मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७६ ची गोष्ट आहे. मी एन्.डी.ए. च्या मुलाखतीसाठीसाठी भोपाळला गेलो होतो. आयुष्यात दुसर्‍यांदा कोल्हापूरच्या बाहेर एकटा पडलो होतो. (पहिल्यांदा लेखी परिक्षेसाठी मुंबईला). मुलाखतीच्या पत्रात लिहिले होते: "Report to RTO at Bhopal". त्या काळी मिलिट्रीमध्ये रेल्वे ट्रान्स्पोर्ट ऑफिसर असायचा. मला हे ठाऊक नव्हते. मी रेल्वेस्टेशनबाहेर पडलो, रिक्षात बसलो आणि आर.टी.ओ. सांगितले. रिक्षावाल्याने सरळ RTO ऑफिसमध्ये रिक्षा नेली. तिथे मुलाखतीसारखे काहीच वातावरण दिसेना. मी रडकुंडीला आलो. मग एका भल्या गृहस्थाने सांगितले की मिलिट्री चा RTO वेगळा. तो रेल्वे स्टेशनवरच असतो. परत रिक्षा रेल्वे स्टेशनकडे. आता हसू येते. पण तेव्हा हवा टाइट झाली होती.

शरद

तरीच मनिषाच्या ह्यांनी हल्ली सिक्युरिटी वाढवलीये. Proud
वैभव, कितीवेळा खंडणी मागायला लावताय पल्लीला.. Happy

पल्ली ,नंतर मनीषाने मला पेशल फोन केला, मला तुझ्या मुळे छान मैत्रिण मिळाली म्हणून Proud
पण तुझे डायलॉग मनी ने जसे च्या तसे म्हणून दाखवले,
तरीच पल्ले नंतर मनी ला जेव्हा भेटायला गेले तेव्हा मा बो वरची मैत्रिण म्हणताच, मनी च्या अहोंनी बाहेरच पळ काढला Proud

काय हे पल्ले ? तूझ्यामुळे मनीचे अहो पलाले ? स्मी ह्या झब्बूला फाउल मिलेल हां.

भाजी करतांना फोडणी केल्यावर भाजी पातळ करण्यासाठी पाण्या एवजी तेला ची बाटली ऊचलायची आणी ओतायची ...

आपल घर समजुन दुसर्‍या कुणाच तरी दार वाजवायच...

ऑफीसात आपल्या नादात आपला डेस्क समजुन दुसर्‍याच्या रीकाम्या डेस्क वर जाऊन बसायच आणी ह्या फाईली, कागद वेगळे वाटतात म्हणुन आणखी गोंधळात पडायच...

मॉल मध्ये फिटिंग रुम ईतकच वाचुन ती मेल की फीमेल साठी हे न बघता चुकीच्या फिटिंग रुम मध्ये घुसायच...

हिवाळ्यात झोपेत टेम्परेचरच बटण Heat वर नेण्या एवजी Cool वर न्यायच आणी रात्र भर थंडित कुडकुडायच...

फोनवर कस्टमरने "तुमच्या ऑफीसचा नेमका पत्ता काय" विचारल्या वर ऑफीसचा समजुन घरचा पत्ता कस्टमर ला द्यायचा...

नवरा रोज माझ्या नंतर घराबाहेर पडतो त्यामुळे घराला कुलूप लावणे उघडणे हे जबाबदारी त्याची.
एकदा रविवारचे बाजारात जात असताना पठ्ठ्याने दरवाजा लावून कुलूप लावलं पण. मी घरातच!! आरडाओरडा केल्यावर उघडलं आणि म्हणे "त्यात काय एवढं, भाजीच आणायची होती तेवढी आणून मी घरी आलोच अस्तो ना!!"

नंदिनी Lol

तुला पण त्याच्याबरोबर जायचं होतं का?

बाकी तुला कुलूपात ठेवणं त्याला एकदा तरी जमलं म्हणायचं Wink

नंदिनी :हहगलो:,

तुला पण त्याच्याबरोबर जायचं होतं का?
>> अर्थातच!!! त्याला भाजी आणायला सांगितली की तो कोथिंबीर, लिंबू, आले आणि अर्धा नारळ घेऊन येतो. अगदीच आठवण झालीतर पाव किलो टोमॅटो. Happy आईचे संस्कार..

Rofl

अगं मग सरळ आपल्याला पाहिजे त्या भाजीची लिस्ट हातात ठेवायची, किती पाहिजे ते पण लिहायचं. आपल्या डोक्याला ताप नाही !

