६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुरटे सर आले पाकिस्तान ला वाचवायला !
जमल तर घरदार विकून त्यांना अट्याच्या पिशव्या पण पाठवा. .
तुम्ही मा बो वर पाकिस्तान बद्दल सिंपथी कितीही क्रियेट केली तरी तरी मोदी माबो वाचत नसल्यामुळे पाकिस्तान ला भीक देण्याचा प्रश्नच येत नाही Happy

Rofl मोदी एकवेळ अफगणिस्तानला मदत देतील, पण पाकड्यांना अजीबात नाही. काय तर म्हणे पाकी लोक करोना मध्ये भारतीयांसाठी प्रार्थना करत होते. Proud अरे तिथे मागच्या वेळी शाळेवर हल्ला होऊन निरपराध लहान मुले गेली तर काही पालक रडुन रडुन असेही म्हणत होते की भारतात व्हायला हवे होते. बहुतेक हे त्या वेळी डोळे बंद करुन निवडक बातम्याच वाचत असतील. परवाच पाकीस्तानात होळी खेळली म्हणून एका हिंदु मुलावर हल्ला केला. तिथले गणपतीचे देऊळ उध्वस्त केले. काय आहे, इथला लाचार भिकार मिडीया तुम्हाला खरे काय ते कधीच दाखवणार नाही. जावेद अखतर यांनी पाकीस्तानाला आरसा दाखवला तर तिथले लोक म्हणतात तुम्हाला सुखरुप जाऊ द्यायला नाही पाहीजे होते. आणी मयेकरांना तरीही पाकड्यांचा पुळका. धन्य हो !!

यांचा पप्प्या चीन मध्ये लोकशाही आहे म्हणून सांगतो. एवढा मतीमंद पणा बरा नव्हे.

रश्मी, कागाळू सर यांना भारतात काय चालले आहे यापेक्षा पाकिस्तानात काय चालले आहे याची अधिक माहिती असते. पाकिस्तानसे इतना प्यार क्यों? मोदीसोबत पुढच्या वेळी बिर्याणी खायला जायचा विचार आहे का?

आम्ही पाकिस्तान मधील हिंदू आणि ख्रिश्चन लोकांचे जीवन पाकड्यानी मुश्किल करून टाकल्यामुळे त्यांचा ओपनली द्वेष करतो .
पण त्या पाकड्यावर अतोनात प्रेम करण्याचे भुरटे सरांचे कारण कळेल काय ? Happy
आणि pissfully नी दलितांवर कितीही अत्याचार केले तरी गप्प बसणारे भुरटे सर गादीवरील कुस्त्या लावून देणारे पंच वाटतात .....

पाकिस्तान शी तुलना स्वतः शी करून घेणे हे च लाजिरवाणे आहे
हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून भारत उत्तम स्थिती मध्ये आहे.
मुस्लिम देश वाईट आहेत तर ..
भारताची तुलना दुबई बरोबर करा..
तो पण मुस्लिम देश आहे.
पण भारतातील सर्व श्रीमंत लोकांचे निवास स्थान दुबई च आहे.
मुंबई पेक्षा त्यांना दुबई जास्त आवडते.
पाकिस्तान शी तुलना करून स्वतःची किंमत कमी करून घेण्यात काय अर्थ आहे

>यांचा पप्प्या चीन मध्ये लोकशाही आहे म्हणून सांगतो. एवढा मतीमंद पणा बरा नव्हे.

फेक न्यूज च्या शेणात अनेकदा पाय घसरूनही राहूल गांधी, सारुख खान यांच्याबद्दल फेक न्यूज देण्याची आपली चिकाटी स्पृहणीय आहे. इतक्या चिकाटीने रामाची भक्ती केला असती तर एव्हाना मर्यादापुरुषोत्तम श्री राम प्रसन्न होउन अवतीर्ण झाले असते.

जात जाता, ५६ इंच सिंहाने अजून एकही प्रेस कॉन्फ केली नाहीये.

