सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
मस्त मस्त फोटो
मस्त मस्त फोटो सर्वच.
वर्षुताई क्या झलक है, एकदम भारी. त्या पाण्यात जाऊन बसावसं वाटतंय.
ईथे सगळेच भारी!!! ३-४
ईथे सगळेच भारी!!!
३-४ महीन्यांपूर्वी माठ पाझरू लागला. मग त्याला खाली आणखी छिद्र पाडून कुंडी केली. मागच्या आंब्याच्या मोसमात आलेले गवत ठेवले होते. माती बरोबर तेही घातले कुंडीत आणि सुकलेली फुले टाकून ठेवली. त्याला कोंब फुटुन छान झाडे झाली... फुलली देखिल.

ही फुले
पण गवत देखिल भराभरा वाढू लागले. हे तर भाताचे गवत. गवत नाहीच.. भातच..



आता लोंब्या डोकावू लागलया आहेत.
पाहू आता कोणाला कळते ते.
मधुरा, खुपच छान. तो माठ
मधुरा, खुपच छान. तो माठ उघड्यावर असेल तर त्यावर चिमण्या येणारच !
दा, चिमण्या आल्यातर उत्तमच.
दा, चिमण्या आल्यातर उत्तमच.
तो माठ उघड्यावर असेल तर त्यावर चिमण्या येणारच !>>> उघड्यावरच आहे.
तसे पाणी प्यायला सगळे येतात... कावळे, चिमणी, दयाळ, साळुंकी,बुलबुल, कबुतर, शिंपी, सूर्यपक्षी....
अनुराग जी तुम्हाला गो ग्रिन
अनुराग जी तुम्हाला गो ग्रिन नर्सरी जवळ पडेल. त्यात मिळेल सुरंगीचे झाड. नेर्याला आहे गोग्रिन नर्सरी अगदी हायवेला लागूनच.
नमस्कार नि.ग.कर्स मी मागच्या
नमस्कार नि.ग.कर्स
मी मागच्या एक वर्षापासून हा धागा वाचते आहे आणि I am loving it. एकंदरीतच मायबोली मुळे बागकाम, फ़ोटूकाम restart झालंय त्याबद्दल ofcourse तुम्हा सगळ्यांन्ना ठांकू.
म्हणून आता मला पण तुमच्या जत्रेत घ्या _/\_
मागच्या २-३ महिन्यांपासून इथे लिहायच्या विचारात आहे, पण त्या आधी माझा संकल्प होता की मी आधीचे सगळे नि.ग. गप्पांचे पानं वाचून काढेन. पण ती अगदीच ससा-कासवाची शर्यत झाली हे म्या आता वळीखलं
स्वागत सुलक्षणा
स्वागत सुलक्षणा
स्वागत सुलक्षणा. निसर्गाच्या
स्वागत सुलक्षणा. निसर्गाच्या बाबतीतलही अगदी छोटीशी पोस्ट देखील आम्हाला अप्रूपाची वाटते. आणि फोटो वगैरे असला तर.. ग्रेटच.
( आणखी कुणीही असे वाचक असतील, त्यांना सगळ्यांनाच हि विनंति. )
स्वागत सुलक्षणा
स्वागत सुलक्षणा
मधुरा मकरंद, आयडिया फारच छान
मधुरा मकरंद, आयडिया फारच छान आणि फोटो ही लवली .
सुलक्षणा , नि ग वर स्वागत आहे
स्वागत सुलक्षणा. मधुरा
स्वागत सुलक्षणा.
मधुरा मकरंद, मस्तच आहेत सर्व फोटो.
सुलक्षणा तुमचे स्वागत आहे.
सुलक्षणा तुमचे स्वागत आहे.
राणीच्या बागेत एका झाडाला ही
राणीच्या बागेत एका झाडाला ही फळे होती. गावठी बदाम आहे की वेगळी आहेत?

मधुरा माझी आवडती फुलं आहेत
मधुरा माझी आवडती फुलं आहेत ती. हीच ती फुलं जी मी त्या दिवशी, वर्षूच्या फोटोत दिसतायत म्हटलं ती.


