Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इतर दुकानांसारखी
इतर दुकानांसारखी एस्टॅब्लिशमेन्ट कॉस्ट या ऑनलाईन स्टोर्सना नसते हा एक ठळक मुद्दा आहे किंमतीच्या फरकांसाठी. शिवाय स्वातीने लिहिले आहे तसे, सध्या नफ्यापेक्षा जम बसवण्यात मग्न आहेत बहुतेक कंपन्या
ऑनलाईन पसार्याच्या
ऑनलाईन पसार्याच्या मेंटेनन्सचा, जाहिरातबाजीचा, खर्चही असेलच पण जगभरातल्या ऑनलाईन ग्राहकांची संख्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असेल.
दोन दोन पेरू, ये कैसे हुआ.
दोन दोन पेरू, ये कैसे हुआ.
या सगळ्या कंपन्या बर्यापैकी
या सगळ्या कंपन्या बर्यापैकी तोट्यात चालतायत. त्यांच्या बॅलन्सशिटस मधून लक्षात येईल.
सध्या या कंपन्या e commerce मार्केट ताब्यात घेण्यासाठी धडपडतायत. भरपूर पैसे ओततायत. अमेझॉनने एक महिन्या पुर्वीच आणखी कितीतरी मोठ्ठी रक्कम भारतात गुंतवणार सांगितलेय. फ्लिपकार्ट सध्या या कट थ्रोट प्रॅक्टिसमध्ये कसे तगायचे यावर कसरत करतायत.
<<
हे खरे आहे. एकच प्रॉडक्ट अमॅझॉन.कॉम व अमॅझॉन.इन वर बघा, किमतीतला फरक लक्षात येईल.
एकदा मार्केट कॅप्चर झाले, की मग देतील दणका मोबाईलवाल्यांसारखा.
पेरू | 28 July, 2016 -
पेरू | 28 July, 2016 - 20:58
दोन दोन पेरू, ये कैसे हुआ. >>>> रुकार(???) मध्ये फरक आहे ना
हो बरोबर @मी मानिनी
हो बरोबर @मी मानिनी
मी अमेझॉनवरून काही वस्तू
मी अमेझॉनवरून काही वस्तू मागवल्या. रविवारी ऑर्डर नोंदवलीय. काल दोन आल्यात. ऑर्डर देताना लक्ष गेले नाही. पण दोनतीन वस्तूंना डिलिव्हरी चार्जेस लागलेत.
ज्या दोन वस्तू आल्यात त्यांच्यासाठी गरजेपेक्षा खूप मोठी , एक तर ५-६ पट मोठं, खोकी वापरलीत. तसंच या वस्तू काही फ्रॅजाइल नव्हत्या. तरीही हवा भरलेल्या फुग्यासारख्या प्लास्टिकच्या पिशव्याही आहेत खोक्यात.
एका वस्तूची डिलिव्हरी रात्री ८ ला तर दुसरीची रात्री १०:३० ला आली.
दुसर्या मुलाला मी विचारलं, की तुमचे ड्युटी अवर्स काय, तर तो म्हणाला की तसे रात्री ८ पर्यंत. पण या डिलिव्हरीज मी माझ्या मित्रासाठी करतोय, कारण त्याच्याकडे जास्त ऑर्डर्स होता.
तासाभरापूर्वी त्याने मला पत्ता विचारायला फोन केलेला, तेव्हा तो अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर होता. अजून का आला नाही म्हणून मी उलट फोन केला. पण फोन आला तो नंबर माझ्या फोनच्या 'लॉगमध्ये फक्त मिस्ड कॉल दिसतील'; या सेटिंगमुळे दिसत नव्हता. म्हणून मला आलेल्या एसेमेसमधल्या नंबरवर फोन केला, तेव्हा तो दुसर्याच कोणी उचलला व तो म्हणाला की माझ्याकडे तुमच्या एरियातल्या ऑर्डर्स नाहीत, पण तुमच्या वस्तूंची डिलिव्हरी नक्की होईल. मग डिलिव्हरी होऊन गेल्यावरही साधारण अकरा वाजता पुन्हा त्याच नंबरवरून मला फोन आला. तर फक्त बोलण्याचे आवाज येत होते. बहुतेक खिशातल्या फोनवर दाब पडून आपणच लागला होता. तर रात्री अकरा वाजताही तो मुलगा पत्ते शोधत होता. दुर्दैवाने काल इथे दिवसभर पाऊस पडत होता.
