सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
मस्तच हिरा.
मस्तच हिरा.
गेला वळीव निघुन, आला मिरग
गेला वळीव निघुन, आला मिरग फिरून,
तुर्या चालल्या रानात सुरू झालीया पेरण . . .
|| अन्नदाता सुखी भव ||
वा फार छान, जिप्सी.
वा फार छान, जिप्सी.
खूप दिवसानी लिहीतेय इथे पण
खूप दिवसानी लिहीतेय इथे पण वाचत होते सगळ.
जिप्सी फोटो मस्त. गावाला जाउन पोचले बघ फोटो पाहुन
वाह... मस्त फोटो
वाह... मस्त फोटो जिप्सी...
चला ११.३० वाजत आले.. कस्काय वर जाव लागेल...
हीरा, छान वाटलं फोटो
हीरा, छान वाटलं फोटो पाहून..
वाह जिप्स्या.. सुंदर कॅप्शन्स सुरेख फोटोज
नवीन थीम आहे का ही ?? म्हंजे अजून या थीम वरचे फोटोज पाहायला मिळतील तर!!!
अन्जू, वर्षू, धन्यवाद. इथे
अन्जू, वर्षू, धन्यवाद. इथे सगळे लोक इतके उद्योग (चांगल्या अर्थाने) करीत असतात, इतके सुंदर सुंदर फोटो टाकत असतात की सुरुवातीला मला या माझ्या छोट्याशा बा.बा.तले फोटो इथे टाकावेत की नाही अशी भीड पडली होती. वरचे जिप्सीचेच फोटो पहा ना किती अप्रतिम आहेत. पण तुमच्यासारख्या अनेकांच्या प्रोत्साहनामुळे आता ती भीड चेपली आहे.
हिरा खर तर आपण नि.ग. वाले
हिरा खर तर आपण नि.ग. वाले फोटोच्या क्वालीटी पेक्षा फोटोतील निसर्ग पहातो.
गप्पा फोटो सगळेच छान सर्वांचेच.
हा फोटो पण श्रावणीनेच
हा फोटो पण श्रावणीनेच काढलेला.
हा फोटो पण श्रावणीनेच
हा फोटो पण श्रावणीनेच काढलेला.
अय्योचक्क प्रोफेशनल
अय्योचक्क प्रोफेशनल क्वालिटी....... मामा आल्ता का ट्रेनिंग द्यायला.. हाँ???????
मामा आशिर्वाद देऊन गेला.
मामा आशिर्वाद देऊन गेला.
जागू खूप सुंदर फोटो . मामा
जागू खूप सुंदर फोटो .
मामा आल्ता का ट्रेनिंग द्यायला.. हाँ??????? फिदीफिदी >> वर्षु , +111
इंद्रा, मस्त हिरवागार फ़ोटो.
इंद्रा, मस्त हिरवागार फ़ोटो. इंद्रधनुष्य तर आहेच. कोकणात पोहोचले मी.
जायचय शिवथरघळला. बघु कधी योग येतो ते.
अशा छोट्याश्या घरातील माणसांचं मन खुप मोठं असतं रे. कधीही जा, दरवाजा वाजवा.
घरात असेल तो खाऊ पुढे करतील, अंगणात नाही तर घरात निवारा देतील, जपून जावा म्हणून निरोप देतील...
बदल्यात अपेक्षा मात्र कसलीच नाही !>>>>>>>>+१
मानुषी,काय सुंदर फ़ोटो आहेत ग?
( या वयात !!!! )>>>>>>>>.दिनेशदा,
जिप्सी हल्ली क्वचितच येतो इथे. पण मस्त फ़ोटो घेऊन येतो.
जागू, लेक छानच फ़ोटो काढते. तुला मागे टाकणार ती.
मामा आशिर्वाद देऊन गेला.>>>>>>>>>.बघा, आशिर्वादात किती ताकद आहे.
आता आंब्यांना बाय बाय. हा पण
आता आंब्यांना बाय बाय.
हा पण मामाच्या भाचीने काढलेला.
जागू, दे आता तिलाच कॅमेरा
जागू, दे आता तिलाच कॅमेरा
हीरा, इथे येतील तेवधे फोटो
हीरा, इथे येतील तेवधे फोटो कमीच.. या अफाट निसर्गातले काय आणि किती टिपणार आपण ?
