आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्राव्हो - आजारी / ईंज्युअर्ड

दिल्ली ची चांगली सुरुवात. पण ही जोडी लवकर फोडायला हवी.

<< आयपीएल नंतर बर्याच टीम्स चे महत्वाचे दौरे सुरू होणार आहेत हे दुखापतीनंतर लगेच स्पर्धेतुन माघार घेण्याचं कारण हे माझं लॉजिक आहे. >> माघार घेणारे बहुतेक खेळाडू तसे ज्येष्ठ व व्यावसायिक आहेत; माघार घेताना त्याना होणार्‍या पैशांच्या नुकसानाबरोबरच [ हें होत असणारच ] त्यांच्या व्यावसायिक विश्वासार्हतेला धक्का पोचण्याची शक्यताही त्याना लक्षांत घ्यावीच लागेल. त्यामुळे खरोखरच दुखापतग्रस्त असल्याशिवाय हे खेळाडू माघार घेणार नाहीत, असं मला वाटतं. दौरे तर आयपीएलचे करार सही करतानाच माहीत असतात. त्यामुळे, माघारीसाठी दुखापत ही सबब व दौरे हें खरं कारण असं मानणं कठीणच.
गुजरात ७७-४ [११ षटकं ] !

दौरे तर आयपीएलचे करार सही करतानाच माहीत असतात. त्यामुळे, माघारीसाठी दुखापत ही सबब व दौरे हें खरं कारण असं मानणं कठीणच. >> मला वाटते काहि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या withdrawal मागे त्या बोर्डाचा पण हात आहे.

असामी, परत जडेजा चर्चा सुरू करायचा विचार दिसतोय तुझा. Wink मी नाही घेणार बेट Happy

"खरोखरच दुखापतग्रस्त असल्याशिवाय हे खेळाडू माघार घेणार नाहीत" - भाऊ, ते दुखापती फेकताहेत असं मलाही वाटत नाही. तसा अर्थ माझ्या विधानाचा निघत असेल, तर मी ते रिवाईज करतो. मला म्हणायचं होतं की दुखापत अंगावर न काढता, पुढचा महत्वाचा दौरा डोळ्यासमोर ठेवून ते वेळीच माघार घेउन उपचारासाठी जातात. उदा. किरकोळ दुखापत अंगावर काढून एखादा ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅशेस मधे खेळेल, पण त्याच दुखापतीसाठी आयपीएल मधून माघार घेईल. आणी तसं केलं तर त्यात गैर नाही. अर्थात हा एक अंदाज आहे. ह्याचं उलटं उदाहरण म्हणजे मलिंगा, जो ईटरनॅशनल मॅचेस च्या वेळी 'अनफिट' असला तरी आयपीएल च्या वेळी एकदम तंदुरुस्त. अर्थात ह्या वेळी त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने चांगलाच दणका दिल्यामुळे तो परत गेला.

<< जाडेजा फॉअक्नरच्या आधी कसा येतो क्रंच ओव्हर्समधे ? >> पण २५ चेंडूत ३५ केले ना त्याने ! [ कुणी तरी इथला फितुरी करून जडेजाला इथले त्याच्यावरचे शेरे, ताशेरे कळवत असावा !बरा खेळला आज. Wink ]
गुजरातने २४-३ वरून १४९-६ ही बरी मजल गांठली म्हणायला हवं .

परत जडेजा चर्चा सुरू करायचा विचार दिसतोय तुझा >> अजिबात नाही, मला त्याच्या कुवतीबद्दल शंका नाही किंवा अतिविश्वासही नाही. त्यामूळे फॉकनरसारखा अधिक कुवतीचा बॅट्समन असताना तो जाडेजाच्या खाली का येतो हे प्रश्नचिन्ह आहे.

DD team राजस्थान रॉयलच्या मार्गावर आहे. They will always be consistent and performant but will stumble at last step. They lacked someone who can play inspired out of the world inning at crunch moment. इथेही डि कॉक वगळता तसा कोणी x factor असलेला दिसत नाही जो एका इनिंग मधे मॅच घेऊन जाईल. अय्यर नि नायर माझे आवडते खेळाडू असले तरी त्यांच्यात तो भाग नाही. मॉरीस predictable आहे. डोके ताळ्यावर ठेवून बॉलिंग करणारे त्याला कंट्रोल मधे ठेवू शकतात. (ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज पाहा).

काल युसुफ पठाण ने त्याच्या प्रत्येक IPL मधे खेळायच्या एका जबरदस्त इनिंग चा कोटा पूर्ण केला. तशी इनिंग खेळताना समोर बॉलर कोण आहे वगैरेनी फरक पडत नाही. शंभरातल्या ९९ वेळा वॉटसन समोर पठाण म्हणजे कु. ऋन्मेशसमोर समस्त मायबोलीकर असे चित्र असणार. काल काय झाले पहा. पुढच्या सामन्यापासून पठाण ला वगळायला हरकत नसावी Wink फे.फे. युसुफ पठाण हा ज्यांच्याबद्दल उसासे टाकले जातात त्या यादीमधे उथ्थप्पाला जबरदस्त competition देउ शकतो.

