६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>जम्मू काश्मीर पैकी काश्मीर खोरे भारतापासून वेगळे करण्यात माझी तरी मुळीच हरकत नाही. मग पुढे जाऊन त्यांनी वेगळा देश स्थापन केला काय, किंवा पाकिस्तानातं गेले काय, तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे<<

चांगला विचार आहे. सगळ्या देशांनी असेच उदात्त विचार ठेवले तर आपापसात युद्धं होणारच नाहित. लष्करावर होणारा अतोनात खर्च विधायक कामांसाठि वापरता येईल. हे विश्वची माझे घर - या उक्तिनुसार आव जाव घर तुम्हारा हे धोरण सुद्धा राबवता येईल.

मस्त, आवडलं...

(नाहितरी आता काश्मिरची वाट लागलेलीच आहे, अब तो वहाॅं तिनका भी उगता नहि होगा...)

त्यातलं प्लीज हे किती मानभावी असते, त्याबद्दल मला सविनय शंका आहे.>>>>

शंका होती तर तसे विचारता आले असते. नंतर जर हेतू चुकीचा वाटला असता तर टिका करता आली असती. असो. जाऊ दे.

जर शंका क्लिअर झाली असेल तर आमचा अभ्यास वाढवण्यासाठी लिंक द्या. नाहीतर विषय सोडून देऊ.

खूप छान पोस्ट आल्यात धाग्यावर.

साधनाजी, ते 2000 लोकांचा सर्वे वगैरे हे आपल्याला कुठे सापडले. मी वरवर वाचले तेव्हा मला हे एवढेच सापडलेले.

The report takes into account the GDP per capita, life expectancy, social support and freedom to make life choices as indicators of happiness.

आता यातले GDP per capita, life expectancy वगैरे लोकांचा सर्व्हे करून कसा ठरवतात हे जाणून घ्यायला आवडेल.

बाकी ही निव्वळ उत्सुकता. कारण तो धागा माझाच असल्याने माहीतीत भर पडेल ते चांगलेच.

बाकी मोदी हेटर लवर वगैरे असा सूर आपल्याला माझ्या पोस्टमध्ये कुठे दिसला. तो सो कॉलड हॅपीनेस ईंडेक्स भारताबाबत गेल्या तीनचार वर्षांत घसरला अशी त्यात माहिती आहे हे खरेय पण तो विषय ईथे नाहीये. 114 काय आणि 118 काय, याला प्रमाण मानले तर दोन्ही आकडे वाईटच. पण जर एखादा त्रयस्थ जर कुठल्याही निकषाच्या आधारे पाकिस्तान या दहशतवादी इमेज असलेल्या देशाला आपल्या जगातील मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या बरेच आधीचा नंबर देत असेल तर ही नुसते डोळे मिटून पुढे जायची गोष्ट मला नाही वाटली ईतकेच.

भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तान पेक्षा जवळ जवळ १००० पट मोठी आहे आणि वाढत आहे ! २०१५ मधली भारतातली FDI जगात सर्वात अधिक होती.
पाकिस्तानची ओळख कडव्या इस्लामी अतिरेकींना सपोर्ट करणारा देश अशी आहे. कारगील, संसद हल्ला, २६/११ , दाउद इब्राहिमला आधार, पठाणकोट हल्ला इत्यादी कारनाम्यातून पाकिस्तान भारतद्वेष व्यक्त करत आला आहे.
भारतात मुस्लिमांची संख्या वाढत आहे या उलट पाकिस्तानातील हिंदूची संख्या वेगाने कमी झाली आहे.

पाकिस्तानात शरिया लॉ आही ज्यात मुस्लिम धर्म सोडल्यास, कुराणाच्या विरुध्द बोलल्यास फाशीची शिक्षा, पुरष ४ लग्न करु शकतात, आपल्या बायकोला कधीही तलाक देऊ शकतात, बुरखापध्द्त इत्यादी कायदे आहेत ! असा देश हॅपीनेस इंडेक्स मध्ये नंबर १ जरी असला तरी काय फरक पडतो..

