६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या वाचनात आलेली एक पोस्ट - स्पेन च्या एका महिलेने पाकिस्तान मध्ये स्पेंड केलेले दिवस आणि तिथल्या आठवणी .
"क्‍लारा अरिगी" या महिलेची पाकिस्तान बद्दलची एक पोस्ट व्हायरल होत होती तिची लिंक देत आहे .
http://www.jansatta.com/trending-news/spanish-woman-facebook-post-on-pak...

वरतून साभार,

PAKISTAN
When I was told I was going to Pakistan I started to think about all the reasons not to go, how to convince my office not to send me. I did not want to spend the next six months of my life in between mud roads and traffic, dirt and smelly donkeys. I definitely did not want to share my time with radical people, extremists, and walk around all covered.
“Prepare to get sick and food poisoned,” they told me. “You should change your job”. "No, I´ve never been to Pakistan but I´ve been to Bangladesh and I know its the same”… or India, or Afghanistan.
Luckily, someone also told me: "When you go to Pakistan you cry two times: when you are sent there and when you have to leave”. Seven months afterwards I indeed have cried two times. The untouched gorgeous beauty of Pakistan is impossible to describe with words. Everything in this country is untouched; the nature, the culture, the cities. Women in their colorfoul dresses and the way they allow their Pashminas to fall loose over their heads, showing their dark hair. Men playing cricket, such a refined English sport to be played in white clothes drinking high tea, is here the street sport by far, played in every corner of every street. I have climbed stunning mountains, swam in incredible clear lakes amidst the most beautiful hills, visited majestic mosques and drank uncountable types of chai. I tasted lots of different dishes. I did not get myself sick or food poisoned at all, but I definitely got myself a bellyache for not being able to stop eating such delicious food! And the mangoes, oh the mangoes.
However… it doesn’t matter how beautiful a country is, you will always remember how it made you feel. And this is what makes the difference in Pakistan. I have never seen so much hospitality anywhere in the world. Incredibly warm people, genuinely kind. I have never felt so welcomed. There is this tendency to smile. A society that has been for so many years oppressed and still can be so tolerant.
I challenge you to come to Pakistan and don´t like it. Cause, so far, I haven´t met anyone who didn´t. I spent seven beautiful months in Pakistan and I encourage everyone to give this amazing country a chance.
Shukria Pakistan!

छान पोस्ट आहे. धाग्याशीही संबंधित म्हणून पुर्ण डकवली. फेसबूक पोस्ट आहे, शेअर करायलाच असते. एवढ्या लगेचच तब्बल वीस हजार जणांनी शेअर केलीय, मी व्हॉट्सपवर सुद्धा करतो... या देशाची दहशतवादी प्रतिमा पुसली जाणे हे एकंदरीत सर्वांसाठीच चांगले आहे.. असे मला वाटते.

या देशाची दहशतवादी प्रतिमा पुसली जाणे हे एकंदरीत सर्वांसाठीच चांगले आहे.. असे मला वाटते.

हे एकदम बरोबर बोललात साहेब !
पाकिस्तानसारख्या चांगल्या देशाला भारतासारखा दुष्ट शेजारी देश लाभला हेच त्याच दुर्दैव !
पाकिस्तानला जागाच्या स्टेजवर दहशतवादी देश म्हणुन जी प्रतिमा झालेली आहे ती भारता सारख्या देशाने
जाणुन बुजुन केलेली आहे अस मला वाटत ! म्हणुन भारताचा त्रिवार निषेध !

पाकिस्तानच्या नाचक्की साठीच भारताने मुंबई हल्ला, संसद वरचा हल्ला, अक्षर धाम हल्ला , कारगील वैगेरे
स्वतःच योजला होता अस मानायला पाहीजे,

या देशाची दहशतवादी प्रतिमा पुसली जाणे हे एकंदरीत सर्वांसाठीच चांगले आहे.. असे मला वाटते.>>>>

या साठी त्या देशाने दहशतवाद बंद करावा, प्रतिमा हळुहळु पुसली जाईल.

