६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काश्मीरविषयी म्हणायचेच झाले, झाला इतका गोंधळ पुरेसा आहे. एव्हाना आपल्याला समजायला हवे की, बहुतांश काश्मिरींची भारतात राहण्याची मुळीच इच्छा नाही. मुळात आडातच नाही, तर पोहोऱ्यात देशप्रेम येणार कसे ?>>>>>>

काश्मीर मध्ये भारताविषयी पद्धतशीरपणे द्वेष निर्माण केला गेला. पंजाबमध्ये पण खलिस्तानसाठी प्रयत्न करून झाले. पुढचा क्रमांक कोणाचा? सेव्हन सिस्टर्स? तामिळनाडू? प्रत्येक ठिकाणी पैसे आणि शस्त्रात्रे ओतून असा द्वेष निर्माण केला की भारताने नांगी टाकून त्यांना वेगळं होऊ द्यायचं का ? आपले शेजारी भारताचे तुकडे करायला टपून बसले आहेत. कारण आपल्या देशाची एकी हि आपली ताकत आहे. त्यांना आपल्या या देशाचे छोट्या छोट्या प्रांतात विभाजन करायचे आहे.

कोणाच्याही मनात दुजाभाव निर्माण करणे, तुझ्यावर अन्याय होतो हि भावना निर्माण करणे खूप सोप्पे असते. त्यात भारतासारख्या विविधता असलेल्या देशात तर अजूनच.

बाकी धाग्याच्या विषयाच्या अनुषंगाने.....

भारत आणि पाकिस्तान तुलना करून किंवा आम्ही बघा त्यांच्यापेक्षा भारी असे म्हणून पाठ थोपटत बसण्यात काही उपयोग नाही. भारताने आपल्या देशाच्या सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष द्यावे.

आधी कोणीतरी लिहिल्याप्रमाणे धार्मिक मूलतत्त्ववाद, नुसती दिखाऊ राष्ट्रवादी प्रवृत्ती, त्या देशाबद्दलचा वैरभाव या पासून लांब रहावे.
त्याच बरोबर तिकडून होणाऱ्या दहशतवादी, भारत विरोधी कारवायांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी आणि आवश्यक तिथे तिखट प्रतिसाद द्यावा(च).

<<<< सामान्य माणूस इतका विचार करतो? >> नसेलही करत . पण विचारवंत, राजकारणी बोलतायत त्यांत कितपत तथ्य आहे, हे ओळखण्याची एक रांगडी, उपजत कला कमी-अधिक प्रमाणात असतेच प्रत्येकाकडे. आणि, राजकारणी व नेत्यांबद्दल म्हणाल तर वाढत्या विचारप्रवाहाची तत्परतेने दखल घेवून आपणच त्यांत अग्रेअसर आहोत असं दाखवणं यात तर त्यांचा हातखंडाच असतो ! << सामान्य लोक हे मेंढराप्रमाणे असतात..... आणि बाकी त्यावर चालतात.>> मेंढराप्रमाणे नसेल पण लांडग्याप्रमाणे नेते व राजकारणीही लोकमताच्या रस्त्यानेच कटाक्षाने चालतात व म्हणूनच बव्हंशी ते नेते म्हणून रहातात. Wink
<< आधी कोणीतरी लिहिल्याप्रमाणे धार्मिक मूलतत्त्ववाद, नुसती दिखाऊ राष्ट्रवादी प्रवृत्ती, त्या देशाबद्दलचा वैरभाव या पासून लांब रहावे.>> सहमत.

काश्मीर मध्ये भारताविषयी पद्धतशीरपणे द्वेष निर्माण केला गेला. पंजाबमध्ये पण खलिस्तानसाठी प्रयत्न करून झाले. पुढचा क्रमांक कोणाचा? सेव्हन सिस्टर्स? तामिळनाडू? प्रत्येक ठिकाणी पैसे आणि शस्त्रात्रे ओतून असा द्वेष निर्माण केला की भारताने नांगी टाकून त्यांना वेगळं होऊ द्यायचं का ? आपले शेजारी भारताचे तुकडे करायला टपून बसले आहेत. कारण आपल्या देशाची एकी हि आपली ताकत आहे. त्यांना आपल्या या देशाचे छोट्या छोट्या प्रांतात विभाजन करायचे आहे.

