केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...
आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.
पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..
त्याचा मला निश्चितच फायदा होईल..
.............................
मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर
कुठे बूक करायचे आहे? ओला
कुठे बूक करायचे आहे? ओला कॅब्स, फास्ट ट्रॅक, मेरो वगैरे सर्व टोरीस्ट पॉइण्टच्या आसपास आहेत.
गुजराथ, राजस्थान.
गुजराथ, राजस्थान.
त्या त्या hotel शी बोलणे हा
त्या त्या hotel शी बोलणे हा एक पर्याय आहे. अख्या भारतात सगळी कडे हा पर्याय खुप छान चालतो.
travel site वर active असाल तरतिथे पण विचारता येइल.
बहुदा मी या दोनीही ठिकाणी चौकशी करुन मगच निर्णय घेते.
ओक्के स्नेहमयी! ट्रॅव्हल
ओक्के स्नेहमयी!
ट्रॅव्हल साईट्सची लिंक द्याल का?
मंजू, www. indiamike.com
मंजू, www. indiamike.com बघितलीस का?
indiamike खरच छान आहे.
indiamike खरच छान आहे. tripadvisor ही अजुन एक छान site. hotels etc चे छान reviews तर मिळतातच पण त्यांचे forums पण आहेत. ते पण खुप उपयोगी आहेत.
दुसर्यांच्या प्रवासाची वर्णने ,trip reports , blogs etc गुगल मधे शोधली तरी बरीच माहिती मिळते. bcmtravel , teambhp
ह्या दोन sites वर असे बरेच trip reports आहेत.
nivalink ही एक tour company आहे. त्यांच्या services कधी वापरल्या नाहीत , पण itineraries , maps ह्या गोष्टी site वर छान आहेत.
विमानाने झुरिक येथे पोचल्या
विमानाने झुरिक येथे पोचल्या वर स्वित्झर्लंड ची अंतर्गत टूरची आणि राहण्याची व्यवस्था करणार्या व्यावसायिक टूर कंपन्या आहेत का?
हे कुणीच वाचले नाहीय का?
हे कुणीच वाचले नाहीय का?
तुम्हाला जनरल सर्च मधून काय
तुम्हाला जनरल सर्च मधून काय माहिती मिळाली? केसरी वगैरे सारख्या कंपन्याही अशी कस्टम टूर ऑर्गनाइज करून देत असतील. त्यांच्याशी बोलून बघा. लंडनची एक स्टार टूर्स म्हणून भारतीय ऑपरेटर असलेली कंपनी ऐकली आहे. डायरेक्ट अनुभव नाही.
दुसरे म्हणजे स्वित्झर्लंड मधे फक्त हॉटेल बुकिंग केले की बाकी तशी काही खूप तयारी लागत नाही. रेल्वे चा पास काढलात की झाले. बहुसंख्य ठिकाणे ट्रेन ने कनेक्टेड आहेत. हॉटेल्स बघताना स्टेशन जवळ आहेत का बघा. एअरपोर्ट वरच एक ऑफिस आहे, तेथे तुम्ही तिथे किती दिवस आहात त्याप्रमाणे कोणता पास घेणे फायद्याचे आहे वगैरे माहिती मिळेल.
धन्यवाद फार.
धन्यवाद फार.
कपल साठी केरळ फिरण्यासाठी
कपल साठी केरळ फिरण्यासाठी कुठली प्रवास कंपनी सुचवाल? मेकमायट्रीप / थॉमसकूक पाहतोय सध्या.
ग्रूप टूर नाही करायचीय.
स्वतः स्वतः बूकिंग करुन पण जाऊ शकतो, पण चांगले हॉटेल्स आणि नेमके कुठल्या शहरात किती दिवस मुक्काम करावा हे कुणाला माहिती असल्यास क्रुपया इथे द्या.
ग्रूप टूर नाही करायचीय.>>>>
ग्रूप टूर नाही करायचीय.>>>> वीणावर्ल्ड अशांसाठी हॉटेल्स,ट्रव्हल्स इ.फक्त बुक करते अशी अॅड वाचली होती.त्यांना विचारले तर माहिती मिळू शकेल.
रंगासेठ, केरळात नक्की कुठे
रंगासेठ, केरळात नक्की कुठे कुठे जायचं आहे ?