युसुफ पठाण हा ज्यांच्याबद्दल उसासे टाकले जातात त्या यादीमधे उथ्थप्पाला जबरदस्त competition देउ शकतो. ; Happy - सहमत

"कुणी तरी इथला फितुरी करून जडेजाला इथले त्याच्यावरचे शेरे, ताशेरे कळवत असावा !बरा खेळला आज" - १++

"कुणी तरी इथला फितुरी करून जडेजाला इथले त्याच्यावरचे शेरे, ताशेरे कळवत असावा !बरा खेळला आज" - १++ >. आता केदारने +१ लिहिले कि जाडेजा निव्रुत्त व्हायला मोकळा Lol

बरा खेळला आज. >> मधल्या आळीचे नाव सार्थ करताय का भाऊ ? Wink

लायन्सनी homework केला नाहिये. 'डी कॉकला कुठे बॉल नक्की टाकायचा नाही' हे त्यांना अजिबात माहित नाहिये. Even RCB got that part right Wink

फॉकनरसारखा अधिक कुवतीचा बॅट्समन असताना तो जाडेजाच्या खाली का येतो हे प्रश्नचिन्ह आहे.
>>>
फॉकनरचा एक दिवस असतो मारायचा. जेव्हा मारतो तेव्हा जबरदस्तच मारतो, क्लीन हिटींग असते म्हणून लक्षात राहते. पण फ्लॉपही बरेचदा जातच असतो तो. रेकॉर्ड चेक करायला हवे त्याचे. त्याच्या फलंदाजीवर जास्त अवलंबून राहण्यात पॉईंट नाही. आणि हेच त्याच्या गोलंदाजीलाही लागू होते. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत असतो तिथे तो निष्प्रभही वाटतो बरेचदा, सहज धुलाई होते..

मागच्याच्या मागचीच मॅच फॉकलनर ने डोके शांत ठेवून जिंकून दिली होती हे नम्रपणे नमूद करु इछितो. वरती अमक्याचा एक दिवस वगैरे मधे current form वगैरे फुटकळ गोष्टी लक्षात घेतल्या तर माझ्या विधानामागचा अर्थ जाणवेल.

current form .... यासाठीच आकडे बघावे लागतील असे म्हणालो. त्याचा कधी सलग फॉर्म असा मला आढळला नाहीये. अर्थात कॅप्टन चॉईस आहे शेवटी कोणाला पाठवायचे पण जडेजा आणि फॉकनर यात फारसा फरक नाही (डावाच्या या स्टेजला) एवढाच मुद्दा

पंतपुढे डि कॉकही फिका वाटतोय आज !!
<< पंत काहीतरी भारी खेळतोय आणि घरचे बघू देत नाहीयेत >> तिथला पंत खुळ्यासारखं खेळतोय आणि घरचे टक लावून बघत बसलेयत... 'पसंत आहे मुलगी ' !! Wink

हा हा हो भाऊ या मराठी सिरीअलईच.. आणि आयपीएल सुद्धा रोजचीच असल्याने काय तुमच्या त्या रोजच्याच सिरीअली असे उलटून बोलताही येत नाही Proud

खुप कंव्हिंसिंगली जिंकली दिल्ली आज!
झहीरचे बॉलींग चेंजेस आणि फील्ड प्लेसमेंट चांगली होती.... तरी मॉरीसला इनिंगच्या सुरुवातीला न वापरता डेथ ओव्हर्ससाठी राखुन ठेवायला हवे असे मला वाटते!
रिषभ पंत अफलातुन खेळला.... त्याच्या शॉट्समधुन त्याचा क्लास जाणवत होता

झहीर आज परत Processes & Freedom to Express बद्दल बोलला
तो जो कुणी ॲंकर होता तो द्रवीड आणि पॅडीच्या contribution बद्दल खोदुन खोदुन विचारत होता पण झहीरने काय त्याला दाद लागू दिली नाही
अखेर त्याने रिषभ पंत कडून द्रवीडबद्दल वदवून घेतले!

असामी हो असतात, पण काय माहीत आयपीएलच्या हायलाईटस बघाव्यात अशी क्रेझ वाटत नाही. आजवर कधीच नाही बघितल्यात. त्यापेक्षा रात्री व्हॉटसपवर ग्रूपवर चर्चा खेचाखेची याची मजा घ्यायची Happy

असो,
स्पर्ध्येच्या या मध्यावर दिल्ली आयपीएलमधील सर्वात संतुलित आणि फॉर्मातली टीम वाटत आहे. टॉप टू मध्ये आल्यास फायनलला जायला एक्स्ट्रा चान्स आणि ते जातीलच.
कलकत्ता आणि गुजरातही पसरले नाहीत तर जाण्याची शक्यता..
आणखी एक चौथी टीम मुंबई ठरावी..
हैदराबाद यात गडबड करू शकते ..
पंजाब पुणे बादच आहेत.. कोहली कडूनही आता फार आशा नाहीत .. त्यांना योग्य कॉम्बिनेशन आणि विजयाचे सूत्र सापडेपर्यंत ते बाहेर गेले असतील

स्वरूप, अरे टीव्ही बरा पडतो घरात येता जाता बघायला.. लॅपटॉप वा मोबाईल सतत घेऊन बसण्यापेक्षा .. आणि तसे अधूनमधून जाहीरात लागली की मला स्कोअर दाखवतात Happy

"आता केदारने +१ लिहिले कि जाडेजा निव्रुत्त व्हायला मोकळा" - केदार, जिथे कुठे असशील, ज्या अवस्थेत असशील, तिथुन, तसच पटकन +१ लिही रे बाबा. भारतीय क्रिकेट तुझे उपकार आजन्म लक्षात ठेवेल Wink

रिषभ पंत मस्त खेळला. त्याला अंडर १९ च्या वर्ल्ड कप ला खेळताना पाहीलं होतं. तेव्हा सुद्धा खुप छान खेळला होता.

"पेक्षा रात्री व्हॉटसपवर ग्रूपवर चर्चा खेचाखेची याची मजा घ्यायची" - मला तर कुठल्याही मॅच मधे, ती चालू असताना आणी संपल्यावर मायबोलीवर च्या चर्चा वाचायची ओढ असते. मस्त रंगते मॅच.

Lol

+१ Lol

Pages