६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन इनडिव्हिज्युअल मेडल्स इन ऑल, ही 'बर्‍यापैकी' आहेत?! म्हणजे त्यांना मेडल्सच मिळाली नसती, तरच त्यांनी तुलनेने कमी मेडल्स मिळवली आहेत असे म्हणाला असता काय?

ऋन्मेश, वरवर वाचन करून धागा काढण्याची घाई करण्यापेक्षा नीट अभ्यास करून धागा काढा. माहिती इथे आहे, अथ पासून इतीपर्यंत वाचा. Faq वाचा, सर्वे साईज वाचा, एकूण काय वाचन वाढवा.

http://worldhappiness.report/

बाकी ते मोदी भक्त आणि मोदी हेटर्स चे मी विनोदाने लिहिलेले. कारण हेच कि मोडीभक्तांना मोदींच्या प्रत्येक गोष्टीने आनंद होतो आणि गर्व वाटतो. उद्या मोदी शिंकले तरी आजवर असे कोणीच शिंकले नाही हे सांगणारे मेसेज सोशल मीडियावरून फिरू लागतील. त्याविरुद्ध अवस्था मोदी हेटर्सची आहे. उद्या मोदींनी ते प्रसिद्ध 15 हजार प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा केलेच तर हेटर्स इतक्या उशिरा दिले, त्याचे इतके व्याज झाले ते दिले नाही म्हणून निषेधाचा गळा काढतील. अर्थात वरची दोन्ही उदाहरणे परत विनोदानेच लिहिली आहेत. तेव्हा ती त्याच अर्थाने घ्या. सोशल मीडियावर विनोदी लिहिण्यासारखे दुसरे पाप नाहीय आता, कोणालाही विनोद समजत नाही.

ते प्रसिध्द १५ लाख. आहेत
१५ हजार तर ऋन्मेष महिन्याला गर्लफ्रेंड वर आनंदाने स्वतःच्या खिशातून खर्च करेल.

पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेतले असते तर काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.

२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्‍षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अ‍ॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.

३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!

जय हिन्द ! जय भारत!

तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्‍षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अ‍ॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे.<<<<

+ १

अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे<<<

+१

वर ऑलिंपिकबाबत आपण पुन्हा तेच करतोय. यात भारताचीही परिस्थिती काही चांगली नाही. पाकिस्तानची आपल्यापेक्षा वाईट आहे असे समाधान मानण्यात काय हशील आहे. अर्थात हि माहीती आपण या धाग्यावर घेतली हे ठिक आहे, धाग्याच्या हेतूला धरूनच आहे. पण पुढे त्यावरून तुलना करत वाद घालने, तू की श्रेष्ठ की मी श्रेष्ठ हे करने नाही पटले.
मुळात खेळ म्हणजे शिक्षणानंतर करायची दुय्यम गोष्ट याबाबत जर दोन्ही देशांतील लोकांचे विचार समान असतील तर या तुलनेला काही अर्थही नाही.

१५ हजार तर ऋन्मेष महिन्याला गर्लफ्रेंड वर आनंदाने स्वतःच्या खिशातून खर्च करेल. >>> आनंदाने का कसे ते विचार करायला हवा, पण खर्च होतात मात्र खरे..
असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय असल्याने यावर पुन्हा कधीतरी ..

ऋन्मेश, वरवर वाचन करून धागा काढण्याची घाई करण्यापेक्षा नीट अभ्यास करून धागा काढा. माहिती इथे आहे, अथ पासून इतीपर्यंत वाचा. Faq वाचा, सर्वे साईज वाचा, एकूण काय वाचन वाढवा.
http://worldhappiness.report/

>>>>>
साधनाजी, लिंकबद्दल धन्यवाद Happy
माझा ईंग्रजीचा प्रॉब्लेम असल्याने आंतरजालावर फेरफटका मारताना माहिती मिळवायला मर्यादा येतात. किंबहुना म्हणूनच मायबोलीवर धागा काढतो जेणेकरून एखाद्या विषयावर येथील लोकं मराठीत लिहितील आणि भविष्यात ती माहिती मराठीत शोध घेणार्‍यांसाठी डेटाबेस म्हणून तयार होईल Happy

इंग्रजीचा प्रॉब्लेम असेल तर माबोवर पडीक राहून तो सुटणार नाही. माबो तात्पुरती सोडून अभ्यासास वाहून घेणे. आणि तसेही अर्धीच माहिती गुगल करण्याइतपत इंग्रजी येते पण ती गुगळलेली माहिती पूर्ण वाचायला त्रास होतो हे कसे कळले नाही. इंग्रजी इतकीही कठीण नाही आणि कठीण शब्दाचे अर्थही गुगल करून पाहता येतात.

