निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हुश्श.. १९० पोश्टी वाचल्या लोक्स.. किती कॅलरीज जळाल्या असतील माझ्या बापरे...

एक से बढकर एक फोटो..

तो चौकोनी झाड अन त्याचा ओंडका.. ममोच्या घरची सदाफुली.. मानुषीने टाकलेले फोटोशॉप वाटतील इतके गच्च हिरवे अरुन ट्रीम केलेल्या गवताने झाकलेले फोटो.. वर्षू ने टाकलेली गरीब माणसाची छत्री.. सायलीची पुष्परचना.. वाह वाह वाह..
बरेच काही सुटले असतील.. पण सारी..

कुंडीत लावलेल्या ज्वारीवर पाखरं येतात का ?

आणि वर्षू ये लेटेस्ट काय आहे ?

कसले भारी एकेक पक्षांचे फोटो आहेत.

वर्षुताई झाडपण भारी आहे, वेगळं. कसलं आहे ते. झाड आणि दुसरं रोप त्यावर असं आहेका. तो शेजारचा जिना लाल पायऱ्यांचा पण मस्त आणि घरही, खिडक्याही उठून दिसतायेत, हे सर्व त्या झाडाबरोबर एकदम खुलून दिसतंय. तुमचं घर आहे का ते.

वर्षूच्या या पानावरच्या फोटोत आहे ते स्टॅग हॉर्न फर्न ( काळवीटाच्या शिंगाच्या आकारात असलेले ) .
इथे पण एक सुंदर फोटो आहे त्या फर्न चा.

https://www.anbg.gov.au/gnp/interns-2004/platycerium-bifurcatum.html

आमच्या इथे लॉन्ग वूड गार्डन नामक मोठे बोटॅनिकल गार्डन आहे. त्यांच्या ग्रीन हाउस मधे दोन तीन असेच अजस्त्र फर्न आहेत.

मेधा.. या झाडाचं नाव सांगितल्याबद्दल थांकु गा..

स्टॅग हॉर्न फर्न..एक्दम अ‍ॅप्ट नांव .. हे झाड चिंगमाय च्या एका मंदिराच्या आवारात दिसलं होतं.. काहीतरी वेगळंच वाटलं .. म्हणून लगेच फोटो काढला

मेडोलार्क बोटॅनिकल गार्डन विएन्ना डीसी.
९५ एकर्सवर पसरलेल्या अतिविशाल बागेत एका चकरे त काहीच बघून होत नाही. इथे इथला लोकल नेटिव फ्लोरा अ‍ॅन्ड फौना फार सिस्टिमॅकली जतन केला आहे. सध्या भरपूर पाऊस असल्याने सगळीकडे हिरवे हिरवे गार गालिचे!
खूप सुंदर निसर्गरम्य परिसरात हे नीट पहाता यावं म्हणून मैलोनमैल जाणारा एक सुंदर सोयिस्कर असा वॉकिन्ग ट्रेल आहे.
गेल्या गेल्या तिथल्या ऑफिसात तुम्हाला संपूर्ण जागेचा नकाशा मिळतो. व तुम्ही आज काय पहायचं याचं व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता. आम्ही नकाशा घेतला. पण वेळेचं खूपच बंधन असल्याकारणाने जेवढं जमलं तेवढं पाहिलं.

,


बागेच्या ऑफिसच्या दरवाज्यावर अश्या फुल्झाडांच्या परड्या आहेत.

ऑफिसची इमारत

वाह..क्या नजारा है!!!!!!!!! हिरवं हिरवं गार..ती निळी फुलं कसलीयेत?

जपान मधल्या आखीव रेखीव गार्डन ची आठवण आली..एस्पेशली ते छोटे छोटे पूल बघून..

माझ्याकडे काही दिवसांपूर्वी हा गुलाब फुलला होता त्यात बहुतेक पाकळ्यांच्या खाली जो भाग असतो तो फुलात आला होता.

मानुषी... मी या ठिकाणी मुक्कामच केला असता.. कायमचा !!!

जागू.. डोस्क फिरलंय त्या गुलाबाचं !!

दा Lol

मानुषी , काय सुंदर काढलेस ग फोटो . प्रत्यक्ष बघताना काय भारी वाटलं असेल ना !

वर्षु , मस्त दिसतंय झाड .

जागू असं गुलाबाचं प्रथमच पाहिलं . सुरंगी क्युट.

जागू.. डोस्क फिरलंय त्या गुलाबाचं !! >> दिनेश , + 1

मानुषी, ती जांभळी फ़ुलं मला दे ना. काय सुंदर हिरवंगार आहे सगळं. कोकणात गेलेय असचं वाटलं.भिरमुळे पण शोधले मी. Proud
वर्षू, छान फ़ोटो. (पण एकच? Uhoh )
जागू, अजबच आहे तो गुलाब. मला सुरंगीच झाडं हवय. Happy

सर्वांना धन्यवाद. वर्षू... काही नीट माहिती घेण्याइतका वेळ नव्हता गं...त्यामुळे तासभर फक्त नेत्रसुख! आणि अहाहा!
दिनेश....:खोखो:

शोभा काही वेळा खरंच मलाही आमच्या कोकणातल्या गावी गेल्याचा फील येतो!

ताबाकोन ग्रँड स्पा थर्मल रिझॉर्ट , कोस्तारिका..

कोस्तारिका वर लिहायचंय डीटेल मधे... वेळ मिळायची वाट पाहतेय ..

तोपर्यन्त झलक ही सही Happy

मानुषी ताई कसले गोडुले गोडुले फोटोज टाकते आहेस ग!!!!
वर्षु दी रिसोर्ट मधला धबधबा आ हा हा! आत्ता तीथे जाऊन बसावेसे वाटते आहे..
जागु मस्त फुले...
दा Rofl

Pages