६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंतप्रधान काळात मिळालेल्या भेटवस्तू विकून पैसे कमवले आणि विद्यापीठाची जागा खासगी बिल्डर ला दिली म्हणून इम्रान खान ला अटक करण्यात आली आहे .
इम्रान चा कार्यकाळ ३ वर्ष आणि ७ महिने होता .
१९४७ पासून आत्ता पर्यंत तेथे एकाही पंतप्रधान ने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही .
लियाकत अली खान याने ४ वर्ष आणि दोन महिने पंतप्रधान राहण्याचे रेकॉर्ड आत्ता पर्यंत कोणीही मोडू शकले नाही .

शांतता वादी धर्माचे बहूसंख्य मुस्लिम नागरिक , निधर्मी ऐवजी मुस्लिम राष्ट्र म्हणून हेतूपुरस्सर निवड केलेली असताना इतर धर्मातील लोकांचा अडसर नसताना पाकिस्तान आर्थिक दृष्ट्या कुठल्या कुठे पोहचायला हवा होता .
पण गेल्या सत्तर वर्षात तेथे लोकशाही नांदु शकली नाही , सतत अराजकता ......

मानव यांनी २०१६ च्या प्रतिसादात लिहीलेले आहे की - भारत निदान स्पेस टेक्नॉलॉ़जीमध्ये , पाकिस्तानला वरचढ आहे. बाकीची क्षेत्रे अन्य कोणास माहीत असल्यास सांगावीत.

अगदी बरोब्बर निष्कर्ष होता मानव. आपण चंद्रावरती पोचलोसुद्धा.

पोर्किस्तान ने नेहमी प्रमाणे युनो मध्ये काश्मीरचे तुणतुणे वाजवले , फरक इतकाच की भारत व्याप्त काश्मिरची तुलना वादग्रस्त , हिंसाचारला पाठींबा देणाऱ्या पॅलेस्टाइन बरोबर केली .
भारताने देखील पाकिस्तानला महत्व देण्याची गरज नाही सांगून फाट्यावर मारले .
तस पाहता कलम ३७० हटवून काश्मीरला भारतात सामावून घेतल्या नंतर काश्मीरी लोकं मुख्य प्रवाहात येण्यास उत्सुक असल्याचे जोडो यात्रेत दिसून आले , भारत जोडो यात्रेचे स्वागत काश्मीरी लोकांनी तिरंगा घेवून केले होते !
पाक व्याप्त काश्मीर ची खस्ता हालत त्यांच्या यू ट्यूबर्स कडून समजते की पाक व्याप्त काश्मीर मधील लोकं पायभूत सुविधा साठी आंदोलने करत आहेत आणि भारताच्या काश्मीर बद्दल त्यांना हेवा वाटतो .

<< पोर्किस्तान ने नेहमी प्रमाणे युनो मध्ये काश्मीरचे तुणतुणे वाजवले , फरक इतकाच की भारत व्याप्त काश्मिरची तुलना वादग्रस्त , हिंसाचारला पाठींबा देणाऱ्या पॅलेस्टाइन बरोबर केली .
भारताने देखील पाकिस्तानला महत्व देण्याची गरज नाही सांगून फाट्यावर मारले .
तस पाहता कलम ३७० हटवून काश्मीरला भारतात सामावून घेतल्या नंतर काश्मीरी लोकं मुख्य प्रवाहात येण्यास उत्सुक असल्याचे जोडो यात्रेत दिसून आले , भारत जोडो यात्रेचे स्वागत काश्मीरी लोकांनी तिरंगा घेवून केले होते !
पाक व्याप्त काश्मीर ची खस्ता हालत त्यांच्या यू ट्यूबर्स कडून समजते की पाक व्याप्त काश्मीर मधील लोकं पायभूत सुविधा साठी आंदोलने करत आहेत आणि भारताच्या काश्मीर बद्दल त्यांना हेवा वाटतो .
Submitted by फुरोगामी on 27 October, 2023 - 01:31 >>

------ काश्मीरचे लोक भारत जोडोत सामिल झाले होते पण निव्वळ नावातच भारतीय असलेल्या पक्षाने भारत जोडो अभियानात अडथळे आणायचा प्रयत्न करुन बघितला होता.