कोणाच्याही मनात दुजाभाव निर्माण करणे, तुझ्यावर अन्याय होतो हि भावना निर्माण करणे खूप सोप्पे असते. त्यात भारतासारख्या विविधता असलेल्या देशात तर अजूनच. >>>> प्रचंड सहमत. ह्याला सहजी बळी पडणं म्हणजे आपल्यापरीने ध्रुवीकरणाला हातभार लावणं.

आधी कोणीतरी लिहिल्याप्रमाणे धार्मिक मूलतत्त्ववाद, नुसती दिखाऊ राष्ट्रवादी प्रवृत्ती, त्या देशाबद्दलचा वैरभाव या पासून लांब रहावे.
त्याच बरोबर तिकडून होणाऱ्या दहशतवादी, भारत विरोधी कारवायांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी आणि आवश्यक तिथे तिखट प्रतिसाद द्यावा(च). >>>> ह्याच्याशीही अगदीच सहमत.

आपल्या देशाची एकी हि आपली ताकत आहे. त्यांना आपल्या या देशाचे छोट्या छोट्या प्रांतात विभाजन करायचे आहे.

>> सहमत. मात्र मुळातच काश्मीर खोऱ्यातील भावना भारतात सामील होण्यास अनुकूल नव्हती, पाकिस्तानने त्या भावनेचा भडका उडवण्यास मदत केली इतकेच. तसेही काश्मीरचा उपयोग लष्करासाठी मोक्याच्या ठिकाणासारखा असावा. बाकी अन्य कोठलाही फायदा याक्षणी दिसत नाही.

पण बाकी राज्ये राजीखुशीने नांदत आहेत असेही नाही. आपण केलेला तामिळनाडूचा उल्लेख पुरेसा आहे. कधी कधी वाटून जाते कि एकसंघ समाज असता तर असे घडले नसते (पण अशा समाजात कदाचित धार्मिक मूलतत्त्ववाद झपाट्याने वाढला असता).

बाकी धाग्याच्या अनुषंगाने, बऱ्याच वेळा भारतातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी व्यक्त केल्या, की पाकिस्तानचे दाखले देऊन आपल्याकडे कशी चांगली परिस्थिती आहे, याचे गोडवे गेले जातात. हे म्हणजे आपले घर जळत असताना शेजारच्याचे जमीनदोस्त झाले, यावर समाधान मानल्यासारखे आहे.
अशा गोष्टींनी आपले नुकसानच होते.
तुलना नेहमी उत्कृष्ट गोष्टीबरोबर करावी. ISRO ची तुलना NASA सोबत व्हावी, SUPARCO (पाकिस्तान अवकाश संशोधन केंद्र) सोबत नाही. अशानेच आपली उत्तरोत्तर प्रगती साधेल.

जसा पाकिस्तानात भारतीय द्वेष पसरवला जातोय तसेच भारतातही होतेय का ?

बलुचिस्तान बद्दल, १५ ऑगस्ट च्या भाषणात नमोंना बोलायची काय गरज होती ? तशी मदत तर इंदिरा गांधीच्या काळापासूनच होत होती, पण त्यांनी कधीही त्याचे जाहीर उल्लेख केले नाहीत.

तूम्ही काश्मिर मधे करताय ते आम्ही तिथे करु.. असा पवित्रा आहे का ? मग दोन्ही देश एकाच मार्गावर आहेत म्हणायचे.

मग ते हि बांगला देशचा वचपा काढत असतील ( आताच्या लोकांना नीट जाणवणार नाही, पण १९७१ च्या आधी, म्हणजे आमच्या शालेय पुस्तकात, बांगला देश हा पूर्व पाकिस्तान म्हणून दाखवला जात असे.. आणि चाचा साहेबांना, त्या दोन भागांना जोडणारा कॉरिडॉर द्यायचा होता. )

आणि फक्त ऋन्मेष चा धागा आहे म्हणून लिहितोय.. शा खा साहेबांची नेमकी कुठल्या कारणासाठी विमानतळावर चौकशी झाली ?

मुळातच काश्मीर खोऱ्यातील भावना भारतात सामील होण्यास अनुकूल नव्हती>>>>>

हे विधान नक्की कोणत्या आधारावर करत आहात ?
जरा काहीतरी विदा, ऑथेंटिक रिपोर्ट द्या प्लिज.