ते मुस्लिम कट्टर आपण हिंदू कट्टर.
शिक्षण,आरोग्य व्यवस्था,नोकऱ्या,व्यवसाय,शेती ची अवस्था ,कायदा सू व्यवस्था .
ह्याला पण किंमत ध्या ,हेच पॉइंट महत्वाचे आहेत

गोष्ट क्र. : १
एक माणूस असतो आणि एक गाढव असतं. माणूस रोज आपण कालच्यापेक्षा जास्त चांगले कसे होता येईल ह्याचा विचार करुन काम करत असतो आणि आपली योजलेली गोष्ट प्रत्यक्षात आली नाही की दु:खी होत असतो.
गाढव ५० वर्षापुर्वी देखील उकीरड्यावर चरत होते आणि आज देखील उकीरड्यावरच चरते. उकीरड्यावर रोज वाढता कचरा पाहून त्याचा आनंदाचा निर्देशांक वर वरच जात असतो. माणूस मात्र गाढवाचा आनंदाचा निर्देशांक वाढताना पाहून अजूनच दु:खी होत असतो.
----
गोष्ट क्र. २ :
एक वेश्या होती आणि एक साधीसुधी गृहिणी होती. मेल्यानंतर वेश्या स्वर्गात गेली आणी साधीसुधी गृहिणी नरकात गेली.
वेश्या रोज विचार करत असे की ही गृहिणी किती चांगली आहे. पतीची सेवा करते, मुलांची काळजी घेते.
गृहिणी रोज विचार करत असे की ही वेश्या किती नालायक आहे. आज हिच्याकडे हा आला, उद्या तो आला . आज ही काय करत असेल ?
----
तळटीप - प्रतिसादाचा जॉनर डार्क ललित आहे. त्यामुळे जे प्रतिसाद कर्त्याला जे सांगायचे आहे ते प्रत्येक स्त्री-पुरुषापर्यंत पोहोचेल याची खात्री नाही. (खुद्द प्रतिसादकर्त्याला तरी ते कळाले असेलच याची खात्री नाही Happy

मायबोलीच्या नियमास अनूसरुन मुळ विषय आणि त्याच्यावरील प्रतिसादाचा अर्थाअर्थी संबंध असेलच असे नाही. तसे आढळल्यास तो एक योगायोग समजावा Happy

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.>>>>>>>>>>
जगाच्या पाठीवरील पन्नास साठ मुस्लिम देशापैकी एक ही देश प्रगत किँवा प्रगतशील नाही , त्याला पाकिस्तान अपवाद कसा ठरू शकतो ?
४७ मध्ये मुस्लिम धर्माच्या पायावर स्थापन झालेला पाकिस्तान अजूनही धर्मच कुरवळून बसलेला आहे . अल्पसंख्याकांची संख्या सत्तर वर्षात २० टक्क्यावरून १ वर आली , म्हणजे ते १९ टक्के मारले गेलेत का ?
की त्यातील काही जणांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले ?
ते अखंड भारत च्या वल्गना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे , अफगाणिस्तान , पाकिस्तान मध्ये आठवड्यात एक तरी बॉम्बस्फोट करवून विरोधी धर्मियांना संपवण्याचे काम जोरात चालू असताना कशाला पाहिजे अखंड भारत ?
मी तर म्हणतो भारतातील असलेले पाकिस्तानी हितचिंतक ना तिकडे जबरदस्तीने पाठवले पाहिजे , प्रत्येकी एक कोटी रुपयांचा करार पाकिस्तान बरोबर केला तर ते ही आनंदाने यांना स्वीकारतील .
केरळ मधील कित्तेक मुस्लिम धर्मप्रेमी सिरिया मध्ये जावून धर्माची सेवा करून आले , त्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम महिला देखील होत्या .
त्याच प्रमाणे भारतातील पाक प्रेमींनी तिकडे जावून पाकिस्तानच्या उभारणीत लक्षणीय सहभाग घ्यावा आणि जन्म सार्थकी लावावा !
पण एक मात्र नक्की पाकिस्तानची निर्मिती करण्यात गांधीजींनी देखील मोलाचे सहकार्य केले होते , नाहीतर भारतात देखील सीरिया सारखी प्रगती दिसली असती .