इंग्रजीचा प्रॉब्लेम असेल तर माबोवर पडीक राहून तो सुटणार नाही
>>>>>

माझा ईंग्रजीचा प्रॉब्लेम आहे हे खरंय.
हा प्रॉब्लेम मी दोन प्रकारे सोडवू शकतो.

1) स्वता ईंग्रजी शिकून.
2) जगाला मला येते ती भाषा (मराठी) शिकवून आणि वापरायला उद्युक्त करून.

मी दुसरा मार्ग स्विकारलाय Happy

@ माबो पडीक,
इथे मला एक अवांतर शंका आहे.
उदाहरणासहीत विचारतो.

समजा तुम्ही तुमच्या घराजवळच्या एका हॉटेलात अधूनमधून चहा प्यायला जातात.
तिथे एक माणूस रोज चहा नाश्ता लंच डिनरसाठी येत असतो. हे तुम्हाला घरच्या खिडकीतून बघून वगैरे माहीत असते.
आता तुम्हाला त्याची काळजी वाटते की याला रोज एकाच चवीचे खाऊन बोअर तर होत नाही ना.
मग तुम्ही त्याला ईतर ग्राहकांनाही ऐकू जाईल ईतपत मोठ्या आवाजात विचारता, की काय रे तू रोज ईथेच पडीक असतोस, तुला ईतर हॉटेल ठाऊक नाहीत का?

तुमचा हेतू नक्कीच छान आणि प्रामाणिक आहे, पण तरीही .... Happy

बाकी मला माबो एखादे हॉटेल नाही तर दुसरे घर वाटते ती गोष्ट वेगळी Happy

जगाला मला येते ती भाषा (मराठी) शिकवून आणि वापरायला उद्युक्त करून.

मी दुसरा मार्ग स्विकारलाय>>>>>>>

All the best. चूक माझीच आहे, मी या धाग्यावर जरा जास्तच वेळ व्यतीत केला.

जगाला मला येते ती भाषा (मराठी) शिकवून आणि वापरायला उद्युक्त करून.>>>>.वल्लाह! क्या बात है! याला म्हणतात गिरे तो भी टांग उप्पर!

माझा ईंग्रजीचा प्रॉब्लेम असल्याने आंतरजालावर फेरफटका मारताना माहिती मिळवायला मर्यादा येतात. किंबहुना म्हणूनच मायबोलीवर धागा काढतो जेणेकरून एखाद्या विषयावर येथील लोकं मराठीत लिहितील आणि भविष्यात ती माहिती मराठीत शोध घेणार्‍यांसाठी डेटाबेस म्हणून तयार होईल >>>>>>

चांगला हेतू आहे. आवडलं

रश्मी जर हे तुम्हाला खरेच गिरे तो भी टांग उपर आणि अशक्यप्राय, आतिशयोक्तीपूर्ण वाटत असेल तर ते मराठी भाषेचे दुर्दैव्य झाले.

@ धागा,
आज स्वातंत्र्यानंतर 69 वर्षांनीही या विविध भाषा परंपरांनी नटलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवणारी भाषा तीच परकीय ईंग्रजांची आहे ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवले.
तर हेच पाकिस्तानबाबत जाणून घ्यायला आवडेल.
तिथेही ईण्ग्रजी भाषेचे असेच स्तोम माजले आहे की हिंदी, उर्दू, पंजाबी वगैरे जास्त वापरात आहेत?

साधनाजी, जेवढा विश्वाचा पसारा आहे त्याच्या जवळपास निम्म्याने भारतपाक विषयाचा पसारा आहे. पण आपण मात्र त्या हॅपीनेस ईंडेक्समध्येच अडकून पडलात जणू काही त्यानेच या चर्चेचा निकाल लागणार होता. ते केवळ कुतूहल जागे होण्याचे एक निमित्तमात्र होते बस्स.