>>>>पाकिस्तानच्या नाचक्की साठीच भारताने मुंबई हल्ला, संसद वरचा हल्ला, अक्षर धाम हल्ला , कारगील वैगेरे
स्वतःच योजला होता <<<< Proud

वरची पोस्ट किंवा पाकिस्तानबद्दल ईतरही लोकांना आलेले चांगले अनुभव जर लक्षात घेतले तर "पाकिस्तान = फक्त दहशतवाद" असे नाहीये हे नक्की. मी त्या अर्थाने ते म्हणालो. थंडा बोले तो कोकाकोला सारखे पाकिस्तान बोले तो दहशतवादी अशी इमेज पुसली जाईल तेव्हा या देशातील ईतर गोष्टी पुढे येतील. त्या चांगल्या गोष्टींचे मार्केट वधारेल तसे तेथील सामान्य लोकांनाही दहशतवादी समजले जातेय ते बंद होईल. बदलती प्रतिमा बघत ते देखील आपली होणारी चांगली प्रतिमा आणखी चांगली व्हावी यासाठी प्रयत्नशील होतील. आपसूक सरकारवर दबाव येईल. सरकारलाही आपल्या धोरणाचा फेरविचार करावा लागेल. दुष्टचक्रात अडकले आहेत ते असे समजा. ते त्यातून बाहेर पडले तर आपल्या पाठी लागलेले सूडचक्र देखील आपसूक मावळेल..

ठीक आहे नं.
त्या देशाने दहशतवाद बंद करावा. 'पाकीस्तान बोले तो दहशतवादी' अशी इमेज पुसल्या जाण्यासाठी त्यांनी ठोस पाउले उचलावी.

त्यांच्या देशातील इतर गोष्टी पुढे येउ लागतील. हळुहळु प्रतिमा बदलू लागेल.

अगदी हाय काय अन नाय काय सारखी सोपी गोष्ट आहे ही.
मनावर घेतले तर.

प्रॉब्लेम् असा आहे की ज्यांना ती ईमेज पुसली न जाणे फायद्याचे आहे ते लोक दहशतवाद जोपासत आहेत.
आणि ज्यांना ती ईमेज पुसली जाणे फायद्याचे आहे ते लोकं स्वारस्य दाखवत नाहीयेत. का स्वारस्य दाखवत नाहीयेत हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. अर्थात ती ईथेच करू शकतो.

पाकिस्तान सारख्या शत्रु देशाच्या प्रतिमेबद्दल भारतात बसुन खुप कळवळा आलेला आहे !!
पण ह्या "नो बडी "च्या पोकळ कळवळ्याने तो देश सुधारणार ?
त्या पेक्षा ग्राऊंड झिरोवर जाउन काम केले पाहीजे !
असेही वर विश्याने सुचवलेच आहे की जगात जर स्वर्ग असेल तर तो पाकिस्तानच !!

ऋबाळा, फेसबुक वर भरपूर पाकी सापडतील, त्यांच्याशी मैत्री कर. मग त्यांना भारताबद्दल विचार. त्यांना हे शिकवलेय कि तिथल्या जनतेला आज जी गरिबीची अवस्था आहे ती भारतामुळे आहे. तिथला प्रत्येक हल्ला भारत फूस लावून करतोय. तिथे आज खूप बेरोजगारी आहे जिला केवळ भारत आणि भारत जबाबदार आहे. भारताची हि परंपरा आहे त्यांच्या डोळ्यांसमोर. खूप खूप ब्रेनवोश केले जाते तिथल्या लोकांना. तुम्ही त्यांना काही सांगू गेलात तर तुम्ही brainwashed हा ठपका येतो.

व्यक्तिश: ते लोक बाकी सगळ्या बाबतीत आपल्यासारखेच आहेत। पण भारत या विषयात ते तुझ्यासारखा विचार नाही करत. भारत हा त्यांच्यासाठी दाहशतवादि आहे. सो, आता हा विचार कोण रुजवतो आणि याला खतपाणी कोण घालते याची चर्चा सुरु कर.

रच्याकने हे मी हाप्पीनेस इंडेक्स वाचून सांगत नाहीये. स्वतःचा अनुभव आहे.