अश्विनी, मग "बाजारात फ्लॉवर मला दिसलेच नाहीत. कॅप्सिकम खूप घाण होते. गवार आणि भेंडी भरपूर आणलेय. ती घाल ना पाव भाजीत." हे ऐकून घ्यायला लागेल.

नंदिनी एकदम बेस्ट, त्याला सांग भाजी दिसली की मला कॉल करत जा, मी सांगेन काय काय किती किती घ्यायचं ते.. हाकानाका..

लिस्ट लिहून आमच्याकडे कधीच फायदा होत नाही. लिस्ट खिशात असली तरी दिसेल ते घेणे, लिस्ट गाडीत विसरलो होतो असे सांगणे, हे जास्त स्वस्त होतं म्हणून हेच आणलं अशी अनेक कारणं तयार असतात. त्यामुळे घरात असलेल्या गोष्टी पण आणल्या जातात अनेकदा.

असो! मुद्दाम तर नाही ना केलं तुझ्या नवर्‍याने नंदू? एकदा माझा नवरा माझ्याशिवायच घरी गेला होता मॉलमधून- मी दुसर्‍या दुकानात होते. मोबाइल पण नेमका विसरलेले Angry

नंदू, गवार व भेंडी पावभाजीत???? इइइइइइइइइइइइइइइइइ.
भाग्या, पुढच्यावेळेस गाडीची चावी तुझ्याजवळच ठेव म्हणजे त्याला आठवण राहील गाडीपाशी गेल्यावर तरी Happy

मग भाग्या, तू घरी गेल्यावरच्या प्रसंगाचा समग्र वृत्तांत यायला पाहिजे इथे.. Wink

नंदिनी तुझ्या नवर्‍याचे कौतुक.
अशा साहसी व्यक्तीमत्त्वाला सलाम
मला काही कानमंत्र (टीप्स) मिळतील काय त्याच्याकडून? Proud

मुद्दाम तर नाही ना केलं तुझ्या नवर्‍याने नंदू? >> नाही गं!!! एक तर त्याला रविवारी घराबाहेर जाणे याचा जाम कंटाळा येतो. त्यात परत एकटयाने भाजी वगैरे आणणे जमणारच नाही त्याला!! त्यापेक्षा आठवडाभर उसळी कर म्हणून सांगेल..

योगिता, एवढं करण्यापेक्षा दोघे भाजी आणायला गेलेलं चांगलं ना? मी भाजी घ्यायची बार्गेनिंग करायच आणि पैसे द्ययचे. त्याने पिशव्या उचलायच्या. Proud
नंदू, गवार व भेंडी पावभाजीत???? इइइइइइइइइइइइइइइइइ>>>>

मी प्रत्यक्ष हे वाक्य ऐकलं तेव्हा कशी किंचाळले असेन विचार!! आणि वर "भाजी म्हणजे कुठलीही भाजी चालते, शिजल्यावर कुठे समजेल कसल्या भाज्या घातल्यात ते" हे लॉजिक ऐकायला लागलं होतं.

आणि पैसे द्ययचे. त्याने पिशव्या उचलायच्या.
>>
हुश्शार गं तु..मला टिप्स लागतील तेव्हा घेईन तुझ्याकडुनच Wink

मला टिप्स लागतील तेव्हा घेईन तुझ्याकडुनच >>> टिप्स काय डोंबल लागतात?? "अयाई गं हात दुखला माझा" "चालून चालून पाय अगदी गळून गेले" "तुम्हा पुरुषाना काय अवजड आहे इतकंसं ओझं उचलायला बाईच्या जन्माला या मग कळेल" ही वाक्यं लग्न झाल्यावर पंधरा दिवसात बोलायची/
एकदा का हा मुहुर्त टळला की मग शक्य नाही!! Proud नंतर बोललीस तर इतके दिवस कसं काम करत होतीस वगैरे ऐकायला लागेल!!!

भाजी म्हणजे कुठलीही भाजी चालते, शिजल्यावर कुठे समजेल कसल्या भाज्या घातल्यात ते" हे लॉजिक ऐकायला लागलं होतं. >>>> काही काही जण पावभाजीचं एकदम पिठलं करुन टाकतात. तसल्या भाजीत चालतील. पण ते गवार मोडणं फुक्कट जाईल. त्याला विचार बुळबुळीत पावभाजी चालेल का?

Pages