पारु,
हैप्पीनेस इंडेक्स म्हणजे, त्यातील लोक किती आनंदी आहेत,
तुम्ही यादी केलेल्या सगळ्या समस्या खऱ्या आहेत, पण inspite of that the index is high, which means ppl seem to be happy there,

रुमनेश तेच विचारतोय, अशा काय गोष्टी आहेत ज्या पाक मध्ये चांगल्या आहेत आणि आपल्याला माहित नाहीत,

<भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तान पेक्षा जवळ जवळ १००० पट मोठी आहे आणि वाढत आहे>

सोर्स?
http://www.tradingeconomics.com/

इथल्या डेटानुसार भारताचे जीडीपी २०७३.५४ बिलियन डॉलर्स तर पाकिस्तानचे जीडीपी २६९.९७ बिलियन डॉलर्स

२०१५ मधली भारतातली FDI जगात सर्वात अधिक होती. : सोर्स?
http://data.worldbank.org/indicator/BX.KLT.DINV.CD.WD
http://unctad.org/en/Pages/DIAE/World%20Investment%20Report/Annex-Tables...

तिथल्या एक्सेल फाइल मधून
Region/economy 2015

United States 379 894.0
Hong Kong, China 174 892.1
China 135 610.0
Ireland 100 542.4
Netherlands 72 648.8
Switzerland 68 838.0
Singapore 65 262.4
Brazil 64 647.9
British Virgin Islands 51 605.7
Canada 48 642.8
India 44 208.0

भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तान पेक्षा जवळ जवळ १००० पट मोठी आहे 
>>>>
ईथे संपत्तीचे समान/असमान वाटप असा मुद्दा देखील लक्षात घ्यायला हवा. पाकिस्तानमध्ये ते समान आहे असे मला म्हणायचे नाहीये. किंबहुना मला त्याची कल्पना नाही. पण भारतात मात्र नक्कीच असमान आहे. गरीब लोकांचा श्रीमंत देश बनून राहण्यात आपल्याला धन्यता मानायची आहे का हे तुम्हीच ठरवा. जिथले लोक पोरांची पोटं भरायला पैसे नाहीत या कारणाने आत्महत्येचा मार्ग स्विकारतात आणि हे असे एखादा कमजोर मनाचा नाही तर बरेच लोकं करतात तिथे ती हजारपट मोठी अर्थव्यवस्था काय कामाची..

>>> पण भारतात मात्र नक्कीच असमान आहे. <<< Lol अगदी लाल संस्कारी शिकवणीला अनुसरुन वाक्ये पेरतो आहेस हं ऋन्मेषा... ....
पण बाबारे, असमानता केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रत्येक देशात आहे अगदी कम्युनिस्ट रशिया अन लालचिन मधेही आहे, भारतात बंगाल/केरळमधेही आहे. त्या आर्थिक असमानतेचा भारत-पाकिस्तान तुलनेशी काय संबम्ध?

बाकी "स्त्रीयांच्या स्थितीच्या तुलनेबाबत" मात्र कोणीही एकजणही "चक्कार" शब्द उच्चारित नाही हे आश्चर्य आहे.

तुम्ही पण चकार शब्द बोलत नाही
इतरांकडून वदवून घ्यायचे आहे पण तुमच्यातच बोलायला दम नाही?
Wink

पाकिस्तानात एकच धर्म आहे, ज्यात जातपात, वर्णभेद वगैरे नाही.
त्यामुळे इथल्या सारखे जातीवरुन राजकारण होत असेल का?

अस्पृश्यता असेल का? प्रत्यक्ष आचरत नसतील पण मनातली अस्पृश्यता आहे का?

आरक्षण आहे का? असल्यास कश्यावर आधारित आरक्षण आहे?

पाकिस्तानात पण सोन्याची जास्त आयात होते का? तिथले लोक पण मशीद, दर्गावर सोने वाहतात का?

