आतल्या खबरा सगळ्या माहीत असतात .................

आणि त्या ते पाकिस्तानकडे ट्विट करुन पाठवतात
Well planned structured money
Well planned structured money laundering was carried out by PM of India before banning 500 and 1000 denomination currencies ...
Last year ( May 26 , 2015) RBI increased the slab for LRS "Liberalized remittence scheme" upto USD 250,0000 which means an individual from India can transfer upto two crore rupee to their overseas account in a financial year ..
Before modi come into the power the LRS limit was just 75,000 USD. He was elected as prime minister on 26 May 2014, RBI Increased the LRS slab to 125,000 in very next month Modi come into the power I.e Jun 03 2014 and also they increased the slab to 250,000 USD second time on May 26 2015.
Please refer below link for this LRS slab from RBI
https://m.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx…
Due to this increase in LRS slab, there was a sudden spurt in remittence since June 2015. Approximately 4.6 billion USD (30,000 Crore rupees) has been transferred from India in last 11 months. This sudden spike in remittance almost 300% higher than historical average remittance. There is no clear explanation from RBI for this sudden surge.
Read this below article from economic times stated this sudden surge on May 17 2016
http://economictimes.indiatimes.com/…/articles…/52301330.cms
After parceled this enormous amount to overseas , now PM playing anti corruption , anti counterfeit and anti black money drama by banning 500 and 1000 currencies ....
- Amitesh Singhal
व्हाट्स्प आहे.
व्हाट्स्प आहे.
आमच्या सासुरवाडीला अजुन नव्या
आमच्या सासुरवाडीला अजुन नव्या नोटा पोचल्या नाहीत... ब्यान्केत जुने पैसे भरुन घेतले. नव्या नोटा पुढच्या आठवड्यात मिळणार आहेत.
माझ्याकडे पहिलीवहिली गुलाब्बो
माझ्याकडे पहिलीवहिली गुलाब्बो आज सोनपाऊलांनी आली!
तिचा विचारही न करता आणि बँकेत न जाता आपल्याआपण चालत आली.
गुलाबी सुबकठेंगणी!
स्व संपादित प्रतिसाद नव्या
स्व संपादित
प्रतिसाद नव्या धाग्यावर हलवला आहे
पाचशेची नोट कोणी आता फुकटातही
पाचशेची नोट कोणी आता फुकटातही घेईना.
इथे पहा.
http://m.hindustantimes.com/i
http://m.hindustantimes.com/india-news/the-measure-is-anti-poor-when-bjp...
The BJP had opposed as “anti-poor” a move by the RBI in January 2014 to withdraw currency notes issued before 2005 and said the move will not address the problem of black money.
In power now, the BJP government demonetised Rs 500 and Rs 1000 currency notes on Tuesday and defended it as a move to deal with illicit wealth.
वर जे घरखरेदीसाठी ब्लॅकचे
वर जे घरखरेदीसाठी ब्लॅकचे पैसे वगैरे चर्चा चालू आहे त्याच लोकांचा विचार माझ्याही मनात सुरुवातीलाच आलेला. खरंच भल्याभल्यांना फटका बसेल. आणि ही अक्षरशा फालतूगिरी ठरेल. मध्यमवर्गीय लोकांनी आयुष्याची कमाई ओतली असते या व्यवहारात त्यातली अर्धी अशी फुकट जाणे याचा झटका तेच समजू शकतात.
आता ते ब्लॅक झाले, चुकीचे झाले. वगैरे आदर्शवादाच्या गप्पा झाल्या.
जर असेल ते चुकीचे तर राजरोसपणे कसे चालते? की ईथल्याच लोकांना हे माहीत आहे पण सरकारला याची अजून कल्पना नाही? जर हे पैसे काही काळ पडून असतात तर एखादा व्यवहार झाल्यावर लगेच धाड घातली तर हे पैसे पकडले जाणार नाहीत का? मग का सरकार अश्या धाडी घालत नाही?
झाडू | 11 November, 2016 -
झाडू | 11 November, 2016 - 22:53
च्याय्ला!
अजून ३ दिवस जुन्या नोटा घ्या म्हणताहेत दवाखान्यात.
माझा नॉर्मल रेव्हेन्यु उदा. ओपीडीचा रोज ६० पेशंट असेल, @ २०० रु पर पेशंट, तर मला ६०,००० रुपयांच्या नोटा येताहेत. कारण कुणाकडेच सुट्टे नाहियेत. अन मी ४२ हजार रुपये यांना सुट्टे देऊ लागतोय.
हे सुट्टे मी कुठून आणू?
