Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिल्ली किंवा कोलकत्ता,
दिल्ली किंवा कोलकत्ता, कुणीतरी पीच मिस-रीड केलय असं बॉलिंग ऑप्शन्स बघून वाटतय.
स्पिनर चालले नाही अजिबत
स्पिनर चालले नाही अजिबत त्यामुळे कोलकत्याने मिस रिड केली असे म्हणू शकतो.
कोलकत्याने मिस रिड केली >>
कोलकत्याने मिस रिड केली >> बहुधा .... दिल्हीनेही दोघेच घेतलेत.
नाही दिल्ली कडे फक्त मिश्रा
नाही दिल्ली कडे फक्त मिश्रा आहे
बाकी शामी, खान, मॉरीस, ब्रेथ्व्हॉट असे चार फास्टर आहे
ऐन मोक्याच्या क्षणी रसल आउट
ऐन मोक्याच्या क्षणी रसल आउट झाला आणि मागोमाग उथप्पा गेला.
दिल्लीने जबरदस्त बॉलिंग केली. त्यांचे फास्टर आज चालले.
तिथेही ३ ३०० मारणारे मूठभरच
तिथेही ३ ३०० मारणारे मूठभरच आहेत.
>>>
कारण आंतरराष्ट्रीय खेळू शकणार्या दर्जाचे तिथे च राहात नाही म्हणून ..
आणि जडेजा तिथेच ३ ३०० मारणारा आहे हे लक्षात घ्या
ह्याच गाळातून सचिन, गावस्कर, कपिल, द्रविद, लक्ष्मण, कुंबळे, राहाणे वगैरे आलेत.
>>>>>>
नाही. सचिन गावस्कर दर्जेदार आहेत याचा अर्थ डोमेस्टीक फॉर्मेट दर्जेदार आहे असे नाही होत. हे कोचिंग क्लासेसच्या जाहीरातीसारखे झाले
दिल्लीमध्ये हळूहळू हिटींग
दिल्लीमध्ये हळूहळू हिटींग पॉवर उभरू लागलीय, गोलंदाजीबाबत प्रश्नच नाहीये त्यांच्या आणि आता तो संघ याच फॉर्ममध्ये राहिला तर आणखी धोकादायक होत जाणार ..
सचिन गावस्कर दर्जेदार आहेत
सचिन गावस्कर दर्जेदार आहेत याचा अर्थ डोमेस्टीक फॉर्मेट दर्जेदार आहे असे नाही होत >> LOL . वरती लिहिलेले खेळाडू खेळतअसेत तेंव्हा डोमेस्टिक क्रिकेट दर्जेदार समजले जात असे. ते खेळत म्हणून ते दर्जेदार होउ शकले असा एक पर्याय शक्य असेल हे लक्षात घे.
तुझ्या गल्लीतल्या रेकॉर्ड्स ना बाजूला ठेवून ज्या दिवशी तू रणजीमधे ३ वेळा ३०० मारलेला दुसरा बॅटस्मन लिहिशील त्या दिवशी आपण ३ वेळा ३०० काढणे उल्लेखनीय आहे कि नाहि ह्याबद्दल पुढे बोलूया.
दिल्लीचा विजय उल्लेखनीय होता कलकत्ता गेममधे आहे असे वाटलेच नाही. टूर्नामेंट जोशात सुरू करून शेवटी फिझ जाणार का ?
खरे तर पूर्वी रणजीचा फॉर्मेटच
खरे तर पूर्वी रणजीचा फॉर्मेटच गंडलेला होता. एका विभागातले तेच ते पाच सहा संघ दरवेळी आपसात खेळायचे आणि मग त्यातील विजेते पुढच्या फेरीत जायचे. त्यामानाने आता प्लेट एलिट वगैरे ग्रूप बनवायचे शहाणपण सुचलेय. असो विषयांतर नको. पण जडेजाची फलंदाजी नजरेला दिसतेय, त्याचा दर्जा त्यावरून मी स्वता ठरवू शकतोय, तर कुठलेही आकडे बघायची गरज मला तरी वाटत नाही. इथे आपण थांबू शकतो.