>>>> तुम्ही पण चकार शब्द बोलत नाही >>> इतरांकडून वदवून घ्यायचे आहे पण तुमच्यातच बोलायला दम नाही? <<<< Lol अगदी अगदी..... मी तर घाबरट आहेच्चे हो.... जगजाहिर आहे ते... Wink

फक्त एरवी भारतातील गेल्या दोन वर्षातील व्यवस्थेबद्दल गळे काढणारे लाल्या लोक "शरीयत कायद्यानुसार" चालणार्‍या पाकिस्तान व तत्सम देशातील "स्त्रीयांचे स्थितीबद्दल" मात्र एक अक्षरही उच्चारायला घाबरताहेत (किंवा राजकीय महत्वकांक्षेची गरज म्हणून वेळेस त्यांचे गळ्यात गळेही घालू शकतात) हे दाखवुन द्यायचे होते...
अन खरे तर त्याकरता तुलनेसाठी पाकिस्तानाचेच उदाहरण कशाला हवे? इकडे शहाबानो उदाहरण पुरेसे आहेच ज्यास लाल्यांनी कधीही विरोध केला नाही Wink , परवाच कारवाई केलेला कोण तो झाकीर? त्या कारवाईबद्दलचे लाल्या लोकांचे प्रतिसाद/प्रतिक्रियाही पुरेशा बोलक्या आहेतच.
माझे प्रामाणीकपणे म्हणणे इतकेच आहे, की जर लाल्या लोक "धर्म" वगैरे मानितच नसतील, तर तो नियम केवळ "हिंदू" धर्माला लावु नये, जगातील सर्वच धर्म "लाल्या लोकांनी" नाकारायचे धाडस दाखवावे.
ते धाडस ते दाखवत आहेत, याची चाचणी म्हणून धाग्याच्या विषयातील भारत पाकिस्तानच्या तुलनेमधे "स्त्रीयांच्या स्थितीवरही" रोखठोक भाष्य लाल्यांनी करावे. असे नै वाटत तुम्हाला?
माझ्या मते मात्र, लाल्या लोक सहसा "दुसर्‍यांच्या खांद्यावर" बंदुका ठेवुन गोळ्या झाडतात, स्वतः लालपोथीनिष्ठ बनुन वेगळेच रहातात, याला इतिहास साक्षी आहे. अन असे दुसर्‍यांचे खांदे शोधायला मग जिथे तिथे जाऊन "तुम्ही बघा कसे असे अन तसे अन्याव ग्रस्त आहात " अशा शिकवणी देत फिरतात... ! असो. . यातिल गंमतीचा भाग असा की "सेम थेअरी" इसिस वापरते आहे, व लाल्यांपुढे खरेतर इसिसचाच सर्वात जास्त धोका आहे. मग तो रशिया असो की चायना, भारतातले लाले मात्र अजुनही या वास्तव गोष्टीम्पासुन अडाण्यासारखे कोसो दूर आहेत.
धाग्याचा हा विषय नसावा बहुधा.... तरीही एक जिव्हाळ्याचा सल्ला, तुमचे खांदे (अन त्यावरील डोक्याचाही) ताबा घेऊन ते कोण वापरतय याची जरा वास्तपुस्त घ्या वेळीच... Happy

तर मुद्द्यावर येऊ, स्त्रीयांचे स्थितीबद्दल बोला कैतरी... Happy

>>>>> पाकिस्तानात एकच धर्म आहे, ज्यात जातपात, वर्णभेद वगैरे नाही. त्यामुळे इथल्या सारखे जातीवरुन राजकारण होत असेल का? <<<<
अभ्यास वाढवा हो..... तिकडे शिया सुन्नी बहावी असे भेद आहेतच, शिवाय, सिंधी/पंजाबी/बलुची/मुजाहिदीन इत्यादीक अनेक भेद आहेतच.

>>>>> अस्पृश्यता असेल का? प्रत्यक्ष आचरत नसतील पण मनातली अस्पृश्यता आहे का? <<<<
ती जगात कुठेही अनुभवता येईल, फक्त स्वरुप भिन्न असतील.... विश्वास नै बसत? मग दगडामातीत काम करुन मग अगदि पंचतारांकीत हॉटेलात तसेच मळके कपडे/अवतारात जाऊन दाखवा..... Wink

>>>>> आरक्षण आहे का? असल्यास कश्यावर आधारित आरक्षण आहे? <<<<< मिलिटरी राज्यात अघोषित आरक्षण फक्त "मिल्ट्रीचे" अस्ते बर्का.... Lol

>>>> पाकिस्तानात पण सोन्याची जास्त आयात होते का? तिथले लोक पण मशीद, दर्गावर सोने वाहतात का? <<<< तिकडचे काय वहातात माहित नाही, पण इकडचे बरेच धर्मिय "चादर" (मजार?) वहातात, उद वहातात. Happy सोने वाहण्याइतकी उदारता Proud तिकडे नसेल असे वाटते....

