Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल दिंडा ने मस्त बॉलिंग
काल दिंडा ने मस्त बॉलिंग केली, पण ते थोडसं, फ्लेवर ऑफ द डे सारखं वाटलं.
आज दिल्ली वि. गुजराथ - द्रविड वि. ब्रॅड हॉज.
एक गंमत जाणवली: आजचे दोन कॅप्टन्स - झहीर - डावखुरा गोलंदाज पण उजव्या हाताने फलंदाजी करतो. रैना - डावखुरा फलंदाज, पण उजव्या हाताने गोलंदाजी करतो.
धुवायला काढलय स्मिथ आणी
धुवायला काढलय स्मिथ आणी मॅक्कलम नी. २२५ साठी खेळतायेत असं वाटतय. झहीर ने २ संधी निर्माण केल्या होत्या, पण कन्व्हर्ट नाही झाल्या. दिल्ली चा दिवस नाही असं दिसतय.
स्मिथ आणि मॅक्युलम दोघांची
स्मिथ आणि मॅक्युलम दोघांची अक्षरशः जुगलबंदी चालू आहे. त्याचे २५ चेंडूत ४५ तर याचे २१ चेंडूत ४८
याने ५ चौकार मारले तर त्याने ही ५ चौकार मारले याने ३ षटकार तर त्याचे २ षटकार
जबरदस्त
९ ओव्हर मधे १०० फास्टेस असेल
९ ओव्हर मधे १००
फास्टेस असेल बहुदा
ओके. क्रिकईन्फो बंद करण्यात
ओके. क्रिकईन्फो बंद करण्यात येणार आहे. मला बघवत नाहीये हे bullying.
Looks like those two wickets
Looks like those two wickets will put the breaks on run rate
Anything below 200 should be getable for DD
जबरी कमबॅक!!
जबरी कमबॅक!!
खरच जबरी कमबॅक..... Hats off
खरच जबरी कमबॅक..... Hats off to morris and tahir
मोमेंटम मिळालाय तो धरुन ठेवा!
इतक्या धडाकेबाज सुरवातीनंतर
इतक्या धडाकेबाज सुरवातीनंतर गुजरातला १७२वर रोखणं हें खरंच दिल्लीसाठी कौतुकास्पद. आत्तां मॉरिसची छोटी मुलाखत घेतली मैदानावर. किती विनयशील होता तो !!.
अगदी अगदी भाऊ Thats why I
अगदी अगदी भाऊ
Thats why I like certain cricketers like moris beyond their cricketing skills!
अरारा, मॉरिस काय पेटलाय
अरारा, मॉरिस काय पेटलाय
मॉरीस ने दोन्ही बाजूने मजा
मॉरीस ने दोन्ही बाजूने मजा आणलीये खरी. क्लीन हिट्स.
शेवटच्या २ ओव्हर्स काय धमाल
शेवटच्या २ ओव्हर्स काय धमाल ह्होती. प्रवीण कुमार ला मानले राव. ब्रावो च्या variations खतरा होत्या. spare a thought for Morris.
एनीबडीज गेम! मस्त झाली मॅच.
एनीबडीज गेम! मस्त झाली मॅच. दिल्ली ने नेगी ची भुमिका ठरवायला हवी. जर तो बॉलिंग करणार नसेल, तर एखादा प्रॉपर बॅट्समन (आगरवाल, अय्यर) ला खेळवावं.
रॉपर बॅट्समन (आगरवाल, अय्यर)
रॉपर बॅट्समन (आगरवाल, अय्यर) ला खेळवावं. >> नेगीचे मग बघूदे. पहिले छूट सलामी ची जोडी नीट ठरवायला हवी. अग्रवाल पहिल्या मॅच नंतर बाहेर, अय्यर चौथ्यानंतर. बहुधा पुढच्या वॅळी सॅमसन नसेल. सगळ्यात स्लो power play खेळतात तेही डिकॉक असताना.
MI च्या मॅचेस एव्हढ्या लागोपाठ का आहेत ?
खरय असामी. डीडी ला सलामी
खरय असामी. डीडी ला सलामी पक्की करायला हवी. अय्यर खेळेल असं वाटतं, त्याच्याकडे क्षमता आहे. मयंक आगरवाल सुद्धा ओपनर च आहे.
