काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं! मग कधी पुढे सरकणार ही कथा? काल मला वाटत शिवच्या बाबुजींना कळले गौरीचे नाव. शिवच्या टमटमीत अम्मा ला गौरीचे नाव पसरणीकडुन समजले असावे. पसरणीचा घाट जास्तच वळणदार होत चाललाय. शिवचे बाबुजी त्या वजन वाढवायच्या जाहीरातीत आहेत. ( एंड्युरा मास) बहुतेक स्वतःचे आणी कुटुंबाचे वजन असेच वाढवले असावे. शिवला पण द्या थोडे. पसरणी जास्त शोभली असती त्या जाहीरातीत.

शिव गवरीकडुन साथ देण्याचे वचन घेतो, गवरी ते हातात हात देऊन देते. गवरी येडपट आहे, तिच्या जागी ती मितु असती तर तिने पसरणीलाच चूना लावला असता.

शिवच्या काकाची एन्ट्री झालीये ना? मजनूचाचा असे काही तरी नाव आहे ना त्याचे.

शिवच्या टमटमीत अम्मा ला गौरीचे नाव पसरणीकडुन समजले असावे. >>>> फोटो पाठवला होता तिने गौरीचा पिकनिकचा अम्माला. अम्मा अजूनही गौरीला नोकरानी कि बेटीच समजते. Uhoh

बहुतेक स्वतःचे आणी कुटुंबाचे वजन असेच वाढवले असावे. >>>> हेच वजन वापरुन आता ते शिवच्या boss ला त्याला नोकरीवरुन काढायला सान्गत आहेत. नव्या प्रोमोत बघितलय. शिवचे अम्मा-बाबूजी जगातले पहिले आई-वडिल असतील जे आपल्याच मुलाला नोकरी वरुन काढायला त्याच्या boss ला सान्गत आहेत. Lol असे office कुठे असेल हो?:अओ:

काहिहि एक्ष्प्रेशन्स नाहित यार या मुलीच्या तोंडावर Sad
प्रेमात पडली, पकडल्या गेली, पावसात रोमांस करताना, शिवशी आँखमिचौली खेलताना सगळीकडे एकच एक्सप्रेशन: Angry
बेक्कार आहे सगळ

लढो शिवबाबू, गौरी नही तो क्या हुआ हम तुम्हारे साथ है

या गवरी बै च्या चेहर्‍यावरची एक रेष हलत नाही. इतर कलाकारांपेक्षा फारच कमी वाटते आहे. इव्हन ती महा वहिनी सुद्धा भूमिकेला बर्‍यापैकी न्याय देते आहे.

आता असं वाटतंय की गवरीच्या मनाविरुद्ध तिचे बाबा तिचं लग्न लावून देतात म्हणून शिरेलीचे नाव "काहे दिया परदेस" Proud

हो ना....शिव इतका टेंशन मधे आणि ही थंड नजरेने त्याच्या कडे बघतेय ....... अजिबात भाव आणता येत नाहीत तिला....

काल त्या मजनूचाचा आणि शिवच्या बाबुजींनी मस्त ऐकवलय त्या निशाला.

तो मजनूचाचा मस्त पुटपुटतो तोंडातल्या तोंडात पण आपल्याला चांगल ऐकु येत. Lol

प्रेमात पडली, पकडल्या गेली, पावसात रोमांस करताना, शिवशी आँखमिचौली खेलताना सगळीकडे एकच एक्सप्रेशन >>> हो ना Angry मालिका वाल्यांनी नक्की काय विचार करुन हिला हिरॉईन बनवले Uhoh

काल त्या मजनूचाचा आणि शिवच्या बाबुजींनी मस्त ऐकवलय त्या निशाला. + १११११

मला वाटत की मजनूचाचांनी पण शिवसारखच इलु इलु केलयं. कारण शिवची हम्मा, शिवच्या बाबुजींना ऐकवते की मुन्नापर उसके चाचाकी छाया पडी है.

मला वाटत की मजनूचाचांनी पण शिवसारखच इलु इलु केलयं. कारण शिवची हम्मा, शिवच्या बाबुजींना ऐकवते की मुन्नापर उसके चाचाकी छाया पडी है.>>>> हो. आज मजनूचाचाची लवस्टोरी शिवच्या बाबूजी कडूनच ऐकली. मजनूचाचा पण असेच पळून गेले होते कुणाबरोबर. Lol

Gauri lai bore.. kal sagale dialogue mitulach dile hote .. tich bari acting karat hoti.. gauri ekdam baththad

Jatana mitu bye mhanali pan hi nahi mhanali

बाकी काही असो पण
शिव, शिवचे बाबुजी, वेणु, अम्मा, चाचा, मोजो, शुगो, अगदी तर नीशा, आज्जी..
सगळे अभिनय छान करत आहेत..
वेणू आणि शिवचे बाबा यांच्यामधला कालचा संवाद छान होता..
गौरी लय पकडतच नाहिये...

बाबुजींना या दोघांच्या प्रेमाबद्दल कळलंय हे शिवने गौरीला सांगितलच नाहिये का? का?

वेणूची अँक्टींग मस्त आहे.>> +१. त्याने बोलण्याचं टोनिंग एकदम जबरदस्त पकडलंय.

बाबुजींना या दोघांच्या प्रेमाबद्दल कळलंय हे शिवने गौरीला सांगितलच नाहिये का? का?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
तस तर शिव आणि गौरी विशेष कधी बोललेच नाहियेत .. डायरेक्टर ने भाषेचा प्रॉब्लेम टाकल्याने बंधन आली..

काल वेणू शिवच्या बाबाना सांगत होता की शिव तुमच्या सगळ्यांबद्दल सांगतो तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो ई. तेव्हा वाटल .. गौरी तर वेणू येवढी पण क्लोज नाहिये शिवला..

झीच्या फेसबुक पेजवर काही जणांनी सायलीला अभिनय शिकवा, नीट करत नाही लिहीलंय. मी पण वाहत्या पाण्यात हात धुवुन आले आणि लिहीलं की नाही करत ती चांगलं काम, तिच्यामुळे मी ही मालिका बघणं बंद केलं. Lol

झीच्या फेसबुक पेजवर काही जणांनी सायलीला अभिनय शिकवा, नीट करत नाही लिहीलंय. मी पण वाहत्या पाण्यात हात धुवुन आले आणि लिहीलं की नाही करत ती चांगलं काम, तिच्यामुळे मी ही मालिका बघणं बंद केलं.>>>> अन्जू, हे सुद्दा लिहायचे होते कि, हयात गौरीचा जो attitude दाखवला आहे तो बदला. कधी कधी कठोर, उद्दट वाटत हे character, specially शिव च्या बाबतीत.

शनीवारच्या भागात गौरी शुगोशी बोलत असते डबे भरतांना.. तेव्हा थोराड आणि जरा राकट दिसली हेमावैम.
तिच्या चेहेर्‍यावर जरापण गोडवा नाहीये. मला आता पुन्हापुन्हा जान्हवी, मेघना वगैरेंची आठवण येतेय. बाकी कश्याही असल्या तरी चेहेर्‍यावर छान गोडवा होता त्यांच्या.. लव्हस्टोरी नसूनही त्या अ‍ॅना, रेश्माचे चेहरेसुद्धा इतके राकट नव्हते दिदोदु मध्ये.

Pages