नो सरकारी उत्तर. मला बँकेतून फक्त एकावेळी १०००० मिळतील. अटवड्यात २० हजार.
लोक बँकेच्या क्यू ला उत्तर म्हणून ट्रिव्हियल कंप्लेंट्ससाठी येताहेत. अन पैसे घेतले नाहीत तर मारामार्या करताहेत. पोलीस मला दमदाटि करताहेत.
अन अशाच इतर गोष्टी.
पण शेवटी देशप्रेम म्हणून सहन करा म्हणे.
अमेरिकेतल्या आर्ततदन्यांनी इकडे लक्ष घातलं तर काय होईल? सगळेच डॉक्टर माझ्यासारखे काँग्रेसी नाहीत. फुकट तोंड द्यावं लागतय..
नाय तर मी चाल्लो माझ्या ता.क./बोल्ड (संपूर्ण इंडियन टाटा मांझा) गाडीत डिझेल भरून जमतील तितक्या १०००-५०० च्या नोटा उडवत फिरायला. ३ दिवस तरी खपतीलच.
थोडीशी गैरसोय, नक्की किती आणि
थोडीशी गैरसोय, नक्की किती आणि कोणाची,
लाभ घ्यावा
<<
हो सिम्बा.
ऑनलाईन भगत्गण हेच म्हणताहेत. इकडे करोडोत व्हाईट आराऽमात होताहेत. इन्कमटॅक्स भरण्यापेक्शा कमी किमतीत.
या ऑनलाईण भगतांना फक्त जनरल पब्लिकला सांगायचं आहे, की मोदींनी कित्ती नं भारी केलं. अन काळा पैसा "आणला" ऑटोपॅरटिझम. दुसरं कैनै.
एकेकाची १०-१० खोकी रोज जिरताना पाहतोय मी.
आपल्या देशात कोणताही कायदा, तो इम्प्लिमेंट करणार्यांइतकाच स्ट्राँग अस्तो. इथे कुंपणालाच हौस आहे पैसे खायची. कुत्ता बिर्याणी तो हर ब्लॅकवालेके पास तैयार रहती है.
वरील दोन्ही पोस्ट मायबोलीवरील
वरील दोन्ही पोस्ट मायबोलीवरील सर्वाधिक गुप्त व सर्वाधिक द्वेषित धाब्यावरून साभार!
>>मग का सरकार अश्या धाडी घालत
>>मग का सरकार अश्या धाडी घालत नाही?<<
सरकार प्रत्येक वेळेला कुठे-कुठे धाडी घालत राहणार, त्यांना दुसरी कामं नाहित का? एक जबाबदार नागरीक म्हणुन तुम्हि तुमचा वाटा उचलणार कि नाहि? तु स्वत: लग्न झाल्यावर जेंव्हा फ्लॅट घेशील तेंव्हा टेबलाखालुन पैसे अजिबात देऊ नकोस. ते एव्हढं काहि कठिण नाहि, मला अनुभव आहे २० वर्षांपुर्विचा...
हि थोडीशी गैरसोय व्यक्त
हि थोडीशी गैरसोय व्यक्त करायला वेगळी सोय केली आहे
आय मीन "अड्ड्यावरून" साभार.
आय मीन "अड्ड्यावरून" साभार.
त्यांना दुसरी कामं नाहित
त्यांना दुसरी कामं नाहित का?
<<
कोणती कामं आहेत? जरा सांगता का, ट्रंपोबा?
माझं काय म्हणणं जुन्या नोटा
माझं काय म्हणणं जुन्या नोटा बदलून त्या बदल्यात ४००० रुपये घेण्याऐवजी दहा हजार पर्यंत विथड्रॉव करण जास्त सोप्प नाही का? आणि जुन्या नोटा ब्यांकेत डिपॉझिट कराव्यात . ते जास्त सोईस्कर होईल
ज्यांचं अकाउंट नसेल बँक्येत
ज्यांचं अकाउंट नसेल बँक्येत त्यांनी काय करायचं? किंवा जे दूर असतील कुठल्या कारणास्तव आणि त्यांची बँक नसेल जवळपास त्यांनी काय करायचं?
ज्यांच्याकडे चार किंवा त्याहून कमीच असतील पैसे तर हा द्राविडी प्राणायाम घालायचा?
झाडू, एकदा हा दंगा ओसरला की
झाडू, एकदा हा दंगा ओसरला की कळेलच खरच किती माल आला अन नक्की किती नुकसान झालं. तुम्हाला त्रास होत असेल हे पण मान्य न करुन कसं होईल. चांगले पॉईंट लिहिण्यामागचा उद्देश वाईट पॉईंट नाहीच आहेत, मोदी भक्ती आहे नाहीचेत आजिबात. ते तुम्हाला वाटतात. Honestly, I don't care about Modi. What I care about is if our country is making progress.
