Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54
परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:
-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind
अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mind Your Language बघा पोट
Mind Your Language बघा पोट धरुन हसण्याची फुल्ल गॅरंटी .
थोडक्यात स्टोरीलाइन पण लिहावी
थोडक्यात स्टोरीलाइन पण लिहावी इथे म्हणजे कल्पना येईल.. कुणी पाहिले नसल्यास त्यानाही कल्पना येईल
आम्ही एका शाॅर्ट फिल्मचा
आम्ही एका शाॅर्ट फिल्मचा प्रयत्न केलाय..
पहिलीच स्वतंत्रपणे केलेली फिल्म आहे..
प्लीज बघा..
भोपळा
Bhopala by Ravindra Mathadhikari
*भोपळाऽऽऽऽऽ* https://youtu.be
*भोपळाऽऽऽऽऽ*
https://youtu.be/wtx7AkH_h0Y
हि गोष्ट आमची तर आहेच,
पण तुमचीही आहे.
आणि जर ही पाहण्यासाठी तुम्ही सहा मिनीटं काढली नाहीत,
तर ही गोष्ट तुमच्या मुलांची सुद्धा होणार आहे.
हा *‘भोपळा’* पाहण्यासाठी फक्त सहा मिनीटं काढा...
नाहीतर मग आयुष्यभर आहेच *भोपळाऽऽऽऽऽ*
नानबा Mind Your Language
नानबा
Mind Your Language सिरीज UK मध्ये १९७७ सालीप्रसारीत झाली होती, Foreign Language Students इंग्रजी शिकण्यासाठी क्लास जॉईन करतात त्यातल्या गंमती जमती आहेत . प्रचंड विनोदी आहे.
भोपळा >> आवडली. हा *‘भोपळा’*
भोपळा >> आवडली.
हा *‘भोपळा’* पाहण्यासाठी फक्त सहा मिनीटं काढा... नाहीतर मग आयुष्यभर आहेच *भोपळाऽऽऽऽऽ* >> +१
चटणी -
चटणी - https://www.youtube.com/watch?v=0krwKbsQscw
भोपळा आवडली
भोपळा आवडली
Mind Your Language हे जबान
Mind Your Language हे जबान संभालके सारखे दिसतेय. दोघांत ओरिजिनल काय आहे?
बॅक बेंचर्स सिरीज पाहिली,
बॅक बेंचर्स सिरीज पाहिली, मजा आली खूप, भूतकाळात चक्कर टाकून आलो
पप्पू पप्पा सेक्स चॅट क्लास आहे. मस्ट वॉच. गर्लफ्रेंडला सुद्धा लिंक पाठवली त्याची. भविष्यात आमच्या पप्पूसाठी कामी येईल
Mind your language, १९७७
Mind your language, १९७७ मध्ये युके मध्ये प्रसारित झाली होती .
जबान संभालके Mind your
जबान संभालके Mind your language वरून बेतलेली. पण सही देशी टच दिलेला त्याला.
चैत्रगंधा, ऋन्मेष धन्यवाद..
चैत्रगंधा, ऋन्मेष धन्यवाद..
चटणी पाहिली मस्त आहे. मनोज
चटणी पाहिली मस्त आहे.
मनोज बाजपेयीने काम केलेली आउच नावाची फिल्म पण पहा. लै भारी इनोदी.
"Ambani" Ekda Pahach Chaan
"Ambani" Ekda Pahach Chaan Ahe
Kannad Ahe pan Bhashechi Garaj LAgat nahi
मनोज बाजपेयीने काम केलेली आउच
मनोज बाजपेयीने काम केलेली आउच नावाची फिल्म पण पहा. लै भारी इनोदी.
>>>
ईतर कोणी असते तर ठिकठाकच वाटली असती पण मनोज वाजपेयीच्या एक्स्प्रेशन्समुळे बघायला मजा येते. कधी कधी तो बाप अॅक्टींग करतो ..
'लाईफ , लफडे और बंदियाँ ' बघतोय हल्ली , >>>> तुझेच वाचून माझीही झाली बघून, धमाल आहे, आवडली
फार पुर्वी मी एक लघुपट पाहिला
फार पुर्वी मी एक लघुपट पाहिला होता, नाव आठवत नाही त्याचे, पण सारांश असा,
दोन बहिणी असतात, एकीचे (मोठी) लग्न झालेले असते एकीचे नाही,घरची परिस्थिती गरीब असते.
लग्न झालेलीला तिच्या सासरी त्रास असतो, आणि ती माहेरी येऊन रहात असते आणि घटस्फोटासाठी प्रयत्न करत असते. हे धाकटीला कळते. तीचे लग्न ठरवायचा प्रयत्न चालू असतो पण ती प्रत्येक वेळी तो प्रयत्न हाणून पाडत असते, एकदा तर चक्क केस कापून येते.
शेवट असा आहे की मोठी स्वतःच्या लग्नाची विडीओ कॅसेट पहात असते, तेव्हा धाकटी तिथे येऊन कॅसेट रिव्हर्स करते, त्यात उलटे फेरे दिसतात, हार गळ्यातून काढलेले दिसतात. आणि मग दोघी खो खो हसायला लागतात.>>> ती धाकटी झालेली अनिता दाते आहे, माझ्या नवर्याची बायकोमध्ये राधिका झालेली. मोठी बहीण झालेली comedy express मध्ये आहे.
