ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! बॅग्जची चर्चा Happy

हायडिझाईनच्या दोन बॅग्ज मी पण त्यांच्या दुकानातून घेतल्या आहेत. (डिस्काउन्ट कुपन्स होती म्हणून केलं धाडस!) ते बॅग ठेवायची कव्हर बॅगपण देतात आणि बॅग मेन्टेन करायच्या सूचनाही! छान टिकल्या आहेत दोन्ही बॅग्ज!

अजून एक blue and blues नावाचा ब्रँड आहे. मी तीन वर्षांपूर्वी शॉपर्स स्टॉपमधून घेतलेली एक बॅग...खूप रेग्युलरली वापरली...अजून काहीच प्रॉब्लेम नाही....जुनीपानी वाटत नाही. त्यांची खासियत म्हणजे कलर्ड लेदर असतं...नेहमीचं ब्लॅक, व्हाईट, ब्राऊनच्या पलीकडे जातात.
https://www.blueandblues.com/onlinestore/index.php

वर्षू ताई मग थोडे दिवस वापरून ठेवून द्यावी आणि एकदम १०-१२ वर्षांनीच काढावी. म्हणजे निदान गेलेल्या फॅशन वापरण्यापेक्षा विंटेज वापरलंय असं म्हणता येईल. Wink

इथून इन्स्पायर होऊन अमेझॉन वरून हाय डिझाईन बॅग मागवली, आधिचा फ्लिपकार्ट्चा अनुभव होता.
डिलिव्हरी ३ दिवसांनी झाली, छान पर्स घेतली, ४००० ची २००० ला पडली.
प्राजक्ता_शिरीन, थँक्स Happy

अरे वा आशु, मस्त Happy

बॅगचं मटेरियल फोटोत जसं दिसलं / अपेक्षित होतं तसचं आहे का ? आणि साईज ?

होय प्राजक्ता, साईज, कलर सर्व डिट्टो. पण मटेरियल आईने रीसीव करून छान असं कळवलय, कारण मी सिंगापुर वरून भारतात ऑर्डर दिली होती, पेमेंट ऑनलाईन Wink

Myntra OLA cab etc websites band hotayet
Apps chalanar fakt mhane.
Snapdeal n flipkart is on d same path

फायनली madeinindiabeads.com आणि craftgully.com वरुन काही सामान मागवल आणि काही सम्राट मधून घेतल .. madeinindiabeads च पार्सल यायला जरा वेळ लागला .. म्हणजे जवळपास एक हप्ता आणि craftgully वरुन १ दिवसात मिळाल .. मस्त आहे दोन्ही साईट्स .. कुणाला हव असल्यास तिथुन घेऊ शकतात ..

माझ्याचप्रमाणे माबोकर श्रद्धा ने सुद्धा काही सामान मागवलं .. त्यात एक वस्तु अव्हेलेबल होऊ न शकल्याने त्यांनी डिलीव्हरी दिल्यानंतर माफी मागुन पैसे पन रिफंड केलेत madeinindiabeads वर Happy

ऐ वॉव.. हाय डिझाईन चक्क डिस्काउंट मधे मिळाली.. वेरी लक्की.. आतापासून मी लक्ष ठेवीन जाबोंग, अ‍ॅमेझोन वर..

ललिता Lol नाय नाय.. ती बॅगवती , माझी एक मैत्रीण नापा लेदर वापरून बनवून घेते.. मोस्टली कस्टम मेड.. म्हंजे कस्टमर च्या ऑरडरी प्रमाणे एक पीस पण बनवून घेता येतो.. ती वाली मी तिच्याकडून बनवून घेतली होती.. Hermès ब्रँड ची Kelly Bag चं डिझाईन कॉपी केल्तं Wink

ओरिजिनल ५००० यू एस $ किमतीची ६००० रु मधे झाली बनून

नापा लेदर माझं आवडतं आहे अतिशय कारण बॅग चा आकार मोठा असला तरी फुला सारखी हलकी आहे वजनाला..

ही
ओरिजिनल वाली

और मेरी कॉपी तो तूने देखीच है.. कंप्लीट आहे विथ कुलुप वगैरे..

फ्लिपकार्टवरून ५ तारखेला मी अ‍ॅनोडाईज्ड कढई मागवली होती.आज सकाळी मिळाली.नंतर पहाते तो साईजमधे फरक आहे.साईजमधे फरक आहे म्हणून मेल पाठवली आहे . बघू आता कधी पैसे परत करतात ते.मला वस्तू बदलून दिली असती तरी चालली असती पण तसा ऑप्शन नव्हता.

हे घेतले काल स्नॅपडीलवरून.

MRP 999.
२७० ला मिळाले Wink

येथे http://www.pustakjatra.com/ बद्दल देखील झालेला उल्लेख पाहून आनंद वाटला. काही कल्पना, सुचना असतील तर स्वागत आहे..

येथे इमेल देणे योग्य आहे, नाही माहिती नाही. तेव्हा साईटवर संपर्क सोय आहे. आपले अमुल्य विचार जरूर व्यक्त करावेत ही नम्र विनंती.