आणि तो निसर्ग तर हरेक क्षणाला रुप बदलत असतो ! एकाच जागी, एकाच वेळी पण वेगवेगळ्या दिवशी फोटो काढा निसर्गाचे.. ते प्रत्येकवेळी वेगळे येतील.
केनया एअरवेजच्या इन फ्लाईट
केनया एअरवेजच्या इन फ्लाईट मॅगेझिन मधे, केनयातील मसाई मारा भागातून काढलेले रात्रीच्या आकाशाचे सुंदर फोटो आहेत. ते इथे देता येणार नाहीत पण त्यांची वेबसाइट असेल तर नक्की बघता येतील.
भाचीच्या मामाची फोटोग्राफी तर
भाचीच्या मामाची फोटोग्राफी तर कमालच आहे तशीच मामाच्या भाचीची सुद्धा! आंब्याचा फोटो एकदम भारी!
गाण्यासाठी कान तयार व्हायला लागतात अशीच फोटो फ्रेमिंगसाठी श्रावणीची नजर तयार होते आहे असे म्हणावेसे वाटते.
हे माझ्या मोबाईलमधून
नलिनी अॅब्सॉल्यूटली ऑस्सम
नलिनी अॅब्सॉल्यूटली ऑस्सम फोटोज... ब्यूटी नुस्ती सांडतीये.......
श्रावणी .. अब वोकॅमेरा तुम्हारा हुआ.. तू माबो ची सर्वात छोटुकली सदस्या बनणार,,, जियो!!!
नलिनी सॉलिड फोटो. श्रावणीकडे
नलिनी सॉलिड फोटो.
श्रावणीकडे ट्युशन लावतेच मी आता, फार मेहेनत घ्यावी लागेल तिला माझ्यावर . काय फोटो काढते ती.
सर्वांना धन्यवाद. हिरा खर तर
सर्वांना धन्यवाद.
हिरा खर तर आपण नि.ग. वाले फोटोच्या क्वालीटी पेक्षा फोटोतील निसर्ग पहातो.>>>>>जागू +१००० हिरा तुम्ही नक्की फोटो देत जा इथे. काही मदत लागली तर अवश्य कळवा
अय्योचक्क प्रोफेशनल क्वालिटी...>>>>>>मग भाची कुणाची आहे. सर्वच फोटो मस्त. जास्वंदीच्या फुलाचे composition खुप आवडले.
नलिनी सगळेच फोटो मस्तच.
गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे
गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सर सर सर काजवा नवा नवा, मनातही ताजवा नवा नवा . . . .
हिरवा . . . . . गारवा . . . .
शोभा थॅन्क्यू! सर्वांचेच फोटो
शोभा थॅन्क्यू!
सर्वांचेच फोटो मस्त आणि मामांची भाची म्हटल्यावर काय बोलायच काम नाय!
व्वा... नलिनी शेवटून दुसरा अद्भुत आलाय फोटो!
जिप्सी...अगदी शेतातल्या लावणीचा फील आला.
आणि हे वरचे हिरवे S सुंदरच!
जिप्सी.. तु काढलेला फोटो
जिप्सी.. तु काढलेला फोटो सुंदर आहेच पण ते आवण पेरणार्या च्या सौंदर्य दॄष्टीला ही सलाम
सगळ्यांचेच फोटो खुप सुरेख आहेत.
ते आवण आहे असे वाटतच नाही. अस
ते आवण आहे असे वाटतच नाही. अस वाटत एखादी हिरवी वाट आहे.
सुप्रभात.
देशी गुलाब का जागु??
देशी गुलाब का जागु??
वाह, मन बाग बाग, हरा हरा हो
वाह, मन बाग बाग, हरा हरा हो गया .....
सर्व फोटो भारी - फोटोग्राफर्सची कम्माल ....
छोटे फोटोग्राफर - विशेष कौतुक... जोरदार शाब्बासकी ... लगे रहो...
हो वर्षूताई. साधनाने
हो वर्षूताई. साधनाने नर्सरीतून आणून दिल.
शशांकदा धन्यवाद.
भाचीच्या मामाची फोटोग्राफी तर
भाचीच्या मामाची फोटोग्राफी तर कमालच आहे तशीच मामाच्या भाचीची सुद्धा! आंब्याचा फोटो एकदम भारी!>>>> +१.
नलिनी,जिप्सी,फोटो सुरेखच.
Pages