>>>>तर मुद्द्यावर येऊ, स्त्रीयांचे स्थितीबद्दल बोला कैतरी... <<<<

लिंबूटिंबू,

दोन्हीकडील स्त्रियांच्या स्थितीची तुलनाही व्हावी ह्या अर्थाचा हा तुमचा बहुधा चौथा प्रतिसाद दिसतो. खरे सांगायचे तर एका अर्थाने मला तुमचा आग्रह अगदी समर्थनीय वाटतो. ज्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अधिक स्वातंत्र्य मिळते ती संस्कृती लवकर विकसित होते किंवा मुळातच विकसित झालेली असल्याचे ते लक्षण मानता येते. शिवाय, सांस्कृतीक विकास हा तंत्रज्ञानाच्या विकासाशी निगडीतही असतो. त्यामुळे, स्त्रियांच्या स्थितींची तुलना हा एक (एकमेव नव्हेच) निकष नक्कीच दोन्हीकडील एकंदर विकासाच्या तुलनेचा मार्ग सोपा करेल.

भारतातील स्त्रियांना, जन्म घेऊ दिला जाणे, शिक्षण, अर्थार्जन, विचारस्वातंत्र्य, विवाहाबाबत निवडीस वाव असणे, पेहराव अश्या काही महत्वाच्या बाबतीत पाकिस्तानातील स्त्रियांपेक्षा अधिक स्वातंत्र्य मिळत असावे असा अंदाज आहे. खरे खोटे माहीत नाही. शिवाय, प्रत्येक भारतीय स्त्री प्रत्येक पाकिस्तानी स्त्रीपेक्षा अधिक चांगल्या अवस्थेत असेल असे सरसकटीकरणही योग्य नाही. पण पाकिस्तानातून पूर्वी आलेल्या काही भीषण बातम्या वाचून असे नक्की वाटते की अनेकदा तंटे सोडवण्यासाठीसुद्धा स्त्रिया भेट म्हणून दिल्या जातात. तेथील धार्मिक कट्टरता स्त्रीच्या स्वातंत्र्यावर गदा आणते हे बर्‍यापैकी मान्य व्हावे. त्यादृष्टीने बघितले तर भारत खचितच अधिक विकसित देश असणार. पण वर म्हंटल्याप्रमाणे, त्याने आपल्याला फरक काहीच पडत नाही. आपले प्रश्न तसेच राहतात. वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे आपल्यापेक्षा खूप सुस्थितीत असलेल्यांशी आपली तुलना करावी व मग वाटचाल करावी हेच योग्य वाटते.

'स्त्रीची स्थिती' हा एक निकष सोडला तर विकसित असण्या-नसण्याचे इतरही अनेक निकष असतील व ते बरेच अधिक महत्वाचेही असतील. जसे, भ्रष्टाचार किती आहे, नैसर्गीक सुबत्ता किती आहे, संरक्षणावरील खर्च किती आहे, दळणवळण, कारखाने, आयात-निर्यात वगैरे असंख्य निकष महत्वाचे असतील.

-'बेफिकीर'!

लिंबुजी, दोनेक महिन्यांपूर्वीची बातमी, भारतातील पहिल्या महिला फाईटर पायलट्स! Happy !

ही बातमी बघताना असेही लक्षात आले की पाकीस्तानात महिला फाईटर पायलट्स त्या आधीच होत्या, आणि मला खूप आश्चर्य वाटले तेव्हा.

पाकीस्तानी स्त्रीसुद्धा पंतप्रधान होऊ शकते, पाकीस्तानी स्त्रीयासुद्धा सरकारी उच्चपदी असू शकतात, पायलट, फायटर पायलट होऊ शकतात, डॉक्टर-वकील-इंजिनियर होऊ शकतात.

