आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ही टीम सुरुवातीला अजिंक्य वाटत होती.>> आणि आतां लागोपाठ तिसरा पराभव ! आयपीएलमधे 'फॉर्म'चा आलेख नेहमीच चढ उतारानीच ग्रासलेला असतो !!

>> विश्व कपात लेंड्या टाकणारे प्लेअर आय पी एलमधे एकदम सुसाट कसे खेळू लागतात? :अ ओ, आता काय करायचं

म्हणजे कोण?
एक रोहीत शर्मा सोडला तर असे कुणी माझ्या माहीतीत नाही!
>>>
रैना, रोहित शर्मा, युसुफ पठाण आणि धोनीही. अजूनही सापडतील

<< विश्व कपात लेंड्या टाकणारे प्लेअर आय पी एलमधे एकदम सुसाट कसे खेळू लागतात? >> खुद्द आयपीएलमधेही सुरवातीच्या मॅचेसमधे धमाल खेळणारे मग पचकतात व आधी लडबडणारे अचानक मॅच-विनींग कामगिरी सातत्याने करतात. 'फॉर्म'च्या लहरीव्यतिरिक्त मला नाहीं वाटत इतर कांही कारणं असतील यामागें .

युसुफ पठाण नव्हता राव विश्वकपात
रैना आणि धोनी सुसाट खेळतायत आयपीएलमध्ये? Uhoh
नक्की बघताय ना तुम्ही आयपीएल? Wink

>> इतकं असूनही दिल्लीची कामगिरी कौतुकास्पद व त्यांचा आत्मविश्वास वाढवणारीच !
ते सगळ ठीक आहे हो.... पण प्लेऑफ साठीची चुरस बघा ना!
आधी प्लेऑफ मधले स्थान पक्के करा आणि मग काय करायचे ते प्रयोग करा ना!..... खरतर तेही नको.... टॉप टू चे aim ठेवले तर खरतर एक चान्स जास्त मिळतो!
कधी नव्हे ते दिल्लीने अपेक्षा निर्माण केल्यात.... त्यावर पाणी नको पडायला!

अगदीच प्रयोग नकोत असे नाही.... नवीन खेळाडूंना संधी दिलीच पाहिजे पण मागच्या सामन्यात केले तसे होलसेल नको!
(अर्थात त्यालाही minor niggles कारणीभूत होत्या म्हणा)

'फॉर्म'च्या लहरीव्यतिरिक्त मला नाहीं वाटत इतर कांही कारणं असतील यामागें .>>>

पण फॉर्म एवढा लहरी कसा? चांगला फलंदाज वा गोलंदाज १० पैकी ७ तरी किमान चांगले परफॉर्मन्स देतो!
गेल किंवा पोलार्ड सारखे समजू शकतो जे अमवास्या पौर्णिमेलाच खेळातात एकच अफलातून खेळी!
रोहित शर्मा बघा बरे आय पी एल म्हटले हटकून कन्सीस्टंट असतो! तसाच धोनीच्या नेतृत्वाखाली असे पर्यन्त रैनाही होता! (कदाचित तो पिवळ्या गणवेशाचा परिणाम होता! धोनी देखिल पिवळ्या कपड्यात आय पी एल चांगला खेळायचा! ) Wink

<< पण फॉर्म एवढा लहरी कसा? >> कसा तें नाहीं सांगतां येणार पण असतो हें तर खरं; तो स्विचसारखा 'ऑन-ऑफ'ही नाही करतां येत, हेंहीं मान्य करायला हवं. मोठ्ठे दिग्गज खेळाडूही त्यांच्या कारकिर्दींत या लहरीपणाचे कधी ना कधी बळी पडलेलेही आपण पहातोच. वाटलं एखाद्या खेळाडूच्या फॉर्मची लहर संघाला फारच महागात पडत्येय तर त्याच्यावर टीका होणं, त्याला तात्पुरतं किंवा कायमचं बाहेर बसवणं अपरिहार्य होतंच. पण त्याच्यावर हेत्वारोप करणं मात्र अन्याय्यकारक, एवढंच मला मनापासून वाटतं.

रोहीत शर्मा ईटरनॅशनल २०-२० सोडले तर त्या आधी ओस्ट्रेलियात जबरी फॉर्मला होता आणि त्याही आधीच्या मालिकांमध्ये चांगलाच खेळत होता.

विश्वचषकात कोहलीची एकट्याचे खेळणे आणि इतरांचे साथ न देणे याचा ताजा प्रभाव सध्या आपल्या विचारांवर असल्याने आपल्याला तो सोडून सारेच कागदी घोडे आहेत असे वाटतेय. ही स्थिती येत्या काही मालिकांनंतर दूर होईल कारण परिस्थिती अगदीच तशी नाहीये.

विश्वचषकात कोहलीची एकट्याचे खेळणे आणि इतरांचे साथ न देणे याचा ताजा प्रभाव सध्या आपल्या विचारांवर >>>

हे तर आपल्या संघाचे वैशिष्ठ्य आहे गेल्या कित्येक दशकांपासून! एक मोठ्ठे नांव बाकी बर्‍या पैकी नांवे पण सारा भार मोठ्या नांवावर!! बाकीच्यांची एखादी दुसरी खेळी... जेंव्हा ही बाकीची बर्यापैकी असलेली नांवांनी नियमितता दाखविली ते दौरे देशी वा विदेशी दौरे आपण गाजवलेत!