तुलना नेहमी उत्कृष्ट गोष्टीबरोबर करावी>>>>

मला तरी वाटते कोणाशीच तुलना करू नका. शिका मात्र सर्वांकडून. एखाद्याकडे पाहून काय करायला हवे हे शिकता येते, दुसरीकडे पाहून काय करू नये हे..

भाऊ तुम्ही म्हणत आहात तसेही काही केसेस मध्ये आहे.
आपला दोघांचा मुद्दा जरी वेगवेगळा असला तरी दोन्ही बाजूनी तगडी उदाहरणे देता येतील पण त्याचा या धाग्याशी काही संबंध नाही. मग इथेच थांबू या. समाजाची मानसिकता या संदर्भात काही धागा निघाला तर तिथे बोलू. Happy

हे विधान नक्की कोणत्या आधारावर करत आहात ?
<<
महोदय, ते एक ऐतिहासिक सत्य आहे.

त्यांना विदा मागण्याऐवजी 'अभ्यास' वाढवलेला बरा राहील, असे सुचवितो. भारतात विलीन व्हावे, अशी काश्मिरातील मेजॉरिटी जनतेची इच्छा होती, अशा अर्थाचा विदा तुमच्याकडे आहे का? तो आधी द्या, मग त्यांच्याऐवजी मी त्या बाजूच्या लिंका देतो.

विदा मागण्याऐवजी 'अभ्यास' वाढवलेला बरा राहील>>>>

अभ्यास करण्यासाठीच विदा मागितली आहे... प्लिज हा शब्द दिसला आहे का ?

भारतात विलीन व्हावे, अशी काश्मिरातील मेजॉरिटी जनतेची इच्छा होती, अशा अर्थाचा विदा तुमच्याकडे आहे का>>>>>

मी असे विधान केले आहे का ????? मी विधान केले असते तर नक्कीच विदा दिली असती.

भारत द्वेष हेच सगळ्याचे मूळ आहे. काश्मिर मध्ये ( सर्वांनाच माहीत आहे ) शेकडो सिनेमाचे शुटिंग झालेय, आणी काश्मीर व भारत सरकार च्या मदतीने तिथे पर्यटन पण वाढले. आणी पर्यटन हाच तिथला मुख्य व्यवसाय आहे. हे कुणी पण मान्य करेल.

आता जरा सविस्तरपणे:- काही वर्षांपूर्वी मी एन जी सी का डिस्कव्हरी चॅनेल वर पाकीस्तानातल्याच एका प्रदेशाची डॉक्युमेंटरी पाहिली. नीट विकास केला तर कश्मीर च्या जवळपास जाईल इतके अफाट सौंदर्य त्या प्रदेशात आहे. हा प्रदेश पाकीस्तानच्या वरल्या अंगाला आहे ( अफगणिस्तान साईड नाही) काहीतरी विचीत्र नाव होते आणी शेवटी स्तान हे बिरुद होते. मुळात पाकी सरकार आणी आर्मीला देशाचा विकास करायचा नाहीच आहे. तसे असते तर असली सौंदर्य स्थळे विकसीत होऊन तिथेही जगभरातले पर्यटक आले असते. पण आर्मी आणी बाकी लोकांना धर्मावर आधारीतच देश बनवायचा असल्याने शेजारी देशांमध्ये आतंक आणी दहशतवादच माजवुन तिथली व्यवस्था पूर्ण खिळखीळीत करणे हाच एकमेव आणी एकमेव उद्देश ठेवायचा आहे.

पाकीस्तानी आपल्या देशाबाहेर गेले की दुसर्‍याशी चांगलेच वागतात, पण जरा देशाचा विषय निघु द्या, मग जाम कडवे होतात. आपण पाकी खेळाडु आणी कलाकरांना सहज व्हिसा आणी सन्मान देतो पण आपल्या अशा किती खेळाडु वा कलाकाराला तिथे मान-सन्मान मिळालाय? जगजीत सिंग हे उदाहरण आहे ना पुढे? शोएब अख्तर आत्ता सध्या एका चॅनेलवर अँकरींग करतोय, आपल्या सचीन ,राहुल, गावस्कर, कपिल देव ला पाकीस्तानात असे करु देतील? अदनान सामीला आपण भारतीय नागरीकत्व दिलय, पण जे लोक नुसत्या कार्यक्रमा साठी जाऊ पहातात त्यांना काय अनूभव येतो? भाजपचे आहेत म्हणून उगाच भूई बडवु नका, पण आपल्या गृह मंत्र्यांना काय अनूभव आहे पाकीस्तानात आता सार्क परीषदेत मध्ये? चांगला अनूभव होता का तो? भावनेच्या आहारी जाऊ नका. पण अफगणिस्तानी लोक जेवढे मनमोकळे आहेत, तेवढे पाकीस्तानी नाहीत कारण त्यांची परवरीशच तशी झालीय.

