सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
मस्त फोटो मानुषीताई. फोटोंना
मस्त फोटो मानुषीताई. फोटोंना नंबर देत जा ना प्लीज , म्हणजे मला नावं लिहिता येतील
शेवटचा फोटो वाइल्ड कॅरट उर्फ क्वीन अॅन्स लेस .
त्याच्या वरचे मोनार्डा उर्प्फ बी बाम. हमिंग बर्ड व इतर परागीभवन करणार्या कीटकांचे आवडते फूल. तुम्हाला या फुलांच्या आसपास हमिंग बर्ड दिसतील .
निळसर आहेत ते चिकोरी. आजच सकाळी ऑफिसच्या वाटेवर चिकोरीची फुले पाहून तुमची आठवण आली - तुम्हाला ही फुले दिसतील का ? तुम्ही फोटो काढाल का विचार करत होते.
सर्वच फोटो भारी आहेत. क्वीन
सर्वच फोटो भारी आहेत.
क्वीन अॅन्स लेस चा मी पुर्वी मायबोलीवर प्रकाशित केलेला हा फोटो
निसर्ग बघून डोळे अगदी निवले !
निसर्ग बघून डोळे अगदी निवले !
कित्ती छान आहेत सगळे
कित्ती छान आहेत सगळे फोटो...मी इकडे आलेच नव्हते कधी! सगळे पाहिले...
हे माझे काही फोटो... मागे आम्ही सी ऑफ गॅलिलीला(इस्राईल) गेलेलो फिरायला ... तिथली फुले...
फोटो मस्त . मेधा तुझ्या मुळे
फोटो मस्त . मेधा तुझ्या मुळे सगळी नाव कळतात आम्हाला .
निसर्गा आणि निसर्गाच्या गप्पावर नाही ? असं कसं ? ( स्मित )
हो ना... आता येत जाईन...खूप
हो ना... आता येत जाईन...खूप आवडला हा धागा...
खरंच खूप इन्टरेस्टिन्ग माहिती
खरंच खूप इन्टरेस्टिन्ग माहिती आहे बघ तिथे. sevenoakslavenderfarm.com>>>>नक्की मानुषीताई
इंद्रा, मस्त फोटो
मेधा तुझ्या मुळे सगळी नाव कळतात आम्हाला . >>>>>>+१०००
सुपर्ब फोटोज सारेच
सुपर्ब फोटोज सारेच
<<निसर्ग बघून डोळे अगदी निवले
<<निसर्ग बघून डोळे अगदी निवले !>> हे म्हणताच निसर्गा हजर
मस्त फोटो मानुषीताई. फोटोंना
मस्त फोटो मानुषीताई. फोटोंना नंबर देत जा ना प्लीज , म्हणजे मला नावं लिहिता येतील स्मित>>>>>>>
सो स्वीट ऑफ यु...मेधा. पुढील सर्व फोटोजना नं . असतील. नक्की. धन्यवाद!
वाह, कसली मस्त फुले, सुंदर
वाह, कसली मस्त फुले, सुंदर फोटोज .... साक्षात निसर्गच उभा केलात कि मंडळी ....
मी इथे नियमित येवून वाचून
मी इथे नियमित येवून वाचून जाते बरं का
मी इथे नियमित येवून वाचून
मी इथे नियमित येवून वाचून जाते बरं का >> मी पण
काल हिस्टरी चॅनेल वर इस्रायल
काल हिस्टरी चॅनेल वर इस्रायल दाखवत होते... अगदी गवताचं पातही न उगवणारा तो भाग, पण तिथे निसर्गाचे एक भव्य रौद्र रुप बघायला मिळालं ( बाकि रुद्र म्हणजे रडवणारा.. असा अर्थ वाचला होता कुठेतरी.. तसाच व्यंकट म्हणजे वक्र.. कारण जे काही सौंदर्य असते ते वक्रच असते ! )
अश्वे निसर्गा तुमचे
अश्वे
निसर्गा तुमचे स्वागत.
मेधा धन्स नाव टाकतेस त्यासाठी.
सगळे फोटो सुंदर.
इथवर आमचे आम्ही उगवलोय आता पुढचे तुमच्या हातात.