श्री वैद्यबुवा, या धाग्यावरची
श्री वैद्यबुवा,
या धाग्यावरची तुमची मागची गालगुच्चा मिळालेली एक लांबट पोस्ट आहे नं? तिचा पुनः एकदा आस्वाद घ्या. ज्या दिवशी तुम्ही माझ्याशी फिजिकल मारामारीच्या गप्पा केल्या होत्या, त्यादिवशी यू हॅव्ह लॉस्ट ऑल रिस्पेक्ट.
आता, तुम्ही अन तुमचे मोदी. किंवा ट्रंप. किंवा जे कुणी असतील ते. खुश रहा.
वैद्यबुवा | 11 November, 2016
वैद्यबुवा | 11 November, 2016 - 08:20
झाडू, तुमचं कौतूक आवरा ना आता. इथे मला वाटतं काही लोकं खरच माहिती करुन घ्यायला येतायत. नवीन माहिती मिळत आहे. त्यात सारखं मोदी/सरकार बॅशिंग आणून सारखी नका ना तुमची चव घालवू? आधी नको तिथे बिन कामाचं बरळून किती वेळा घालवली आहेच ना? परत कशाला? साधे मुद्दे सांगितले तर अर्थतज्ञ का? अन तुम्ही इथे येऊन नुसत्या फुस्कुल्या सोडत्या म्हणजे तुम्ही कोणते तज्ञ झालात? अपचनाचे? गपा की जरा. काही खर्या तृटी असतील तर वाचायला आवडेल त्या बद्दल, नुसतं काय स्पेक्युलेशन. पाल्हाळ, लाडात, डोळे मारुन, भ्रमिष्टासारखं बोलायला तुमचा अड्डा आहे ना? परत इथे कशाला दळण?
आणि हो, तुम्ही अन तुमच्या आधीच्या पिढ्या जेव्हा पासून सर्वज्ञ असल्यासारखे सगळीकडे पच्कायला लागले ना? तेव्हा पासून माझ्या सार्खे अर्थतज्ञ झाले. फक्त ह्याच कारणा करता की तुमच्या सारखे दीड शहाणे जास्त हवेत उडायला लागले की तुमचे पंख कापायला. समजलं का आता? हाहा
सगळी माहिती, कॉमनली अवेलेबल असते. नीट वाचली, विचार केला तर कोणाला ही समजते. त्यात आपलं अजेंडा न घुसडता तर बोललं तर नक्कीच चांगली चर्चा पण होऊ शकते.
दीप्स | 11 November, 2016 - 08:22
बुवा:हाहा
सह्ही स्पिरीट.
**
ही ती सभ्य भाषेतली पोस्ट अन गालगुच्चा.
माझ्याकडे पहिलीवहिली गुलाब्बो
माझ्याकडे पहिलीवहिली गुलाब्बो आज सोनपाऊलांनी आली!
तिचा विचारही न करता आणि बँकेत न जाता आपल्याआपण चालत आली.
गुलाबी सुबकठेंगणी!>>>> हे मस्तय.
Who said I was looking to
Who said I was looking to gain your respect?
गालगुच्चे आधी तुम्ही चिमटे काढल्यामुळेच घेतले आहेत. आत्ताही आणि तेव्हाही पण मला वाटलं तुम्ही हे सगळं लक्षात घेऊन परत नीट बोलत आहात. मागच्या वेळेस उल्लेख केलात ते आश्चर्य वाटतय पण. आय थॉट वि बेरिड द हॅचेट, नो? ओके. जशी आपली मर्जी. कारण नसताना सर्कास्टि़ पोस्टी टाकणार तर समोरचा पण उत्तर देइलच ना?
त्याचं काये नं, पब्लिक
त्याचं काये नं, पब्लिक धाग्यावर उत्तर द्यायची गरज भासणं, अन तेही पार्ल्यातल्या धोब्रीकडून, तेही इतक्या वाक्यांचं!, हेच मला अन जुन्या जाणत्या मायबोलीला सांगतं, की कुणाचा रिस्पेक्ट गेन करायची गरज कुणाला आहे.
आपण भेटलात, आनंद झाला. या आता! नव्यानेच ट्रंपाळलेल्या "अम्रेकेतील आयुष्य" एंजॉय करा. तिथले गोराक्षस तुम्हाला मुबारक होतीलच हळूहळू.
धन्यवाद!
Pages