काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिचा चेहेरा राकट नाहीये, पण भावांचा संपूर्ण अभाव असल्याने तो तसा दिसतो बहुधा. तिच्या चेहेर्‍यावरचे ठोकळेपण काही जात नाही. अश्रू सुद्धा ग्लिसरीन चे दिसतात. हसत नाही मनापासून, शिव शी एकदम पक्की कमिटेड आहे असेही जाणवत नाही . शुगो किती चांगले सहज काम करते तिच्या पेक्षा!!
आणि ड्रेसेस.....टाईट-टाईट, सेम स्टाईल चे प्लेन सिल्क चे टॉप्स व जरीच्या ओढण्या, मक्ख चेहेरा व तेच ते रुटीन - पर्स लटकावून ऑफीस ला जायला जिना उतरणं व शिवच्या दाराकडे पाहणं...दुसरे काही इंटरेस्टींग सिक्वेंसेस दिग्दर्शकाला सुचत नाहीत.
तसंच बेल वाजली की कुणीतरी म्हणणारच "मी उघडते..." किंवा "मी पाहते"...आणि मग जाऊन उघडणार...असं कशाला सांगावं लागतं दर वेळेस?

खरंच. सायली प्रोमोजमध्ये आणि तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये किती गोड दिसत होती. मालिकेत काय गंडलंय तिचं नक्की? बर तिलाही नंतर मॉनिटरवर दिसत नाही का की आपण चांगल्या दिसत नाहीयोत ते? मग त्यासाठी काही करत का नाही ती?

तसंच बेल वाजली की कुणीतरी म्हणणारच "मी उघडते..." किंवा "मी पाहते"...आणि मग जाऊन उघडणार...असं कशाला सांगावं लागतं दर वेळेस?>> हो नं. आणि कोणीतरी दाराजवळ जाऊन कडीला हात पण लावलेला असतो उघडायला तेवढ्यात कोणीतरी दुसरं म्हणणार मी बघते... तर पहिला माणूस चक्क कडी न उघडता बाजूला होतो. Uhoh कैपण दाखवतात.

पूनम +१२३... मला पण ती प्रोमोमध्ये फार आवडली होती. झीच्या सगळ्या हिराॅइन्स मध्ये तिच जास्त सुंदर वाटली होती.

निधी.. Happy मला तुझा कैपण शब्द कैच्या कै आवडलाय !!
आणि कोणीतरी दाराजवळ जाऊन कडीला हात पण लावलेला असतो उघडायला तेवढ्यात कोणीतरी दुसरं म्हणणार मी बघते... तर पहिला माणूस चक्क कडी न उघडता बाजूला होतो....हे वाचून खूप हसायला आलं !

चिंचे Happy "कैपण" हा शब्द माझा नाही बहुतेक मुग्धाचा आहे. मला पण तो भारी आवडतो म्हणून मी पण वापरते. Happy

तो दार उघडायचा प्रसंग तर मी दोन तीनदा तरी बघितलाय. काय बावळटपणा आहे असं प्रत्येकवेळी वाटलं.

आणि आमच्याकडे तर अरे बघा जा कोणीतरी कोण आलंय ते असं बोंबलून शेवटी हातातलं काम तिथेच ठेवून स्वतः दार उघडायला जावं लागतं, त्यामुळे हे कैतरी अतिच वाटतं मला तरी. Happy

आमच्य घरात सगळे नामी आहेत.

माझ्या घरी सगळे घरी असतील, आणि बेल वाजली की, जिथे ज्या रूममध्ये असू ( अगदी हॉल मध्ये सुद्धा कोणी असले लहान प्राणी ( माझीच मुलं) तिथून आधी दुर्लक्ष मग कानोसा मग ए दार उघडा कोणीतरी असे बोंबलू.

बेल वाजतेच मग... दोनदा, तीनदा...

अरे उघडा ना... पुन्हा बोंबलणार..
जोवर आई आपले काम सोडत बाहेर येत नाही. आईच जर घरात नसेल तर बाबा. ते येवून उघडणार.

आणि बाबा नसतील तर मी आधी कामवाली ( ती असेल त्यावेळी तर) बघणार , तिला सांगणार. .. वगैरे वगैरे.