वर वरच्या अनूभवाने मी बोलत नाहीये कारण परदेशात तसे लोक भेटलेत, चांगले पण आणी वाईट पण.

जरा काहीतरी विदा, ऑथेंटिक रिपोर्ट द्या प्लिज.

>> विदा म्हणजे काय कृअपया सांगावे . कधी ऐकलेला नाही शब्द

काहीतरी विचीत्र नाव होते आणी शेवटी स्तान हे बिरुद होते.
>>
गिलगिट- बाल्टीस्तान तर नव्हे? तसे असेल तर तो आपण क्लेम करीत असलेल्या पीओके चाच भाग आहे.
Gilgit Baltistan is, perhaps, the most spectacular region of Pakistan in terms of its geography and scenic beauty. Here world’s three mightiest mountain ranges: the Karakoram, the Handukuch and the Himalayas – meet. The whole of Gilgit Baltistan is like a paradise for mountaineers, trekkers and anglers.

एकदा तुलना करतोच आहोत, अन ती करणे ओघाने येतेच, तर मग दोनही देशातील स्त्रीयांच्या स्थितीविषयी तुलना का करायला नको म्हणता?

नाही ते बहुतेक काफिरीस्तान असावे मला नक्की आठवत नाही. पण खालची लिंक बघा.

http://www.hunzaguidespakistan.com/kalash-valleys-chillinji-trek ते कलश व्हॅली नाव गुगल करा, जाम सुंदर इमेजेस आहेत.

मग ते हि बांगला देशचा वचपा काढत असतील ( आताच्या लोकांना नीट जाणवणार नाही, पण १९७१ च्या आधी, म्हणजे आमच्या शालेय पुस्तकात, बांगला देश हा पूर्व पाकिस्तान म्हणून दाखवला जात असे.. आणि चाचा साहेबांना, त्या दोन भागांना जोडणारा कॉरिडॉर द्यायचा होता. ) >> दिनेश, ती कॉरिडॉर ची मागणी मुस्लिम लीग ची होती. तत्कालीन कोणत्याही काँग्रेस नेत्याचा त्याला सपोर्ट नव्ह्ता. त्या प्रचंड विरोधामुळेच माउण्टबॅटन ने तो क्लॉज काढून बाकी पाकिस्तान स्वीकारायला लावलेला जीनाला. किंबहुना तेव्हा पाक समर्थकांना मूळच्या पेक्षा बराच कमी भूभाग मिळाला असेच वाटले होते त्यामुळे.

चाचांना पाक चे कधीच कौतुक नव्हते (मुस्लिमांचे होते. पण तो पूर्ण वेगळा पॉइण्ट आहे). इतर अनेक बाबतीत उदारमतवादी भूमिका घेणारे चाचा काश्मीरच्या बाबतीत इतके ठाम होते, कारण काश्मीर पाक कडे जाणे हे काश्मीरच्या दृष्टीने चुकीचे आहे असेच त्यांना वाटत होते.

पण जे लोक नुसत्या कार्यक्रमा साठी जाऊ पहातात त्यांना काय अनूभव येतो? >>> रश्मी, हे खरे नाही. पाक मधल्या अतिरेकी संघटना व तेथील सामान्य लोक यांच्यात याबाबतीत खूप फरक आहे. तेथे जाउन आलेल्यांचा थेट अनुभव मी ऐकलेला आहे याबाबतीत.

हॅपीनेस इंडेक्स कुराण, बायबल आणि हिण्दूचे जे काय हाताला लागेल ते पुस्तक हे सगळे एकत्र केले तर जे काय निर्माण होईल त्यापेक्षाही जास्त पॉवरफुल, प्रात:स्मरणिय आणि विश्वसनिय आहे हे इथे माबोवरच कळल्यावर मुद्दाम हा इंडेक्स काय याची गुगलकडे चौकशी केली.