हर्षा भोगले बॅक
हर्षा भोगले बॅक
मस्त
मस्त
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?time_continue=185&v=Tct9kgjGkX0
विराट- गेल चा डांस आणि वॉट्सन चे गायन गिटार वादन
thankfully उथ्थप्पा बाद झाला.
thankfully उथ्थप्पा बाद झाला. अतिशय अॅनॉयिंग प्लेयर आहे. मधेच एखादी इनिंग अशी खेळतो कि तो भारतीय टीं मधे का नाहि असे वाटायला लागले नि मग परत ' ये रे माझ्या मागल्या' सुरू होते
भज्जी एकदम हताश वाटतो आजकल. बॉलिंग पण फारशी नीट होत नाही.
भाऊ तुम्हाला हे ऐकून बरे वाटेल. विराट आज पुण्यातल्या एका व्रुद्धाश्रमाला भेट देऊन आला. त्यांना मदत करण्यासाठी त्याने त्याच्या फाऊंडेशन तर्फे प्रयत्न सुरू केले आहेत.
" अतिशय अॅनॉयिंग प्लेयर
" अतिशय अॅनॉयिंग प्लेयर आहे." - भ्रमनिरास केलेल्या खेळाडूंच्या यादीतला एक उथप्पा, दुसरा तो दिनेश कार्थिक. टेस्ट ओपनर होता तो एके काळी हे सांगून सुद्धा खरं वाटणार नाही कुणाला. ह्या यादीतलं आणखी एक (थोडसं वादग्रस्त) नाव म्हणजे ईरफान खान.
ईरफान खान. >> हे नाव असेल तर
ईरफान खान. >> हे नाव असेल तर नक्कीच वादग्रस्त असणार रे
<< भाऊ तुम्हाला हे ऐकून बरे
<< भाऊ तुम्हाला हे ऐकून बरे वाटेल. विराट आज पुण्यातल्या एका व्रुद्धाश्रमाला भेट देऊन आला. >> काय सुचवायचंय काय तुम्हाला !
भाऊ. आपले मागे डीस्कशन झाले
रसेल ची बॅटींग बघणे हि
रसेल ची बॅटींग बघणे हि डोळ्यांना शिक्षा आहे. म्हणजे पॉवर हिटींग हि सुद्धा एक कला आहे पण रसेल ला ते करताना बघणे अतिशय त्रासदायक वाटते. तो कुठे, बॅट कुठे, बॉल कुठे कसलाही ताळमेळ नसतो.
"ईरफान खान. >> हे नाव असेल तर
"ईरफान खान. >> हे नाव असेल तर नक्कीच वादग्रस्त असणार रे" - चुकलच की हो ते जरा! ते खान = पठाण वाचून सोडा की हो.
असामीजी जरा गंमत केली, इतकंच.
असामीजी जरा गंमत केली, इतकंच. पण सिरीयसली, क्रिकेटर्सच्या या दुसर्या बाजू त्यांच्या आयुष्याचाच नाही तर त्यांचा क्रिकेटचा व नेतृत्वाचाही 'परस्पेक्टीव्ह' नक्कीच सुधारत असाव्यात ; कुणी सांगावं, विराट हा यामुळेच एक प्रेरणादायी व परिपक्व कर्णधार म्हणूनही नांव लौकीक मिळवेल !!
आता काय माहित कि इरफान
आता काय माहित कि इरफान खान्पण क्रिकेट खेळला असेल तर . लई टॅलेंटेड बेण आहे ते.
स्साऊथीला तीन बॉल लागले युसुफ पठाणला किती शॉर्ट बॉल लागतो मिस करायला हे लक्षात यायला
विराट हा यामुळेच एक प्रेरणादायी व परिपक्व कर्णधार म्हणूनही नांव लौकीक मिळवेल !! >> आमेन !!!
ड्रॉप्ड कॅचेस वर कोणाचीच
ड्रॉप्ड कॅचेस वर कोणाचीच कॉमेंट नाही?
ड्रॉप्ड कॅचेस वर कोणाचीच
ड्रॉप्ड कॅचेस वर कोणाचीच कॉमेंट नाही? >> dew. humidity मूळे ? Usually MI fielding is sharp.
Pages