काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ती आई कुठे तरी पोळ्या बनवून देते ना तिथल्या केटरर कडचा शिधा उरलेला सामान किराणा म्हणून खपविले असेल. आमच्या एका नातेवाइकानी एकदा तळणीचे तूप साजूक घरचे आहे म्हणून दिले होते डबा भर. वापरलेले लगेच लक्षात येते. पैशाची चण चण असली की अशी खपवाखपवी होते. वाइट नाही पण सांगून करावी. आजही गिरणीतले सांडलेले पीठ उचलून नेणारे, देवासमोर वाहिलेला तांदूळ स्वच्छ
करून वापरणारे लोक आहेत. स्टोव्ह वर पण स्वयंपाक करतात. माझ्याकडे पण पाइप गॅस नाही आहे.
कनेक्षन पण नाही.

गौरी जेवणानंतर जमीन पुसून घेते ते कामही मी केले आहे. सासरी पहिले दोनच खोल्या होत्या. लेकीला सांगितले तर तिने आय रोल!!! कैपण अश्या अर्थाने.

आता सर्व मालिकांमधून वट पौर्णिमेचे जोरदार मार्केटिंग चालू झाले आहे. नांसौ भरे. पसंत आहे मुलगी तर फारच. सासू म्हणजे अगदी निथळत होती. मोठा सण असल्यागत. राखेचा मध्ये पण भूत वट वट करणार काय?

अरेच्चा! पसरणीची आई पण पोळ्या बनवून विकते? Happy
मग तर फारच झालं.........हा एकच धंदा दिसतो का सिरेलीच्या लेखकांना...?

अवांतर--- पाईप गॅस हे काही आपल्या कडे कॉमन नाहीये . आमच्याकडेही नाही.
ही पसरणी ची आई समोरच्या खोलीत मध्य भागी स्टोव्ह ठेवून त्यावर पोळ्या करीत होती...ते ऑड दिसलं....बाकी तसा तर चुलीवरही स्वयंपाक करतातच की आजही महिला......त्यांच्या कष्टाबद्दल दुमतच नाही!

खिचडी ...... मला तर खुप आवडते, गरमगरम खिचडी त्यावर मस्त साजुक तुप आणी लिंबु पिळुन अगदी तोपासु.

त्यात काय कमीपणा, उलट छानच आहे की कधीतरी बदल म्हणुन.

आणी असे कुनी मु लीला खीच्डी खावी लागली एक दिवस तर लगेच महिन्याचा किराणा पाठवत असेल तर मी तर मुद्दाम रोज करेल... मज्जा बघायला, कुणाच्या चांगुलपणाचा ईतका फायदा घेने बरे आहे का

खेचा मध्ये पण भूत वट वट करणार काय?>>>:हहगलो: शेवंता तर कायम वडालाच लटकलेली आहे, पण सध्या ती नाही तर निलीमा वट वट करतेय.:खोखो:

मंडळी त्या खिचडीचा किती कीस काढताय Wink

कालच्या शिवची कविता >>> मला DDLJ मधली काजोलची कविता आठवली Happy

शेवटी नीशा म्हणाली 'शिवची कविता आणि गौरीच्या डोळ्यात पाणी?' मला तर दिसल पण नाही पाणी..>>> मला पण नाही दिसलं. मी तर रिवाइंड करुनही पाहील. तरी नाही दिसलं Proud

डायरेक्टरकडून माझ्या पहिल्या दिवसापासून अपेक्षा नाहीच आहेत.>>> अन्जूचा डायरेक्टवर फारच राग आहे Lol

मानिनी, आता लयच इस्कटून सांगायले लागतंय बघ. Happy

अगं, 'काही' लोकांना असं वाटतं की, जे भाजी, आमटीचा रोजचा खर्च करु शकत नाहीत ते लोकंच खिचडी करुन खातात. चवीत बदल म्हणून खिचडी केली जाते यावर त्यांचा विश्वास नाही.. सधन घरातले लोक जर खिचडी खात असतील तर ते कंजूस आहेत.

खिचडी खाणार्‍या लोकांबद्दल असे अनेकविध विचार मी स्वतः ऐकलेले आहेत, त्यामुळे निशाचे खिचडीवरुन तणतणून घर सोडणे मला तरी अशक्य वाटले नाही. Happy

आता बास करुया खिचडीपुराण. Happy

राग असा नाही ग नताशा. एका मी बघत होते त्या सिरीयलमधे २ महिने डायरेक्टर होता आणि मग दुसरी १५ दिवस बघितली मग नाही बघू शकले, तिथे वर्षभर तरी होता मग हि मिळाली म्हणून ती सोडली बहुतेक. अपेक्षा ठेवली नाही की अपेक्षाभंग होत नाही एवढंच, :D.

खरं म्हणजे मीच गुड viewer ह्या category मध्ये नाहीये (मालिकावाल्यांच्या मते तरी बहुतेक) कारण सिरीयल बघायला जो पेशन्स लागतो तो माझ्यात नाही, लवकर कंटाळते. मग सोडून देते.