एकच वादा - अजिंक्य दादा असं म्हणावसं वाटावं ईतका छान खेळतो हा रहाणे. एकदम सिल्की स्मूथ बॅटींग आहे त्याची. आणी कन्सिस्टन्सी क्या कहने! अफलातून बॅट्समन आहे.

<< एकदम सिल्की स्मूथ बॅटींग आहे त्याची. आणी कन्सिस्टन्सी क्या कहने! अफलातून बॅट्समन आहे.>> +१. पोरगं लईच गुणी आहे. क्षेत्ररक्षणही जीव तोडून करतो. आणि, हें सगळं असून कसला दिखाऊपणा नाहीं, घमेंड नाही. 'चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक !'

" पोरगं लईच गुणी आहे. क्षेत्ररक्षणही जीव तोडून करतो. आणि, हें सगळं असून कसला दिखाऊपणा नाहीं, घमेंड नाही. 'चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक !" एकदम सहमत. रहाणे कॅच घेतो ते दृष्य बघण्यासारखं असतं. एखाद्या लहान बाळाला कडेवर घ्यावं, असं हळुवारपणे तो बॉल कॅच करतो.

एकदम सिल्की स्मूथ बॅटींग आहे त्याची. आणी कन्सिस्टन्सी क्या कहने! अफलातून बॅट्समन आहे.>> +१. पोरगं लईच गुणी आहे. क्षेत्ररक्षणही जीव तोडून करतो. आणि, हें सगळं असून कसला दिखाऊपणा नाहीं, घमेंड नाही. 'चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक !'>>>

आमचा गांववाला आहे ना आम्हाला सार्थ अभिमान ह्याचा!! Happy

आणि द्रविड साहेबांचे मार्गदर्शन लाभलेले त्यामुळे गुणवत्तेला झळाळी आली नक्कीच!

३ ओवर ४० ला गेलेली मॅचही कोहली लीलया काढू शकतो याने तो अधिकच डेंजरस फलंदाज झाला आहे.
मी मोठे फटके खेळू शकत नाही बोलून तो जगाला गंडवतोय, गाफील ठेवतोय Happy

<< मी मोठे फटके खेळू शकत नाही बोलून तो जगाला गंडवतोय, गाफील ठेवतोय >> सध्यां फलंदाजीत 'कोहली बोले सो कायदा ', अशी परिस्थिती झालीय ! त्याचं फूटवर्क, टायमींग, प्लेसींग, सातत्य, स्टॅमीना व धावांची भूक, सगळंच एका अत्यूच्य पातळीवर गेलंय, त्याच्या फलंदाजीतील सहजता व नजाकत तसूभरही कमी न होतां ! ही इज अ लिजंड इन मेकींग; प्रॉबेब्ली, ही ऑलरेडी इज !!! कोहलीचं नांव जगभर दुमदूमत राहो व त्याबरोबर भारतीय संघाचंही !!!!

'सुनील', 'सुनील'..मग 'सचिन', सचिन' मग .. 'वीरु', 'वीरू' आणि आतां 'विराट',
'विराट'... !! लग्नांत बायकोचं नांव काय ठेवलंत, तें आठवतंय तरी का ?nenevakil2.JPG

६२-८

एवढी गंडलेली मॅच आमची मुंबईच दाखवू शकते ..

याच्या पुढची मॅच दण्यक्यात जिंकून ही दाखवतील ती गोष्ट वेगळी..

आज टॉसचा निर्णय चुकला वाटते ..

मुंबई ने पुढच्या वर्षी साठी संघ बांधणी सुरू करावी हेच उत्तम . रन रेट चा सुद्धा विचार केला नाहिये ह्या मॅचमधे.

पठाण - शकिब ची भागीदारी जबरदस्त झाली. मुंबई ने आज आणी दिल्ली ने काल फारच निराशा केली.

रोहीत शर्मा गेल्यावर कोणी थांबायचे कोणी मारायचे काही गेमप्लानच नसतो बहुधा .. पिच जरा बदललेले रागरंग दाखवत होते पण अनप्लेयेबल सारखा प्रकार नव्हता.. विकेट पडत गेल्या आणि डाव कठीण होत गेला..

कलकत्त्याचे स्पिनर नाही चालले तर यांचा सामनाही रंगणार नाही..

२४-४ वरून १५९-४ ! कोलकता हरले तरी शकीब-पठाण जोडीला मानलं. पठाण कधीं नव्हे तें सातत्य दाखवतोय या आयपीएलमधे !

एबी आणि बेबीची चांगली पार्टनरशीप सुरु आहे.
३ विकेट्स एकापाठोपाठ एक गेल्यानंतर बँगलोरला बर्‍यापैकी सावरलं आहे आणि आता एबी 'सुटलाय'.

<< आता एबी 'सुटलाय'.>> लेग स्टंपवरच्या जवळ जवळ 'यॉर्कर लेंग्थ'च्या चेंडूला फ्लिक करून स्क्वेअर लेगला सिक्सर !! एबी हा खरंच एक अफलातून खेळाडू आहे !!

मध्ये ३ विकेट्स गेल्यावर १७५ स्कोर वाईट नाही, पण बँगलोरचे बॉलर्स हे टार्गेट डिफेंड करु शकतील असं वाटत नाही. वॉटसन आणि काही प्रमाणात जॉर्डन सोडलं तर त्यांच्या बॉलिंगमध्ये दम नाही. अर्थात पंजाबच्या बॅटींगमध्येही फारसा दम नाही (मिलर, विजय, स्टॉईन्स) सोडल्यास हेही तितकंच खरं... इंटरेस्टींग मॅच होईल असं दिसतंय.

Pages