वाजपेयी पंप्र असतानाची गोष्ट आहे ही. मी एका पाकिस्तानी कॉलेज युवकाशी चॅट करत होतो. तेव्हा फेसबूक वगैरे काहीच नव्हते. त्याने म्हटले 'तुमच्या वाजपेयीना सांगा पाकिस्तानात सैन्य घुसवून पाकिस्तान जिंकून घ्यायला. म्हणजे आमची या जुलमी आणि मूर्ख राज्यकर्त्यांपासून सुटका होईल.वाजपेयी हे खूप चांगले गृहस्थ आहेत. तुमच्यात आले म्हणजे निदान आमची थोडीफार प्र्गती होईल ' म्हणजे अखंड हिंदुस्तानची आग उधर भी लगी है और इधरभी. Wink

सध्याचा काळ पाक जनतेच्या भ्रमनिरासाचा आहे. त्यातून काही तरी चांगले निर्माण होइल. पाक जनता हे सगळे जोखड झुगारून द्यायच्या मानसिकतेत आहे. पाकिस्तानचे तुकडे करायला प्रोत्साहन देणे म्हणजे शत्रू आपल्या दारात आणून उभे करण्यासारखे आहे. कारण पाकिस्तान हा एक जबाबदार देश आहे. तिथे अनागोंदी माजून मध्यपूर्वेतल्या दहशतवाद्यांच्या हातात तो देश गेल्यास ते काही ऑर्गनाईज्ड आणि जबाबदार संस्था असणार नाहीत आणि पाकी अणुबाँब त्यांच्या ताब्यात असेल आणि तो न वापरण्याचे कोणतेही आंतरराष्ट्रीय बंधन त्यांच्यावर नसेल....

अ अ अ, सहमत. हेच !

साधनाजी, ऑर्कुटच्या काळात मी भारत-पाकिस्तान, अमन की आशा, असे ऑर्कुट ग्रूप जॉईन केलेले. अर्थात तेव्हा मी फारच लहान असल्याने तिथली चर्चा लांबूनच वाचायचो, भाग घ्यायचो नाही. पण परीस्थिती नक्कीच एवढी क्रिटीकल नाही जसे तुम्ही म्हणता. अर्थात ती फारच आशादायी आहे असे मलाही म्हणायचे नाही. पण ग्लास अर्धाअधिक जो काही भरलेला, रिकामा आहे तो कसा बघायचा हे आपले आपण ठरवायचे आहे.

पाकिस्तानने अगोदरच अणु बाँबची टेक्नॉलॉजी बर्याच देशांना विकलेली आहे. त्यात माहीती असलेले आहेत उत्तर कोरीया, ईराण आहेत पण त्या बरोबरच लिबिया व ट्युनिशियाला सुद्दा त्याची तयारी चालु झालेली होती.
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणूबाँब संशोधनाच्या वेळॅला पैश्याची मदत केलेली होती, सौदीच्या मालकीचे काही अणु बाँब अजुनही पाकिस्तानच्या शस्त्रागारात आहेत अस बोलल जात.

तसेच १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, त्यातुन निघालेला भागाचा बांग्ला देश बनला.
आज उपलब्ध डेटानुसार बांग्ला देश हा पाकिस्तानापेक्षा जास्त प्रगतीशील आहे.

आता पाकिस्तानचे जे तुकडे पडणार आहेत त्यात बलोचीस्तान, सिंध व पंजाब असे मेन तुकडे पडतील जे आताच्या पाकिस्तानपेक्षा मवाळ आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीत ह्या तिन भागाला काहीही न पर्याय देता न सांगताच पाकिस्तानमध्ये सामिल केले गेले. त्या मुळे हे भाग वेगळे झाले तरी ते जास्त डोकेदुखी नसणार !!

शेजार्‍यावर प्रेम करा पण आधी कुंपण भक्कम करा
एक रशियन म्हण

आपल्याकडे गोंधळ हा आहे की पाकीस्तान हा शेजारी आहे की घरातून आपला वाटा भांडून /रुसून गेलेला मुलगा हेच ठरवता येत नाहीये.