फार पुर्वी मी एक लघुपट पाहिला
फार पुर्वी मी एक लघुपट पाहिला होता, नाव आठवत नाही त्याचे,>>>>>>मिडलक्लास मॅरेज
मायबोली संथ झाल्याने हल्ली
मायबोली संथ झाल्याने हल्ली शॉर्टफिल्म्स पूर्वीपेक्षा जास्त पाहून होतात. सगळ्याच चांगल्या आहेत असं नाही. काही प्रंमाणापेक्षा जास्त प्रायोगिक आहेत. घिसेपिटे सामाजिक संदेश मांडणा-या शॉफि ढिगाने आहेत. पण तांत्रिक अंगाने भक्कम आहेत. कॅमे-याची भाषा तरूण मंडळींना खूप चांगली कळालीय हे दिसते.
माझ्या पुतणीची शॉफि तर डोक्यावरून गेली. मी तिला तूच सांग समजावून म्हटलं. तिने अर्थ सांगितल्यावर कळाली. म्हटलं कुणाला कळणार हे ? तर त्या फिल्मला पुरस्कार मिळालेत. आता शॉफि पहायचा कंटाळा येत चाललाय.
काल 'chutney' ही शॉर्टफिल्म
काल 'chutney' ही शॉर्टफिल्म पाहिली. शेवटाला अगदी मळमळते त्या बाईला ती भजी खाताना पाहुन. टिस्का चोप्रा वेगळीच दिसते पण काम नेहमीप्रमाणेच टेरिफिक!
नेकेड - कल्की कोचलिन ची
नेकेड - कल्की कोचलिन ची शॉर्ट फिल्म बरी वाटली.
ह्युमन ऑर्गन ट्रॅफिकिंग वरची युज्ड पार्टस ओके वाटली
चटणी पाहतेय - टिस्का ला खोटे दात लावलेत आणि कुंकु (टिकली) फार वर लावल्याने वेगळीच वाटतेय)
सॉलिड वाटला चटनी. टिस्का
सॉलिड वाटला चटनी. टिस्का चोप्रा कसली निर्विकार आणि थंड डोक्याची दाखवली आहे.
बोझ (bojh) पण पहा
बोझ (bojh) पण पहा
आऊच पाहिली. भारी आहे!
आऊच पाहिली. भारी आहे!
दक्षे, बोझची लिंक दे ना.
हि घे ललीhttps://www.youtube
हि घे लली
https://www.youtube.com/watch?v=bPlvWcXt90Y
हो. आउच मस्तच आहे.
हो. आउच मस्तच आहे.
ईतर कोणी असते तर ठिकठाकच वाटली असती पण मनोज वाजपेयीच्या एक्स्प्रेशन्समुळे बघायला मजा येते. कधी कधी तो बाप अॅक्टींग करतो ..>> +1
मिडलक्लास मॅरेज मध्ये अनिता दातेचा बाॅयफ्रेंड दाखवलाय तो राखेचामधला विश्वास आहे. मी पहिलं त्याला ओळखलंच नाही.
खुजली
खुजली
बोल्ड विषय मध्यमवर्गीय सादरीकरण
आपला जग्गूदादा आहे यात
https://www.youtube.com/watch?v=KmRzflPuCjE
बोझ पाहिली. विषय टिपिकल आहे.
बोझ पाहिली. विषय टिपिकल आहे. त्या फेरीवाल्याच्या चेहर्यावर जरा जास्तच सज्जनपणा दिसतो. (त्या अॅक्टरला तसं सांगितलं असावं.
) ते खेळणंही मुलीचं वय बघता मिसफिट वाटतं.
शेवट मात्र परिणामकारक आहे. राजस्थानचं चित्रणही खूप आवडलं.
इलायची मस्त आहे. मला आवडली.
इलायची मस्त आहे. मला आवडली. स्टोरी-टेलिंगचा आणि फिल्म-मेकिंगचा चांगला प्रयोग आहे. हा विषय देखील वेगळा नाहीये; पण सादरीकरण क्रिस्प आहे एकदम.
https://www.youtube.com/watch?v=A6LdrZLgBd8
मी गेले दोन दिवस रात्री
मी गेले दोन दिवस रात्री मोबाईल वर शॉर्ट फिल्स पाहते आहे.
द अफेअर नावाची एक (तमिळ, मल्याळम किंवा तत्सम भाषेतली) एक शॉर्ट फिल्म पाहिली ती आवडली.
अंथरूणाला खिळलेली अल्पायुषी पत्नी आणि तिचा ५२ वर्षाचा नवरा... त्यांच्या मुलांना (एक मुलगा एक मुलगी) यांना संशय आहे की आपल्या वडिलांचे बाहेर अफेअर आहे ते पण त्यांची मुलगी शोभेल अशा वयाच्या मुलिशी...
नक्की काय आहे ते पहायला हरकत नाही.
सवारी नावाची शॉर्टफिल्म अगदी टिपिकल शेवटाची.
एक टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यात २-३ वेगवेगळ्या व्यक्ती येऊन बसतात, पहिला पॅसेंजर सुट्टे नसतात म्हणून २८० रुपये टॅक्सी ड्रायव्हर कडून आधीच घेतो आणि उतरताना फक्त भाडं देऊन उतरतो आणि आधी घेतलेले २८० देतच नाही, पुढचा पॅसेंजर फिल्म लाईन मधला असतो आणि टॅ.ड्रा. ला हिरो व्हायचे असते... त्याबद्दलचे काही संवाद, आणि शेवटचा पॅसेंजर आपल्या पत्नीला हॉस्पिटलात ठेवल्याने साडेतीन लाख रूपये कॅश घेउन निघालेला असतो...
Pages