निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना पावसाळ्याच्या शुभेच्छा! वेळेत आणि पुरेसा पाऊस सगळी कडे पडो!

सगळे फोटो आणि माहिती सुरेख! पण त्या ककाटूला बिस्कीट नका घालू हो प्लीज! साधारण सगळ्या वन्यप्राण्यांच्या गप्पामधे त्यांना मानवी मुख्यत: प्रोसेस्ड खाद्य खाऊ देऊ नये असा सल्ला दिला जातो. पक्षांना फळे किवा धान्य द्यावे.

ह्या क्षणाला आकाश मस्त भरून आलेय. बघूया खरच पडतो का!!

मस्त फोटो,

वर्षू , जागू म्हणतेय तसे, यात पांढरी, पोपटी आणि लाल अश्या तीन जाती आहेत. आपल्याकडे जास्त करून पांढरीच मिळते बाजारात.

सर्वात जास्त गोड, लाल रंगाचे असतात.

पांढरे केवळ तहानलाडू म्हणून ठिक असतात. या जाम पैकी काही जाम मधेच बिया निघतात तर काही आतून पोकळ असतात !

हि निळी फुले ( आणि तशीच पांढरी ) न्यू झीलंड मधे खुप दिसतात. मोठा गुच्छ असतो त्यांचा.>>>>>>मनाली मध्ये पण पाहिली होती हि फुले. हा फोटो:-

हो हे जामच झाड फळांनी भरल की त्यावर खारूताई आणि पोपट आस्वाद घेण्यासाठी सतत येतच असतात. खालीही भरपूर जाम पडलेले असतात त्यांच्या हालचालीमुळे.

अलिबाग अक्षीनागांव येथील एका हॉटेलच्या समोरील कमान अशी फुलली होती.

अलिबाग किल्यात गेलेलो तेव्हा हे फळांनी भरलेल सुंदर झुडुप दिसल. छान वाटत होत ते अस लाल-काळ्या फळांनी भरलेल झुडुप. कसल आहे हे?

जागू, सुंदर रंगसंगती आहे या फळांची आणि पानांची... पण बहुतेक विषारी असावे. कुणीच फळे खाल्ली नाहीत म्हणजे.

जोपर्यन्त पाऊस हुलकावणी देतोय.. तोपर्यन्त थंड थंड फोटो पाहात वर्चुअल गार वातावरणा चा अनुभव घेतेय

आज के लोकमत मे बातमी है ना रे लोगा...
२० तारखेपर्यंत पुणेमे जोरदार बरसेगा करके..
आजपन येऊ शकतो म्हणे..

नेमका जोक पण आहे पेपरमदे..
भारतात तीन ऋतु असतात म्हणे..
उन्हाळा
पावसाळा आणि
ढगाळा

Lol Lol Lol

जागू Lol

आत्ता रविंद्र जडेजा परत वादाच्या भोवर्‍यात सापड्लाय..
गिरच्या जंगलात लायन सफारी करताना त्यांच्यासोबत फोटो काढायचे म्हणुन तो अन त्याची बायडी गाडीखाली उतरले आणि मागे सिंहीणी बसुन आहे अश्या बॅकग्राऊंड चे फोटो काढले त्याने आणि ऑनलाईन पोस्ट केले..
वाईल्ड्लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट नुसार या नॅशनल पार्क मधे सफारी व्हेइकल मधून खाली उतरुन प्राण्यांना डिस्टर्ब न करण्यासाठी स्ट्रिक्ट रुल आहे म्हणुन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन घेण्यात येईल म्हणे..

या लोकांना समजवा रे कोणतरी.. काउन असे स्टंट करतात का माहिती.. तरी बह्याड आहे हे पोरगं असा अतितुच्छ कटाक्ष टाकुन त्या सिंहिनी गप्प बसल्या आहेत फोटोत नै तर एका ढांगेत लोळवला असता याला..

ह्या अशा लोकायमुळं तो अजय देवगण वाला काली पैदा होते निदान त्याची तरी भिती वाटू द्या म्हणावं.. अशा गोष्टीपायी आता खरचं एक दोन काली/ काले सुडून द्याव जंगलातनी.. श्या...

फोटो सर्व मस्त मस्त.

जागू काल टीव्हीवर उरणला आलेले फ्लेमिंगो दाखवले, काय सही मोहक हालचाली करतात. यु आर लकी हा.

Pages