भारताच्या तुलनेत प्रमाण बरेच कमी असावे, असे मला वाटते.

पण स्त्रीसशक्तीकरणाचे महत्व/गरज तिथेही रुजते आहे, असेही मला वाटते.

स्त्रीयांचे स्थितीबद्दल बोला कैतरी... <<<<

मध्यण्तरी व्हॉटस्सपवर पाकिस्तान राजकारणातील महिला विरुद्ध भारतीय राजकारणातील महिला असा फोटो फिरत होता.
सौण्दर्याची तुलना करता तिथल्या अप्रतिम लावण्यवती होत्या तर ईथल्या सर्वसाधारण.

मागे ट्वेंटी 20 वर्ल्डकपदरम्यान व्हॉटस्सपवर पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे जोडीने फोटो फिरत होते. जवळपास सर्वांच्याच बायका फॅशन ईंडस्ट्रीमधील मॉडेल वाटत होत्या.

दोन्ही फोटो फिरवण्यामागे सीमेपलीकडे किती सुण्दर आणि मॉडर्न महिला आहेत बघा बघा असा हेतू होता. तुर्तास असे महिलांचे फोटो फिरवणे हे अनैतिक अयोग्य अश्या चर्चात पडूया नको. पण त्यावरून एक मात्र समजले की तिथे उच्चभ्रू वर्तुळातील महिला तरी नक्कीच फॅशनेबल आहेत, आधुनिक विचारांच्या वाटतात. (अरे हो, मागे आतिफच्या एका शो मध्येही तेथील पेज थ्री क्राऊड पाहिलेला, तिथेही डोळे सुखावलेले) असो, तर सांगायचा हेतू हा की तिथे सर्व स्त्रिया बुरखाच घालून फिरतात असे जे चित्र त्या आधीपर्यंत माझ्या डोळ्यासमोर होते ते टराटरा फाटले. याऊपर जाणून घेऊ तसे आणखी समजत जाईल.

बाकी आपल्या देशातही कुठे सर्व स्तरावरच्या स्त्रियांना योग्य वागणूक मिळतेय. विनयभंग आणि बलात्कारांच्या केसेसचा आकडा लक्षात घेतला तर या देशाला तुम्ही स्त्रियांसाठी सुरक्षित म्हणू शकाल? मला तर हल्ली आमची मुण्बईही सुरक्षित राहिलीय असे वाटत नाही.

हे काही मी भारताला खाली आणि पाकिस्तानला सरस दाखवायला म्हणत नाहीये. किंवा मी धागा काढलाय तर त्यात काहीतरी तथ्य आहे हे दाखवायचा अट्टाहास नाही. तर समोरून पोस्टचा टोन आपणच कसे सरसच आहोतच हे दाखवण्याचा वाटला म्हणून जरा जमीन दाखवायचा प्रयत्न केला ईतकेच.

बाकी एमेनसीत कामाला असल्याने बरेच पाश्चात्य देशातील महिलांशी तोडक्या मोडक्या ईंग्रजीत बोलणे होते. कामासोबत ईतरही गप्पा होतात. निव्वळ त्यावरूनही तिथले कल्चर आणि तेथील महिलांची स्थिती समजते. ते पाहता आपल्याला आपल्या येथील महानगरातल्या स्त्रियांच्या स्थितीबाबतही मोठी मजल मारायची आहे हे समजते. छोट्या गावखेड्यातले सोडूनच द्या.

वर एका पुरुषाच्या चार बायकांचा उल्लेख आहे. नक्कीच तो एक वाह्यात प्रकार आहे. पण हे बोलताना तुम्हीही कधी हे समजून घेऊ शकाल का की स्त्रीने लग्न करून नवर्याचे नाव लावत त्याच्या आईवडीलांसोबत सासरी नांदायला जाणे हेच मुळात एक व्यक्ती म्हणून तिच्या स्वातण्त्र्यावर घाला असतो. हा वेगळाच विषय होत असेल तर थांबूया. पण मुळात हा धागा तुलना करत कोण वरखाली करायला नाही तर काही समज गैरसमज असतील तर ते मिटून माहीतीत भर टाकायला आहे समजा. आणि हो, अमन की आशा असाही धाग्याचा हेतू नाही Happy

पाकीस्तानी स्त्रीसुद्धा पंतप्रधान होऊ शकते
>>>>
हे विधान/उदाहरण खूप बोलके आहे. पंतप्रधान होणे म्हणजे एखाद्या महिलेचे नेतृत्व तमाम देशवासीयांनी स्विकारणे.

