Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
हिच्याशी का बरे लग्न करवले
हिच्याशी का बरे लग्न करवले असेल त्याचे?>>>> love marriage असेल नचिकेतचे. बाकी निशाचे माहेर बघून मला अचानक तिच्याबद्दल sympathy वाटू लागली. पण मग असेही वाटू लागले की ही एवढी शिवच्या अम्माकडून एक्सट्रा इनकम च्या नावाने पैसे घेते ते ती तिच्या आईला मदत म्हणून का देत नाही? स्वतःकडे का ठेवते ते पैसे ? सासरच्यान्ना नाही निदान माहेरच्यान्ना तरी मदत करावी तिने, पण नाही!
आणि ही चाळीत राहते तर एवढा कसला माज करते ही? बड्या घरची मुलगी असल्यासाऱ़खी? आपल्या लिमिट मध्ये राहाव कि तिने. मोजोचे status तिच्या पेक्षा वरचे आहे म्हणावे.
मुळात निशा चाळित राहणारी मुलगी वाटतच नाही. निशाचे आणि तिच्या माहेरचे characterization चुकले आहे सिरीयल मध्ये. तिचे माहेर at least मोजोपेक्षा वरच्या status चे दाखवायला हवे होते. convincing वाटले असते.
गौरीचा अभिनय सुधारतोय हळुहळु.
मुळात निशा चाळित राहणारी
मुळात निशा चाळित राहणारी मुलगी वाटतच नाही. निशाचे आणि तिच्या माहेरचे characterization चुकले आहे सिरीयल मध्ये. तिचे माहेर at least मोजोपेक्षा वरच्या status चे दाखवायला हवे होते. convincing वाटले असते. >>>
मागे तर तिच्या आईने किराणा पाठविलेला... हे बहुदा दिग्दर्शक विसरला आणि एकदम गरीब केले माहेर तिचे...
Naahi mojo barech aadhi ekda
Naahi mojo barech aadhi ekda mhanale hote ki tya chhotya chaLee madhun ithe anal tila apan
बरोबर आनंदी, मोजो कधीच
बरोबर आनंदी, मोजो कधीच म्हणाले होते, छोट्या चाळीतून तर आलीय ती.
आपल्या भावना पसरणीला कळू नयेत
आपल्या भावना पसरणीला कळू नयेत म्हणून मख्ख चेहरा ठेवायचा 'अभिनय' गवरी करते असा युक्तिवाद वाचला .....
पण शिव गवरी आणि वेणू असे तिघेच असतानाही तोच चेहरा.....
बरं इतर वेळी अगदी सहॄदय असणारी गवरी त्या बिचार्या शिवच्या डब्यात मिरच्या भरते .....कैच्याकै...
टोटल गंडलीय ही व्यक्तिरेखा
त्यापेक्षा जावई-सासू मस्त मजा आणताहेत.......
निशाच्या आईला ३२ पेक्षा जास्त
निशाच्या आईला ३२ पेक्षा जास्त दात असावे असं वाटतंय !
निशाची आई, सावंतांच्या घरात
निशाची आई, सावंतांच्या घरात येऊ बघतेय. मग तीच शीव व गवरीचे भांडे फोडेल.
मोजो कधीच म्हणाले होते,
मोजो कधीच म्हणाले होते, छोट्या चाळीतून तर आलीय ती. >>>> मग ती आपल्या आईकडून किराणा माल कशी काय आणते सावन्तान्साठी बड्या घरची मुलगी असल्यासारखी? मुळात तिची personality चाळितल्या बाईसारखी वाटतच नाही.
हे
हे वाचा.
http://www.marathidhamaal.com/news/exclusive-9-unknown-facts-of-actress-...
पसरणीची आई आणि ती उगाचच करत
पसरणीची आई आणि ती उगाचच करत असलेल्या माजाबद्दलच्या कमेंट्सना अनुमोदन. ज्यावेळी ती किराणा आणुन देते त्यावेळेला वाटल होत की हि सावंतांपेक्षा वरच्या फायनान्शिअल स्टेटसची असेल म्हणुन येवढे नखरे चाल्लेत.
निशाच्या आईला ३२ पेक्षा जास्त
निशाच्या आईला ३२ पेक्षा जास्त दात असावे असं वाटतंय ! >>>>:हहगलो: जास्तीची अक्कल्दाढ पण उगवली असेल.:फिदी: काल पसरणीने सुधरण्याचा आव आणला, पण बेडरुममध्ये घुसल्यावर परत येरे माझ्या मागल्या. सुंभ जळला पण पीळ काही जात नाही म्हणतात ते खरे आहे.