अमेझॉनवाले जास्त डिस्काउंट देताना या डिलिव्हरी करणार्यांना एक्स्प्लॉइट करताहेत असं मला वाटायला लागलं. फ्लिपकार्टवाले आपल्या डिलिव्हरी वाल्यांना डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणतात. आणि ते जरा जास्त शिकलेले असतात असं वाटतं. इंग्रजे बोलू शकतात. अमेझॉनवाले हिंदीत बोलत होते. स
अर्थात कमी शिकलेल्या डिलिव्हरीवाल्यांमुळे मला फरक पडत नाही. त्या कामाला जास्त शिकलेलं असायची गरज नाही. पण कमी शिकलेले घेणार तेव्हा त्यांना पगारही तुलनेने कमी देत असतील असं वाटलं.
आता त्यांना नोकरी तरी आहे आणि तेवढा तरी पगार मिळतोय असं म्हणायचं की त्यांचं शोषण होतंय असं ते कळेना.
आताच एकापाठोपाठ एक असे
आताच एकापाठोपाठ एक असे मेसेजेस आलेत. तुमची अमुक एक वस्तू कस्टमर उपलब्ध नसल्याने डिलिव्हर होऊ शकली नाही. मग काही वेळात दुसरा, (त्याच) वस्तूची डिलिव्हरी पूर्ण झाली.
आपण ऑनलाइन ऑर्डर करताना जवळचा सप्लायर निवडायला हवा. तेवढेच आपले कार्बन माइल्स कमी होतील. प्रत्यक्ष खरेदीपेक्षा ऑनलाइन खरेदीत पॅकिंगला अपरिहार्यपणे जास्त सामग्री वापरली जातेच.
हो अमॅझॉन जबाँग सगळेच कुरियर
हो अमॅझॉन जबाँग सगळेच कुरियर वाल्यांना प्रचंड एक्स्प्लॉईट करतात.ते फेअर लेबर ट्रेड ची तत्वे पाळत नाहीत.
अमॅझॉन चे पॅकिंग खूपच चांगले असते.
कुठल्याच ऑनलाईन ट्रेडिंग
कुठल्याच ऑनलाईन ट्रेडिंग साईटचा स्वतःचा लॉजिस्टीक सेटप नाही. आऊटसोर्स्डच आहे त्यामुळे एक्स्प्लॉयटेशनचा ठपका अॅमेझॉनपेक्शा त्या त्या डिलीवरी एजन्सीवरच ठेवायला हवा. जास्तीत जास्त ऑर्डर मिळवण्यासाठी वेळेत डिलीवरी करण्याचं प्रेशर डिलीवरी बॉय्जवर आणलं जातं.
मी अमेझॉनपेक्षा असं म्हणणार
मी अमेझॉनपेक्षा असं म्हणणार नाही. अमेझॉनही तितकंच जबाबदार आहे माझ्यासाठी. त्यांनी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. त्यांचीही जबाबदारी आहेच. आणि जास्तच आहे कारण they are the face of it. फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी स्टाफने मध्ये संप केल्याची बातमी वाचली होती. नेमकी त्याच दिवशी माझ्याकडे एक डिलिव्हरी झाली आणि तो डिलिव्हरी पर्सन म्हणे की , असं काही झालं नाही.
लॉजिस्टिक सेटप नाही, आउटसोर्स्ड आहे म्हणण्यापेक्षा त्यांनीच या सगळ्याचा ताणाबाणा बांधलाय असं म्हणायला हवं. तेव्हा आपले सप्लायर्स आणि कुरियर निवडताना त्यांनी या गोष्टी पाहायला हव्यात. त्या नक्कीच तितक्या मोठ्या संस्था आहेत.
अमेझॉनच्या पॅकिंगबद्दल : मी सिलिकॉन मॅट मागवली. एक घडी करून १०इंच गुणिले १६ इंच. त्याला २ इंच उंचीचं खोकं चाललं असतं. ते १० इंच उंचीचं. आत प्लास्टिक पिशव्यांच्या २० पेक्षा जास्त फुग्यांची (दुधाच्या पाव लिटर पिशव्यांएवढा एक) साखळी.
हो, हेही बरोबर आहे. या मोठ्या
हो, हेही बरोबर आहे.
या मोठ्या कंपन्या 'बायर्स मार्केट'चा नारा लावत डिलीव्हरी कंपन्यांवर ग्राहकांना समाधानी ठेवण्याचं अप्रत्यक्ष दडपण आणतात. डिलीव्हरीसाठी तुम्ही २० माणसं लावायची, १०० लावायची की पाचात काम भागवायचं तो तुमचा प्रश्न, आमच्या डिलीवर्या वेळेवर'च' झाल्या पाहिजेत.
त्यांनी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध
त्यांनी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. त्यांचीही जबाबदारी आहेच. >>> तसा तर मग ग्राहकच जबाबदार आहे कारण तोच खरेदी करतो. कुरीअर कंपन्यांचे ग्राहक अमेझॉन / फ्लीपकार्ट इ. आणि अमेझॉनचे ग्राहक आपण. म्हणजे तुमच्या न्यायाने अंतिम जबाबदारी आपल्यावरच येते.
