निसर्गाच्या गप्पा (भाग ३०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 May, 2016 - 23:07

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.

तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.

अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.

आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.

क्रुष्णमेघ दाटून येतील वार्‍याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?

उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.

झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.

कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.

पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.

शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.

वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह.. खुप सुंदर शब्दबद्ध केलय नि..
त्याच्या आगमनाची आस आहे. वातावरण बदलु लागलयं खरं.. यावेळी तो लवकर बरसेलस दिसतोय.

ईन मीन, छानच प्रस्तावना....
तप्त उन्हाळ्याचे वर्णन आणि आगामी आशादायक पावसाळ्याची चाहूल आणि इंतजारही छान...
यावर्षी पावसाळ्याची वाट सगळेच जण जरा जास्तच आसुसुन पहात असतील.... मीही....
पण तरीही आपल्या वाट पहाण्यात आणि दुष्काळाने होरपळलेल्यांच्या वाट पहाण्यात खूप अंतर आहे... वेगळी तीव्रता आहे...
शेती तर राहू दे पण पिण्याच्याही पाण्यासाठी तरसणार्‍या माणसां प्राण्यांसाठी हा वरुणराजा लवकर बरसू दे... चांगला बरसू दे... आणि योग्य बरसू दे ही प्रार्थना.....

सुरुवातीचे निरुपण सुंदर आहे.

वाचता वाचता एक जाणवलं - निसर्ग माणसाला सदोदीत भरभरून देत असतो. पण माणूस असा करंटा की त्या देणार्‍याचे हात घ्यायचे सोडून ते हात तोडायला बघत असतो.

ईन मीन, छानच प्रस्तावना....>>>> + ११

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या >>>>>> Uhoh

परवा ( म्हंजे आपल्या मराठी च्या परवा हो!! Wink ) बहिणीशी गप्पा मारताना एक जम्मत समजली..

आपण सर्रास कलौंजी म्हणजे कांद्याचे बी असेच मानत आलोय ... पण तीच तर जम्मत आहे. कलौंजी , कांद्याच्या बिया नाहीतच मुळी..
कांद्या च्या बिया जरी रुपाने, आकाराने,रंगाने' कलौंजी' सारख्या दिसत असल्या तरी कलौंजी च्या चवी,फ्लेवर च्या बाबतीत अगदीच निराळ्या असतात.

या काळ्या बिया आहेत Nigella sativa . Ranunculaceae परिवारातील एका वनस्पती ला लागणार्‍या फळांच्या या बिया आहेत , ज्यांचा उपयोग आपण स्पायसेस मधे करतो.ही वनस्पती वर्षातून एकदा फुलते. पाच ते दहा पाकळ्या असलेली फिकट गुलाबी,निळ्या,पांढर्‍या रंगांची फुले अतिशय नाजूक असतात.
याला येणारी फळे मात्र आकाराने मोठी असून प्रत्येक फळा तील कॅप्सूल तीन ते सात संयुक्त follicles ने बनलेला असतो,त्यात भरपूर बिया असतात..

आणी हो,आपला कांदा मात्र Allium cepa कुळातला आहे.. काय माहीत तो मनातल्या मनात Nigella sativa
ला म्हणतही असेल.. आप मे और हम मे दूर दूर का भी रिश्ता नही है जी!! Lol

वा! सफेद बोगन वेल आणि प्रस्तावना दोन्ही मनाला गारवा देणारी..:)
ईन मीन तीन, लाजवाब लिखाण...

एक छोटासा कीस्सा शेयर करते...

"पिवळ्या गुलबाक्षीच्या बिया "

माझ्या चुलत सासु बाईकडे पिवळी पण गुलबाक्षी छटा असलेली गुलबाक्षी खुप बहरली होती..
मी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा त्या गुलबाक्षीच्या अवती भोवतीच घुटमळायचे..
ईतकच काय तर आम्ही दोघी चहा / नाश्ता पण पायरी वर बसुन करायचो , अन मग तस न तास
गप्पा रंगायच्या .. पायर्‍यांच्या अगदी पायथ्याशी गुलबाक्षी फुललेली असायची, तीच्या बाजुलाच गोकर्णाचा वेल जरा नागमोडी होऊन वर चढवलेला... हिरव्या कंच पानातुन, गर्द निळी फुले सारखी लक्ष वेधुन घ्यायची,
त्याला लागुनच लाल आणि मोतिया रंगाच्या गावराण गुलाबचे ताटवे फुलले असायचे... जोडीला शेंद्री, गणेश वेल, झेंडु, अबोली यांची पण सोबत असायची...

