निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, तुला सगळेच फोटोसाठी छान पोझ देतात.

आत्ता कुलाबा मुंबई येथे ढग गडगडून पाउस पडत आहे. एकदम आल्हाददायक वाटत आहे.

वर्षू, बरोबर. मना़लीच. Happy
मानुषी, सुरेख फोटो. मण्यांचा पडा मस्तच. Happy
जागू, लेक तुझा वारसा चालवणार. दे तिला कॅमेरा. Proud
जागू, तुला सगळेच फोटोसाठी छान पोझ देतात.>>>>>>>>>>.+१
निरु वाघोबा काय रुबाबात लोळतोय!!!>>>>>>>>>>१

जागु.. किती क्यूटी पोझ दिलीये.. Happy

ओह्,हमारे कान्हा का वाघोबा.. लहानपणी भेट दिली होती तेंव्हाही याच पोझीशन मधे आढळला होता..
आम्ही जयमाला नावाच्या हत्तिणीवर स्वार होतो आणी ती मस्त सोंडेने त्याला डिवचत होती ,पण तो खाऊन पिऊन सुस्तावस्थेत असल्या ने गुरगुरण्याचा ही कंटाळा करत होता.. Proud

जागू... spotted owlet मस्तच

शिवथरघळी कडे जातानाचा निसर्ग...

इंद्रा, मस्तच फोटो..

अशा छोट्याश्या घरातील माणसांचं मन खुप मोठं असतं रे. कधीही जा, दरवाजा वाजवा.
घरात असेल तो खाऊ पुढे करतील, अंगणात नाही तर घरात निवारा देतील, जपून जावा म्हणून निरोप देतील...

बदल्यात अपेक्षा मात्र कसलीच नाही !

इथे पिकासातल्या लिंका देण्याव्यतिरिक्त काही दुसरी व्यवस्था आहे का?
म्हणजे गुगलफोटोच्या लिंका इथे इथे देता येतात का? म्हणजे लिन्क टाकली तर फोटो दिसतात का?
गुर्जी......धावा!
घराजवळची ट्रेल...एकाच जागेचं सौन्दर्य रोज पाहिलं तरी काही तरी वेगळं आणि अधिक सुंदर भासते!


ही फुलं खूप आहेत सध्या. गंमत म्हणजे याच्या एन्डला जोकर/सान्ता क्लॉजसारखी गोन्डेदार टोपीसारखा भाग आहे.



इन्द्रा.. कॅलेंडर वर चा देखावा भासावा इतका फोटो सुर्रेख आहे.. Happy

मानु.. कसली क्यूट टोपी आहे.. खर्रच की सांताक्लॉज च्या टोपी सारखी.. आणी जांभळ्या पायर्‍या परिराज्यात चाललेल्यायेत कि काय...

मानुषी.. अ‍ॅज फॉर मी.. गूगल + मला अजिबात हँडल करता येत नाही.. Sad
इट्स क्वाईट अ हेडेक ( फॉर मी) लिंक्स द्यायला त्रास देतो
मी हॅपी विथ पिकासा..

जोकर/सान्ता क्लॉजसारखी गोन्डेदार टोपी >>>>> मस्त ....

बाकीही सर्वांचेच फोटो मस्तच .... Happy

लक्की यु मानुषी..
काय सजवलयं त्या ट्रेल ला...
नै तर आमचे ट्रेल...
माती नाही..
फुलं वगैरे काय असतं ?
जिकडे तिकडे खर्रा आणि कसला कसला सडा.. (आय वंडर, यांना थुकायच्चं असतं तर कमीने खातात कशाला?)
तू तिकडं वर निसर्ग आणि हिरवळ बघत चालते आणि आम्ही इकडं गाड्यांमधुन फुरसत मिळाली तर रस्ते दिसताय का चालाण्यासाठी हे बघत फिरतो ... खर्‍या अर्थाने प्रगती बर का..

त्या पायर्‍यांवरून, कुणी ललना फिक्क्ट गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली, केस मोकळे, हातात फुलांचा गुच्छ किंवा एखादे पत्र, स्वतःच्या विचारात हरवलेली... येतेय असा भास होतोय मला ( या वयात !!!! )

( या वयात !!!! ) >> Lol Proud Biggrin दादा...
शाम गुलाबी गाणं आठवलं मला... कसलं खत्तम कॉम्बो आहे त्या पिच मधे...

जागूला खरंच सगळे मस्त पोझ देतात.
इंद्रा अगदी गारेगार हिरवा गार फोटो.
वर्षू ....हो मी पण पिकासाच सध्या तरी.
दिनेश ....आणि टिना दोघांच्याही भापो!
आणि हो....तो पहिला जिन्यावर थोडं रंगकाम Proud ......जरा अंमळ टचप केलाय ! म्हणून ते भारीकलर कॉम्बो दिसतंय!
तरी ऑफ्कोर्स टिना म्हणते तसं पिचकार्‍यांचं रंगकाम आणि इतर प्लॅस्टिक घाण नाहीच्चे कुठे. त्या मुळे स्वच्छ सुंदर निर्मळ निसर्ग!

मला गॅलरित जुन्या कुंडया बदलून नवीन फुलझाडे लावायचा एचआर आहे, पण नर्सरीत छान दिसलेली फुले घरी आणल्यावर दूसरा बहार येताच नाही, असे का होते, पूर्वी खूप प्रयत्न करूँ झाला , मग कंटाळा आला आणि तो प्रयत्न सोडून दिला. आता परत इथले फोटो पाहून परत एकदा प्रयत्न करणार आहे, तर सर्वानी मला त्याविषयी माहिती दया ना.

आमच्या खि.बा./बा.बा.(खिडकीतली बाग, बाल्कनीतली बाग) मधली ही फुलं. गेल्या आठवड्यातले फोटो. आता पावसामुळे सगळी गळून गेलीत. यंदा चाफा खूप फुलला होता. जवळ जवळ दीड महिना देवपूजेला रोज चारपाच फुलं मिळत राहिली. नेवाळीसुद्धा फुलत राहिली. इतकी उंच वाढली की वरच्या मजल्यावरूनसुद्धा फुलं काढता यावीत. आता कापायला झालीय. पण फांद्यांवर अजून कळ्या आहेत. कळ्या असलेली फांदी तोडवत नाही.

IMG_20160510_085755836 (480x640) (183x230) (175x220) (175x220) (167x210) (159x200) (147x185) (143x180) (139x175) (135x170).jpg299 (125x155).jpg

Pages