काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे द्या तिला पाठवून,

प्रिय शिव,

कहीं दिनों से मुझे तुमसे एक बात कहनी थी, बस कह नही पा रही थी.

ये कैसा अंजान एहसास है जो तुम्हारे आने से मेरे मन को हो रहा है. हर बार तुम्हारी आहट, दिल की धडकन बढाती है. पता नही क्युं, तुम्हारे आसपास रहने से मन को एक तसल्ली हो जाती है.

तुमसे बाते करने के लिये, तुम्हारी बाते सुनके के लिये, दिल तरसता है.

जिस तरह मेरे परीवार को तुमने अपना मानकर उनकि सहय्यत्ता कि है, उस प्रति आभार दर्शाने के लिये मेरे पास शब्द नही है. तुम्हारा यहि अपनापन भा ने लगा है.

अगर तुम इस रिश्ते को कोइ नाम देना चाहते हो, तो मै नही जानती . मगर इस खत मे हि मेरा जवाब है ये सोचकर उसे स्विकार कर लो.

-------------------------------------------------------------
आई गं, मी सोळा एक वर्षाने हिंदीतून प्रेमपत्र लिहिलय फटाफट मलाच विश्वास बसत नाही. ....:फिदी:

हो, आजचा अख्खा एपिसोड अज्जीच्या बड्डेच शिक्रेटली प्लॅनिंग करण्यात जाणार, शेवटच्या काही मिन्टात काल दाखवलेल हॅप्पी बर्डे टु यु होणार आणि सोमवारच्या भागात बेसुर आवाजात गाण म्हणत गौरी शिवला होकार देणार..

'चाचरती हूँ'. चाचरणे हा शब्द शिवला कसा माहित असेल? हे चाणाक्ष मधुसुदन सावंतांच्या लक्षात येऊ नये ?

प्राची ती म्हणते की ती शिवला हिंदीच मराठी भाषांतर करायला शिकवत होती त्यात आलाय हा शब्द चाचरती हुं. यातला किमान लिंगभेद तरी मधुसुदन सावंतांच्या लक्षात यायला हवा होता. शिवला चाचरायचच असेल तर मै चाचरता हुं म्हणेल चाचरती हुं कस म्हणेल?

मला ते नचिकेतने नोकरी मिळाल्याचं निशाला सांगितलं नाही ते अज्जिबात पटलं नाही.
तिला फोन करून नचिकेतने सांगायला हवे होते. शुगो ने नाही.

आणि बेसुर आवाजात गाण म्हणत गौरी >> मला तर भेसूर वाटलं ते..

मला ते नचिकेतने नोकरी मिळाल्याचं शिवला सांगितलं नाही ते अज्जिबात पटलं नाही.
तिला फोन करून नचिकेतने सांगायला हवे होते. शुगो ने नाही. >>>>> पियु, बोल्ड केलेल्या जागी निशा हवय का? शुगो त्याला म्हणते निशाला सांग तो तिच्यावर चिडलेला असल्याने सांगायला नकार देतो म्हणुन शुगो फोन करते तिला, पण ती फोन उचलत नाही.

सध्या हिरविणीने हिरोला मिरच्या खायला घालायची फॅशन आहे का. सोनी वरच्या कुछ रंग प्यार्के ऐसे भी च्या हिरविणीने पण हिरोला मिरच्या खायला घातल्या.

त्यातला हिरो पण कातील आहे. हिरवीण पण भारी आहे. हिरोला मस्त साथ देते. गवरी सारखी थंड नाहीये.

गौरी ला जरा धरुन हलवलं पा हिजे..
थोड हसायला लाजायला काय होत?
शिव चांगला प्यार हो गया मोड मधे आहे..
जर अ‍ॅक्टिंग चांगली असेल तर कालच्या प्रसंगासारखे लूज प्रसंग पण खपुन जातात

अत्यन्त गंडलेली, विस्कळीत त्या गौरी पेक्षाही दिग्दर्शक आणि लेखक जास्त गोंधळलेला, भांबावलेला... समजत नाहि आहे बिचार्‍याला आपण नक्की हिंदी करायचयं की मराठी? हे आज दाखवावे कि उद्या? साखर द्यावी मिरच्या...
मिरच्याच देऊ शिवलाही झोंबतील आणि प्रेक्षकांनाही... मज्जा तेवढीच!

