Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<आणि तसे अधूनमधून जाहीरात
<<आणि तसे अधूनमधून जाहीरात लागली की मला स्कोअर दाखवतात >> +१
<< अरे तो गंभीर किती उतावळा
<< अरे तो गंभीर किती उतावळा आहे..गल्लीत खेळताना मुलेसुद्धा यापेक्षा mature वागत असतील! >> << गंभीर फारच 'ओव्हर रिअॅक्शन' देत असतो मैदानावर; बघवत नाही कधीं कधी तो तोंड वाकडं करतो तें >> आरसीबीविरुद्ध जिंकल्यावर गंभीरने खुर्चीवर लाथ मारली; या 'आक्षेपार्ह वर्तना'बद्दल त्याला मॅच फीच्या १५% दंड करण्यात आला आहे !
अर्थात, विराटलाही २४लाख रुपयांचा भुर्दंड पडला आहे पण तो 'ओव्हर रेट' कमी ठेवल्याबद्दल.
दोघांत मोठ्ठा फरक हा असावा कीं विराट कितीही खुन्नसने खेळला तरी आपल्या क्रिकेटचा आनंदही घेत असतो, तर गंभीरला फक्त खुन्नस काढणे व दाखवणे यांतच आनंद मिळतो !
मॅच बघताना दुसऱ्या कुणाच्या
मॅच बघताना दुसऱ्या कुणाच्या हातात रिमोट असलेला आपल्याला चालतच नाही.... तसे असेल तर मग ते डीडी(दूरदर्शन) वाले कसे ओव्हरचा पहीला आणि शेवटचा बॉल जाहिरातीने खातात तशी तुटक-तुटक मॅच बघावी लागते
त्यामुळे सध्या हॉटस्टार झिंदाबाद..... ऑफिसमधुन घरी येताना तर पहिली इनिंग पण बसमध्ये बघता येते
ब्ल्यूटूथ स्पीकर लावतो आणि कंपनीच्या बसचे फुल्ल स्टेडीयम करुन टाकतो सध्या आम्ही!
<< मॅच बघताना दुसऱ्या
<< मॅच बघताना दुसऱ्या कुणाच्या हातात रिमोट असलेला आपल्याला चालतच नाही >> पण आपलाच रिमोट घरच्यांच्या हातांत देवून फसलेल्या अनेक महाभागांपैकी पडलों ना आम्हीं !!
<< कंपनीच्या बसचे फुल्ल
<< कंपनीच्या बसचे फुल्ल स्टेडीयम करुन टाकतो सध्या आम्ही! >> अगदीं रहावत नाहीं म्हणून यावरून आठवलेला हा जुना किस्सा सांगतो -
आमच्या कंपनीच्या बोर्डाची बैठक सुरु होती. वातावरणात अपेक्षित अशी कांहींशी उत्सुक्तता व उगीचंच गांभीर्य. इतक्यांत घरून मुलीचा फोन, " बाबा, त्यांच्या तीन विकेटस गेल्यात व सॉलीड एक्साईटमेंट सुरूं आहे !". " फोन चालू ठेव आणि मला रनींग कॉमेंटरी दे ", मींही तिला दटावलं. कांहींतरी चमत्कार घडत होता आणि माझ्याकडे तर साधा ट्रांन्झिस्टरही नव्हता. आमच्या एमडीना क्रिकेटमधे खूप रस होता व त्यांच्याकडे कधीही कामाला गेलं कीं शेवटीं चहा मागवून पांच मिनीटं तरी क्रिकेट चालायचंच. मला राहावेना. एका कागदावर स्कोअर लिहीला आणि शिपायाबरोबर दिला धाडून बोर्डरुममधे ! मग मात्र तो आतताईपणा वाटला व टेंशन आलं. इतक्यांत तो शिपाईच माझा कागद घेवून आला . " प्लीज कीप मी पोस्टेड", खालीं एमडींची इनीशिअल्स ! झालं, दर पांच मिनीटानी मी आंत स्कोअर पाठवूं लागलों. चौथ्या खेपेस शिपाई आला तो मात्र मलाच आंत बोलावल्याचा आदेश घेवून! दबकतच मीं आंत गेलों तर कंपनीचं सगळं भवितव्यच जणूं माझ्या हातांत आहे अशा तर्हेने सर्व बोर्ड मेंबर्स माझ्याकडे बघताहेत. " भाऊ, सॉरी. सर्वाना सांगितल्याशिवाय रहावलं नाहीं मलाही ", इति एमडी. आतां मलाही धीर आला. "बोर्डरुमधला टीव्ही सुरुं केला तर मला कांहीं सांगावच लागणार नाही ", मी दिलं पिल्लू सोडून. त्या दिवशीं तुडूंब भरलेल्या आमच्या बोर्डरुमधे बोर्डमेंबर्स, ऑफिसर्स,स्टाफ, ड्रायव्हर्स व शिपाई आम्ही सर्वानी मिळून एका अनपेक्षित भारतीय विजयाचा जल्लोष साजरा केला !
क्रिकेट रिअली इज अ ग्रेट लेव्हलर !!!