कपलटूर म्हणून शांत, एकांत हवा असेल तर मुन्नार (अथवा थेक्कडी), अलेप्पी आणि अथिरापल्ली चा विचार करता येईल. ट्रिपअॅडवायझरवरच्या चर्चा वाचून ठिकाणं फायनल करा. कपलसाठी मी अथिरापल्लीचा विचार करावात असं सुचवेन. फार शांत आणि सुरेख जागा आहे. आता पावसाळ्यात तर मस्त वाटेल तिथे. तिथल्या रेनफॉरेस्ट रिसॉर्टमध्ये ट्रि-हाऊस बुक करता येईल. आमच्या केरळ ट्रिपबद्दलची माहिती.
हॉटेल, होमस्टे बरोबरच हल्ली www.airbnb.com वरून पूर्ण घर्/फ्लॅट बुक करता येतो. हल्ली आम्ही त्यावरून बुक करतो. चांगला अनुभव आहे पण अजून भारतातल्या भारतात नाही केलेलं. आम्ही कॅलिफोर्निया आणि आताच्या इंंग्लंड ट्रिपकरता www.airbnb.com वापरलं आहे.
धन्यवाद देवकी आणि
धन्यवाद देवकी आणि मामी.
आम्हाला संपूर्ण केरळ + कन्याकुमारी करायचय.
मी वीणा वर्ल्ड आणि airbnb ची साइट पण बघतो.
मुन्नारला 'आरण्यक रिसॉर्ट'
मुन्नारला 'आरण्यक रिसॉर्ट' मस्त आहे.
थेकाडीला गेलात तर चुकूनही ' वुडस् अँड स्पाइस' मध्ये जाऊ नका.
ज्यांना ग्रुप टूर करायची
ज्यांना ग्रुप टूर करायची नाही त्यांच्यासाठी केसरी/वीणा वर्ड आणि मेक माय ट्रीप ( अशा बऱ्याच असतील खरं तर) ट्रीप अरेंज करून देतात
थेकाडीला गेलात तर चुकूनही '
थेकाडीला गेलात तर चुकूनही ' वुडस् अँड स्पाइस' मध्ये जाऊ नका.>>>>प्राची, तिथे का जाऊ नका ते पण लिही. कारण हे नको करु असे आपण आपल्या अनूभवानुसार सांगीतले तरी तसे करणारे महाभाग असतातच. त्यामुळे कारण जरुर लिही.
मी लिहिते माझी टुअर लवकरच .
मी लिहिते माझी टुअर लवकरच . मी स्वतः प्लॅन केली होती आणि मस्त आणि स्वस्त हि झाली होती स्वतः सगळं केल्या मुळे
कुठलाही मोठा टूर ऑपरेटर
कुठलाही मोठा टूर ऑपरेटर घ्या, तो सहलीसाठी स्थानिक एजन्टसचीच सेवा घेतो. त्या दोघांचे करार असतात. असे स्थानिक एजन्ट गाठले तर ते स्वस्तात आणि चांगली सेवा देतात ( कारण त्यांचेही कमिशन वाचते ) पण त्यांची जाहिरात होत नसल्याने त्यांना गाठणे कठीण असतें.
खुपदा सहल संपता संपता ते हळूच आपले कार्ड देतात, पण मला परत तिथे जायचे नसल्याने फायदा नसतो.
दिनेश सहमत. मी दोन्ही
दिनेश सहमत. मी दोन्ही प्रकारच्या ट्रिप्स केलेल्या आहेत आणि त्या अनुभवावरून नेटचा आधार घेऊन स्वतःच प्लॅन करायचं या निष्कर्षाला आलेय. या पुढच्या माझ्या सगळ्या ट्रिप्स मी स्वतःच प्लॅन करून करणार आहे.
केरळात फिरण्यासाठी आम्हाला
केरळात फिरण्यासाठी आम्हाला दोन वेळा the travel planners या टूर ऑपरेटर्सचा अतिशय उत्तम अनुभव आला. नावाची मात्र खात्री करून घ्या कारण अशासारख्या नावाच्या बर्याच साईट्स आहेत. हे फक्त केरळातच ऑपरेट करतात.
वावे -->
वावे --> http://www.ttpkerala.com/ ही साइट का?
