काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आं.गो अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडलाय तुला. ह्या सगळ्या शिरेलीतल्या एकही हिरवीण वेस्टर्न आउटफीट्स घालताना दाखवत नाहीत.

पसरणीच्या घाटाला, त्या मंग्यांच्या आईला वेळीच आवरले नाही आणि गवरीच्या जागी दुसरी कोणी नायिका घेतली नाही तर या मालिकेचा टीआरपी झी मराठीच्या इतर मालिकांप्रमाणे लवकरच रसातळाला जाणार हे नक्की!>>>

शिव आहे टी आर पी सांभाळायला नुसते त्याचे बघणे आणि स्माईल पुरेसी... एपिसोड पहिल्याचे सार्थक!! Wink

शिव ला खरंच अगदी 'डेडिकेटेड' चाहते मिळाले आहेत हं!

हो गं, मुग्धा, इव्हन स्वानंदी, उर्मी, ..कुणीच नाही दाखवत. त्यांच्या मैत्रिणी- बहिणी मात्र जीन्स, केप्रीज, स्कर्ट्स (संपदा) ...सग्गळं घालतात .. आणि अर्थात वैभव लक्श्मीचा प्रश्नच नाही म्हणा !! Happy

त्या शिवच्या तोंडावर दार लावण्याच्या सीनमध्ये सिव गौरीकडे बघुन अस्सा काय लुक देतो की इकडे माझा कलिजा खलास झाला.

मी तर ऑलरेडी मालिका बघणं सोडलंय. शिवचा पण मला राग येतो. काय तरी प्रेमात पडणं, मितुसमोर लंबंचौडं भाषण देणं सगळं बळंच. मला असला पकावपणा फार काळ सहन होत नाही. मी लगेच बघणं बंद करते.
सध्या मी टीव्हीवर काहीही पहात नाहीये.

गौरी च्या जागी , प्राजक्ता माळी असती आणि शिव नुसत्या तिच्या हसण्याकडे बघूनही तिच्या प्रेमात पडला असता , तरी पटलं असतं . फार फ्रेश चेहरा होता तिचा .

स्वानंदी कधीच जीन्स वगैरे काही घालत नाही . लग्नानंतर हल्ली हल्ली पंजाबी ड्रेस घालायला लागली आहे. नाहीतर आपली एकाच टाईपच्या प्लेन साड्या आणि फुलाफुलांचे ब्लाउज .

उर्मी लग्नाआधी निदान घरी तरी पायजमा आणि टीशर्ट्स घालायची . आता पंत सचिवांकडे तर तिला साड्या नेसण्यावाचून ऑप्शन्च नाही.

अदितीचा वॉड्रोब तर महा बोर होता .

जानी निदान आयांच्या उत्साहाखातर एक-दोन वेळा गाउन घालू शकली..

जानी निदान आयांच्या उत्साहाखातर एक-दोन वेळा गाउन घालू शकली..>>> तिने एकदा जीन्स पण घातली होती. सगळ्या आया आणि हे दोघे कुठेतरी पिकनिकला गेले होते तेव्हा.

जानी निदान आयांच्या उत्साहाखातर एक-दोन वेळा गाउन घालू शकली.. >>> मोजुन दोन वेळा. एकदा वादि सेलिब्रेशनच्या वेळी ब्लॅक गाउन (मस्त होता हा) आणि चांदण्यातल्या डोजेच्या वेळी व्हाईट गाउन (हा बोर होता)

तिने एकदा जीन्स पण घातली होती. सगळ्या आया आणि हे दोघे कुठेतरी पिकनिकला गेले होते तेव्हा. >>>> येस्स.. एक-दोन मॉर्निंग वॉकचे सीन्स होते त्यात पण ट्रॅक पॅण्ट ऑर असच काहीस होत.

जगी सर्वसूखी असा कोण आहे?
उत्तर: सस्मित >>>>>>>>>>> असं अजिबात नाहीये. हे झीदळण घरी सुरुच असतं. साडेसहा ते रात्री ११ पर्यंत. मी बघत नसले तरी नजर पडतेच Happy आणि कानवर तर येतच Happy

बाकी सगळ्या हिरवीणी एकाच टाईपचे ड्रेस का घालतात हे पण कळत नाही Uhoh म्हणजे प्रत्येकीचा एक ठरविक पॅटर्न असतो.

शिवचे सगळे शर्ट पण एकाच पॅटर्न चे असतात Sad

Happy जानी वगैरे बद्दल आपल्या जितकं लक्षात आहे तितकं खुद्द लेखक- दिग्दर्शकांच्या तरी असेल की नाही कुणास ठाऊक !!
बहुदा नसेलच...नाहीतर असले भिकार , इल्लॉजीकल सिक्वेंसेस दाखविले नसते सगळ्यांनीच!