येथे अनेकांनी ऑनलाइन पेंमेटबद्दल काही शंका व्यक्त केलेल्या दिसत आहेत. त्यांच्यासाठी...

१. आम्हाला (साईटवाल्याला) तुमच्या कोणत्याही बँक डीटेल्स दिसत नसतात, शेवटचे ३-४ क्रमांक सोडले तर.
२. वन टाईम डिजिटल पासवर्ड ची सोय आता जवळपास सर्व बँक मध्ये झालेली आहे.
३. साईटवर तुमचा पेमेंटचा कोणताही डाटा स्टोर होत नाही (फक्त काही जे मनी व्हालेट ची सुविधा देतात ते सोडून)
४. सर्व साईटवर पेमेंट गेटवे आहेत, असतात व त्यांची स्वत:ची एक सुरक्षा व्यवस्था असते.

अलीएक्स्प्रेसवरुन हे कॉर्नर / एज प्रोटेक्टर २९ मार्चला मागवले होते. आज ते पोहोचले. प्रॉडक्ट छान आहे. आणि त्याबरोबर एक टू साइड टेपही आहे चिकटवायला. रंग जसा चित्रात होता तसाच आला. घरात हवे होते तिथे लावुनही झाले.

सावली, लक्की यू! २९ मार्चची ऑर्डर ९ एप्रिलला मिळाली.
बरं, ऑनलाईन पेमेंट व्यतिरीक्त डिलीव्हरी घेताना काही पैसे द्यावे लागले का? पोस्टेज वगैरे?

फ्लिप्कार्ट वर अमेझिंग ऑफर्स मध्ये रझा पेंटिंग सारखा एक दिवा अर्ध्या किमतीत मिळाला आहे. व हँड टोवेल्स ५०% डिस्कौंट. शिवाय एक इअर फोन्स आणि दोन वह्या घेतल्यात. आता येतील. दिव्या बद्दल उत्सुकता आहे.

हो ना. मला इतक्या लवकर सामान येईल याची अपेक्षा नव्हती.
फ्री शिपींग वाला ऑप्शनच होता. अजुन काही पोस्टेज भरावे लागले नाही.
बहुधा अशा वस्तु ज्यांना कस्टम ड्युटी लागते त्यांना डिलीवरच्या वेळेस थोडे पैसे भरावे लागत असतील असा अंदाज आहे. शिवाय अशा कस्टम ड्युटी लागणार्‍या वस्तु पोहोचायला वेळही लागतो कारण कस्टम प्रोसेसस होत असतील.

ओक्के!
मी ज्वेलरी मागवली आहे. आणि दक्षिणाचं गॉगल पोस्टेज वाचून आठ आण्याची कोंबडी आणि दहाऽऽ रुपयांचा मसाला नाही ना लागणार अशी भिती वाटून राहिली आहे Wink

सावली, कोपर्‍यांवर ते नेमके कसे लावायचे असते? फोटोवरून त्या उंचवट्यांची नेमकी साईझ किती असेल याचा अंदाज येत नाही.

ऑनलाइनचा पहिल भुर्दंड बसला काल, ७५०/- रु चा चुना लागला आहे.. Uhoh
इन्टरनेट रिचार्ज करताना पहिला प्रयत्न कँसल केला आणि पुन्हा दुसर्‍या प्रयत्नात रिचार्ज केलं, नंतर समस आल्यावर कळलं की आधिचा कँसल केलेला आणि नवा अशे दोन्हि रिचार्ज झाले आणि डबल पैसे गेले. कॉल सेंटर ला फोन केल्यावर त्यांनी हात वर केले. म्हणाले तुमचे दोन्हि पॅक सेल झालेत, पण एक पॅक ने दुसर्‍याला रिप्लेस केलय, आता ना डेटा मिळत आहे ना दोन महिन्याची व्हॅलीडिटी मिळत आहे..
जळफळाट होत आहे.
असो अक्कल खाती जमा झाले आत हे पैसे.

कोपर्‍यावर पेक्षा कडांना लावायचे आहे ते. दोन्ही कडांना नीट ओवरलॅप करत लावले तर आपोआप कोपरे पण प्रोटेक्ट होतात.
त्या उंचवट्याची साईज ८मिमी आहे. त्या वरच्या लिंकमधे कडांना लावलेले दाखवलेय. हव असल्यास माझ्याकडे लावलेल्याचा नंतर वेळ मिळाला की फोटो काढुन टाकते. फर्निचर / काचेच्या दोन्ही कडा ( वरची खालची ) एकाचवेळी कवर करायला मला हे सोयीचे वाटते. बरेच दिवसापासुन इथे दुकानात शोधत होते.

तुम्हाला फक्त कोपरे प्रोटेक्ट करायचे असतील तर हे ही उपलब्ध आहे ते बघु शकता.
आणि फक्त एकच कड प्रोटेक्ट करायला हे बघा.

Pages