निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याबाबतीत मजेदार अनुभव आहेत. एकाच प्रकारची झाडे वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या रुपात बघितली आहेत मी.

झकरांदा घ्या.. केनयात जसा फुलतो तसा आपल्याकडे नाही.
वेडी बाभूळ घ्या, ऑस्ट्रेलियात जशी फुलते तशी आपल्याकडे नाही.

निलगिरीला निलगिरी हे नाव आपल्याकडच्या डोंगराच्या नावावरुन पडले ( नाहीतर झाडाच्या नावात गिरी कशाला ? ) पण न्यू झीलंड मधे तिला खुप रंगीबेरंगी फुले येतात, तशी आपल्याकडे नाहीत.

न्यू झीलंडचे काही पक्षी जसे इतरत्र कुठे नाहीत, तसेच त्यांचे काही वृक्षही.. पाली ज्याचे परागीवहन करतात, तो त्यांचा पोहोतुकावा इतरत्र कुठेच बघितला नाही मी.

आपल्याकडे खाल मानी असलेली मधुमालतीची फुले, इथे अंगोलात अगदी ताठ मानेची असतात.

नैरोबीत, ३/३ मजल्यांएवढी वाढलेली पेरुची झाडे आहेत आणि त्याखाली बदाबद पेरु पडलेले असतात.

वॉव.. भारीच अनोखी आहेत झाडं.. ३,३ मजली उंच पेरू... इमॅजिन करूनच गम्मत वाटली.. Happy

म्हंजे तिकडे शेजार्‍यांकडचे पेरू, बांबू ला हुक लावून चोरून तोडण्याची मज्जाच नाहीये तर!!! Proud

ईन मीन तीन प्रस्तावना अतिशय सुरेख, क्या बात है.

बाकी सर्व फोटो, माहीतीही फार सुंदर. सर्व आत्ता वाचून काढलं, मस्त ह्या उकाड्यात गारेगार, प्रसन्न वाटलं.

वर्षूताई, मस्त फोटो आणि वेगळीच माहिती...
त्या चौकोनी ओंडक्याचे पातळ काप काढुन सुतार पक्षाला दिले तर तो म्हणेल..... I had a Nice Wooden Bread Breakfast... Happy

उडन ब्रेकफास्ट मस्त.. मागे चौकोनी कलिंगडे पाहिलेली त्याची आठवण झाली, पण ती तशी माणसानी वाढवलेली. हि निसर्गाने वाढवलेली.

नवरात्रात पेरलेले धान्य दरवर्षी चांगले रुजून येते. नवरात्र संपल्यावर हे रुजवण टाकून देण्याऐवजी किंवा मातीत गाडण्याऐवजी आम्ही एका मोठ्या कुंडीत जसे जमेल तसे लावतो. तीन एक महिन्यांत त्यातली काही थोडी रोपे तरारतात आणि त्यांना कणसे धरतात. त्यातले दाणे टिपण्यासाठी चिमण्या/बुलबुल जमतात. काही कणसे पक्ष्यांच्या नजरेतून सुटतात. यंदा ज्वारीची कणसे धाटावर राहिली होती. त्यांतल्या एकाचे फोटो.
pic1.jpgpic2.jpg

वर्षु कापलेला ओंडका आणि निरू तुमची कमेंट मस्त दोन्ही . वर्षु, मस्त महिती मिळतेय तुझ्याकडुन आणि फोटो ही छानच

दिनेश एकाच झाडाची निरनिरळी रुपं किती विलोभनीय

शोभा, म्हणून लिहीलसं होय माझा आवडता... ह्याला विसरु शक्णार नाही अस.

हिरा, कुंडीतल पिक तरारुन आलय. मस्त युक्ती .

व्वा! छान चाललंय की इथे!
वर्षू चौकोनी ओन्डके ...अनोखेच हं अगदी!
साधना ...मलाही सिंगापूर् मधे खाल्लेल्या चौकोनी कलिंगडाची आठवण झाली. आणि तेही अति क्रिस्प आणि लाल नव्हे बरं का ...चक्क पिवळं , मी तरी पहिल्यांदाच खाल्लं पाहिलं!
दिनेश ....खरंच ऐकावं ते नवलच!
शोभा किती छान मांड्लंयस!
हिरा ...युक्ती आणि फोटो दोन्ही छानच.
आता इकडच्या खर्‍याखुर्‍या समरबद्दल...
काल एका पार्कात गेलो होतो. आगं बाबौ....( ही खास नगरी उद्गार् वाचक प्रतिक्रीया!....कही भी गये तो अपना नगरी बाणा नही छोडनेका! Proud )....तर काय तौबा गर्दी, इथे आल्यापासून एकसमयाव्च्छेदेकरून इतका "मनुक्शप्राणी" बघून अगदी डोळे फिरलेच!
मग लक्षात आलं ...हे अमेरिकन्स नसून कोणत्या तरी आफ्रिकन देशातले आहेत. शेकड्यांच्या संख्येने अबालवृद्ध स्त्री पुरूष.
काही वयस्कर ...त्यांच्या पारंपारिक वेषभूषेत. पुरूष लांब पायघोळ झग्यात. आणि स्त्रीया चक्क साडीसारख्या रॅप अ राउन्ड मध्ये. या अगदी आपल्या साड्यां सारख्याच फ्लोरल प्रिन्टच्या. पण नेसण्याची पद्धत वेगळी. निर्‍या नव्हत्या. पण पदर होता.
आणि हट्टेकट्टे या शब्दाला लाजवेल अशी सर्वांचीच शरीरयष्टी! वर्ण पक्का!
मग मात्र माझ्यातल्या उत्सुकतेने सगळ्या इतर गोष्टींवर मात केली. आणि मी काही सुंदर्‍यांना गाठल! आणि चौकशी सुरू केली.
तर हे लोक सुदान या देशातले निघाले. त्यांनी समर पार्टी केली होती.
गंमत म्हण्जे त्यांना आमचे भारतीयत्व ओळखता आले...जरी आम्ही खास पारंपारिक भारतीय असं काही परिधान केलेलं नव्हतं! आणि त्यांना माझ्याशी बोलून आनंदही झाला.
हे जरा निसर्गापेक्षा वेगळ्या विषयाशी निगडित आहे....पण भूगोलही निसर्गाशी निगडित असतोच की. आणि इथे शेअर करावीशी वाटली.
पोस्ट अनाठायी वाट्त असल्यास काढून टाकीन.