अरे काय ती सिरियल!! काय ते डायलॉग! काय तो अभिनय!! काय ते संकलन! बकवास नंबर एक!!! सगळेच

हे अरण्यरुदन ठरण्याची शक्यता जास्तच आहे, याची कल्पना आहे तरीही लिहितोय.

मी मालिका सुरुवातीपासून पाहिलेली नाही, पण या आठवड्यातल्या भागांवरून गौरीने शिवशी हिंदीत न बोलण्याचे कारण;, त्याने आधी आपली भाषा शिकून घ्यावी हा आग्रह आहे असं दिसतंय. मुंबईत आल्यावर त्याने इथल्या पद्धतीचा आहारही स्वीकारायला हवा हाही भाग त्यात असावा. आधी शिवसाठी भाजी वेगळी काढली जायची. मग आजीबाई 'आता त्याची काय गरज नाय, चलता त्याका आपल्यासारखीच भाजी' असं म्हटलं. शिवने पोहे केले तेव्हा मारलेला तो हम वाला डायलॉगही हेच सुचवतो, की तो जिथे राहतो तिथली संस्कृती त्याने समजून घ्यायला हवी असा गौरीचा आग्रह आहे.
आता तो आग्रह जास्तच ताणला जातो. अगदी आणीबाणीच्या परिस्थितीतही बाई मराठीतच तोडत राहता हे खरंय.

शिवने मराठीत आपल्या प्रेमाचा इजहार केल्यावर (खरं म्हणजे तो मराठी अजूनही शिकलेला नाही, केवळ कोणीतरी भाषांतर करून दिलेल्या ओळी पाठ करून बोलतोय) गौरीने शिवला हिंदीत उत्तर देणं अपेक्षित आहे (बहुतेक मागे कधीतरी त्यांचं तसं ठरलं असावं).

बाकी लेखन, दिग्दर्शनाचा दर्जा अन्य मराठी मालिकांच्याच तोडीचा आहे. शुभांगी गोखले, मोहन जोशी आणि आजीच्या भूमिकेतल्या अभिनेत्री आपल्या सहज अभिनयाने वाट्याला आलेलं काम चोख बजावताहेत इतकंच.

गौरीला शाळेत हिन्दीच्या पेपरला शुन्य गुण मिळत असावे कदाचीत. अरे देवा, काय ती खाडाखोड.:अरेरे: आम्हा ला ह्या वयातही ओरडा मिळतो खाडाखोड केल्याबद्दल आमच्या आई-वडिलान्कडून. हिची आई शिक्षिका आहे, ती दुसरयान्ना शुद्दलेखन शिकवते.

आणि एवढ सगळ करुन नाव मात्र हिने घेतल शिवचे कि ह्याने पत्र लिहिले म्हणून. शेवटी ती त्याच्याकडे खुन्नस नजरेने बघत होती ते वेगळेच. Angry

सध्या हिरविणीने हिरोला मिरच्या खायला घालायची फॅशन आहे का. सोनी वरच्या कुछ रंग प्यार्के ऐसे भी च्या हिरविणीने पण हिरोला मिरच्या खायला घातल्या.>>>> ती सुप्रिया पिळगावकरची सिरियल ना?

अरे काय ती सिरियल!! काय ते डायलॉग! काय तो अभिनय!! काय ते संकलन! बकवास नंबर एक!!! सगळेच>>>> हो ना, आणि आजच्या म.टा. (मुम्बई) मध्ये ह्या सिरीयलची स्तुती करणारी दोन पत्रे आली आहेत.

झंपी , मस्त आहे पत्र.

कहीं दिनों से मुझे तुमसे एक बात कहनी थी, बस कह नही पा रही थी.

ये कैसा अंजान एहसास है जो तुम्हारे आने से मेरे मन को हो रहा है. हर बार तुम्हारी आहट, दिल की धडकन बढाती है. पता नही क्युं, तुम्हारे आसपास रहने से मन को एक तसल्ली हो जाती है.

तुमसे बाते करने के लिये, तुम्हारी बाते सुनके के लिये, दिल तरसता है.

हि वाक्ये गौरी सारखी मुलगी अजिबात लिहीणार नाही. कारण तिला ती " फिल्मी" वाटतात ना. जराही रसिकता नाही तिच्याकडे. आता प्रेमामध्ये कसल आलय फिल्मी आणि नॉन-फिल्मी? नॉन-फिल्मी राहून प्रेम कस करावे ते गौरीने शिकवावे. तिला शिव जे काही बोलतो ते फिल्मीच वाटते. किती unromantic आहे ही मुलगी!

