शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thay day after everyday पाहिली . आवडली .

एक tubelight ka chand नावाची शॉर्टफिल्म आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शक असलेली . छान आहे. आभाळातला चन्द्र जमिनीवर आणायची छोट्या मुलाची धडपड दाखवली आहे . मस्त आहे ती शॉर्टफिल्म.

>> स्पॉयलर अलर्टः

तारुण्य असं नाही.. इन फॅक्ट अख्खं आयुष्यच शोषून घेत असतो. याकामी त्याला राधिका मदत करत असते. प्रत्येकालाच मोह पडावा अशी सिच्युएशन राधिकाच्या मदतीने तयार करून तो प्रत्येकाला रूप बदलायला भरीस पाडत असतो. पण बहुतेक त्या जादूची मजा किंवा लिमिटेशन असे असते कि रूप बदलल्यावर थोड्या वेळाने त्या व्यक्तीची शिळा/ दगड/ बाहुली होत असते.

>>>>>>

अर्थ काढण्यात जरा गल्लत होतेय.

स्पॉयलर अलर्ट -

अहल्या नावाचे एक पौराणिक स्त्री पात्र होते. ती कोणत्यातरी ऋषीची पत्नी होती. तिच्यावर ईंद्राचा जीव जडतो. मग ईंद्र त्या ऋषीचे रूप घेऊन येतो आणि तिच्याबरोबर वावरतो. नंतर ऋषीला जेव्हा हे समजते तेव्हा तो ईंद्राला काहीतरी शाप देतो आणि अहल्याचा दगड करतो. तिची खरे तर यात काही चूक नसून तिला ही शिक्षा मिळते. अशी काहीशी दंतकथा आहे.
तर बस्स तीच अहल्या आता ईंद्रासारख्या पुरुषांचा बदला घेतेय. आधी एखाद्या पुरुषाचे रूप बदलून आपल्या नवर्‍यासारखे करते, आणि मग त्या स्थितीचा त्या पुरुषाने फायदा घ्यायचा ठरवताच त्याचा दगड करते Happy

अहल्या मला ईंटरेस्टींग वाटली. पण अजून मोठी असती तर जास्त मजा आली असती असे वाटले.

-That Day After Everyday आणि बायपास या दोन शॉर्ट फिल्म या सोबत पाहिल्या..
दोन्ही काही खास वाटल्या नाहीत.. ओके ओके.. नसत्या बघितल्या तरी चालले असते..

अहल्या - स्पॉयलर अलर्ट

..

यात मला अहल्याने पुरुषाला उकसावणे हे नाही पटले. हाताला स्पर्श करणे, पायाशी चाळा करणे, असे ईशारे देऊन जर कोणा पुरुषाला आमंत्रित केले जात असेल तर मग नंतर त्याने सिच्युएशनचा फायदा उचलल्यास त्याची चूक दगड बनवण्याएवढी मोठी कशी? पण असो, बिचारीचा बदला होता हा.. आणि बदल्यात काही सारासार सुचत नसते..

इथे लिहिलेल्या शॉर्ट फिल्म्स ज्या छान आहेत लिहिलेय त्यांची नावं वरती अ‍ॅड करा ना.

पायताण
पुरणपोळी

सुद्धा मस्त आहे.

'आजी' बरी वातली.

क्रिती कानात हेडफोन घालून आता रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान पाहिली .. दचकायला सुरुवात झाली तसे हिच वेळ बघायला मिळालेली असे वाटले.. मग हेडफोन कानाच्या जरा खाली सरकावला आणि सावरून बघू लागलो.. खतरनाक बनवलीय.. शेवट मात्र काय असणार हे मी बरोब्बर पकडले, पण त्याने रसग्रहनावर काही फरक पडला नाही..

सुनिधी चोहान ची 'playing priya' पाहिली .
बर्याच रिव्यु मध्ये , मध्येच अचानक संपवली ,अर्धवट आहे वगिअरे लिहिले आहे .
त्याना बहुतेक समजलीच नाही.
क्रीपी आहे .

पियु, दक्षिणा धन्यवाद..

प्लेयिंग प्रिया पाहिली. वर क्रीपी लिहिलेले असल्याने आता रात्रीचे तीन वाजता बघायची की नाही हा प्रश्न होता. पण किडा थोडी स्वस्त बसू देतो. पाहिली. अर्थात थराराची कल्पना आधीच असल्याने तितका जाणवला नाही. (कदाचित त्यामुळे) तितकी भावली नाही.

बर्याच रिव्यु मध्ये , मध्येच अचानक संपवली ,अर्धवट आहे वगिअरे लिहिले आहे .
त्याना बहुतेक समजलीच नाही.
>>>>
अर्धवट वगैरे नक्कीच नाही. खूप छोटी असल्याने किंवा बघणार्‍याच्या हाती काहीच लागत नसल्याने तसे वाटले असावे.

स्पॉयरल -

.

जे एखाद्या पालीचे माणसाबाबत आणि नंतर त्या माणसाचे पालीबाबत होते ती आणि एवढीच याची स्टोरीलाईन आहे Happy

.

स्पॉईलर एण्ड

काल क्रितीने दचकलवल्यावर हेअरकटने उतारा दिला त्यावर..

टीस्पून मस्तच जमलीय .. त्या हिरोईनचा अभिनय तर त्याहून मस्त!

INTERIOR CAFÉ NIGHT

https://www.youtube.com/watch?v=23KufSqo6cQ

कथेत म्हटले तर काही नावीन्य नाही .. पण दिल को छू लेने वाली.. अभिनयासाठी नसरुदीन शाह नाम काफी है, ईतरांचाही चांगला.

रोज एक एक शॉर्टफिल्म बघावी ठरवते पण वेगवेगळे वाचन करण्यात वेळ निघून जातो. आता बघायला हव्यात आठवणीने.

दिप्या, ही सगळी नावं हेडरमधे टाक ना... म्हणजे एक एक करून पाहता येतील सगळ्या.
आता माझ्या क्यूमधे 'हेअरकट' आहे.

मला प्लेइंग प्रिया काही कळली नाही. >>> पहिल्या फटक्यात मलाही कळली नाही .
टीपः तिच्या नवर्याच बोलणं नीट कान देउन ऐका.

इथे वाचून shortfilms बघायला लागले. आवडल्या बर्याच.
अजून एक Afterglow म्हणून आहे ती पण मस्त आहे.

पण त्याने रसग्रहनावर काही फरक पडला नाही..> मला नीट नाही कळली ही फिल्म . यात सगळेच कॅरेक्टर्स मनोज वाजपेयी ने इमॅजीन केलेले आहेत का?

मी पाहिलेल्या शॉर्ट्फिल्म्स
Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind , अहल्या etc.

आता Sex Chat with Pappu & Papa webseries बघतोय , लहान मुलांना सेक्स एजुकेशन विषयी माहिती देणारा आहे , सचिन पिळगांवकर ( महागुरु) वगैरे मंडळी आहेत , येवढा किचकट विषय कसा हाताळला असेल ह्याविषयी उत्सुकता आहे.

ते कळले... पण इन्स्पेक्टर सुद्धा?
>>>
येस्स. ते तर क्लीअर केलेच आहे. त्याच्या नावाचा संदर्भ देऊन.
एकच व्यक्ती खरी आहे. आणि तिच्या डोक्यात सारे चालू आहे बस्स.

Pages