सुलक्षणा, नि.ग. वर स्वागत!
जागु, फळांचा रंग छान आहे. बाकीचं तज्ञ सांगतीलच.
धन्यवाद जागू.
धन्यवाद जागू.
जागू, ही टेम्भुर्णी ना ?
जागू, ही टेम्भुर्णी ना ?
मला तेम्भुर्णीही माहीत नाही.
मला तेम्भुर्णीही माहीत नाही. राणीच्या बागेत माकडाच्या पिंजर्याजवळ आहे हे झाड.
नि.ग.कर,
नि.ग.कर, https://www.facebook.com/groups/indianbirds/?fref=nf इथे भेट दिलेय का कोणी?
जागू हे diospyros malabarica,
जागू हे diospyros malabarica, टेंबुरी (टेम्भुर्णी)आहे.
Thank you Thank you जागुतै,
Thank you Thank you

जागुतै, इतकं सुंदर फूल देऊन गरिबाला लाजवलत
दिनेशदा: बागेतल्या फुलांचे खूप फोटो आहेत, लौकरच post करेन. आणि फुलं फुलायला आता तर इथे फक्त सुरुवात झालीये.
मधुरा माझी आवडती फुलं आहेत
मधुरा माझी आवडती फुलं आहेत ती. हीच ती फुलं जी मी त्या दिवशी, वर्षूच्या फोटोत दिसतायत म्हटलं ती >>> शोभा, आम्ही त्यांना सोपारीची फुले म्हणतो. मला फार आवडतात. खुप टिकतात, झाडावर आणि काढल्यावर देखिल.
सध्या या झाडावर फार लाल मुंग्या झाल्या आहेत. यातच भात उगवले आहे. पण भातावर मुंगी नाही. सोपारीच्या झाडावर मात्र फार फार लाल मुंग्या आहेत. असो.
स्वयंपाकघरात कोणी नसेल तर कावळा खिडकीतून थेट टेबलावर येतो.... आंबा खायला. चोच मारून उष्टावला देखिल. तसे कावळा कधी घराच्या आत शिरत नाही, का आता त्यांच्या सवयीही बदलल्या आहेत.
मधुरा.. कावळ्या च्या तोंडाला
मधुरा.. कावळ्या च्या तोंडाला सुटलेलं पाणी जेंव्हा त्याला आवरत नसेल्,तेंव्हा तो आत येण्या ची रिस्क घेत असणार..
थोड्या दि वसांपूर्वी माझ्या किचन प्लॅट्फॉर्म वर तीन उकडलेली पण न सोललेली अंडी ठेवली होती..
कावळा गपचुप आत आला आणी अजिबात आवाज न करता दोन अंडी चांगली खोलवर चोच मारून खाऊन घेतली..
तिसरं मात्र इन्टॅक्ट ठेवलं.. माझ्या करता बहुतेक.. कृपाळू असला पाहिजे तो
सुलक्षणा ,स्वागत आहे तुझं या धाग्यावर
जागू त्या रेड बेरीज,'Morella
जागू त्या रेड बेरीज,'Morella rubra' तर नाहीत??
मागे एकदा चायना तील फ्रूट सीरीज मधे या ,'यांग मै' बेरीज चा फोटो टाकला होता मी..
जागू गुलाब अगदी perfect
जागू गुलाब अगदी perfect दिसतोय.
हल्ली कावळे धिटावलेत चांगलेच असंच म्हणायचं कि काय ?
जागू गुलाब अगदी perfect
जागू गुलाब अगदी perfect दिसतोय.
हल्ली कावळे धिटावलेत चांगलेच असंच म्हणायचं कि काय ?
सुप्रभात. टेंभुर्णीची फळे
सुप्रभात.

टेंभुर्णीची फळे खातात का? काय उपयोग असतो?
टेंभुर्णीची फळे खातात का? काय
टेंभुर्णीची फळे खातात का? काय उपयोग असतो?>>>>> http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Diospyros+malabarica
नलिनी धन्यवाद.
नलिनी धन्यवाद.
सारखी फिरतीवर असते त्यामुळे
सारखी फिरतीवर असते त्यामुळे इथे फारस येणं होत नाही.... फार कमी निगकरांकडून
ह्या धाग्याचे वाचन झाले आणि हा धागा निसर्ग व पर्यावरणप्रेमींनी दखल घ्यावी असा आहे ..
रिक्शा http://www.maayboli.com/node/58940
मुंबईतल्या आणि भारतातल्या
मुंबईतल्या आणि भारतातल्या पावसाचे फोटो येऊ द्या. खुप आठवण येतेय !
Pages