गौरीला लक्षात आलेय की पसरणी तिच्यावर आणी शिव वर लक्ष ठेऊन आहे, पण सावध होण्या ऐवजी ती आणखीन बावचळतेय. काही म्हणा पसरणीचे डोळे फार भारी आहेत. बारकाईने बघा. ती डोळ्यात लबाडीचे भाव फार भारी पद्धतीने आणते. या अभिनया बाबत मी तिला ९९ % मार्क देईन, पण गवरीबाई केव्हा सुधरतील माहीत नाही.
पण पसरणीचे ओठ फारच सपाट आणि
पण पसरणीचे ओठ फारच सपाट आणि बेढब आहेत......तीच तशी आहे मुळात!
गवरी ला थायरॉईड चा त्रास आहे म्हणे आणी गोळ्या घेऊन काम करते म्हणे...म्हणून काय काहीही चालवून घ्यायचं काय प्रेक्षकांनी? अनुनासिक , चढ उतार नसणारा, बद्द आवाज, ठोकळेबाज अभिनय आणि यथातथा वार्डरोब.....
गवरी फक्त Still Model म्हणुन
गवरी फक्त Still Model म्हणुन चालु शकेल.
गवरी ला थायरॉईड चा त्रास आहे
गवरी ला थायरॉईड चा त्रास आहे म्हणे आणी गोळ्या घेऊन काम करते म्हणे...>>>>>>>>.
कशावरुन?
असं ती म्हणाली आहे कुठे?
आणि हे जरी खर असल तरी त्याचा
आणि हे जरी खर असल तरी त्याचा इथे काय संबंध?
पसरणीचं माहेर गरीब दाखवलंय???
पसरणीचं माहेर गरीब दाखवलंय??? सावंतांच्या घरचा अख्ख्या महिन्याचा किराणा कसा काय पाठवला होता मग त्यांनी??
काही म्हणा पसरणीचे डोळे फार भारी आहेत. बारकाईने बघा. ती डोळ्यात लबाडीचे भाव फार भारी पद्धतीने आणते. >> +१.
पण मला तिचे डोळे बेडकासारखे वाटतात.. बाहेर आलेले.
सावंतांच्या घरचा अख्ख्या
सावंतांच्या घरचा अख्ख्या महिन्याचा किराणा कसा काय पाठवला होता मग त्यांनी?? >>>> अगदी खर सांगायच तर हा सीनच मुळात चुकलाय. एक दिवस जेवायला खिचडी केली म्हणुन कोणी लग्गेच दुसर्या दिवशी अख्ख्या महिन्याचा किराणा मुलीच्या सासरी पाठवत नाही.. चेंज इन टेस्ट म्हणुन आठवड्यातुन एखादा दिवस डाळ-तांदळाची खिचडी कुठल्याही घरी केली जाते.
मुग्धा, आजीचा हात भाजतो आणि
मुग्धा, आजीचा हात भाजतो आणि अजून काही प्राॅब्लेममुळे ते लोकं पटकन खिचडीच करतात जेवायला.. त्यावर निशा फार तणतण करते.. मरमर काम करायचं आणि खिचडीच खायची का जेवायला वगैरे.. आणि रागाने माहेरी निघून जाते.. येताना आईकडून महिन्याचा किराणा घेऊन येते... (दोनच पिशव्यांत तांदूळ, गहू, डाळी सगळं कसं मावतं कोणास ठाऊक)
कदाचित आईला उलटसुलट सांगत असेल ती म्हणून पाठवत असावी.
खरे आहे मुग्धाली... बहुदा
बहुदा लेखक वेगवेगळे असतील........ दहा दहा एपिसोडस देत असतील काँट्रॅक्ट ने ..म्हणूनच इतकी विसंगती दिसते!
अग निधी, कारण काहीही असल तरी
अग निधी, कारण काहीही असल तरी एखादा जेवायला खिचडी असली म्हणुन इतक काही बिघडत नाही. म्हणुन तर मी चवीत बदल करण्याच उदा दिल ना.
कदाचित आईला उलटसुलट सांगत असेल ती म्हणून पाठवत असावी. >>>> हेच कारण असेल तर परवा दाखवलेल तिच माहेर किंवा कुल्फीच्या एपिमध्ये आलेला आईचा उल्लेख खिचडी प्रकरणाच्या आधी यायला हवा होता.. ते काहीच नाही आणि डायरेक्ट आईने महिन्याचा किराणा पाठवला आहे म्हणुन माज?