तरीही एक मात्र गोष्ट नक्की पाकिस्तान मधील मुस्लिम आणि भारतातील मुस्लिम मध्ये खूप फरक जाणवत होता , पण लिब्रुज नी भारतातील लोकांना बिघडवले !

अरेरे. शेवटी खापर फोडायला लिब्रूच का बरं! ते तर अगदीच मूठभर आहेत बिचारे. एवढ्याश्या लिब्रूंनी जे बिघडवले ते अवाढव्य संख्येतल्या अ - लिब्रू लोकांना का बरे सुधारता नाही आले!

आणि लिब्रू नेहमीच अल्पसंख्य असतात आणि त्यांच्या काळात धोपटले जातात हा इतिहास आहे.

इंडियन लिब्रलस डोळे झाकून कट्टर मुस्लिम धर्मियांना देखील समर्थन का देतात ?
याचे विश्लेषण तस्लिमा नसरीन ने छान केले आहे !
https://theprint.in/opinion/indian-liberals-want-to-support-everything-m...

भारतात २२ टक्के मुस्लिम आहेत , आणि ६८ टक्के इतर !
याच्या अगदी उलट परिस्थिती असती तर ?
पाकिस्तान सारखीच अनागोंदी पसरली असती का ?

सर्व जगात आणि विशेषतः सौदी अरेबियात अनेक मुस्लिम त्यांचा धर्म सोडत आहेत. भारतातही अनेक ex-Muslim बनत आहेत आणि युट्यूबवरून इस्लामबद्दल लोकांना जागरूक करत आहेत.

२२ आणि ६८ हे उलट नसते झाले नेहरू पटेल गांधींमुळे. मुस्लिमांच्या अवास्तव मागण्या त्यांनी मान्य केल्या नाहीत आणि शेवटी फाळणीचा त्यांना अप्रिय पण त्या परिस्थितीत अपरिहार्य असा कटू निर्णय घेतला.

तस्लीमा नसरीन, तारेक फतेह वगैरे संधिसाधू आहेत. आपले 'मार्केट' त्यांनी चतुरपणे ओळखले आहे. त्यांनी लिबरल्स ना चपराक वगैरे मारली की उच्चवर्णीय हिंदुंना गुदगुल्या होतात.

सर्व जगात आणि विशेषतः सौदी अरेबियात अनेक मुस्लिम त्यांचा धर्म सोडत आहेत. भारतातही अनेक ex-Muslim बनत आहेत आणि युट्यूबवरून इस्लामबद्दल लोकांना जागरूक करत आहेत.

Good for them आपला धर्म सोडून द्यायचा हक्क सर्वांनाच असायला हवा. दुर्दैवाने भारतात अनेक राज्ये धर्मांतर बंदीचा कायदा आणत आहेत कारण आपली पायरी ओळखून असलेले दलित एकदा धर्म सोडून गेले की बरोबरी करतात हे धर्म मार्तंडाना ठावूक आहे.

Good for them आपला धर्म सोडून द्यायचा हक्क सर्वांनाच असायला हवा. >>> नाहीये. हे सर्व एक्स मुस्लिम आपली ओळख लपवून राहतात कारण त्यांना तसं रहावं लागतं कारण त्यांना त्यांचा धर्म सोडल्याबद्दल धमक्या मिळतात / घराबाहेर पडावं लागतं / नाती तोडून टाकावी लागतात कारण मुस्लिम धर्मात अश्या धर्म सोडून देणार्‍या व्यक्तींसाठी एकच सजा आहे - सर तन से जुदा.

स्वतःहून धर्म सोडून देणे आणि दुसर्‍याला धर्मांतर करायला लावणे यात फरक आहे. एक्स मुस्लिम साहिल, सचवाला, समीर, अ‍ॅडम सीकर हे आधी कट्टर मुस्लिमच होते आणि स्वतःच्या धर्माचं सत्यस्वरूप समजल्यावर ते स्वेच्छेने त्यातून बाहेर पडले आहेत. हे सर्व इतर मुस्लिम लोकांसाठी इस्लामचं खरं स्वरूप उघडकीस आणत आहेत आणि त्यामुळे डोळे आणि अकलेचं कुलूप उघडल्यामुळे अनेकजण मुस्लिम धर्माचा त्याग करत आहेत.