व्वा! मस्त फोटो. माझाही
व्वा! मस्त फोटो.

माझाही खारीचा वाटा!
१.
२.
वा सुंदर सुंदर प्रचि अन महिती
वा सुंदर सुंदर प्रचि अन महिती
(No subject)
गुलमोहोर मस्त ग शोभा. सायली
गुलमोहोर मस्त ग शोभा.
सायली ही बघ ग तुझी लेकरे माझ्या घरी आनंदाने नांदतायत. बघ कसा टवटवीतपणा आलाय फुलांना.

आता ही फुलली की तुझीच आठवण निघते ग सायू.
जागू, मस्त आहेत फुलं. नाजूक,
जागू, मस्त आहेत फुलं. नाजूक, आणि रंगही सुंदर आहे.
जागू , कसल्या शेंगा आहेत
जागू , कसल्या शेंगा आहेत त्या ? मोड आलेल्या बिया नीट जपून लावशीलच ना तू
एकदा तुझ्या अंगणाचे व्यवस्थित फोटो फीचर कर बरे
अर्रर्र..ईकडे यायलाच जमले
अर्रर्र..ईकडे यायलाच जमले नाही,वा.दि.हा शु साठीशशांकजी सकट तुम्हा सगळ्यांचे मनपुर्वक आभार..
आणि ईतक्या उशीरा आभार मानते आहे त्या बद्द्ल क्षमस्व. ---/\----
पण मला शुभेच्छां सोबत चे प्र.ची का दिसत नाहीये?
माझ्या बाल्कनीत एका कुंडीत लावलेल्या कृ.क. च्या वेलीला लागलेले या सिझनचे पहिले वहिले फुल....:)
८,१० कळ्या दिसत आहेत अजुन, सारख बाल्कनीत घुटमळायला होतं....:)
मानुषी, फुले सुंदर आणि
मानुषी, फुले सुंदर आणि फोटोग्राफी तर त्यांच्याहुनही सुंदर !!>>>+१
सायु,फोटो देखणे आहेत ग.
मस्त फुले आहेत.
मस्त फुले आहेत.
मस्तच आहे कृ.क.!!!
मस्तच आहे कृ.क.!!!
माझ्याकडच्या कडिपत्त्याला
माझ्याकडच्या कडिपत्त्याला कसलतारि रोग झालाय, म्हणजे पानांवर पांढरे ठिपके, आणि फांदीवर पांढरा कापसासारखा काहीतरी आहे, .
मि इथे त्याचा फोटो टाकायला बघते पण फाइल अपलोड होत नाही, साइज मोठी होतेय. ती लहान कशी करायची? मला मोबाईलच्या गॅलरीतून फोटो अपलोड करायचा आहे. Please help करा.
प्रज्ञा, ते पांढरे ढेकुण
प्रज्ञा, ते पांढरे ढेकुण आहेत. चिवट असतात. साबणाचे सौम्य द्रावण फवारून पहा. त्याने जर फरक पडला नाही, तर रोगट फांद्या काढून, लांबवर नेऊन टाकल्या पाहिजेत.
नर्सरी वाल्याने एक औषध दिलय
नर्सरी वाल्याने एक औषध दिलय "चंडिका505" ह्या नावाचे, ते पाण्यात मिसलून फवारायचे अस म्हणाला तो. मि बऱ्याच वेळा फांदया तोडूं टाकल्या, नवीन पालवी आली की परत तो रोग दिसतो
माझा खुप छान झालेला कडीपत्ता
माझा खुप छान झालेला कडीपत्ता गेला ह्याच कारणाने काही वर्षापुर्वी, तेव्हा मला मायबोली वगैरे माहीती नव्हतं नाहीतर नि ग वर मार्गदर्शन मिळालं असतं.
वाह मस्त माहिती आणी
वाह मस्त माहिती आणी फोटोज..
थँक्स मेधा, नावं कळतात मोस्टली तुझ्या मुळे
सु.प्र.
Pages