सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
वर्षु दी, मस्त फुले आणि
वर्षु दी, मस्त फुले आणि कीत्ती कळ्या...:)
(No subject)
मोठे करमळ, दिनेश दा आणि
मोठे करमळ, दिनेश दा आणि शांकली ने खुप छान माहिती / वर्णन दिले होते त्यामुळे या झाडाला नागपूरात शोधु शकले..:)
सायु, मस्त आलात मोठ्या
सायु, मस्त आलात मोठ्या करमळीचा फोटो.. असा फोटो काढताना काय प्रयास पडतात त्याची चांगलीच कल्पना आहे मला !
आज गुरुपौर्णिमा -
आज गुरुपौर्णिमा - निसर्गगुरुंना सादर वंदन....
_________/\_______
आज गुरुपौर्णिमा -
आज गुरुपौर्णिमा - निसर्गगुरुंना सादर वंदन.... -------------/\---------- +१००
(शशांक , शा़ंकली त्यात तुम्ही देखिल बर्का...:) )
माझ्याकडचे कमळ छान वाढते आहे ....:)
वाह..सायु.. ऑसम आहे तुझी बाग
वाह..सायु.. ऑसम आहे तुझी बाग आणी फुलं,पानं...
अगा त्या गुलाबाच्या झाडाला एकावेळी शंभरेक कळ्या सहज असतात.. संपूर्ण कुल्लू वॅलीत वसलेल्या घरांघरांत तुला अनोख्या रंगाचे गुलाब भरगच्च लागलेले दिसून येतील..
हा गुलाब आमच्या मित्राच्याच अंगणातला आहे
सर्व निसर्गगुरुंना सादर प्रणाम !!!. मी एकटीच इकडे श्टुडंट हाये
निसर्गगुरुंना सादर वंदन
निसर्गगुरुंना सादर वंदन >>>>>>>> निसर्ग हाच सर्वांचा गुरु - अशा या गुरुंचरणी वंदन ....
____________/\___________
त्याच्यापुढे आपण सगळेच शिष्य, निसर्गप्रेमी, निसर्गमित्र वगैरे..... पण गुरु एकच - एकमेवाद्वितीयम् ....
निसर्गगुरुंना सादर प्रणाम
निसर्गगुरुंना सादर प्रणाम
निसर्ग गुरूंना वंदन !
निसर्ग गुरूंना वंदन !
त्याचेच देणे त्याच्या पायी
त्याचेच देणे त्याच्या पायी अर्पण....
अरे वा, आज सगळेच फोटो सुंदर
अरे वा, आज सगळेच फोटो सुंदर !
सायु, भराभर वाढते आहे !!
निसर्गगुरुंना सादर
निसर्गगुरुंना सादर प्रणाम.
सर्वच फोटो सुंदर.
सर्वांना गुरुपैर्णिमेच्या
सर्वांना गुरुपैर्णिमेच्या शुभेच्छा! निसर्गगुरुंना सादर प्रणाम.
सर्वांचे फोटो मस्तच! आणि माहितीही!

१)
२)

३)

एक ससा भेटला पण खूप लांब होता.

अरे वा, मस्त फोटो !
अरे वा, मस्त फोटो !
क्रेप मर्टल फुलले सुद्धा
क्रेप मर्टल फुलले सुद्धा तुमच्या इथे ? आमच्या इथे एखाद दुसरेच फुलले आहेत. बहुतेक झाडांवर कळ्याच आहेत.
हे क्रेप मर्टल का? हम्म.. हे
हे क्रेप मर्टल का? हम्म.. हे इथे खूप फुललंय!
यात फोटो२)पांढरा पिवळा आणि
यात फोटो२)पांढरा पिवळा आणि ३)गुलाबी असे दोन रंग आहेत का?
क्रेप मर्टल किती सुर्रेख..
क्रेप मर्टल किती सुर्रेख.. नाजूक लेस चं दिसतंय..