माझे नुकतेच लग्न झाले होते... काकुंनी माझी आवड ओळखली आणि एक दिवस मला त्यांनी पिवळ्या
गुलबाक्षीच्या बिया दिल्या. मला ईतका आनंद झाला होता...आपली आवडीची वस्तु आपण न मागताच कोणी आपल्यला दिली तर आनंद गगनात मावत नाही ना!

मी खुप हौसेने त्या एका कुंडीत रुजवल्या..दर वर्षी त्याला छान फुलं पण येतात..
काकु जाउन आता ४ वर्षे झालीत , पण त्या कुंडीतुन दर वर्षी पावसाळ्याच्या सुमारास रोप वर येतं.
आत्ता पुन्हा १० दिवसापुर्वीच त्या कुंडीतुन गुलबाक्षीचे रोप डोकावु लागले..:) आणि गुलबाक्षीच्या रुपानेच
का होईना, काकुंची आणि माझी भेट घडते... Happy

अतिशय सुंदर प्रस्तावना नितीन दा…
निसर्ग आपली हरित संपदा ज्या ऋतूमध्ये अक्षरह: उधळतो त्या ऋतूच्या आगमनाची चाहूल लागायला सुरुवात झालीये. सगळी सृष्टी आतुरते वाट पाहतेय त्याची. जवळपास प्रत्येकाच्या आवडीचा असा हा पाऊस. काळ्या मातीची कुस उजवणारा, तिला आईपण बहाल करणारा पाऊस…
या वर्षी महाराष्ट्र तहाणलाय नेहमीपेक्षा जास्त…शहरी भागात देखील आठवडयातून एकदा पाणी मिळतंय तिथे ग्रामीण भागाबद्दल काय बोलणार ? तहान लागली कि विहीर खाणण्याची सवय लागलेले आपण सारे या जलरूपी धनाचे रक्षण करणार आहोत कि नाही; कि पाणी वाचवा हे फक्त होळी नि उन्हाळ्यात करण्याच्या गोष्टी आहेत ? असेल तेव्हा दिवाळी नि नसेल तेव्हा शिमगा हि वृत्ती सोडून आता ३६५ दिवस जल व्यवस्थापन करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण वाचवलेला, आडवलेल, जिरवलेला प्रत्येक थेंब उद्या आपल्याच कामा येणार आहे. "जल हैं तो कल हैं " अस म्हणतात ते काही खोटं नाही.
प्रत्येक सजीवाला नवसंजीवनी देणा-या या वर्षा ऋतूच्या आपणां सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
या पावसाळ्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावून जगवूया…
बाकी; सुज्ञास सांगणे न लागे .

नवीन भागाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!
वर्षू खूप नवीन आणि छान माहिती. मला नायजेला ती कुकरी शो वालीच फक्त माहिती होती.
नितीन प्रस्तावना आवडली. पण संक्रान्त....नाही कळ्ल!
सायु किती छान आठवण रहाते ना अश्या जिव्हाळ्याच्या कृतीतून एकमेकांची!

गुड न्यूज....समर .....खर्राखुर्रा समर.....खर्खरचा समर....पाऊस सध्या तरी थांबलाय. आणि तापमान चक्क....३१ से.
कडक ऊन शरिराला आणि डोळ्याला सुखद ऊब देतंय!

धन्यवाद Happy _/\_

पण माणूस असा करंटा की त्या देणार्‍याचे हात घ्यायचे सोडून ते हात तोडायला बघत असतो.>> माधव अगदी अगदी.

पण आपण त्याचे काय करणार आहोत हाच प्रश्न आहे ! >> दा यावेळी नाम सारख्या संस्थांच्या कार्यामुळे चित्र थोड आशादायक आहे.

भरत अगदी मनापासून लिहिलंस ना म्हणून इथपर्यन्त पोचतंय.. Happy
सायु खूप मधुर आठवणी आहेत तुझ्या.. सो क्लोज टू युअर हार्ट Happy छान!!
मानु..३१ डि. म्हंजे कैच नै.. इकडे ये म्हंजे कळेगा तुमको गरम किसको बोल्ते Proud
आणी ती नायजेला ना.. तिच्या रेस्पींपेक्षा तिच्या ब्यूटी कडे आणी इश्टाईल कडेच जास्त लक्ष असते माझे Wink

Pages