सासरी अगदी उलट... लहानांन्नेच उघडावे.

एक बेल वाजली की साबा जिथून असतील तिथून बोंबलणार. अगदी बाथरूम मधून कानोसा बाहेरचा घेणार आणि बोंबलत बसणार..अरे खोलो...
दुसरी बेल... मग साबा.. बोंबलणार पण दोघेही उघडणार नाही.
मग मी आणि नवरा एकमेकांवर बोंबलणार...

शेवटी मीच जाणार हातातला फोन टाकून... Proud

झंपी Biggrin
हेच तर.. दार उघडायला इतका उत्साह असलेली सावंत कुटुंबीयच पहिल्यांदा पाहिलीत. Proud

वेणू आणि शिव मध्ये पण दार कोण उघडणार यावरुन चकमक घडते. Happy

तेच तर निधी.

>>>>हिचा चेहेरा राकट नाहीये, पण भावांचा संपूर्ण अभाव असल्याने तो तसा दिसतो बहुधा. तिच्या चेहेर्‍यावरचे ठोकळेपण काही जात नाही. अश्रू सुद्धा ग्लिसरीन चे दिसतात. हसत नाही मनापासून, <<<<<

नक्की काय कमी कळत नाही पण चेहरा थंड जाणवतो.

डोळे इतके निस्तेज का आहेत की मुळातच तसे आहेत समजत नाही. पण खूपच भावहिन.

हे दार उघडण्याचे वर्णन वाचून फारच मजा वाटली . Happy म्हणजे खरंच, इतकी घरोघरची कॉमन गोष्ट आहे, पण इथे लिहील्यावर वाचतांना किती हसू येतं...... का दि प चे असे अनेक इन डायरेक्ट मनोरंजनात्मक फायदे आहेत. !!

त्या वहीनीच्या अंगात काय खोड्या आहेत.

आणि किती कुसकी आहे.

आणि बावळट गौरी... तिला सांगून मोकळी होते.

किती तो मधूसुदन सावंतचा आठमुठेपणा.... ह्या अश्या वागण्याने मुलं पळून जातात.
हे जरी खरी आहे की, शिवचे आई वडील पण एकदम कर्मठ आणि टिपीकल आहेत. त्यामुळे एका अर्थी मधूसुदन जे काय बोलतो ते काळजी करण्यासारखेच आहे.

पण मुलगा आणि मुलगी समजत असतील का मुद्दा?( कि किती तडजोडी आहेत. मुलीलाच ज्यास्त नेहमीप्रमाणे.).
तसेही जातीबाहेर असो वा जातीत.... टिपीकल माणसे कुठेही भेटतातच.

आणि बावळट गौरी... तिला सांगून मोकळी होते... Uhoh

काय.. खरच? म्हणजे गौरी ने वहिनीला सांगित्लं शिव च्या आणि तिच्या नात्याबद्दल??? वहिनीचा स्वभाव कसा आहे माहित असुनही..

डायरेक्ट नाही सांगीतलय. पसरणी जे आडाखे बांधते, जे सुचक बोलते, त्या कशालाच गवरी विरोध करत नाही. म्हणजे हो पण म्हणत नाही आणी नाही पण म्हणत नाही.

नाही डायरेक्ट हो म्हणाली ती काल..

शिवचे बाबुजी गौरी ला शिव वरुन बोलत असताना वहिनी येते आणि तिचा थोडा बचाव करते..
मग घरी जाउन तिला म्हणते की बाबुजी तुला अस का म्हणत होते तुझ्या आणि शिव मधे काही आहे का?
तेव्हा गौरी रडता रडती हो म्हण्ते आणि हे पण सांगते की शिव आज बाबांना सांगणार आहे तो रेडिओ ऑफिस मधेच गेला आहे ई.

गौरी आत्ता आडमुठेपणा करून शिवला नीट रिस्पॉन्स देत नाहीये.. तो सगळा नंतर शिवची अम्मा उतरवेल. परवा कँटीनमध्येसुध्दा त्याच्याशी मराठीत बोलत होती Uhoh
अरे? एवढा तणावपूर्ण प्रसंग असूनही स्वतःचा हेका सोडायची तयारी नाही? शिवला ती जे काही बोलतेय त्यातले अर्धेच कळत आहे हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. तेव्हा तरी.. असोच..