दिल्ली जिंकली. धतड धतड धिंग!!
दिल्ली जिंकली. धतड धतड धिंग!! चला, शनिवार कारणी लागला. आता शहाण्यासारखा गृहस्थाश्रम स्विकारावा, नाहीतर आक्खा वीकेंड गंडेल.
जबरीऑललराऊंड परफॉर्मन्स होता दिल्ली चा. अय्यर ने घेतलेला कॅच जबरदस्त होता. मिश्रा च्या कॅच ने मॅच फिरली. अर्थात असे कॅचेस हातात बसले तर बसतात. मॉरीस चे वर्क एथिक्स स्ट्रेट फ्रॉम द्रविड्स बूक ऑफ वर्क एथिक्स मधून घेतल्यासारखे वाटतात. नायर, बिलींग्ज आणी कार्लोस ची बॅटींग पण जबरदस्त. स्पेअर अ थॉट फॉर उथप्पा. छान खेळला, पण अजिबात साथ नव्हती बाकी कुणाची.
वॉर्नर चालला तर हैद्राबाद ची
वॉर्नर चालला तर हैद्राबाद ची टीम वेगळीच वाटते. विल्यमसन आल्यामुळे सॉलिडीटी आलीये बॅटींग ला. नेहरा आणी मुस्तफिझूर मुळे बॉलिंग पण स्ट्राँग वाटते. भुवनेश आणी स्रन चा सपोर्ट चांगला आहे. पण तरी मधल्या गाळलेल्या जागा भरायची नितांत आवश्यकता आहे.धवन, रेड्डी वगैरे मोठे खड्डे आहेत.
बंगळुरू ने आज गेल ला नाही खेळवलय. धाडसी, पण योग्य निर्णय. जॉर्डन आल्यावर त्यांची बॉलिंग स्ट्राँग वाटेल. केदार जाधव आणी लोकेश राहुल, दोघांना खेळवण्यात फार अर्थ नाहीये. केदार जाधव च्या बाबतीत मला नेहमी पु. लं.च्या असा मी असामी मधल्या नानु सरंजामेअवरच्या कॉमेट ची आठवण होते - 'आहे, आपला मराठी माणुस आहे म्हणुन घेतो संभाळून झालं'.
ऋन्मेश, तुमच्या गल्लीतील
ऋन्मेश, तुमच्या गल्लीतील क्रिकेट रेकॉर्डवर एक बाफ काढा ना राव. लोकं ही आपापले रेकॉर्ड लिहितील उदा माझ्या ६ वर्षाच्या मुलाने काल मला सांगीतले की त्याने ४५ बॉल मध्ये २४० रन्स केले आहेत. आणि एकदाही आउट झाला नाही म्हणे. ग्रेटच !
अरे राहुल काय खेळतोस राव,
अरे राहुल काय खेळतोस राव, जबरदस्त शॉट्स. ! फे.फे. बघतोयस का ? त्याच दिवशी आपण बोललो होतो त्याच्याबद्दल.
तात्या लोक बडवतील तुला अजून एका बाफाचे आवताण दिल्याबद्दल.
राहुलचे शॉट अफलातून आहेत.
राहुलचे शॉट अफलातून आहेत. आत्ताचा कट तर वॉव होता. जबरी !
असाम्या लोल
केदार हा हा .. सिरीअसली
केदार हा हा .. सिरीअसली साधारण अश्याच प्रकारचा धागा काढायचे मागेही माझ्या डोक्यात होते .. पण राहीलेच.. पुढे मागे नक्कीच तुम्हाला श्रेय देत काढेन
बाकी बेंगलोरने गेलला बसवले .. कमाल आहे, गेललाही बसवले जाते.. पोसणे जड जात असेल तर पंजाब पुणे अश्या एखाद्या गरीब टीमला देऊन टाका .. किंवा आज जाता जाता हैदराबादलाच देऊन जा ..