हे तेच झाड आहे का, लहानपणी ज्याच्या कळ्या हाताने दाबून मुद्दामून फुलाला उमलवायचो??
जागु, माधव, ममो.. सुंदर्र फोटोज
वा सगळे फोटो मस्त. ते क्रेप
वा सगळे फोटो मस्त.
ते क्रेप चे फोटो मला नेहमीच लहानपणात घेऊन जातात. आमच्या मागच्या दरवाज्यातच अगदी हे गुलाबी क्रेप चे झाड होते. त्यामुळे खुप जवळची आहेत ही फुले. मी बर्याचदा खेळताना घ्याय्ची हे फुले खोबर म्हणून. आणि आम्ही त्याला खोबर्याचेच झाड म्हणायचो. खरवडलेल्या खोबर्याप्रमाणे दिसत म्हणून.
क्रेप मर्टल हे नाव इथेच
क्रेप मर्टल हे नाव इथेच कळले... याला मराठीत गुलमेन्दी / झुडपी ताम्हण म्हणतात.. (ईती शांकली)
मानुषी ताई खुप छान फोटो....मी यात पिवळा रंग नाही पाहिला..
हे माझ्या कडुन...:)

लहानपणी ज्याच्या कळ्या हाताने दाबून मुद्दामून फुलाला उमलवायचो??++ हो हे तेच झाड आहे...:)
जागु,वर्षु,दिनेशदा, सगळे फोटो
जागु,वर्षु,दिनेशदा,
सगळे फोटो मस्त !
माबोला खुप मिस करतोय...
मानुषी, आम्ही या फुलांना
मानुषी, आम्ही या फुलांना खोबर्याची फुले म्हणायचो... पण यातला एक रंग जरा वेगळा आहे, भारतात बघितला नाही मी कधी..
अनिल, आम्ही पण मिस करतो तूला !
सगळ्यांचे फोटो मस्त. वर्षू,
सगळ्यांचे फोटो मस्त.
वर्षू, मागच्या पानावर पांढरे फुल आणि त्यातुन व्हॉयलेट् फुल मस्त होते. नाव माहित आहे का...
मानुषी, कासवाच्या बाबतीत खुप समज्/गैरसमज आहेत. कासवाने डोळ्यात फुंकर मारली तर अंधत्व येतं हेही ऐकलय. आता एवढ्या खाली वाकुन त्याच्याकडुन फुंकर मारुन घ्यायला कोण जाणार? तरी असे समज अस्तात....
अरे अनिल दिसला इकडे बरेच
अरे अनिल दिसला इकडे बरेच दिवसांनी.. आम्ही पण तुला मिस करतोय.. आहेस कुठे तू आता??
वर्षू, मागच्या पानावर पांढरे फुल आणि त्यातुन व्हॉयलेट् फुल मस्त होते.... साधना..मागे म्हंजे एक्झॅक्टली कुठे गा..
अनिल कुठे होतात इतके दिवस?
अनिल कुठे होतात इतके दिवस?
सर्वच फोटो मस्त मस्त क्रेप
सर्वच फोटो मस्त मस्त क्रेप मर्टलचे, मी कुठे पाहिल्याचं आठवत नाही. ससा फार गोड मानुषीताई.
सायु फ्लॉवरपॉट(का कुंडी आहे ती) आणि खालचा रुमाल पण मस्त फुलांबरोबर.
क्रेप मर्टलचे, मी कुठे
क्रेप मर्टलचे, मी कुठे पाहिल्याचं आठवत नाही. >.अंजू , मुंबैत तरी पुष्कळ कॉमन आहेत ही झाडं. पांढरी आणि गुलाबी- जांभळ्या छ्टा पाहिल्यात. इथे काही ठिकाणी अगदी गडद लाल - कुंकू कलरची फुले पण पाहिलीत.
आम्ही कॉलेजात असताना आइसक्रीम कोन प्लांट म्हणत असू . क्रेप मर्टल हे नाव इथे आल्यावर कळले
मेधा आता लक्ष ठेवेन. मोठे
मेधा आता लक्ष ठेवेन. मोठे ताम्हण आहेत डोंबिवलीत पण झुडपी ताम्हण नाही बघितले.
आम्ही कॉलेजात असताना आइसक्रीम
आम्ही कॉलेजात असताना आइसक्रीम कोन प्लांट म्हणत असू >>> हो मेधा , बरोबर. मस्त दिसतात ही फुलं . फोटो छानच आलेत.
Pages