अगा मानु.. अनाठायी कुठेय .. मनुक्श बी निसर्गाचाच चमत्कार आहे नै.. फोटो टाक की.. मला तर वेगवेगळ्या देशांतील माणसं, संस्कृती, वेशभूषा, भाषा, खानपान यांचा अभ्यास करायचं वेडंच आहे..
प्लीज टाकच आधिक माहिती... Happy
किंवा इथे योग्य वाटत नसेल तर वेगळा लेख टाक.. हाकानाका Happy

मनुक्श बी निसर्गाचाच चमत्कार आहे नै.. फोटो टाक की.. मला तर वेगवेगळ्या देशांतील माणसं, संस्कृती, वेशभूषा, भाषा, खानपान यांचा>>>>
सेम हियर वर्षू! अगं तिकडे मनुक्षांचे फुटु घ्यायला भीति वाटते .....आणि खरं म्हण्जे त्यातल्या एकीला पकडून मला समग्र सुदान या विषयावर तिच्याशी बोलायचं होतं पण वेळ नव्हता.
मग घरी येऊन सुदान ला गुगललं ... दुधाची तहान ताकावर! आणि इतक्या संख्येने सुदानी इथे रहातात हेही नवीनच माहिती झाल!.

ओह...इन फॅक्ट दिनेशची आठवण करतच ही सुदानी पोस्ट लिहिली. नंतर गुगलताना जाण्वलं की अंगोला सुदानपासून खूपच लांब आहे.
दिनेश वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मानुषी.. अगा साऊथ ईस्ट एशिया त आम्हाला कित्येक देशांत,कित्येक ठिकाणी (अम्यूजमेंट पार्क्स, ऐतिहासिक स्थळं,हॉटेल्,शॉपिंग मॉल इ.इ.)अनोळखी लोकांनी त्यांच्याबरोबर पोझ करून फोटो काढण्याची रिक्वेस्ट केलीये आणी आम्ही ती आनंदाने मान्य ही केलीये.. त्यांना आपल्या देशात फॉरिनर्स
बघून खूप एक्साईटमेंट होते.. आणी आपल्याला इन्स्टंट स्टारडम मिळतो Wink Lol

वरून भारतीय पोशाखात असाल तर काही विचारूच नको, लायनी लागतात.. खर्रच.. Happy
नेक्स्ट टैम ट्राय कर.लक्षात ठिव.. तुला नकार नाही मिळणार..

पनामाच्या पश्चिम टोकाकडल्या 'चिरिकी 'या प्रॉविंस मधील ,'बुकेते' हे एक टुमटुमीत गांव , तिथे होणार्‍या कॉफी च्या पैदास मुळे जगभरात मशहूर आहे. समुद्रसपाटी पासून ४००० फूट उंचीवर असल्याने हवामान थंड आहे.
इथे मुक्तहस्ताने निसर्गाने फुलाफळांची उधळण केलीये. बुकेते शब्दाचा अर्थ मी बुके असाच लावला होता तेथील फुलांचा बहार बघून.. पण खरंतर स्पॅनिश मधे बुकेते म्हंजे गॅप.. एकोणीसाव्या शतकात सोनं हुडकणारे या गॅप मधून पॅसिफिक कडे जाण्याचा रस्ता शोधत येत असत.
आता मात्र हे गाव पर्यटकांचा स्वर्ग बनलेला आहे.
इथे विविध पक्षी,फळं, फुलं दिसत राहतात.. त्यापैकी हे टोमॅटो चे झाड तर पहिल्यांदाच पाहायला मिळालं..
दीड ते दोन मीटर उंची असलेल्या या झाडाला अंडाकृती फळं लागतात. स्पॅनिश मधे यांना तामारियो म्हंजे ट्री टोमॅटो म्हणतात. बाकी गुणधर्मात आपल्या टोमॅटोशी काहीच संबंध नाही या फळाचा.
यातील गर आंबट गोड चवीचा असून त्याचा उपयोग चटनी,डिप्स, जूस्,स्प्रेड इ. बनवण्याकरता होतो.
साल मात्र कडवट असल्याने त्यांचा उपयोग नसतो.

मजा म्हंजे लाल फळ आंबट अस्ते, मात्र पिवळी झाली कि गोडवा येतो त्यांत

Pages