काल एकदाची गौरी दोन शब्द का होईना हिंदी बोलली ब्वा.... हुश्श्स्श्श्श्श...

प्रोमोजमध्ये दाखवल होत की मोजो गौरीला आणि शिवला एकत्र बघतात, तेव्हा म्हटल आता यांच भांड फुटत की कै, पण झाल उलटच मोजोंना आपली मुलगी कित्ती कित्ती गुणी आहे याचा प्रत्यय आला.

कँटिन मधे मोजो दरवाजातून आत येतात आणि तिथेच उभे राहतात. त्या कँटीनमधे आणखी कुणिही नसते. तरीही गवरीला निघताना मोजो दिसत नाहित? तो प्यून देखिल शिवला सांगत नाही की हे साहेब तुला भेटायला आलेत. मुळात शिवला मोजो भेटायला येतात तेव्हा त्यांना डायरेक्ट कँटीनमधे कसं काय पाठवलं? . त्या शिवला साधं मराठी कळत नाही आणि हे गवरीचं भलंमोठ्ठं लेक्चर त्याला कळलं?? कैच्याकै

त्याला गौरी जे काही बोलली ते का ही ही कळलेल नाहीये. ती फक्त दोन शब्द हिंदीतुन बोलली आहे ज्याच्या आधारे त्याने तिला समजुन घेण्याचा प्रयत्न केला.

कँटिन मधे मोजो दरवाजातून आत येतात आणि तिथेच उभे राहतात. त्या कँटीनमधे आणखी कुणिही नसते. तरीही गवरीला निघताना मोजो दिसत नाहित? तो प्यून देखिल शिवला सांगत नाही की हे साहेब तुला भेटायला आलेत. मुळात शिवला मोजो भेटायला येतात तेव्हा त्यांना डायरेक्ट कँटीनमधे कसं काय पाठवलं? . >>>> मालिका आहे ती, त्यातच हे प्रकार होतात. आपल्याला आपल्या हापिसात कोणी भेटायला आल तर अख्ख्या हापिसला कळत, ब्रेकिंग न्युज असल्यासारख आणि आपल्याला ओळखणारा प्रत्येकजण येउन सांगतो आपल्याला...

Happy मुग्धा...अगदी.....!!

काल पसरणीची आई दाखवली...इतकी साधारण परिस्थिती आहे तिची..? मग कशाचा पसरणीला माज आहे?
तिनेच ना मधे सगळा किराणा पाठवला होता पसरणी साठी...?

आपल्याला आपल्या हापिसात कोणी भेटायला आल तर अख्ख्या हापिसला कळत, ब्रेकिंग न्युज असल्यासारख आणि आपल्याला ओळखणारा प्रत्येकजण येउन सांगतो आपल्याला...>>हे मीही अनुभवलं आहे Happy

काल पसरणीची आई दाखवली...इतकी साधारण परिस्थिती आहे तिची..? मग कशाचा पसरणीला माज आहे? >>>> नैतर काय, काल तिच घर दाखवल तेव्हा नवरा पण आश्चर्याने म्हणाला "हे हिच माहेर आहे?"

>>>>कँटिन मधे मोजो दरवाजातून आत येतात आणि तिथेच उभे राहतात. त्या कँटीनमधे आणखी कुणिही नसते. तरीही गवरीला निघताना मोजो दिसत नाहित? तो प्यून देखिल शिवला सांगत नाही की हे साहेब तुला भेटायला आलेत. मुळात शिवला मोजो भेटायला येतात तेव्हा त्यांना डायरेक्ट कँटीनमधे कसं काय पाठवलं? . त्या शिवला साधं मराठी कळत नाही आणि हे गवरीचं भलंमोठ्ठं लेक्चर त्याला कळलं?? कैच्याकै<<<<

+१

Happy हो ना....स्टोव्ह वर आजकाल कुणी पोळ्या करतं का?
पुढे काय झालं काल?...मी नंतर स्वयंपाकघरात अडकले व पाहता आलं नाही!!! Happy

पसरणी च्या साड्यांचा चॉईस कुणाचा आहे? अती भिकार आहे. >>+१
राहून राहून वाटतंय गौरीची निवड चुकलीय, दुसरी एखादी जरा उंच आणि चांगला अभिनय असणारी हवी होती>> +++१११११

शारीरिक उंची सोडुन द्या, पण अभिनयाची पातळी जरा उंच हवी होती. ही अगदीच बालनाट्यात काम केल्यासारखं करतेय. एकसुरी बोलणं, थंड डोळे आणि मख्ख चेहरा! Sad

नाचिकेत मध्ये बेस्ट असण्यासारखे आहे तरी काय? त्या आजीच्या टोमणे जाम मज्जा येते :डी

Pages