तारेक आणि तस्लिमा संधीसाधू आहेत. >>>>>>>>
अखेर फसला Lol
दुतोंडीपणाची पण हद्द झाली ...
हे टिकली बिंदी प्रथेला कट्टर हिंदुत्ववदी चे लेबल लावणार , त्याच वेळी ट्रीपल तलाक , बुरखा , हलाला या कू प्रथा विरोधात लिहिणारे बोलणारे यांना संधी साधू वाटतात ....
याच मूठभर लिब्रिजनी सतत पक्षपात करून दोन्ही धर्मातील दरी वाढवली आहे ....

तारेख आणि तस्लिमा संधीसाधू आहेत.

Proud

कुलकर्णी सर is a true Islamist scholar at heart. हिजाबचा विषय असो की ट्रिपल तलाक, polygamy- त्यांचा समर्थनाचा आवेश बघण्यासारखा असतो. पण हे छान आहे.

तस्लिमाचा लेख आवडलाच.

A truly progressive person can only be someone who wishes to combat all kinds of religious extremism – be it Muslim or Hindu. >>>> परफेक्ट!

भले ते ट्रिपल तलाक , हलाला बद्दल नको बोलू द्या पण
त्यांनी ब्राह्मण मुलींच्या रखडलेल्या लग्नावरून कळकळीने काढलेला धागा देखील तुफान चालला होता हो .
शेवटी आपलेच आहेत ते Lol

तस्लिमाचा लेख आवडला.

<< A truly progressive person can only be someone who wishes to combat all kinds of religious extremism – be it Muslim or Hindu.

Half the world’s problems can perhaps be solved only if we stopped tolerating brutality irrespective of religion, gender, race and ethnic or linguistic communities.

Hindutva supporters clamour for a Uniform Civil Code, liberals are not heard making similar demands. However, the liberals should have been at the forefront of this fight for equal rights. >>
+१

अगदी चिमटीभर मुस्लिम लोक स्वखुशीने स्वधर्म सोडत आहेत. जेव्हा ह्याची एक लाट होईल तेव्हा काही दृश्य परिणाम जाणवेल. गेल्या साठ सत्तर वर्षात ( आणि आधीच्या शतकांतही) प्रचंड संख्येने बौद्ध लोकांनी क्रिस्चन धर्म स्वीकारल्यामुळे फिलिपीन्स, कोरिया आदि देश ख्रिश्चनबहुल झाले आहेत. श्रीलंकेतही बौद्ध लोक कमी आणि क्रिश्चन व मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे. जपानचाही कल christianity स्वीकारण्याकडे आहे.

ह्या पार्श्वभूमीवर भारतीय लोक तसे कडवे किंवा चिवट ठरतात. मुस्लिम आणि christianity ला तोंड देऊन अजूनही बऱ्यापैकी आपली संख्या राखून आहेत. अर्थात आ सिंधु सिंधु पर्यंतात् भारतवर्ष असता तर कदाचित हे वास्तव उरले नसते.

"Pakistan won the toss and decided to pick the coin first."
Imtiyaz Mohammad.

तस्लिमाच्या लेखात लिबरल्स नी असे करावे, तसे करावे वगैरे सूचना आहेत. fair enough पण दुसर्‍या बाजूला मॉब लिंचिंग करू नका, लव्ह जिहाद चा नावाने बागुलबुवा फिरवू नका, बलात्कार्‍यांचे सत्कार करू नका, हिजाब वाल्या शाळकरी मुलींना हेरॅस करू नका, मिशनरी लोकांना जाळून मारू नका, अशा काहीच सूचना नाहीत. ज्या दिवशी ती या विषयावर बोलू लागेल त्या दिवशी ती आवडायचे बंद होईल आणी तिची राणा
अयूब होईल.

त्या लेखात
The practice of triple talaq being declared unconstitutional by the Supreme Court has elated the Right-wing fundamentalists, while it has made the liberal class unhappy. असे तद्दन खोटे कांगावाखोर वाक्यही आहे, पण par for the course.

Pages