ऋन्मेश व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि तितके विचार. मी ग्रुपवरचे वाचून सांगत नाहीये तर एखाद्याशी इतर विषयांवर बोलताना जेव्हा गाडी भारत पाक संबंधांवर आली तेव्हाचे विचार सांगितलेत. असो.

ज्या देशात बालवयातच उलटा ईतीहास शिकवला जातो तिथे काय अपेक्षा करणार !!

पाकिस्तान ने भारताबरोबर केलेल्या चार ही युद्धाची कारण भारतच आहे , भारताने पाकिस्तानला गिळंकृत करायला चार वेळा युद्द छेडल पण चारही वे ळा पाकिस्तानने भारताला मात दिली अस पाकिस्तानातील शाळेत शिकवला जाणारा ईतीहास सांगतो.

पाकिस्तानात सुद्दा भारतातल्या प्रमाणेच निम गोरे, गव्हाळ वर्णाचे भारत उपखंडातील भारतीय वंशाचेच लोक रहातात ! पण ते स्वतःला समजतात मात्र महम्मद घौरी, मिर कासिम , सारख्या तुर्क स्तानातुन आलेल्या गोर्या गोमट्या अरबी लोकांचे वंशज. म्हणुनच चीन कडुन घेतलेल्या मिसाईल्सची नाव सुद्धा घौरी, बराक वैगेरे तुर्की नाव ठेवली.

पाकिस्तानातील सिंध, बलोची व पंजाबी लोकांना स्वतःची भाषा बोलण्याची परवानगी नाहीय. ते शा़ळेत असताना फक्त उर्दुच बोलु व लिहू शकतात, सिंध, बलोची व पंजाबी लोकांची संस्कृ ती पुसुन टाकायचा प्रयत्न चालु आहे जो त्याना मान्य नाही.

आताश्या पाकिस्तानातील शिकलेले सवरलेले लोक ही बोलु लागले आहेत. त्यांना हे सर्व पटायला लागलेल आहे.

पुर्वी पाकिस्तानला भारताची तसेच भारताला पाकिस्तानची गरज होती. त्याच कारण दोन्ही देश एकमेकांवर अवलंबुन होते. दोन देशात सरहद्दी दरम्यान मोठा व्यापार होता. पण हळु ह़ळु आता परिस्थीती बदलत चाललेली आहे. आता पाकिस्तानला भारताची जितकी गरज आहे तितकी भारताला पाकिस्तानची गरज नाहीय. त्या मुळे भारता कडे नेगोशिएशन पॉवर आलेली आहे. त्याच बरोबर चीनशी भारता चा व्यापार हा १०० बिलियन डॉ पर्यंत वाढलेला आहे. त्यातला ८५ ते ९० बिलियन डॉ चा माल चिन भारताला पुरवतो पण भारत, चीन ला फक्त १० ते १५ बिलियन डॉ. अश्या मोठ्या बाजारामुळे चीनही भारताशी पंगा घेण्याच्या मुड मध्ये नाहीय !!

चीनची सीमेवर घूसखोरी, भारतीय हद्दीत रस्ते बांधने, एनएसजी संघात भारताविरूध्द मत प्रदर्शन करून भारताचा सहभाग रोखने, pok मधे रस्ते बांधने इ, कटकारस्थान चीन निव्वळ खुशमस्करीत करत आहे या मतापर्यंत पोहचलो आहे. कारण चीन भारताशी पंगा घेऊच शकत नाही.

उलटया इतिहासावरून आठवले. पाकिस्तान सैन्याच्या संकेतस्थळावर सुद्धा युद्धवर्णन आणि इतिहासाचे चित्रण अगदी वेगळे आहे. यात भारताबरोबरच्या सगळ्या युद्धांचे तपशीलवार वर्णन आहे (त्यातले किती खरे अन किती खोटे देव जाणो).
याउलट भारत सैन्याच्या संकेतस्थळावर याचा अगदी पुसटसा उल्लेख आढळतो.
नशीब आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये या युद्धांचे भडक वर्णन नाही. आपल्या देशाची बाजू खरी असो वा खोटी, सादरीकरणात तारतम्य न बाळगल्यास द्वेषाचा विखार वणव्यासारखा पसरतो.

Pages