उस प्रति आभार दर्शाने के लिये मेरे पास शब्द नही है. तुम्हारा यहि अपनापन भा ने लगा है.>>> यावर शिव म्हणेल," आप हमे अपना भी कहती है, और आभार भी हमे दर्शाती है. भला अपनो को कोई thanks कहता है?

कोइ नाम >>> मी ते कोड नाम-code name असे चुकून वाचले. Biggrin

माझी आपली एक भाबडी मध्यमवर्गीय शंका बरं का.. त्यांच्या घरची अगदी सामान्य परिस्थिती बघून मनात आलेली..

मोजोंचं वय बघता ते जेव्हा त्यांच्या तरूणपणी रेडिओत नोकरीला लागले असतील ते ऑल इंडीया रेडिओतच असणार. तेव्हा काही खाजगी चॅनेल्स नव्हती एफ एमची. मग इतकी वर्षं ऑ इं रे ची (अर्थातच सरकारी) नोकरी केल्यावर (तत्त्वांना मुरड न घालणं, नोकरीतलं राजकारण न करणं वगैरे समजूनही) प्रमोशन्स मिळाली असतीलच. आणि पगार कमी नसणार. शिवाय या वयात ते नुसते निवेदक न रहाता अधिकारी पदावर असणं अपेक्षित आहे असं मी आजवर बघितलेल्या अनेक ओळखीच्या रेडिओ कर्मचार्‍यांच्या अनुभवावरून सांगू शकते. Wink
तीच गत शुगोंची. २०-२५ वर्षं नोकरी केल्यावर त्यांनाही बेताचा पगार असेल यावर विश्वास नाही बसत. दोघांनाही ५-६ वा वेतन आयोग माहिती नाही का Proud आणि आजी टिफिन देतात तोही धर्मार्थ नसावा. आणि गौरी, निशा-नचिकेत हेही नोकरदार. असं असताना, आणि इतकी वर्षं मुंबईत राहूनही नियोजनपूर्व स्वतःचा जरासा तरी मोठा फ्लॅट न घेणं अव्यव्हार्य आणि न पटणारं आहे. शिवाय परिस्थिती जेवढी दाखवली आहे तेवढी ती बेताची नसावी. साधेपणा वेगळा, आणि अशी परिस्थिती वेगळी. ५०००० रुपये कर्ज घेणं वगैरे पटत नाही. असो. फार जास्त अपेक्षा आहे बहुतेक माझी Wink

आज आमच्या पावणेपाच वर्षाच्या भाचीबै भेटल्या. मला म्हणाल्या त्या शिवला कळव फेसबुकवर, मला तो आवडतो आणि माझं एक नाव गौरी आहे. मी म्हणाले त्या गौरीपेक्षा तूच छान आहेस पण लहान आहेस, शिवला थांबायला लागेल १५ वर्ष.

चला शिवची अजून एक चाहती, तरी बहिण सिरीयल कुठलीच बघत नाही पण आमच्या गौरीबाय आजीकडे आल्या की बघतात. मी उत्तर दिले की आता मी नाही सिरीयल बघत तर म्हणाली बघू नकोस, पण शिवला कळव. Lol

आणि बेसुर आवाजात गाण म्हणत गौरी >> मला तर भेसूर वाटलं ते..>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

बाकी यांच्या चुका बर्याच आहेत पण हे ओकेच आहे
आपण पण घरी भेंड्या खेळताना सुरात थोडीच गातो..
मजा असते ना ती..

आता शिवचा आवाज पण बरा वाटतोय ही वेगळी गोष्ट.. Happy

आपण पण घरी भेंड्या खेळताना सुरात थोडीच गातो..>>>>> हो पण टीव्ही वर दाखवताना जरा बरा आवाज हवा ना. अगदी प्रोफेशनल नको पण भेसुरही नको. घरी, शाळा / कॉलेजात बर्या गाणार्या मुली असतात की. त्यातल्या एखादीकडुन गाऊन घ्यायचे.

पण परवा आजी मस्त दिसत होत्या, गुलाबी फुलांची साडी, मोत्याचे गळ्या- कानातले आणी प्रसन्न हसू.....गवरी तरी शिव कडे तुसड्या सारखी पहात होती. "वाट बघ"...वगैरे किती तुच्छतेने म्हणते ती! तिला अजिबातच प्रेम वाटत नाही त्याच्या बद्दल.

Pages