त्यामुळेच तिचे वडील जे म्हणले ते खरं वाटलं.. "तत्वांपुढे माझी मुलगी प्रेमाला काडीचीही किंमत देणार नाही." ते दिसतंच आहे म्हणा.

काय ते भावनाशून्य डोळे.. थंड कुठची..

बिचारा शिव..

खरच खुप एक्स्प्रेसिव्ह आहे..

काळजी भिती प्रेम त्याच्या डोळ्यातुन आवाजातुनही व्यक्त होत आहे..

खरंच पसरणीला तिने सांगायला नको. पसरणीची विश्वासार्हता हिला अजून कळली नाही का? काल पसरणी फक्त एक काकडी सोलत होती. स्वयंपाकाचा बहाणा करत. ही गवरी इतकी मत्थड आणि भावना शून्य का दाखवली आहे? तिला काहीच स्मार्ट नेस आणि धडाडी नाही. सारखी आपली गांगरलेली, भ्यायलेली, थंडाक्का..
शिव शी ती कुठल्याही टेंस सिच्यएशन मधे मराठीत बोलायला लागली की माझी तळपायाची आग मस्तकात जाते. हिला थोडं हिंदी बोलायला काय जातं? तिथे परदेस मधे गेल्यावर हिच्याशी कुणी सदैव बंगालीत बोललं तर चालेल का हिला? (म्हणजे हिंदी सोडून प्रादेशिक भाषेत ! )

आंबट गोड + ११११ पण एवढे असुन शिव तिच्या प्रेमात कसा पडतो ह्याच मला जाम आश्चर्य वाटत Uhoh खरत मितूच त्याच्यासाठी छान आहे. निदान काम चांगले करते. तिला शिव आवडतो हे तिच्या देहबोलीतून कळायचे. आता सो कॉल्ड विनोदी प्रसंग तिच्यावर दाखवले होते ते सोडा.

गौरी आत्ता आडमुठेपणा करून शिवला नीट रिस्पॉन्स देत नाहीयेहो::>>>> हो ना, बिचारा शिव ए़कटाच प्रेमाची लढाई लढतोय.

बावळट गौरी.>>>> ही गौरी दुसर्याना जी विशेषणे लावते उदा. बावळट, डरपोक, वेडा वै वै. तीच विशेषणे तिला लागू पडतात. हे म्हणजे दुसर्यान्ना सान्गा ब्रहमज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण!

मधुसुदन सावन्त स्वतःला "समाजसुधारक" समजतात की काय? मी अमक्या विषयावर बोलणार नाही, मी तमक्या विषयावर बोलणार नाही, मी प्रेमपत्रावर,आन्तर जातीय लग्नावर बोलणार नाही. मला हे आवडत नाही, ते आवडत नाही वै वै. अश्याने एक दिवस नोकरी जाईल. मुलीमध्ये सुद्दा बापाचे गुण आले आहेत. सासरी जाऊन ही सुद्दा अशीच वागणार का? तसही त्या "लौकी" च्या प्रोमोमध्ये तिचे गुण दिसलेच होते. Sad

आज त्या राधिकाची entry आहे.

हो न...लौकी चा प्रोमो म्हणजे उद्दाम पणाचा कळस होता तिच्या. "तुला मजा येतेय...?" असं ती एकदम धमकावणीच्या सुरात शिवला म्हणते!
का ही इतकी आड मुठे पणाने आणि रागाने आणि उद्धटपणे वागत्ये त्याच्याशी? मुळात शिवची निवड चुकलीच

हो न...लौकी चा प्रोमो म्हणजे उद्दाम पणाचा कळस होता तिच्या. "तुला मजा येतेय...?" असं ती एकदम धमकावणीच्या सुरात शिवला म्हणते!
का ही इतकी आड मुठे पणाने आणि रागाने आणि उद्धटपणे वागत्ये त्याच्याशी? मुळात शिवची निवड चुकलीच
मला तर ती राधिका आवडली काल हिच्या पेक्षा!
ही एकदमच काकू बाई दिसत होती. तेलकट केस, भावहीन चेहेरा .....