जोक्स अपार्ट पण माझ्या दीराकडे रोज खिचडी खातात (मसाला, साधी, तुरीच्या डाळीची, मुगाच्या डाळीची, मिश्र डाळींची, दलियाची असे अनेक प्रकार). पोळी भाजी असते पण खिचडी कॉमन.
प्रत्येकाच्या आवडीचा भाग, कुणाला आवडते कुणाला नाही. Happy

विषयांतराबद्दल क्षमस्व.

फारच पसरट होत चाललिये सिरियल पण. तुकडे तुकडे बघतोय अस वाटत राहात सारखं. किती दिवस ते निशाचे पैसे आणि त्याची व्यवस्था आणि शिकवण्या, स्वयपाक, डबा Sad

बरं शिव गौरीच प्रेमतरी जरा चांगल्या प्रसंगासह दाखवतील तर ते पण नाही. टिपिकल सिरियल प्रमाणे निशाला व्हीलन करुन तोच तो ट्रॅक सुरु केलाय.,

आज आमच्याकडे पहिला सीन दाखवून चॅनेल बंद पडले. काळ्या शरटातला शिव मरा ठी वाचून दाखवत होता अंध्रातून, महिरलो वगैरे. शिव काय बोर्न्हाण आहे समजून काळा शर्ट व वर हलव्याचे डिजैन
घालून आलेला.

शिवने उठुन बसुन .. इकडुन तिकडुन सगळ्या पद्धतीने गौरीला प्रपोज करुन झालं..
आता तरी गौरी काय बोलेल तर पुढ्च्या भागात दाखवलं की नीशा आली दोघांमधे..
एक भाग विदाउट टेन्शन गेला तर पाप लागेल काय?

नताशा Lol .

मी गेले दोन आठवडे एक दिवसाआड बघायचे कालपासून कंटाळाच आला, तसंपण मी रात्री १२ ला बघते. ९ ला नवरा अशोका लावतो. काल मस्तपैकी लिविंग फुड्झवर शेफ on wheel बघितलं रात्री १२ ला.

अरेरे ! काल वेणूला ४४० व्होल्टचा शॉक लागला ते नाही बघितलं तुम्ही.>>>> मी बघितल. ती मितू कधीपासून फोन करायला लागली वेणूला? ह्यान्ची पण लवस्टोरी सुरु होतेय की काय?

काल पुन्हा गौरीला झटका आला वाटत, म्हणत कशी होती, मला ही कविता कळलीच नाही, मुझे हिन्दी कहा आती है. हि कविता माझ्यासाठी होती का? पाणी फिरवल हिने शिवच्या मेहनतीवर. ड.पो, insensitive कुठली? Angry

मोजोला प्रेमपत्रान्चा तिटकारा आहे, हिन्दी प्रेमकविता मात्र बरी चालते ह्याला!

ती गौरी मराठी पणाची नाटकं कशाला करतेय. भैयाच्या प्रेमात पडली कशाला ईतकी दिड शाहाणी आहे तर. तिकडे सासरी जाऊन मराठीच्या शिकवण्या लावेल वाटतं सर्वांसाठी

काल ती शिवच्या कवितेला हिंदीतुन उत्तर द्यायचा प्रयत्न करत होती.. अजिबात पटण्यासारखी गोष्ट नाहीये की जी मुलगी लहानपणापासुन मुंबईसारख्या शहरात राहीली आहे, शिक्षण घेतल आहे, नोकरी करतेय तिला चार वाक्य हिंदीत लिहिता येत नाही. शिवच्या हिंदीची क्वालिटी नसेल कदाचित पण दोन हिंदी वाक्य सरळ लिहिता येत नाहीत हे काय पटत नाही ब्वा.

कालचा एपिसोड गंडलेला होता. शिव लिहिताना स्त्रीलिंगी का लिहिल?? आणि त्या निशाला २० फूट अंतरावर उभे असलेले शिव-गवरी काय बोलतात ते ऐकु आलं?

मुग्धा...... Happy
पण एकूणातच ही गवरी किती मठ्ठ दिसते!! काल ती असं वर-खाली बघत लहान मुली आठवत आठवत अभ्यास करतात ना, तसं लिहीत होती एकेक वाक्य!! आणी मोजो ना अगदी पटले की ते शिव चे पत्र आहे म्हणून..!! काहीही...!!
आणि ती वर हवा छान आहे म्हणून गच्च्चीत गेलेली आणि जिन्यात काय जाऊन बसली अडचणीत!!!!

>>>अजिबात पटण्यासारखी गोष्ट नाहीये की जी मुलगी लहानपणापासुन मुंबईसारख्या शहरात राहीली आहे, शिक्षण घेतल आहे, नोकरी करतेय तिला चार वाक्य हिंदीत लिहिता येत नाही.<<

शाळेत हिंदी असतच आपल्याला आणि तिची आई तर हिंदी शिकवते ना...

अतिशयुक्ति आहे.

अगदी कविता नाही लिहिली तरी मनातले हिंदी लिहायला येतच्/यायला पाहिजे.

फालतुगिरी आहे.

झंपी, पोस्ट पटेश..

अतिशयुक्ती नसते हो कधी अतिशयोक्ती असते.

Pages