निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती वेगवेगळी नावं कळतायेत. Happy आम्ही पण याला खोबर्‍याची फुलं म्हणतो.
जागू मस्तं धागा. Happy मी नेहमी बघते, पण हल्ली लिहीत नाही जास्तं, कारण कॉप्म्युटर चा काहीतरी घोटाळा आहे. नीट टाइप होत नाही.

निळसर आहेत ते चिकोरी. आजच सकाळी ऑफिसच्या वाटेवर चिकोरीची फुले पाहून तुमची आठवण आली - तुम्हाला ही फुले दिसतील का ? >>>>>
मेधा कधीपासून विचारीन म्हणते...ही निळसर फुलं असलेली झुडुपं ...चिकोरी....
तर कॉफीमधे घालतात ती याच झुडुपापासून मिळवतात का चिकोरी?
आपल्याकडे...(भारतात) जी ब्रू कॉफी मिळते...ती कमी कॉन्स्टिपेटिव्ह असते असा समज आहे. कारण नेस्कॉफी अति प्युअर म्हणजे त्यात आजिबात चिकोरी नसल्याने ती थोडी हार्मफुल्/कॉन्स्टिपेटिव असू शकते. खूप जास्त घेतली तर!

.

आम्ही या क्रेप मर्टल / खोबर्‍याच्या फुलांना "आईस्क्रीमची फुलं" म्हणायचो लहानपणी! पुण्यात दिसली नाहीत कुठे मला.

मेधा कधीपासून विचारीन म्हणते...ही निळसर फुलं असलेली झुडुपं ...चिकोरी....
तर कॉफीमधे घालतात ती याच झुडुपापासून मिळवतात का चिकोरी? >>
चिकोरी Genus मधे एक Species ची मुळं सुकवून त्याची पावडर कॉफीत मिसळून वापरतात. त्यात कॅफीन अजिबात नसले तरी रंग आणि चव कॉफी डिकॉक्शनच्या जवळपास असते. अमेरिकेत न्यू ऑर्लीन्स भागात कॉफी + चिकोरी मिक्स प्रचलित आहे - फ्रेंच कॉलनी असल्याचा प्रभाव . ती पद्धत भारतात सुद्धा बहुतेक पॉण्डिचेरी भागातल्या फ्रेंच वसाहतींमधून आली असावी.

त्याच Genus मधले काही Species, आणी कल्टिव्हार्स सॅलड मधे वापरले जातात आणि काही ( अमेरिकेत तरी) जनावरांच्या चार्‍यासाठी वापरले जातात.

मेधा,खूप छान माहिती देत असतेस..
आईसक्रीम ची फुलं.. अगदी हेच म्हणत असू आम्ही ही .. Happy

ममो, छान ओला हिरवा फोटो आहे...

सगळ्यांचेच फोटो छान Happy

गौरी, मस्त फोटो, मला हे असं वातावरण फार आवडत, दिवसभर मळभ, अधुन मधुन येणार्‍या जोरदार सरी, पाण्याचा येणारा रपरप आवाज...... अशावेळी आवडती गाणी लावुन खिडकीत बसावं आणि आवडत पुस्तक वाचावं....... आहा हा,,,,,,,,,,,

गौरी मासा आहे ना तो?

बहुतेक सध्या ओरीजनल निसर्गात सगळे रमलेयत.

हे कसल फुल? हे झाड बर्‍याच ठिकाणी दिसत.

श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे.

अर्थात आपल्या ह्या धाग्यावर कायम श्रावणमास असतो, निसर्ग कायम बहरलेला असतो Happy .

वरचे सर्व फोटो मस्त आहेत.

या वर्षी पावसाने भारतात बर्‍याच भागात थैमान घातलेय, पूर ओसरु देत आणि लोकांना आपले घर मिळू दे.

आमच्या नगरात प्रचंड पाऊस.
लगालगा आधी काय झालं तर वीज गेली. वायरींवर २/३ ठिकाणी झाडं पडली.

मानुषीताई नगरात कधी आलात परत? काळजी घ्या. लाईट इथेही घालवतायेत. पाऊस थांबून थांबून पडतोय तरी.

हेमाताई मस्त स्वागत फोटो.

हाय
सुदुपार निगकर्स .....कसे आहात? ववीत मज्जा केलेली दिसते!
ममो फोटो मस्त.
अन्जू
नगरात ३१ जुलाईस आले परत. हो गं... काळजी घेतेय!
भरपूर पाऊस आजही.
५ महिन्यांपूर्वी सहज टाकलेल्या मिरची बीयांची झाडं येऊन त्याला मिरच्या आल्यात.

ममो, फोटो हिमालयातला आहे का?
मानुषी, छान आल्यात मिरच्या. आता मिरच्या आणायला बाजारात जायला नको. Proud

मानुषी, मायदेशात स्वागत.

फक्त मीच नाही तर मिरच्या ही स्वागताला अगदी लवून उभ्या आहेत ( स्मित)

हो शोभा, हिमाचल मधलाच आहे बियास नदी.

जागू, फुल मस्त दिसतय.

Pages