(अ) लाखो लोकांना एकत्र करत भले मोठे कुंभमेळा , गंगा स्नान, किंवा टोलेजंग निवडणूक सभा झाल्या पण भारत जोडो यात्रेच्या वेळी कोविडचे कारण पुढे करत यात्रा थांबविता येते का याबद्दल चाचपणी झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव यात्रेवर बंदी आणा अशी मागणी झाली होती का?
https://www.hindustantimes.com/india-news/centre-asks-rahul-gandhi-to-st...

(ब) भारत जोडो यात्रेच्या वेळी भाजपा समर्थक यात्रेच सामिल झालेच नाही पण यात्रेच्या मार्गात वर इमारतीमधून मोदी मोदी असे नारे देत होते . भारत माता कि जय असे तरी म्हणायचे.
https://www.youtube.com/watch?v=GiKB31ffKXk

अशा मोदी भक्तांनाही राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिले.... " तुम्ही द्वेष करा, मी प्रेम करतो... "

(क) सर्व गोदी मिडिआला भारत जोडो यात्रेबद्दल न लिहीण्याचे कडक आदेश दिले होते. मायबोलीकर भक्तांनी त्यांच्या भक्तीला साजेल असे " लहरी, धरसोड वृत्तीचे , बेभरवशाचे रागा" या बद्दल विश्लेषण केले होते.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उदासिन राहणारा भाजपा विचारवर्ग आजही भारत जोडो या संकल्पने अनेक योजने दूर आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उदासिन राहणारा भाजपा विचारवर्ग आजही भारत जोडो या संकल्पने अनेक योजने दूर आहे. >>>>>>>>>>
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दूर राहणारी भाजप विचारवर्ग ?
अरे वा ! ही नवीनच माहिती मिळाली !
मग भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी तुर्की साम्राज्याशी काही घेणेदेणे नसताना भारतात खिलापत चळवळ चालू करणारे महारथी कोण होते बरं ?

पाकिस्तान मधील तरुण वर्गाला ७२ हुरों चे आमिष दाखवून धर्मासाठी भरकटवनाऱ्या मौलाना तारिक जमील च्या मुलाला कोणीतरी गोळ्या घालून ७२ हूरों कडे पाठवून दिले .
# कर्मा

त्याने डिप्रेशन मुळे आत्महत्या केली आहे. ७२ हूरांचे ऑब्सेशन $%##^$ frustrated अंकल्सनाच जास्त असते.

भाड्याने देण्याचा व्यवसाय करणाऱ्या अंकल्स ना तर नक्किच obsession असते Happy
म्हणून त्या तारिक जमील बद्दल सहानुभूती असावी .

https://www.reuters.com/world/asia-pacific/afghans-return-taliban-rule-p... >>>>>>
17 लाख अफगाणी रिफुजिना पाकिस्तान ने देश सोडून जायला सांगितले . याच पाकिस्तान ने भारत ने आणलेल्या NRC कायद्या विरोधात स्टेटमेंट दिले होते त्यांचा काहीही संबंध नसताना .
आत्ता पर्यंत दीड लाख अफगाणी मायदेशी गेले आहेत .
विशेष म्हणजे भारतातील NRC विरोधात पाकिस्तानच्या साथीने सुरात सुर मिळवणारे भारतीय लीब्रे आणि कमूनिस्टेना ही बातमी दिसलीच नसावी . त्यांचा मसिहा पाकिस्तान जे करेल ते योग्यच असते असा लिब्र्यांचा समज असावा .....