२०१२ पासुन प्रकाशित होणा-या ह्या इंडेक्स्सची सँपल साईज सर्वेतल्या प्रत्येक देशातले १००० नागरिक प्रती वर्ष एवढी आहे. म्हणजे भारताचे नाव २०१२ पासुन या यादित येत असेल तर २०१६ मध्ये भारतातले ४००० नागरिक या लोकांच्या सर्वेमध्ये भाग घेऊ शकले.

२०१६ला भारताचा नंबर पाकिस्तानपेक्षाही खाली याचा अर्थ एकच, हे सगळेच्या सगळे चार हजार लोक नेमके मोदी हेटर्स आणि अर्थातच सेक्युलर्स निघाले. जर सगळे लोक मोदी भक्त निघाले असते तर भारताचा नंबर पहिला असता. ह्याच लॉजिकने पाकिस्तानातल्या ४००० लोकातले कोणीही मुलांवर, वकिलांवर आणि इतरत्र झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्याना ओळखत नसावे. जाऊद्या, सर्वेवाल्यांना जे रिकामटेकडे सापडले त्यांना त्यांनी धरले.

एनी वेज, १२० करोड लोकांच्या देशात ४००० लोकांच्या मुलाखती घेऊन जो निष्कर्‍ष काढला जातो तो पुर्ण देशाचे प्रतिनिधित्व करत असेल याच कोणतीही शंका नाही.

काश्मीर प्रश्नी माझी ही भूमिका मवाळ आहे पण याचा असा अर्थ होत नाही की काश्मीर च देऊन टाकावा. कारण काश्मीर प्रश्नी बोलणी आणि वाटाघाटी करून मार्ग निघो ( जी माझी भूमिका आहे) अथवा बंदुकीने मार्ग निघो काश्मीर भारतातच राहायला हवा. कारण म्हातारी मेलेल्याच दुःख नाही काळ सोकावतो. आज कश्मीर जाईल उद्या पंजाब, परत नॉर्थ ईस्ट, तामिळनाडू, यांची रांग लागेल. मग काय शेवटी शेवटी काही लोक मुबंई सुद्धा वेगळा देश मागतील.
बाकी पाकिस्तान च्या सामान्य लोकांविषयी द्वेष भावना नाही, कारण काही पाकिस्तानी मित्र असल्यामुळे त्यांची अपल्याविषयची भावना जाणून आहे. मात्र पाकिस्तान चे राज्यकर्ते आणि सैन्यधिकारी हे कट्टर भारत विरोधी आहेत ज्यांच्याविषयी द्वेष आहे. भविष्यात भारतीय लोकांचा पाकिस्तान द्वेष थोडा का होईना पण कमी होईल असं दिसतंय कारण चीन आपला शत्रू म्हणून उदायाला घेईल.

उदय, युनेस्कोने व्हॉटसॅपवर जाहिर केलं असतं तर रिलायबिलिटी आणखी वाढली असती.
Wink

बाकी साधनाताईंनी ज्याप्रकारे स्पष्टीकरण दिले आहे ते फार फार आवडले.
आय मीन एकशे वीस करोड मधून ४००० लोक निवडले जे सगळेच्या सगळे मोदी हेटर्स होतेव्ह पण सेक्युलरही होते.
म्हणजे काय योगायोग नसेल.
म्हणजे उलटा विचार केला तर भारतात मोदी हेटर्स आणि सेक्युलर लोक इतके वाढलेत की कुठल्याही ३२ लाख लोकांत एक माणूस रँडमली उचलला तर तो मोदी हेटर -सेक्युलर काँबोचा असेलच असेल.

वा वा!
मी तर या लॉजिकच्या खरे असण्याच्या नुसत्या कल्पनेनेच सुखावून गेल्येय.

साती आपल्याला हवे तसे interpretation करता येते हेहि यावरून सिद्ध होते. माझ्या निष्कर्षावरून तुम्हीही तुम्हाला हवा तो निष्कर्ष काढू शकलात. अजून काही लोकांनी डोके लावले तर अजून चांगले निष्कर्ष निघतील.