भाऊ, एकदम भन्नाट किस्सा
भाऊ, एकदम भन्नाट किस्सा तुमचा!
लहाणपणी एकदा नगरल असताना आठवतयं आमच्या शाळेत ७५-७६ च्या आसपास भारत इंग्लंड की विंडीज सामना सुरु असताना गावस्कर विश्वनाथ भन्नाट फलंदाजी करत होते. तेंव्हा वर्गात स्पीकर होते त्यावर रोज सकाळी प्रार्थना असायची तेंव्हा दुपारी चक्क रेडिओ कॉमेण्टरी सुरु झाली... आणि आम्ही मुलांनी सरांसह नाचत ओरडत एन्जॉय केलेली आठवतेय!
आज 'केकेआर'ला गुणतक्त्यात वर
आज 'केकेआर'ला गुणतक्त्यात वर येण्याची नामी संधी आहे. पण तिथं तळाला असलेला 'नथींग टू लुज' पंजाब संघ बिनधास्त खेळून केकेआरला अडचणीतही आणूं शकतो. गुजरातला धूळ चारणार्या व आतां मुरलीच्या कॅप्टन्सीखाली
खेळणार्या पंजाबपासून केकेआरला सावधही रहायला हवं. अक्षर पटेल [ जो 'बेरक्या 'गोलंदाज म्हणून मला आवडतो ] गेल्या मॅचमधल्या धमाल कामगिरीमुळे फॉर्ममधे येवून भेदक ठरूं शकतो.
मला सुनील नरैनला पुन्हां एकदां त्याच्या पूर्वींच्या भेदक स्वरूपात बघायचंय. अॅक्शन सुधारायच्या प्रयत्नात बिचार्याची अवस्था एखाद्या अगदींच मामुली गोलंदाजासारखी झालीय !
तसं मला गंभीरलाही मनमोकळं हंसताना बघायचंय. पण तें अशक्यच दिसतंय !
" गंभीरलाही मनमोकळं हंसताना
" गंभीरलाही मनमोकळं हंसताना बघायचंय. " - तो आडनावाला जागतो.
भाऊ, अप्रतिम किस्सा. माझ्या ऑफिस मधे मी 'देवा'चा एक पर्सनल मेसेज असलेला एक फोटो फ्रेम करून लावलाय. जाता येता सगळे त्याच्याबद्दल विचारतात. मग मी अभिमानानं सांगतो की 'गॉड ऑफ क्रिकेट' असं गूगल करा, म्हणजे सगळी माहिती मिळेल.
क्रिकेट ईतकं भारतात लोकांना एकत्र आणणारं दुसरं साधन नाही हे मात्र अक्षरशः खरय. मला तर नेहेमी 'किती झालाय?' आणी 'सचिन?' हे दोन प्रश्न आठवतात. पहिल्या प्रश्नात उत्सुकता आणी दुसर्या प्रश्नात सगळ्या आशा-आकांक्षा सामावलेल्या असायच्या. आणी गंमत म्हणजे हे २ प्रश्न विचारायला ओळख-पाळख सुद्धा नाही लागायची.
भाऊ तुमच्या किस्स्यावरून
भाऊ तुमच्या किस्स्यावरून आठवले कि जर क्रिकेट मॅच असेल तर आम्ही शाळॅत जात असताना एका दूरच्या रस्त्याने जात असू. त्या रस्त्यावर ४ टी.व्हीची दुकाने होती जिथे मधे थांबून सामना बघता येत असे. दोन दुकानां मधले अंतर आम्ही आजूबाजूच्या distractions कडे पूर्ण पणे दुर्लक्ष करत धावत धावत पार करत असू. अशानेच रनिंग बीटविन विकेट सुधारले असावे
९५ च्या विष्वचषकाच्या वेळी मित्राने माझ्या प्लेटमधली पाणीपुरी 'अपनाही माल' स्टाईलमधे उचलली नि माझी भुवई वाकडी व्हायच्या आधी जाडेजाने युनिस ला पहिली सिक्सर लगावली होती. उगाच पनवती नको म्हणून मित्राला उरलेली प्लेट संप्वायला लावली होती
पंजाब ३ ओव्हरसीज खेळाडू घेऊन
पंजाब ३ ओव्हरसीज खेळाडू घेऊन मैदानात उतरलय. बेहर्डीन असताना असं का केलं ते नाही कळलं. नेमका नियम काय आहे? जस्स्तीत जास्त ४ परदेशी खेळाडू खेळवता येतात हे माहीत आहे, पण कमीत कमी किती खेळवावे ह्याचा ही काही नियम आहे का?
क्रिकेट नॉस्टॅल्जिया चालू आहे
क्रिकेट नॉस्टॅल्जिया चालू आहे तर!
शाळेत असताना आम्ही तर लहान-मोठी, शी-शू ची, जेवणाची जी कुठली सुट्टी मिळेल त्यात जवळच्या पानपट्टीवर जाउन टाचा उंचावून उंचावून त्याच्या त्या एव्ह्ढ्याश्या B&W टीव्हावर जाउन स्कोअर बघायसाठी आणि पदरात पडेल तितकी मॅच बघायसाठी मर-मर करायचो
आता याच्यापुढे थांबलो तर वर्गात घेणारच नाहीत असा क्षण आल्याची जाणीव झाल्यावरच तिथन निघायचो!
