शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकोलाय फिलिबेर (Nicolas Philibert) यांचे लघुचित्रपट नक्की पाहा. इंग्रजी सबटायटलांसह उपलब्ध आहेत.
खासकरून Etre et avoir, La ville Louvre आणि Qui sait?

या लिंका आधीही दिल्या होत्या -

१. ग्लास - https://www.youtube.com/watch?v=aLS7--ZLCoI

२. झू - https://www.youtube.com/watch?v=56ot1I27Iso

..

फार पुर्वी मी एक लघुपट पाहिला होता, नाव आठवत नाही त्याचे, पण सारांश असा,

दोन बहिणी असतात, एकीचे (मोठी) लग्न झालेले असते एकीचे नाही,घरची परिस्थिती गरीब असते.
लग्न झालेलीला तिच्या सासरी त्रास असतो, आणि ती माहेरी येऊन रहात असते आणि घटस्फोटासाठी प्रयत्न करत असते. हे धाकटीला कळते. तीचे लग्न ठरवायचा प्रयत्न चालू असतो पण ती प्रत्येक वेळी तो प्रयत्न हाणून पाडत असते, एकदा तर चक्क केस कापून येते.
शेवट असा आहे की मोठी स्वतःच्या लग्नाची विडीओ कॅसेट पहात असते, तेव्हा धाकटी तिथे येऊन कॅसेट रिव्हर्स करते, त्यात उलटे फेरे दिसतात, हार गळ्यातून काढलेले दिसतात. आणि मग दोघी खो खो हसायला लागतात.

Kriti navachi shortfilm aahe. Search on youtube. Radhika Aaapte aahe.>>>
ती काढुन टाकण्यात आली आहे, plagiarism केल्या बद्दल..

गेल्या आठवड्यात 'टीस्पून' पाहिली. मस्त आहे. गृहिणीचं काम करणारी अ‍ॅक्ट्रेस छान काम करते.

.

मी पण काल टिस्पून, आफ्टरग्लो आणि डिवोर्स अशा तीन शॉर्टफिल्म्स पाहिल्या.
डिवोर्स बरी आहे.
पिस्त्युल्या पाहण्याचा प्रयत्न केला पण यु ट्युब वरची प्रिंट अगदीच खराब आहे. Sad

इथे बर्‍याच जणांनी टेबलस्पून लिहिलंय, अशा नावाची पण शॉर्टफिल्म आहे का एखादी? Uhoh

इथे बर्‍याच जणांनी टेबलस्पून लिहिलंय, अशा नावाची पण शॉर्टफिल्म आहे का एखादी? >>
'टीस्पून' दोनदा पाहिल्यावए 'टेबल्स्पून' होत असेल Proud

इथे बर्‍याच जणांनी टेबलस्पून लिहिलंय, अशा नावाची पण शॉर्टफिल्म आहे का एखादी?>>>> मस्त पकडलंस दक्षिणा!
टीस्पूनच आहे ग.

मला अहल्या निट समजली नाही. Uhoh
कुणितरी सांगा समजावून.
तो म्हातारा तरूण माणसांचं तारूण्य शोषून घेऊन त्यांना बाहुल्यांमध्ये बंदिस्त करत असतो का?

एक रिवाईंड नावाची शॉर्टफिल्म पण पाहिली त्यात चक्क
सोनाली कुलकर्णी, आदित्य कोठारे वगैरे होते. बरी आहे.

'केवडा' पाहिली.. माझी आज्जी आठवून खूप रडू आलं. पण का कोणजाणे.. मला सतत असं वाटत होतं कि या नातवाचे आईवडीलही (अपघातात वै.) वारलेले आहेत आणि ते लपवण्यासाठी तो एकटाच येतो दरवेळी. तसं काही दाखवलं असतं तर त्याचं वागणं अगदीच संवेदनाशून्य वाटलं असतं मला. पण तसं नसावं कदाचित.

'चैत्र' पाहिली. फार काही मॉरल ऑफ द स्टोरी नसली तरी सोनाली कुलकर्णी आणि लालन सारंग यांचा अभिनय ___/\___

'डिवोर्स' चांगली आहे कि वाईट यापेक्षा 'टिस्पून', 'आफ्टरग्लो', 'अहल्या', 'चैत्र' वगैरेंनंतर 'डिवोर्स' बघितली तर कलाकारांचा बालीश अभिनय आणि त्या बाईचे कृत्रिम दिसणारे केस सारखेच खटकतात. Uhoh

मला अहल्या निट समजली नाही. अ ओ, आता काय करायचं
कुणितरी सांगा समजावून.
तो म्हातारा तरूण माणसांचं तारूण्य शोषून घेऊन त्यांना बाहुल्यांमध्ये बंदिस्त करत असतो का?

>> स्पॉयलर अलर्टः

तारुण्य असं नाही.. इन फॅक्ट अख्खं आयुष्यच शोषून घेत असतो. याकामी त्याला राधिका मदत करत असते. प्रत्येकालाच मोह पडावा अशी सिच्युएशन राधिकाच्या मदतीने तयार करून तो प्रत्येकाला रूप बदलायला भरीस पाडत असतो. पण बहुतेक त्या जादूची मजा किंवा लिमिटेशन असे असते कि रूप बदलल्यावर थोड्या वेळाने त्या व्यक्तीची शिळा/ दगड/ बाहुली होत असते.

हेअरकट बघा. हहपुवा आहे. उच्चंभ्रू पार्लरमध्ये गेल्यावर जी भांबेरी उडते त्याच मजेशीर वर्णन आहे

Pages