निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलौंजीला इंग्लिशमध्ये नायजेला सीड्सच म्हणतात.

योगायोग म्हणजे, नायजेला लॉसनच्या शो मध्ये तिच्या तोंडूनच मला हे प्रथम कळले. तेव्हा एक क्षण मला वाटले होते की ही कलौंजी तिचा स्पेशल इंन्ग्रेडिएंट म्हणून वापरते म्हणून ह्याला नायजेला सीड्स म्हणतेय की काय Happy

सायली, खूप मस्त आठवण लिहिलीस!!!

कलौंंजीची ही माहिती आजच कळली...धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल Happy

आतापर्यन्त सुखी माणसाचा सदरा इ. वाक्प्रचार ऐकून होते.. पण गरीब माणसाची छत्री?.. Happy
ही फक्त ऐकीव गोष्ट नसून खरोखरीच दिसली.
नुकत्याच घडलेल्या कोस्तारिका ट्रिप मधे तेथील नॅशनल पार्क मधून पोआस ज्वालामुखी ला जायच्या वाटेवर अनेक गमतीदार झाडं दिसली होती.. त्यातील हे बुटकसं झाड का झुडुप लक्ष वेधून घेत होतं. हे फक्त इथेच आढळतं म्हणे!!

गरीब माणसाची छत्री एक herbaceous plant असून तिच्या स्टेम ची लांबी, बारा इंचापर्यन्त तर पानांचा व्यास तीन ते सहा फूट असू शकतो. बुरशी ,फुंगी पासून बचाव करण्याकरता पानांवरच्या पाच मुख्य शिरांमधून पाणी डिसपर्स होण्याची सोय असते.याला लागणार्‍या फळांत प्रत्येकी एकच बी असते.
या शोभिवंत वनस्पतीचा औषधी वापर नाही, उलट याच्या बिया,पाने,दांड्या पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते. नाही म्हणायला, लांबुडका दांडा आणी पानांचा विस्तार बघता कमी प्रती च्या छत्री सारखा उपयोग मात्र होऊ शकतो.

तर चला पोआस च्या वाटेवर माझ्याबरोबर

ही तिची फुलं, अजून फळं नव्हती लागलेली.

ही तिची पानं..

Happy

नितिन - प्रस्तावना अतिशय जमलीये - खूप खूप आवडली - काव्यात्मक तरीही वर्तमानाचा हात न सोडता मांडलेली... Happy जियो ...

सायली, वर्षू - मस्त आठवणी, मस्त माहिती.... ही छत्री भारीच्चे ... Happy

अर्र.. सुरुवातीला नितिन च्या प्रस्तावनेबद्दल काय वाटलं ते गेले लिहायचे राहू>>न.. Happy

Nitin, your power of artfully crafted words is incredible..

खूप सुरेख लिहितोस.. पण इतकं क्वचितच का लिहितोस बरं ???

माझ्या आठवणीनी तुम्ही ही सुखावलात, वाचुन आनंद झाला.. सगळ्यांचेच आभार..

वर्षु दी मस्तय छत्री..
मानुषी ताई मस्त फोटो..

नवीन भागाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
प्रस्तावना खूपच छान!
सायु, मस्त आठवण.
वर्षू, सायु, ममो. सुरेख फ़ोटो आणि माहिती.
मी ह्याला विसरू शकत नाही.
Copy of RSCN6134.jpg

वर्षू, नायजेला सीड्स, गरिबांची छत्री काय काय काढते आहेस खजिन्यातून Happy
ममो, हि सदाफुली वेगळीच आहे, मी नेहमी छोटी छोटी रोपं आणि त्यावर फुललेली मधे लालसर झाक असलेली फिक्या जांभळट रंगाची फुलं पाहिली आहेत.. त्यांच्या पाकळ्याही विलग असतात.
हि अशी: http://www.indiashots.com/2009/02/06/sadafuli-in-marathivinca-flower/

मॅगी, हो, मी ही तू म्हणतेस तशीच पहिली आहे.
पण ही फुल खूप मोठी होती आणि जणू बेटच झालंय सदाफुलीच इसकी पसरली आहे . त्यामुळे खूप छान दिसत होती.

मॅगी, हो, मी ही तू म्हणतेस तशीच पहिली आहे.
पण ही फुल खूप मोठी होती आणि जणू बेटच झालंय सदाफुलीच इसकी पसरली आहे . त्यामुळे खूप छान दिसत होती.

शोभा गुलमोहोर सुंदर दिसतोय. लाल हिरवा मिक्स.

ममो..वावावा..किती फुललीये सदाफुली...
शोभा .. खूप दिवसांनी भेटलीस इकडे.. सुंदर रंग आहे गुलमोहोराचा..

