निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात सुलक्षणा..
इकडं रातीचे ०३४१ झालेय गं... Proud

ते लाल रंगाच कसल फुले?
दोन्ही एकाच कुंडीत लावलीत का ?

सु प्र

सुलक्षणा ने टाकलेल्या फोटोतील सुंदर फुलं मी पण पाहिलीयेत.. जुने फोटो शोधावे लागतील.. नेमकं स्थान आठवतच नाहीये आता..

हाहा Lol टिना आता लक्षात ठेवीन की जब दुनिया सोती है तब टिना जागती है Proud
ते उजवीकडचे आहेत petunia आणि डावीकडचे begonia
इकडे UK मध्ये garden center मध्ये गेले की मी वेडी होते आणि वाट्टेल तितकी रोपं घेऊन येते Proud मग असं एका कुंडीत २ ३ लावावे लागतात Happy
petunia ची रोपं आपल्याकडे मिळतात पण बहुतेक आपल्या उष्ण हवामानामुळे फुलं इतकी छान येत नाहीत.

वर्षू मागे कलौंजीच्या फुलांचे फोटो तुम्हीच टाकले होते ना? मी या वर्षी लावेन म्हणते. तशा घरात्ल्या कलौंजी जरा जुन्या आहेत पण ट्राय करून बघते

सुलक्षणा.. हाहाहाहा...
मै और अन्जू दोनो भी जागते है रे...

पिटूनिया ( हॅपॉची मावशी आठवली मला Wink )/ पेटूनिया माझ्याकडे पण होत.. आता मेलं शायद.. घरी विचाराव लागेल एकदा... डार्क वेलवेट जांभळा रंग होता... बिगुनिया मस्तच..

वर्षू,
पेन्सिल फ्लॉवर छानच..
चिंगमाय च्या फुलांवरुन निलगिरीच्या झाडाच्या टोप्या आठवल्या Happy

टिनि.. त्या फुलांचं नांव पेंसिल फ्लॉवर्स आहे?? खरंच??

हे टिपिकल पनामिनिअन लोकल क्वांग दू नावाच्या लेंटिल्स चं झाड .. हे दाणे घालून फ्राईड राईस करतात. मस्तं जांभळ्या रंगाचा होतो

अमेरिकेत ऑरेगन स्टेट - बीव्हरटन मधे Tualatin hills nature park ला गेले होते. मी ज्या मैत्रिणीकडे राहिले होते ती मला तिथे घेऊन गेली -- पण तिला काही कारणाने लगेच घरी जावं लागलं, म्हणून मी एकटीच तिथे भटकंती चालू केली. खूपच वेगळं होतं ते पार्क. ऑरेगन चा नेटिव्ह लँडस्केप जतन केलाय तिथे असं मी ऐकलं. जिकडे तिकडे मॉस-कव्हर्ड झाडं होती. आधी खरंतर जरा भीतीदायकच वाटलं.. पण थोडा वेळ घालवल्यावर मस्त वाटू लागलं अगदी.. मग मी दीडेक तास फिरत होते तिथे.

TualatinNaturePark1.jpgTualatinNaturePark2.jpgTualatinNaturePark3.jpg

सुदुपार!!

आजचा दिवस छानच आहे.
सकाळी साडेसात वाजता नॅशनल पार्क, बोरिवली येथिल "सिलोंढा ट्रेलला" जाणे झाले. सात वाजता घरून निघताना पावसाची रिमझिम होती. पुढे सिलोंढाला एखादी सर अनुभवता आली.
काय काय पाहिले... बारतोंडीची झाडे, गुंजाचे वेल त्यावरील गुंजांसकट, काटे सावर, कुडा, अर्जुन व्रुक्ष, जंगली जांभूळ, प्रार्थना किडा, सिकाडा किडा, मुंग्याची झाडावरची पॅगोडा घरटी, वाळवीची विविध वारुळ.. रिकामी केलेली.. नवी बांधायला घेतलेली, विविध फुलपाखरे, काही पक्षी, काही पक्षांचे फक्त आवाज, माकडे, भारद्वाज, पोपट ....
या वर्षीचा हा पहिलाच ट्रेल. अजुन पाउस झाला नाही. तसे सगळीकडे सुकलेलेच होते.
दुपारी बारा पर्यंत घरी परत...
आता चार वाजुन गेले आहेत. थोडा थोडा पाउस पडायला लागला आहे... त्याचे स्वागत आहे.

सिलोंढा ट्रेल BNHS तर्फे होता.

वाह बॅग्झ.. भारीच.. पहिल्या फोटोत दचकली ना पण मी Sad

अनिल पडद्यामागचं घरट छानच आहे..

मधु मकरंद.. मस्तच दिवस..

वर्षू,
हो अगं इकड सारे आम्ही पेन्सील फ्लॉवरच म्हणतो.. पेन्सिल शॉर्पनर ने शार्प केल्यावर त्याचे झिल्ले दिसतात न तसेच आत डार्क बाहेर फेंट.. Happy

बोरिवली उद्यानातील ट्रेन सुरु आहे का ? >>>> हो

तुम्ही www.bnhs.org ला भेट द्या. तेथे त्यांचा दोन महीन्यांचा कार्यक्रम दिलेला असतो.
त्यांचीच cec goregaon शाखा आहे. दि. १० जुलै, रविवारी ट्रेल आहे. चांगलाच असेल.
पहा कोणाला जमते ते.

अरे आज खुप दिवसांनी छान गप्पा चालू आहेत.

पावसाला काल पासून सुरुवात झाली.
अनिलजी परदेके पिछे चे घरटे सुंदर.
अन्जु काल उरणला मकरंद अनासपुरे येउन गेले फॅमिलीसकट फ्लेमिंगो बघायला. उरणकरांच्या वॉट्सअ‍ॅपवर त्याचे फोटो फिरतायत. मला पण जायचय. वेळ मिळेल तशी जाईन.
बॅग्ज तुमच नाव काय आहे? काय भन्नट शेवाळीने भरली आहेत ती झाडं.
वर्षूताई शेंगा अगदी तुरीसारख्याच दिसतायत.

हा फोटो माझी मोठी मुलगी श्रावणी हिने काढला आहे.

काय एकेक मस्त मस्त फोटो.

जागू श्रावणी माझी ट्युशन घेईल काय? फोटो कसा काढायचा ते शिकवेल का मला. अफलातुन काढलाय तिने.

फ्लेमिंगो बघायला नक्की जा.

>बॅग्ज तुमच नाव काय आहे?
बागेश्री. IIT मधे असताना सगळे मित्र-मैत्रिणी बॅग्ज म्हणायचे.

अन्जू Lol

प्रज्ञा हल्ली बाहेर गेल्यावर मला कॅमेरा लपवावा लागतो. Lol

आमच्या दगडी कुंडी (भांड्यातील) फुललेली फुले.

Pages