मला तर ती राधिका आवडली काल हिच्या पेक्षा>>>>>>>
>>>>>>>>>>>>>

+१२३४५६७८९

खरच अभिनय पण ठिक वाटत होता तिचा.. फ्रेश तरी होती..
गौरी खरतर हे सगळ चालु आहे म्हणुन दु:खी वाटण्या ऐवजी वैतागलेली वाटते..
शिव पण दु:खी आहेच पण उगाच चिडका कटकटी नाही वाटत ..नीट हँडल करत आहे

अ‍ॅक्च्युअली मेघना (जु ये रे) ची फार आठवण येत्ये . ती शोभली असती अथवा मग कुलवधू मधली ती देवयानी पण चालली असती.....स्क्रीन टेस्ट घेतात तेव्हा अभिनयाची काहीच टेस्ट घेत नाहीत का?

आजच्या मटाच्या पुरवणीत सायली संजिव (गवरी) चा फोटो आलाय. अभिनयात बोंबाबोंब असली तरी फोटो चांगले येतात तिचे. छान दिसलिये फोटोत ती.

मला तर ती राधिका आवडली काल हिच्या पेक्षा!>>>> मला सुद्दा तीच बेस्ट वाटली.

ही एकदमच काकू बाई दिसत होती. तेलकट केस, भावहीन चेहेरा .....>>>> उगाच नाही, अम्माला ती कामवाली वा टली. मुळात गौरीच चुकलच, नीट कपडे करुन, केस विन्चरुन यायला हव होत तिने अम्मा-बाबूजी समोर त्या दिवशी. चान्गल impression पडल असत.

अम्माला मराठी बोलणारी राधिका चालते, पण ओरीजिनलं मराठी गौरी नको.

ए मी राधिकाचे काम करण्यार्या मुलीला पाहीले होते "माप्रिप" मध्ये. शमीकाची मोठी बहीण झाली होती ती.

इथे वाचून रिपीट एपि. बघतेय. राधिका जास्त शोभते शिवला, काम पण छान करते. अर्थात शिवने सांगितलं तिला त्यामुळे तिच नकार देईल बहुतेक लग्नाला. वहीनी म्हणते तसं पळून जाऊन लग्न करतील बहुतेक गौरी-शिव. असो राधिकासाठी बघतेय आत्ता, बाकी इच्छा नाही बघायची हि सिरियल, ती गौरी काही सुधारणार नाही.

गौरी लय बोअर..

परवाचा देवळामधला सिन

गौरी:: काय तु माझे बाबा म्हणाले ना अंतर जातिय विवाह चालणार नाही
एकतर मला सांगितल पन नाहिस ते असं म्हणाले ते .. आता बास झाल..
तुझ तु राधिकाशी कर लग्न माझ मी बघते..

मग शिव:: अगदी प्रेमाने ई.
मी हे करेन ते करेन .. सगळ नीट होईल..

मग गौरी बर चल ठिक आहे.. बघुन घे तुझ तु

काही दया माया नाहिच .. डायलॉग तर सगळे उद्धट...
आणि अभिनय पण तसाच

हो ना...किती रागाने आणि तोडून बोलत होती ती? "का नाही सांगीतलंस मला, बाबा असं म्ह्णाले ते? नाही शिव, आपलं लग्न होणं शक्य नाही.....इ..इ" आणि शिव ने अगदी प्रेमाने हात हातात घेतल्यावरही थंड नजरेने त्याच्या कडे बघत राहिली.
काही प्रेम नाही हिला.......शिव बद्दल तर सोडाच...मालिकेबद्दलही नाही....अन्यथा ती इतक्या भावना शून्य नजरेने वावरलीच नसती!

अजूनही हा बाफ हलतोय हे बघून मला सगळ्यांच्या चिकाटीला दाद द्याविशी वाटतेय. कधीच सोडले ही मालिका बघणे. सध्या त्याच वेळेस कलर्स मराठिवर असलेली 'तुझ्यावाचून करमेना' बघतोय. सध्या तरी मस्त वाटतेय. कविता मेढेकर मुलाची आई असल्यामुळे 'सासू सून जुगलबंदी' या नेहमीच्या महामार्गावर जाण्याची शक्यता कमी वाटतेय.

Pages