पायी दुकानात जाऊन खरेदी करायचा पर्याय आहेच की. कार्बन माईल्स आणि पॅकेजींग दोन्ही वाचेल.
अमेझॉनच्या पॅकिंगच्या बाबतीत
अमेझॉनच्या पॅकिंगच्या बाबतीत सहमत . मी वॉटरकलर मागवले होते , ते दोन पॅकिंगच्या थरात चाललं असत पण अनावश्यक असे पाच थर लावले होते.
माधव, हव्या असलेल्या सगळ्या
माधव, हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी दुकानात मिळत असत्या तर काय हवं होतं?
ऑनलाइन शॉपिंगचा धागा आहे, तर नेचर्स बास्केट हे ग्रोसरी/ इत्यादीसाठी चांगलं आहे. त्यात अतिरिक्त पॅकेजिंगही नाही, हे नोंदवतो.
दुर्दैवाने आता आपण सगळ्याच वस्तू प्रिपॅक्ड किंवा प्लास्टिक पॅक्ड घेतो. माझ्या लहानपणी आपल्यासमोर वजन होऊन कागदी पिशव्यांत सामान भरलं जायचं. दुधाला काचेच्या बाटल्या असायच्या. रिकाम्या परत करून भरलेल्य घ्यायच्या.
दुर्दैवाने आता आपण सगळ्याच
दुर्दैवाने आता आपण सगळ्याच वस्तू प्रिपॅक्ड किंवा प्लास्टिक पॅक्ड घेतो. > +१ . त्याची जबरी किंमत मोजावी लागते आहे आणि !
पॅकिंग च्या बाबतीत मला हे
पॅकिंग च्या बाबतीत मला हे दिसतं:
अमॅझॉन/इतर बर्याच स्वरुपाच्या बर्याच वस्तू सारख्या पॅक करतात, कधीकधी वस्तू बाय एअर दिल्लीहून पण येतात.
त्यांच्याकडे एक सेट प्रोसेस आहे ज्यात सगळ्या वस्तू चांगल्या आणि विथ भरपूर प्लॅस्टिक बबल रॅप आणि फुगे पॅक केल्या जातात.
ही काचेची, ही नीट पॅक करतो, ती प्लॅस्टिक ची, एक खोकं पुरे हे वर्गीकरण त्यांचे पैसे आणि जगाची कार्बन फूटप्रिंट वाचवेल पण ते करायला त्यांच्याकडे मॅन पॉवर आणि रिसोर्सेस नाहीत.शिवाय त्यातही वेगवेगळे प्रकार केले तर नव्या स्टाफ चा पॅक करताना गोंधळ होऊन एखादी वस्तू कमी प्रोटेक्शन ने पॅक केली जाऊ शकते.
आपण या साईट ना वस्तू प्रमाणे कमी जास्त पॅकिंग आणि पॅकिंग चे रिसायकलिंग याच्या सूचना नक्की देऊ शकतो.
अॅमॅझॉन कंपनीच्या मूळ
अॅमॅझॉन कंपनीच्या मूळ कार्यपद्धतीतच जितकं जास्त जमेल तितकं काम कर्मचार्याकडून करून घेण्याची 'संस्कृती' आहे. तेव्हा ते इतरांकडून तशीच अपेक्षा करणार.
आणि कार्बन फूटप्रिंट वगैरे सगळं ठीके पण अनेकदा सोय, जवळपास ती गोष्ट उपलब्ध नसणं याचसाठी ऑनलाईन ऑर्डर दिली जाते. सहजी जवळपासच्या दुकानांत मिळत असेल् तर ऑनलाईन जायची गरजच नसते
या साईटवरून खरेदी करताना
या साईटवरून खरेदी करताना खबरदारी बाळगा. मी मोहात पडून एक ट्रॅकपँट आणि शॉर्ट मागवली. घातलेल्या दुसऱ्या मिनिटाला सीटवर टर्कन उसवली. आता रीटर्न ची रिक्वेस्ट टाकलीये, पण कितपत देतील याची शंका आहे. अक्कलखाती जमा नाहीतर
बिग बास्केट मध्ये सध्या फुकट
बिग बास्केट मध्ये सध्या फुकट सहा ग्लासेस चा सेट वाट्त आहेत. पहिला आल तेव्हा मला जाम भारी वाटले. मग दुसृया वेळी अगदी ब्रेड वगैरे मागवले होते तेव्हाही परत सहा ग्लासेस आलेत. आता बारा ग्लासेसचे लोनचे घालावे का?
Madhav, भरत हे मुद्दे मांडून
Madhav, भरत हे मुद्दे मांडून ग्राहकाची जवाबदारी पार पाडताहेत.