सध्यातर गुलमोहोर आपल्या रंगांची भरपूर पखरण करत आहे. पुण्यातून बाहेर पडून पाचगणी च्या दिशेने जाताना एका ठिकाणी तीन गुल्रमोहोराची झाडे दिसली.. एकमेकांना खेटून असली तरी एकावर पिवळ्या तर दुसर्‍यावर केशरी आणी तिसर्‍यावर मरून रंगाचे साम्राज्य होते.. बापरे.. कसली देखणी दिसत होती ती झाडे.. गाडी स्पीड मधे असल्याने फोटो काढायचे राहून गेले

गेली कित्येक वर्ष मी त्याला पहातेय. त्याचे सगळी रुपं न्याहाळणं हा माझा छंदच झाला होता. निष्पर्ण रुप पहाताना मनात कालवा कालव व्हायची. पण जसा हळू हळू कोवळ्या पानांनी भरायला लागायचा तेव्हा मला वेध लागायचे, ते त्याच्या लाल रंगात न्हाऊन निघण्याचे. संपूर्ण झाड लाल रंगाचा ड्रेस घालून नटायचं. नंतर झाडाखाली नुसता लाल सडा दिसायचा पाकळ्यांचा. त्यावरून गाड्या गेल्या की मला फार वाईट वाटायचं.
त्यानी आयुष्यभर सर्वांना सावली आणि पक्षांना आश्रय दिला. पण जातानाही कुणाला इजा करून गेला नाही. ते आमच्या शेजारच्या इमारतीत आहे . झाड जेव्हा पडलं तेव्हा आमच्या सोसायटीच्या दारातून, एक काकू आपल्या लहान मुलीला घेऊन गाडीवरून येत होत्या. फक्त १-२ सेकंदांचा फरक. ते झाडं जर १-२ सेकंद नंतर पडलं असतं तर त्यांच्या अंगावर त्याच्या फांद्या नक्कीच आल्या असत्या. पण त्या दोघीही वाचल्या.
नंतर त्या झाडाची लाकडे तोडायला लोकं आली त्यांना एक घरट दिसलं.म्हणून त्यांनी पाहिलं, तर त्यात एक कावळ्याचं पिल्लू सुरक्षित होतं. एवढं उंच झाड (किमान ४०-४५ फूट)जमिनीवर पडल्यावरही पिल्लू सुरक्षित होतं. मग त्या लोकांनी ते घरटं दुसरीकडे नेऊन ठेवलं . नंतर काय झालं माहित नाही.

पण मी घरी गेल्यावर जेव्हा हे झाड पडलेलं पाहिलें तेव्हा मला फारच वाईट वाटल. Sad

Nitin, your power of artfully crafted words is incredible..

खूप सुरेख लिहितोस.. पण इतकं क्वचितच का लिहितोस बरं ??? >>>>> +11111

नितिन - प्रस्तावना अतिशय जमलीये - खूप खूप आवडली - काव्यात्मक तरीही वर्तमानाचा हात न सोडता मांडलेली... स्मित जियो ... >>>>+11111

झाडांनी मूळ देश सोडून दुसरीकडेच लोकप्रियता मिळवलेली दिसतेय... मुंबईत दिसणार नाही एवढा शिरिष इथे अंगोलात दिसतो. हिरवागार दिसतो कायम. आणि फुले आली कि खासच. त्यामानाने गुलमोहोर अगदीच कमी. रेन ट्री तर नाहीच बघितला मी इथे.

पनामा सिटी पासून केवळ दिडशे किलोमीटर अंतरावर , जगातील दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ,सर्वात मोठ्या सुप्त ज्वालामुखी च्या १८ स्क्वेअर किमी रुंदीच्या calderaत (खोर्‍यात?) वसलेलं एक छोटसं हिरवंगार खेडं आहे,' एल वाय दे आंतोन''.
समुद्र सपाटी पासून ६०० मीटर उंचीवर असल्याने पनामा पेक्षा बरच थंड हवामान आहे इकडलं.
येथील नैसर्गिक धबधबे, थर्मल पूल्स (ज्यांतील माती चा रंग त्या त्या जमिनीत उपस्थित असलेल्या विशिष्ट खनिज पदार्थांनुसार वेगवेगळा आहे.), आजूबाजू चे घनदाट रेनफॉरेस्ट आणी त्यात आढळणारे सोनेरी बेडूक (जे आता एन्डेंजर्ड स्पेसीज च्या लिस्ट मधे आहेत .) अशी भरपूर आकर्षणे मन खेचून घेतात, पण या खोर्‍यात वाढणारी चौकोनी बुंध्याची झाडे मात्र अक्षरशः बुचकळ्यात टाकतात.
संपूर्ण जगात ही झाडं फक्त सेरो गायताल पर्वतराजीच्या पायथ्याशी असलेले हॉटेल Campestre च्या पाठीमागच्या जंगलात आढळतात. तिथे ट्रेकिंग ची सुविधा आहे.
कॉटनवुड जाती च्या या झाडांचे रहस्य शोधायला शास्त्रज्ञ आपली शक्ती पणाला लावत आहेत. फ्लोरिडा युनिवर्सिटी तील तज्ञांनी या झाडांची रोपे नऊन ती इतरत्र रुजवली आहेत , पण तिथे मात्र या झाडांचे बुंधे गोलाकारच राहिले.. त्यामुळे या खोर्‍यातील वोल्कॅनिक माती च या आयताकार बुंध्याला कारणीभूत असावी हे स्पष्ट झालंय.. मात्र येथील इतर जाती ची झाडे मात्र सर्क्युलर बुंध्याचीच आहेत..
त्यामुळे या विशिष्ट झाडांमागील रहस्य अजून अंधारातच आहे.

हॉटेल कँपेस्त्रे चा परिसर

हा आमचा ट्रेक

आणी हे निसर्गातील अजून एक न सुटलेलं कोडं

कापलेला ओंडका.. आतील लाईन्स पण चौकोनीच Happy

वर्षूदी - कस्ली भारी माहिती देते आहेस..... खूप मस्त.... Happy

कापलेला ओंडका.. आतील लाईन्स पण चौकोनीच ------ केवळ ग्रेट .... Happy

Pages