शंका होती तर तसे विचारता आले असते.
<<
एक्झॅक्टली तेच विचारले आहे. समजूनही न समजल्याचे सोंग समजले. टाटा.

वल्लाह! लिंब्या अन धाविघाभूंचा ड्वायलाग.. ड्वले पानावले...

जिंदगी गुलजार है ही पाकीस्तानी मालिका बघितल्यावर मला समजले की पाकिस्तानात pregnancy च्या काळात सोनोग्राफी करून होणार्‍या बाळाचं लिंग कळतं. मालीकेत दाखवलेले सगळेच खरे मानण्यात काही अर्थ नाही. पण तरीही पुढील प्रश्न पडलाच.
तिथं जर खरचं स्त्रीयांना पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान असेल समाजात तर मग स्त्रीभ्रुणु हत्या वगैरे समस्या पण असणारचं. सरकार/ राजकीय नेते ह्या समस्यांकडे सोयीस्कर पणे दुर्ल्क्ष करतात का?

या धाग्याशी संबंधित नाही, पण ज्याला 'लाल्फोबिया' झालाय त्याच्यासाठी.. भगवे देखिल झाकीरला हात लावु इच्छीत नाहीत.

परवाच कारवाई केलेला कोण तो झाकीर? त्या कारवाईबद्दलचे लाल्या लोकांचे प्रतिसाद/प्रतिक्रियाही पुरेशा बोलक्या आहेतच.>>>http://epaper.loksatta.com/c/12562064

भारत आणि पाकीस्तानामधला प्रमुख आणि मोठा फरक म्हणजे पाकीस्तानात असलेला 'मध्यम' वर्गाचा अभाव.
पाकीस्तानात 'आहे रे' आणि 'नाही रे' असे दोनच वर्ग प्रामुख्याने आढळतात. 'थोडा है थोडे की जरूरत है' वाला जवळजवळ सगळा मध्यमवर्ग देशाबाहेर गेलाय किंवा जायची धडपड करतो आहे. त्यामुळे अर्थातच पाकीस्तानाबाहेर, अमेरिका इंग्लंड व इतरत्रही आपल्यासारखीच व्हाईट कॉलर वर्किंग क्लास माणसे भरपूर आढळतात. भारतात ब्रेन-ड्रेन होऊनही उरलेला बराच मोठा मध्यम वर्गीय समाज आढळतो तसा पाकीस्तानात नाही.

ह्या गोष्टीचा पाकीस्तानाच्या सद्यस्थितीवर मोठा परीणाम झालाय जो स्टॅटिस्टिक्समधे दिसत नाही.

(मला मान्य आहे मी खूप ढोबळ विधान करतोय, पण याला आधार म्हण्जे बरेच आधी पाकी मित्रासोबत झालेल्या भरपूर गप्पा आणि अवांतर वाचन) (विदा वगैरे नाही देता येणार तुर्तास क्षमस्व Happy )

या धाग्यावर आधी बलुचिस्तान चा उल्लेख आलाय त्या संदर्भात बलोच रिपब्लिकन पार्टीचे सध्याचे अध्यक्ष ब्रह्मदाग खान बुग्ती यांची ही मुलाखत वाचनीय आहे
http://navbharattimes.indiatimes.com/india/modi-come-off-as-strong-as-in...