केरळ बद्दल माहिती हवी
केरळ बद्दल माहिती हवी आहे.तिथले दर्शनीय स्थळ,तिथे राहयची सोय,पर्यटक स्थळ बघतांना हिंदी किंवा मराठीत माहिती देणारे एखादी चांगले गाइड इत्यादी
केसरी आणि वीणा वर्ल्ड च्या
केसरी आणि वीणा वर्ल्ड च्या ग्रुप टूर्स बदल . दोन्हीचे अनुभव घेतलेत म्हणून . दोन्ही कडे उत्तम सर्व्हिस असते. फक्त जेवणखाण मध्ये दोन्ही ठिकाणी थोडा थोडा फरक असतो. केसरीच जेवण जास्त सरस आहे. केसरीच्या टूर्स वीणा पेक्षा थोड्या महाग आहेत याच कारण वीणाच्या ओरिएन्टेशन टूर्स वर जास्त भर आहे. हे खर तर टूर इटिनीरी मध्ये लिहिलेल असत पण एवढं वाचतो कोण ?
ओरिएन्टेशन टूर्स म्हणजे ठिकाण सगळी बस मधून दाखवतात उतरून फोटो काढायला सुद्धा देत नाहीत. बसमधूनच फोटो काढायचे ( हे परदेशी टूर्स बद्दल मी म्हणतेय ) त्या उलट केसरीची त्या त्या ठिकाणी व्हिझिट असते. ठिकाण प्रत्यक्ष उतरून तिकीट काढून दाखवतात. म्हणून केसरीच्या टूर्स वीणा पेक्षा थोड्या महाग असतात कारण ठिकाण प्रत्यक्ष उतरून व्हिसिट करण्यात जी एन्ट्री फी असते ती अर्थातच कस्टमर्सच्या टूर चार्जेस मध्ये लावलेले असतात . हे परदेशी टूर बदल . लोकांना एवढे पैसे देऊन येतोय म्हटल्यावर ठिकाण व्हिझिट करण्यातच इंटरेस्ट असतो . ठिकाण बाहेरूनच बसमधुनच बघण्यात नाही तुम्ही संपूर्ण ईटीनरी वाचलीत . प्रश्न विचारलेत तर लिहिण्यातला हा सूक्ष्म फरक कळतो . लोकांना फक्त कमी पैसे दिसतात पण या छोट्या छोट्या गोष्टी पटकन लक्षात येत नाहीत
आणखीन एक एक अनुभव. वीणा वर्ल्ड चाच . त्यांच्या काही काही टूर्स मध्ये दुपारचा चहा स्किप करतात. कितीही लोक बोलले अरे दुपारचा चहा ? दुपारचा चहा ? ( दुपारच्या चहाची तल्लफ जबरदस्त असते ) तरी देतच नाहीत टूर लीडर्स बिनधास्त दुर्लक्ष करतात . गप्पच बसतात पण अजिबातच देतच नाहीत . ( सिंगापूर मलेशिया चा वीणा चा अनुभव ) त्या दुपारच्या चहा चा खर्च वाचलेला असतो म्हणूनत्यांच्या टूर्स केसरीपेक्षा थोड्या स्वस्त . गोष्टी छोट्या छोट्या असतात पण वीणा कडून असे पैसे वाचवले जातात .
लोंकाना केसरीपेक्षा कमी पैसे दिसतात पण त्याची ही वर सांगितलेली कारण असतात
बाकी अशा छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या तर एकंदरीत दोघांचाही अनुभव चांगला
सर्वांचे अनुभव उपयोगी आहेत.
सर्वांचे अनुभव उपयोगी आहेत.
छान सांगितलंत सुजा. या लेखात
छान सांगितलंत सुजा. या लेखात वर मी काही लिंक्स दिल्या होत्या. मायबोलीच्या धोरणात बसत नाहीत म्हणून वेबमास्तरांनी काढून टाकल्या दिसताहेत.
धागा वर आला तर मला वाटल कोणी
धागा वर आला तर मला वाटल कोणी युनायटेड एअरलाईन्स बद्दल लिहील की काय..
हो परवा विंचूही चावला म्हणे
हो परवा विंचूही चावला म्हणे कोणालातरी. मला तो स्नेक्स ऑन अ प्लेन पिक्चर आठवला.
बापरे!! डेंजर!
बापरे!! डेंजर!
नीता ट्रॅव्हल्स ची बस
नीता ट्रॅव्हल्स ची बस सर्व्हिस आहे. मुंबई पुणे आणखीन बऱ्याच ठिकाणी इतरत्र .
त्यांच्या मुळे मेट्रो लिंक ला फटका बसला
Pages