युनेस्को, व्हा ऍ, फेसबुक वरचे नावावरूनच अजेंडे ओळखु येणारे ग्रुप्स हि सगळी वाढत्या विश्वासार्हतेची एकेक चढती पायरी आहे. इथे माबोवरच दोन चार धाग्यांवर उल्लेख आला तरी खूप होते.

दोन्हीकडच्या राजकारण्यांनी तुंबड्या भरण्यासाठी हा प्रश्न तेवत ठेवला आहे. सैनिकांच्या मनात एकमेकांबद्दल शतृत्वाची भावना असणे नक्कीच समर्थनीय आहे. पण सीमेपासून शेकडो मैलावर आरामात राहणार्‍या, चावडीवरच्या गप्पांमध्ये असले विषय घेणार्‍या बिनकामाच्या नागरिकांनी 'पाकिस्तान आपल्यापेक्षा कमी विकसित आहे' ह्या (खर्‍या / खोट्या) माहितीवर भुलून जायचे काही कारणच नाही. स्वतःचे दैनंदिन प्रॉब्लेम्स सोडवण्यात आयुष्य खर्ची घालणार्‍या आमच्यासारख्या सामान्यांना काय घेणे की देणे, त्या देशाचा किती विकास झाला ह्याच्याशी? वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे स्वतःच्या देशातील आयुष्य सुलभ व्हावे ह्यासाठी किमान नियम पाळण्याची मानसिकता आधी स्वतःमध्ये निर्माण करावी हे असले थोर विषय निवडण्यापेक्षा आणि त्यावर हुरळून जाण्यापेक्षा!

हा प्रतिसाद वर चर्चा करणारे किंवा ऋन्मेष ह्यापैकी कोणालाही उद्देशून नसून हा प्रतिसाद त्या लोकांना उद्देशून आहे जे असे निरर्थक संदेश पाठवत राहतात, वाचतात, हुरळतात आणि पुन्हा स्वतःत मश्गुल होतात.

-'बेफिकीर'!

वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे स्वतःच्या देशातील आयुष्य सुलभ व्हावे ह्यासाठी किमान नियम पाळण्याची मानसिकता आधी स्वतःमध्ये निर्माण करावी हे असले थोर विषय निवडण्यापेक्षा आणि त्यावर हुरळून जाण्यापेक्षा!>>>>>> हे वाक्य जास्त आवडले, तसेही बेफिकीर यांचा प्रतीसाद जास्तच आवडला.

मी उद्या सर्वे करण्याआधी लोकांना विचारेल तुम्ही मोदी हेटर्स की मोदी भक्त.
खर तर सध्याच्या स्थितीत भारतात सर्वे करण्याआधी एजंसीच्या लोकांनी हा प्रश्न आधी विचारायला हवा. कारण तो प्रश्न जास्त महत्वाचा आहे हे आता कळले आहे. त्या आधारे पुढे येणारी उत्तरे बरोबर आहे की चूक हे ठरवायला सोपे जाईल . उदा. गाण्याचा स्पर्धक गाणे सादर करण्याआधी स्वतःची माहीती देतो तसे सर्वेची उत्तरे देण्याआधी मी अमुक तमूक. गाव ढमूक आणि मी मोदी भक्त / मोदी हेटर आहे. आता मी माझे उत्तर देतो.

त्या नंतर कुणाला काही प्रश्न पडणार नाही

( काही महिन्यानंतर असेच "अमेरिकेत" सुध्दा करावे लागणार आहे याची 'भविष्यवाणी' आताच करून ठेवतो Wink )

अभ्यास करण्यासाठीच विदा मागितली आहे... प्लिज हा शब्द दिसला आहे का ?

<<

तो दिसला.

८ वर्षे माबोवर वावरणार्‍या व गूगल हाताशी असणार्‍या व्यक्तीने, जेव्हा

>>
हे विधान नक्की कोणत्या आधारावर करत आहात ?
जरा काहीतरी विदा, ऑथेंटिक रिपोर्ट द्या प्लिज.
<<

असे विधान केलेले असते, तेव्हा त्याचा अर्थ, 'उगा थापा मारू नका, पुरावा द्या' असा असतो, हे तुम्हाला आता नव्याने सांगायला हवे असे वाटत नाही.

त्यातलं प्लीज हे किती मानभावी असते, त्याबद्दल मला सविनय शंका आहे.

Pages