अशक्यप्राय, आतिशयोक्तीपूर्ण वाटत असेल तर ते मराठी भाषेचे दुर्दैव्य झाले.>>>>???? ऋन्मेष, तुला मराठीची इतकीच काळजी आहे तर आधी शुद्ध लिहायला शिक. तुझी ही सारवासारव म्हणजे तुझ्या चूकीवर तू गोंडस मुलाम्याचे पांघरुण घालतो आहेस. तुझ्या चूका तू कधीच कबुल करणार नाहीस, किंवा किमान त्या सुधारण्याचा पण प्रयत्न करत नाहीस हे सर्वांना माहीत आहे.

दुर्दैव्य>>>>> दुर्दैव !

ऋन्मेष, पाकिस्तानातपण इतर भाषांपेक्षा इंग्रजीचं महत्त्व जास्त आहे.

आणखीही बर्‍याच बाबतीत सिमिलॅरिटीज आहेत.
मी एका पाकी माणसाला विचारलं 'आम्ही भारतीय उठसूठ प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आमच्या राष्ट्रपित्याला आणि पहिल्या पंतप्रधानांना ब्लेम करतो तसं तुम्ही काय करता?'

तर तो म्हणाला 'आम्ही पण असंच करतो. फादर ऑफ नेशनला ब्लेम करतो. आखिर दोनो कौमोंका खून तो एकही है!'

हो आणी त्यांचे फादर ऑफ नेशन म्हणजे बॅ. जीना पण स्वतला ब्लेम करत होते की कुठुन त्यांना अवदसा आठवली आणी कुठुन त्यांनी पाकीस्तान मागीतले. खुद्द जीनांनी हे कबुल केल होतं की त्यांच्या स्वप्नातल पाकीस्तान् सुशिक्षीत, सेक्युलर होता, पण तो बदलला. नशीब आपल की आपली मिलीटरी धार्मिक रंगाने बरबटलेली नाहीये.

हो आणी त्यांचे फादर ऑफ नेशन म्हणजे बॅ. जीना पण स्वतला ब्लेम करत होते की कुठुन त्यांना अवदसा आठवली आणी कुठुन त्यांनी पाकीस्तान मागीतले. खुद्द जीनांनी हे कबुल केल होतं की त्यांच्या स्वप्नातल पाकीस्तान् सुशिक्षीत, सेक्युलर होता, पण तो बदलला.>> Really? Is there any proof for this. As far as I know Jinnah died in Sept 1948. So by that time Pak is also in same state as India (struggling to establish).

जीनांना सेक्युलर पाकिस्तान हवा होता हे खरं वाटत नसेल तर लालकृष्ण अडवाणी आणि सुधींद्र कुलकर्णींना विचारा.

हेपा. माझा कुठल्याही भाजप/ कॉन्ग्रेस्/ राकॉ/ समाजवादी/ जद/ बसपा/शिवसेना अशा पक्षाशी जवळचा वा दूरचा पण संबंध नाही, कुणी नेता-अभिनेता माह्या वळकीचा नाही. मी कुठल्या पक्षाची मेंबर म्हाई, मंग पाकीस्तानात अडवाणी जाव द्या नायत कुलकर्णी, म्या कशाला कोणाला इचारु? तसेही बाप दाखव नायतर श्राद्ध कर या जमातीशी माझा छ्त्तिस चा आकडा हाये.

जीनां विषयी हे विधान मी काही वर्षापूर्वी वाचले होते. ते लोकप्रभा मध्ये होते की चित्रलेखा मध्ये हे मात्र मला आठवत नाही. माझी मेमरी इतकी इस्ट्राँग नाही, का ते आठवुन म्या तुम्हाला लिंका देऊ शकेन. विश्वास ठेवायचा तर ठेवा नायत उडत जावा कुठल्याही कंपनी च्या इमानाने अन ते पण तुमच्या पैशात. वक्के?