आशुचॅम्प, तू घेतलेल्या वस्तू
आशुचॅम्प, तू घेतलेल्या वस्तू अॅमेझॉन फुलफिल्ड होत्या का? असतील तर हमखास परतावा मिळेल. आणि रीटर्न पॉलिसी प्रत्येक वस्तूला वेगळी असू शकते तीपण आधी नेहेमी बघून घ्यावी.
आजपर्यंत मला अॅमेझॉनकडून परतावा मिळाला नाही असे झालेले नाही. क्रेडिट कार्ड किंवा रोख दोन्ही प्रकारच्या व्यवहारात
अॅमेझॉन.इन वर ऑर्डर
अॅमेझॉन.इन वर ऑर्डर नोंदवताना उपलब्ध असतील तेवढ्या वस्तू एकाच खोक्यात पाठवण्याचा पर्याय देत नाहीत का? इथे तसा पर्याय असतो बरेचदा.
बरेचदा एका माणसाच्या एका
बरेचदा एका माणसाच्या एका वेळच्या ऑर्डरी वेगवेगळ्ञा सप्लायर कडून असतात, एका सप्लायर ला उशीर झाल्यास सगळ्यांच्या ऑर्डरी अडकतील म्हणून जश्या येतात तश्या डिलीव्हर करत जातात
नॉय. मी ३ वस्तू मागवल्या
नॉय. मी ३ वस्तू मागवल्या होत्या दोन महिन्यांपूर्वी. तीनही वेगवेगळ्या वेळेला आल्या
पण असा पर्याय असायलाच हवा. एकावेळेला सगळ्या/उपलब्ध असतील तेव्हढ्या वस्तू मिळतील तरी. पुन्हा पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट, फ्यूल वाचेल ते वेगळंच...
सप्लायर वेगवेगळ्या जागी
सप्लायर वेगवेगळ्या जागी असतात. Packing, डेस्टिनेशनच्या जवळच्या हबमध्ये करत नसणार.
लास्ट वीकला मी अॅमेझॉन.इन
लास्ट वीकला मी अॅमेझॉन.इन वरून रेड मी नोट-३ आणि त्यासाठी गोरीला स्क्रीन गार्ड मागवला, मोबाईल फक्त साध्या प्लॅस्टीक बॅगच्या पॅकिंगमधे आला आणि स्क्रीन गार्ड मात्र बबल व्रॅप आणि कोरोगेटेड बॉक्सपॅक होऊन
अॅमेझॉन.इन वर ऑर्डर
अॅमेझॉन.इन वर ऑर्डर नोंदवताना उपलब्ध असतील तेवढ्या वस्तू एकाच खोक्यात पाठवण्याचा पर्याय देत नाहीत का? इथे तसा पर्याय असतो बरेचदा.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सगळ्या shopping site चे हजारोंनी सेलर्स , तेही वेग वेगळ्या शहरात असतात .जरी तुम्ही एकाच वेळी ५-६ वस्तू ऑर्डर केल्या आणि एकत्र पेमेंट केले तरी वस्तू वेगवेगळ्या येतात याचे कारण तेच आहे.
amazon वरून १५ दिवसापूर्वी Moto G मोबाईल आणि त्याच्या accessories ची एकत्रित ऑर्डर टाकली होती .
मोबाईल बंगलोर हून आला , मेमरी कार्ड भिवंडी हून , फ्लिप कवर दिल्ली हून , स्क्रीन गार्ड जयपूर हून ,
बॅक फॅन्सी कवर इंदोर हून , OTG केबल कलकत्त्यावरून , तर हेड फोन राजकोट हून आला .
एकाच ऑर्डर ची ऑल इंडिया मधून शॉपिंग ......:P


तर मग
कशा येणार एकाच खोक्यात आणि एकाच दिवशी ....?
दर्दी खवैय्यांकरता
दर्दी खवैय्यांकरता प्लेसऑफओरिजिन डॉट इन नावाच्या वेबसाईटवर संपुर्ण भारतभरच्या गावोगावचे स्थानिक प्रसिद्ध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत आणि माफक आणणावळीत घरपोच मिळतात.
मी पंजाबी पचरंगा अचार, गाजराचे ऑलीव्ह तेलातले लोणचे, आल्याचे लोणचे, कलिंगड आणि गुलाब जॅम ई. पदार्थ जे सगळे मिळून ७०० रुपयांच्या आसपास किंमतीचे होते ते ६० रुपयात घरपोच मिळाले.
अशीच अजून एक फ्लेवरऑफमायसिटी डॉट कॉम नावाची वेबसाईट पण आहे. पण तिकडून अजून काहीही मागवले नाहीये.
हर्पेन किंमत ७०० +६० शिपिंग
हर्पेन किंमत ७०० +६० शिपिंग असंच ना?
साईट छान आहे, ऑथेंटिक फिल्टर कॉफी पावडर आहे आणि एक जिंजर कॉफीपण interesting वाटतेय..
Pages