आं.गो. असेलही अस काय म्हैत.
आं.गो. असेलही अस काय म्हैत.
कारण काहीही असल तरी एखादा
कारण काहीही असल तरी एखादा जेवायला खिचडी असली म्हणुन इतक काही बिघडत नाही. म्हणुन तर मी चवीत बदल करण्याच उदा दिल ना.>> अगं, ते आपल्यासाठी.
त्यांच्या घरात इतर कोणालाही त्या खिचडीचा प्राॅब्लेम नसतोच. पण खिचडी बघून पसरणीचा घाट चिडतोच की.. हे काय जेवण आहे का म्हणून...
तिच्यासाठीच म्हणतेय मी.
तिच्यासाठीच म्हणतेय मी. रोजच्या रोज साग्रसंगीत जेवते ना ही, मग एक दिवस खिचडी खाल्ली तर काय जात? आणि तु म्हणालीस तस आईला उलटसुलट सांगितल्याने आईने किराणा पाठवला असेल तर तिच्या आईचा, माहेरचा उल्लेख या प्रकरणाच्या आधीच यायला हवा होता.
मुगु ती चाळीत रहाते हा उल्लेख
मुगु ती चाळीत रहाते हा उल्लेख खूप आधीच आलाय, किराणा आणते ते नंतर. तेवढा पिशवीभर किराणा आणायला दिले असतील आईने पैसे. थोडे पैसे बाळगून असेल आई. खरं तो सीन पटलाच नव्हता, माहेर गरीब का श्रीमंत हा मुद्दा नाहीच आहे.
रोजच्या रोज साग्रसंगीत जेवते
रोजच्या रोज साग्रसंगीत जेवते ना ही, मग एक दिवस खिचडी खाल्ली तर काय जात?>> अगं, स्पष्ट सांगायचं तर काही लोकांना खिचडी खाणे हे कमीपणाचं लक्षण वाटतं.. हा माझा स्वानुभव आहे. तसंच तिलाही वाटत असेल.
आईला उलटसुलट सांगितल्याने आईने किराणा पाठवला असेल तर तिच्या आईचा, माहेरचा उल्लेख या प्रकरणाच्या आधीच यायला हवा होता.>> हे बरोबर आहे तुझं.. पण तिच्या आईचं पात्र घुसवायचा विचार दिग्दर्शकाच्या मनात नंतर आला असेल.
अन्जु, निशाची आई चाळीत रहाते
अन्जु, निशाची आई चाळीत रहाते किंवा निशा चाळीतुन इथे आलीय याचा उल्लेख नाही म्हणत मी. निशा आपल्या आईजवळ इथल्या चुगल्या करते, वास्तवापेक्षा खोट काहीतरी वाढवून सांगते असा उल्लेख हवा होता अस म्हणतेय मी जेणेकरुन तो किराणा पाठवायचा सीन जास्त जस्टीफाय झाला असता.
पण तिच्या आईचं पात्र घुसवायचा
पण तिच्या आईचं पात्र घुसवायचा विचार दिग्दर्शकाच्या मनात नंतर आला असेल. >>>>> करेक्ट. डायरेक्टर झोपा काढतोय किंवा राखेचाच्या डायरेक्टरशी जास्त मैत्री आहे त्याची त्यामुळे मागे काय दाखवल होत हे विसरतोय.
कालच्या शिवच्या कवितेत लय
कालच्या शिवच्या कवितेत लय वेळा अजनबी व्हत,,,
शेवटी नीशा म्हणाली 'शिवची कविता आणि गौरीच्या डोळ्यात पाणी?'
मला तर दिसल पण नाही पाणी..
आईचं पात्र....... खरंच पात्र
आईचं पात्र....... खरंच पात्र आहे अगदी!
गौरीला वहिनीने इतकं डायरेक्ट
गौरीला वहिनीने इतकं डायरेक्ट विचारूनही, गौरीला कळत नाहीये का ती लक्ष ठेऊन आहे संशय आलाय तिला. असो आता एकट्या शिवसाठी सिरीयल नाही पाहू शकत, गौरीला खूप वेळ दिला पण ती नाही सुधारणार आणि डायरेक्टरकडून माझ्या पहिल्या दिवसापासून अपेक्षा नाहीच आहेत.
Pages