पाकिस्तान मध्ये झालेल्या १४ आत्मघाती बॉम्बस्फोटात अफगाणी निर्वासितांचा सहभाग असल्याचे कारण देवून अफगाणी लोकांना हकलयला सुरुवात केली आहे असे पाकिस्तान चे म्हणणे आहे .
थोडावेळ ते गृहीत धरले तर भारताची रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरा बद्दल भूमिका वेगळी होती का ?
पण भारतातील देश लिव्र्यानी आणि कमुनिस्ट्या नी मूठभर फुटीर लोकांना साथ देवुन देश भारत एन आर सी विरोधात मोर्चे घेवून आणले , सोमि वर त्या कायद्या विरोधात पानेच्यापाने खर्च केली , मायबोली वर देखील.
भारताची सुरक्षा व्यवस्था खीळ खीळी करण्यात लिब्र्याना इतका उत्साह का असतो हे न समजणारे कोडे आहे .
सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात ते घुसखोर येवून ज्या समुदायात राहतात त्या समुदायातील एकाही व्यक्तीने आज पर्यंत एक ही घुसखोर पकडुन दिलेला नाही हे कशाचे द्योतक आहे ?
यावर काही लीब्र्यांचे म्हणणे असते की देशाचा गृह मंत्री काय करतोय ?
मग पोलिसांनी त्या वस्तीतील घराघरात घुसून लोकांकडे आधारकार्ड आहेत का ? ती ओरिजनल आहेत का हे बघायला पाहिजेत का ?
तसे केल्याने शांतता राहिलं का ?
शांतता नष्ट झाली की लिब्र्यांची सोरोस फंडिंग वर पुन्हा हाय तौबा मार डाला रे , अल्पसंख्यक ना टार्गेट केलं जातंय वैगेरे वैगेरे नाटकं चालू होणार .....

आजोबा, nrc कायदा काय आहे?

the UPA government had deported 82,728 Bangladeshi foreigners between 2005-2013, while the count was only 1,822 in the first four years of the Modi government.

किती थापा माराल.

शाहीन बाग ला caa / एन आर सी विरोधात आणि बांगलादेशी रोहींग्या ना हकलू नये म्हणून यांच्या सारख्या बऱ्याच आज्ज्या आंदोलन करायला बसलेल्या होत्या !
त्या काळात जाणीवपूर्वक देशात दंगली घडवून आणल्या गेल्या होत्या , घुसखोरांच्या समर्थन साठी देशाच्या संपत्ती ची जाळपोळ करण्यात आली होती.
या सगळ्या घटना ला जसे ते दंगेखोर जबाबदार आहेत तेव्हढेच त्यांना समर्थन देणारे लुबरे !
या उलट upa च्या काळात बांगलादेशीना हाकलू नये म्हणून भाजप ने बिलकुल विरोध केला नव्हता .
ते जाऊ द्या !
१७ लाख अफगाणी मुस्लिम पाकिस्तान मधून बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू आहे , पण त्या विरोधात पाकिस्तानी मुस्लिमांनी एकही मोर्चा काढला नाही , ना त्यांच्या देशाच्या संपत्ती ची हानी केली .......

कायद्याच़ं नाव माहीत नाही आणि निघाले पोस्टी पाडायला.
बाकी तुमच्या थापा तुम्हांला तरी पचतात का?
बांग्लादेशींना बाहेर काढायला सी एस एस nrc कशाला लाघत़य? युपीए ने त्याशिवायच काढलं ना?
.

पिस्तुले घेऊन फिरणारा तर रामगोपाल होता आणि गोली मारो म्हणणारा अनुराग‌ आणि द़ंगली दुसऱ्यांनी घडवल्या?

आणि caa पास होऊन चार वर्षे झाली. नत्याचे नियम तयार झाले का?