रश्मी, माझी दुर्दैवी चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद.
माझे मराठी नक्कीच गंडलेले आहे. मीच मायबोलीवर शिकतोय. वेळोवेळी हे कबूलही केलेय आणि व्याकरण, शुद्धलेखनांच्या सूचनांचे स्वागतही केलेय.
पण तरीही ज्याला काहीच मराठी येत नाही अश्यांना थोडेबहुत नक्कीच शिकवू शकतो. तसेही ईंग्रजी कच्चे असूनही शेजारच्या बालवाडीच्या पोरांना अधूनमधून ‘ए फॉर अ‍ॅप्पल’ अने ‘बी फॉर बॅट’ असे टोचन देत असतोच Happy

ऋन्मेष, आपली मातृभाषा ही आपली कितीही आवडती असली तरी जिच्यामुळे आपले आर्थिक, सामाजीक रहाणीमान सुधारु शकते, ती भाषा शिकणे क्रमप्राप्त ठरते, भलेही मग ती भाषा आपली नावडती का असेना.

जगात काही लोक दाखले देतात की रशियन्स आणी जर्मन्स तसेच फ्रेंच त्यांच्याच भाषेतुन शिकतात, व्यवहार करतात. आहे तसे, पण भारतात ते पूर्ण शक्य नाहीये, कारण १५ च्या वर ऑफिशीयल भाषा. त्यामुळे सर्वमान्य होईल अशी एकच इंग्रजी भाषा असल्याने आणी सायन्स, गणित, साहित्य पण त्यात जास्त प्रमाणावर असल्याने ती शिकणे बरे हे माझे वै. मत आहे. माझी मामे बहिण मराठी माध्यमातच शिकली. पण ११ वी पासुन तिने इंग्रजी माध्यमातुन कॉमर्स केले कारण मराठी त्या मानाने जास्त अवघड आहे असे तिला वाटले. अर्थात, हा तिचा वै. प्रश्न होता.

भारताच्या दृष्टीने पाक काय आहे हे एका मस्त इंग्लिश शब्दात सांगता येइल :
frenemy =friend + enemy.
वरून दाखवायला मित्र पण आतून मात्र पक्का शत्रू !

चर्चा नाही वाटली येथे, द्वेष, भांडणे, कुरघोडी, एक प्रकारे अपार्टमेंट मधले भांडणच वाटले,

काही पोष्टी उत्तम, उडन खटोला, लिंबुटींबु, बेफिकीर, मानव, Happy

६९ वरून आठवले -
आमच्या वसाहतीत ध्वजारोहणानंतर एक लाडके काका चार शब्द सांगायला उभे राहिले. ते म्हणाले, ६९ हा आकडा खूप काही सांगून जातो. तुम्ही हा आकडा इंग्रजीत लिहून बघा.
काय दिसते तुम्हाला?
तर तुम्हाला दिसेल की एका बाजूने सहाचा वेढा आणि दुसर्‍या बाजूने नवाचा वेढा. म्हणजेच एका बाजूला पाकिस्तान आणि दुसर्‍या बाजूला चीन. असे असूनही आज आपण ६९ वे ध्वजारोहण करण्यासाठी इथे अभिमानाने जमलेलो आहोत.....

वरून दाखवायला मित्र पण आतून मात्र पक्का शत्रू !
>>>>
आपण दाखवायला मित्र आहोत?
राजकीय मोदी-शरीफ-मनमोहन ईत्यादी भेटीगाठी सोडल्या तर कुठे दाखवतो नक्की मैत्री?

पाकिस्तानी आणि भारतीय लोकांचे भारताबाहेर एकमेकांशी वागण्याचे एक क्रिकेट मधले उदाहरण, एका ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नजरेतून Happy

I remember going in late on day one to bat and they thought I was Indian and said nothing to me. The next morning they discovered I was an Aussie and they got stuck into me big time. I remember asking Moin when was the last time the Australian RAF bombed Pakistan, because they were nice to me when they thought I was Indian but turned feral when they found out I was Aussie!

पूर्वीही आणि अजूनही भारतीय आणि पाकी खेळाडूंची मैदानावर व्हिजिबल खुन्नस खूप कमी असते. अनेकदा प्रेक्षकांनी आणखी पेटू नये म्हणून दोन्ही देशांच्या अ‍ॅड्व्हायजर्सनी मैदानावर फ्रेण्डली वागायला सांगितलेले असते.

Pages