कोलकाताने आता पेस करायला हवय!
कोलकाताने आता पेस करायला हवय!
असामी, to your point,
असामी, to your point, क्रिकईंफो वरची एक कॉमेंट - " Seeing this splendid form of Uthappa, the selectors must be thinking of giving him a chance in the upcoming Zimbabwe vs India series"
" Seeing this splendid form
" Seeing this splendid form of Uthappa, the selectors must be thinking of giving him a chance in the upcoming Zimbabwe vs India series" >>
दर IPL मधेच तो अशा इनिंग्स खेळतो.
" Seeing this splendid form
" Seeing this splendid form of Uthappa, the selectors must be thinking of giving him a chance in the upcoming Zimbabwe vs India series" >>
दर IPL मधेच तो अशा इनिंग्स खेळतो.
उथप्पा, युसुफ पठाण, पोलार्ड,
उथप्पा, युसुफ पठाण, पोलार्ड, सुनील नरैन, आंद्रे रसेल, ब्राव्हो, पियुश चावला हे खास आयपीएल स्टार्स आहेत. मी रोहित शर्मा चं नाव पण ह्यात घालणार होतो, पण वाद नको म्हणून वगळलय.;)
मी रोहित शर्मा चं नाव पण
मी रोहित शर्मा चं नाव पण ह्यात घालणार होतो, >> हरकत नाही रे. डेव्हॉन स्मिथ पण घाल त्यात.
शेवटची ओव्हर जबरदस्त राव.
शेवटची ओव्हर जबरदस्त राव. संदीप शर्माचे कौतुक करावे कि पठाण नि रसेल चे लिमिटेशन्स चे !
स्मिथ, बरोबर. तसं संदीप
स्मिथ, बरोबर.
तसं संदीप शर्मा, मोहित शर्मा वगैरे पण आहेत.
असं लिहेपर्यंत संदीप शर्मा ने शेवटची ओव्हर कमाल टाकली.
१६४ मोठा नाहीये स्कोअर. ज्या
१६४ मोठा नाहीये स्कोअर. ज्या पद्धतीनं पहीला हाफ खेळले होते केकेआर, त्या पद्धतीनं मला ते १८०+ पर्यंत मजल मारतील असं वाटत होतं.
पंजाब च्या एकाही बॉलर ला
पंजाब च्या एकाही बॉलर ला विकेट नाहीये. तिन्ही रन-आऊट्स आहेत.
वेस्ट इंडीयन क्रिकेटरकडून
वेस्ट इंडीयन क्रिकेटरकडून मॅक्सवेल ने कसे अॅडॉप्ट करायला हवे मॅच सिच्युअशनल हे ऐकणे विचित्र वाटते राव.
मॅक्सवेल रिव्हर्स स्विप
मॅक्सवेल रिव्हर्स स्विप खेळताना क्रिजमधे होता. बॉल बाहेर पिच झालेला नि पायाला लागला तेंव्हाही स्टंपच्या बाहेर होता. अंपायरने उचलला मॅच मस्त सुरू असताना
मी रोहित शर्मा चं नाव पण
मी रोहित शर्मा चं नाव पण ह्यात घालणार होतो, पण वाद नको म्हणून वगळलय.डोळा मारा >>>>> त्याने ऑस्ट्रेलियात शतकं मारली ती हो ?? तेव्हा कुठे गेला होता..... तुम्ही वाद नको म्हणता म्हणून इतकच..
अरे तो T20 बद्दल बोलतोय रे.
अरे तो T20 बद्दल बोलतोय रे.
माहिती आहे. ती पोस्ट मजेत
माहिती आहे. ती पोस्ट मजेत टाकली आहे.
भाऊ मस्त किस्सा .. डोळ्यासमोर
भाऊ मस्त किस्सा .. डोळ्यासमोर आला..
तुमच्या काळात अश्या किस्श्यांची मजा आणखीनच येत असेल कारण स्कोअर सहज उपलब्ध न होणे..
पराग, हे फक्त टी२० पुरतं आहे.
पराग, हे फक्त टी२० पुरतं आहे. पण रोहित शर्मा विषयी वेगळी चर्चा करू हवं तर.
केकेआर छान जिंकले. आज मॅक्सवेल मस्त खेळत होता.
उद्या डीडी वि. पुणे.
रोहीत शर्मा आयपीएल लिमिटेड
रोहीत शर्मा आयपीएल लिमिटेड नक्कीच नाही..
पण २०-२० बाबत मुंबईकडून खेळताना त्याचा रोल जसा डिफाईन आहे, आणि तो ही जबाबदारीचा आहे तसा तो भारताकडून खेळताना तितकासा नाहीये.
पण रोहित शर्मा विषयी वेगळी
पण रोहित शर्मा विषयी वेगळी चर्चा करू हवं तर. >>>
करा करा, मी पुढे लेट एलेगन्स घेऊन येतो.
Pages