बरं आता मजेत लिहिताय की सिरीयसली? नाहीतर परत शेपूट घालाल

सी एस एस ? >>>>>>
हा कोणता कायदा आणला ?
पहिलं का स्वतः काय लिहितो ते कळत नाही आणि इतरांना शेपूट घाला म्हणणार !
बाय द वे शेपूट घाला सारख्या अजून कोणत्या शब्दांसाठी Admin साहेबांनी तुम्हाला अभय दिलंय ते आम्हाला कळू द्या तरी .
देशाचा संपत्तीची राखरांगोळी करणाऱ्यांसाठी वकिली करताना तारेवर खूपच उड्या माराव्या लागत असेल ना ?
कारण अख्ख्या देशाने बघितले आहे शहीन बाग मधील तमाशा .
शाहीन बाग मध्ये आंदोलन करणाऱ्यांना समर्थन देणाऱ्या लीब्र्ये पेक्षा पाकिस्तानी पब्लिक सज्ञान निघाली .
दिड लाख अफगाणी एका रात्रीत हाकलून दिले पण त्या अफगाणीच्या समर्थन साठी एकही मोर्चा निघाला नाहीं
.

खरे तर दहा बारा आयडी च प्रतिसाद लिहीत असतात .
एक विरोध करत असतो आणि दुसरा समर्थन.
ह्या दोन्ही गटातील निबार झालेले आयडी आहेत.
एकच विचाराने भारावलेले आहेत किंवा स्वार्थ मध्ये अडकलेले आहेत.

स्वतःच्या विश्वात च सर्व आयडी नी स्वतःला बंद करून घेतले आहे.

त्या मुळे प्रतिसाद एकच प्रकारचे असतात.
भरत काय लिहणार किंवा पुरोगामी काय लिहू शकतात ह्याचा अंदाज डोळे झाकून करता येतो.
नवीन आयडी नी विचार व्यक्त करायला हवेत काही तरी नवीन विचार त्या मुळे वाचायला मिळतील.
जुन्या आयडी न वर प्रतिसाद देण्यास बंदी घालावी.

पाकिस्तान मधील अतिरेकी लोकांच्या ग्रुप वर पाकिस्तान सरकार नी अत्यंत कठोर कारवाई केली .
गरज पडली तर सर्रास त्या लोकांचे एन्काऊंटर केले.
आणि भारत सरकार नी बिलकुल देशप्रेमी वर्तन नसणाऱ्या पण पाकिस्तान द्वेष करणाऱ्या लोकांवर एन्काऊंटर आणि जामीन मिळणार नाही अशा कलमा खाली अटक केली तर.
आणि
भारत ,पाकिस्तान ह्या दोन्ही देशातील सरकार नी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले .
तर
तर भारत पाकिस्तान विवाद सहज सुटेल.
काही मोठा कठीण प्रश्न नाही.
.पण भारतीय राजकारणी लोकांना निवडून येण्यासाठी पाकिस्तान लागतो.
तसेच पाकिस्तान मधील राजकीय पक्षांना निवडून येण्यासाठी भारत लागतोच.
खरी गेनबाची मेख इथेच आहे.

https://m.timesofindia.com/world/pakistan/14-pakistanis-arrested-for-ter...
१४ पाकिस्तानी नागरिकांना स्पेन सरकारने टेरर लिंक्स कनेक्टेड असल्याच्या आरोपाखाली नुकतीच अटक केली .
त्याच प्रमाणे आखाती देश देखील पाकिस्तानीना एकतर व्हिसा द्यायला उत्सुक नसतात किंवा हाकलून द्यायला एका पायावर तयार असतात.
सौदी ने नुकतेच सांगितले मक्केत असणाऱ्या भिकऱ्यात ९५ टक्के पाकिस्तानी मुस्लिम आहेत .
ब्रिटन ने लहान मुलींना फसवून जाळ्यात ओढणाऱ्या ३० पाकिस्तानीना जेल मध्ये टाकले , आता त्यांच्यावर केस चालू आहे.
या ढोबळ उदाहरणावरून ६९ वर्षानंतर पाकिस्तानी पब्लिक त्यांच्या देशाचे नाव किती उज्वल करत आहेत हे लक्षात येईल !

Pages