ब्रह्मदागखान यांचे आजोबा नवाब अकबरशाह खान बुग्ती हे बलुचीस्तान मधील मुख्य जमात असलेल्या बुग्ती जमातीचे तुमानदार म्हणजे मुखिया होते व बलुचिस्तान प्रांताचे इण्टेरियर मिनिस्टर ( म्हणजे बहुतेक गृहमंत्री ) पण होते त्यांचा २००६ मधे जन. मुशर्रफ च्या पाक आर्मी ने केलेल्या बॉम्ब हल्यात देहांत झाला. हे एक अतिशय लोकप्रिय नेते व जबरदस्त व्यक्तिमत्व होते. त्यांच्या बद्दल खरे तर वेगळा धागा काढूनच लिहायला हवे. त्यांच्या जीवनावर बॉलीवुड मधे चित्रपट बनावा व अकबरशाहांची प्रमुख भूमिका अमिताभ बच्चन यांनी करावी अशी इच्छाही ब्रह्मदागखान यांनी या इंग्रजी मुलाखतीत व्यक्त केली आहे
http://indianexpress.com/article/india/india-news-india/pm-narendra-modi...

आपल्याकडच्या आणि पाकिस्तानमधील स्त्रियांच्या स्थितीत फारसा फरक नसावा. तिकडे बर्याच स्त्रिया ह्या बुरखा घालतात तर आपल्याकडेही बर्याच राज्यात स्त्रिया ह्या घुंगट ओढलेल्या आढळतात. दोन्ही देशात राजकारणात ज्या स्त्रिया अत्युच्च स्थानापर्यत पोहोचल्या त्या मुख्यता राजकिय परिवारातुनच आलेल्या होत्या.आपल्याकडे हुंडाबळी हा भयानक प्रकार आहे तिथे मात्र स्त्रियांना मेहेर दिला जातो.धार्मिक बाबतित दोन्हीकडच्या स्त्रियांचे स्थान नगण्य आहे.जिथे शहरीकरण झालेय तेथिल स्त्रियांचे रहाणिमान हे आधुनिक आहे. गावसाईडला आपल्याकडील स्त्रियांची स्थिती भयानक आहे. जातिभेदाबाबतीत आपला देश पाकिस्तानपेक्षाच काय सर्व देशांच्या पुढे असावा.पाकिस्तानातही भेद आहेत पण पाणि बाटणे, स्पर्शाने मंदिर, वास्तु बाटणे ह्या सारखे अद्वितीय प्रकार, साडेसहा हजार जातिंचे लटांबर तिथे नाहि.स्रि भ्रुण हत्या आपल्याइथे आहेत पाकिस्तानाबाबत माहिती नाही, जाणकारांनी माहिती द्यावी.

अति धार्मिकपणा हा पाकिस्तानातील हिंसक वातावरणाचे कारण आहे असे माझे मत आहे. प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडणे हेच त्यांच्या अधोगतीचे कारण ठरेल. भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मातब्बर नेत्रुत्व लाभले त्यांनी हा देश घडवला. धार्मिक स्वातंत्र्य दिले पण त्याचा अतिरेक होउ नये ह्याचीही काळजी घेतली.अन्यथा साडे सहा हजार जातिंचे लटांबर, भेदभाव घेउन पुढे जाणे कठिण काम होते. भारतात जेव्हा कर्मापेक्षा धर्माला महत्व मिळेल तेव्हा अधोगतीकडे वाटचाल सुरु होइल.

पाकिस्तानचे रियो ऑलिंपिक्समध्ये एकूण ७ प्रतिनिधी आहेत. "total of 7 athletes will represent Pakistan at the Olympics, the country's smallest ever contingent at the Games. All 7 athletes gained entry to the Olympics through either wildcard invitations or quota spots" ते सर्व मेडल जिंकण्याच्या शर्यतीतून बाद झालेले आहेत, ही माहिती बर्‍यापैकी रिलेव्हंट आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Pakistan_at_the_2016_Summer_Olympics

तरीही पाकने इतिहासात त्याच्या व भारताच्या साईज, रिसोअर्सेस च्या तुलनेत बर्‍यापैकी मेडल्स मिळवली आहेत. बाकी यंदा ७ अ‍ॅतलेट बरोबर ११ अधिकारी गेले आहेत. आपल्याकडेही खेळाडूंपेक्शा अधिकारी , पदाधिकार्‍यांचा 'संघ 'मोठा असतो. ही उपखंडाची संस्कृतीच आहे असे म्हणता येईल...

Pages