संघ असमतोल असल्याचे लक्षण आहे हे .. भले आज जिंकले तरी बेंगलोर आयपीएल मारणे कठीण आहे अश्याने .. गेल, कोहली, डिविलिअर्स .. आजच्या तारखेचे मर्यादीत षटकांचे टॉप तीन असूनही
आज तो सरफराज खान नव्हता का?
आज तो सरफराज खान नव्हता का? का नव्हता?
कालची डीडी वि. केकेआर मॅच
कालची डीडी वि. केकेआर मॅच कमाल झाली
DD is absolute example of teamwork.... प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार किंबहुना बहुतेकदा punching above thr weight परफॉर्मन्स देतायत
सॅम बिलींग्सने पहील्याच मॅचमध्ये प्रभावित केले.... करुण नायरने परत एकदा त्याच्या प्रतिभेची झलक दाखवली.... त्याने नरेनला मारलेले स्वीप आणि रिव्हर्स स्वीप तर केवळ अप्रतिम होते... श्रेयस अय्यर फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी काल मोक्याच्या वेळी त्याने घेतलेला अप्रतिम कॅच आणि डायरेक्ट थ्रोने केलेला रन आउट त्याला कदाचित अजुन एक संधी देउन जाइल
झहीरने पण काल अप्रतिम बॉलींग केली आणि मॉरीस असताना डेथ ओव्हरची कधीच काळजी वाटत नाही
मिश्रा फिरकीला अनुकुल नसणाऱ्या खेळपट्टीवर पण नेटाने गोलंदाजी करतो आणि १७वी ओव्हर करण्याचे धैर्य दाखवतो यातच सगळे आले
ब्रेथवेटने काल जे बॅटींगमध्ये केले ते त्याच्याकडून अपेक्षित होतेच पण त्या २२ रन्सवाल्या ओव्हर नंतर त्याने बॉलींग मध्ये जे कमबॅक केले ते काबिल-ए-तारीफ होते.... त्याचे यंग भारतीय खेळाडूंबरोबर bonding पण चांगले आहे असे जाणवते
थोडक्यात ताहीर आणि ड्युमिनीला बाहेर ठेवण्याचा निर्णय सोपा नव्हता पण द्रवीड आणि कंपनीचा "horses for courses" फॉर्म्युला काल चालला
झहीरने कॅप्टन म्हणुन इंप्रेस केले.... त्याच्यात एक सकारात्मकता जाणवते..... मागच्या मॅचनंतर तो संजय मांजरेकर त्याला इतके निगेटिव्ह प्रश्न विचारत होता पण या पठ्ठ्याने आपला असर्टीव्हनेस सोडला नाही
तो जे काही बोलतोय "processes in place" & "fredom to express" ही कुणाची भाषा आहे ते ओळखायला फारसे डोके लावावे लागत नाही
मुख्यतः तो मॅच झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूला जाउन जे appriciate करतो ते बघून बरे वाटते!
So far so good.... Long way to go DD!
<< कालची डीडी वि. केकेआर मॅच
<< कालची डीडी वि. केकेआर मॅच कमाल झाली>> अगदीं खरंय.
एखाद्या फलंदाजाने अफलातून खेळी करून शतक किंवा ८०- ९० झंझावाती धांवा केल्या तरीही त्याचा संघ जिंकण्याची गॅरंटी नसते, हें वारंवार या आयपीएलमधे दिसून येतंय. << DD is absolute example of teamwork...>> याला अनन्यसाधारण महत्व येतंय व तें स्वागतार्हही आहे !!
असामी, बंगळुरू ची मॅच नेमकी
असामी, बंगळुरू ची मॅच नेमकी मिस झाली. पण हायलाईट्स पाहीले. मस्त खेळला राहुल.
स्वरूप, दिल्ली बद्दलच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन!
जडेजाचे रेकॉर्ड्स काही
जडेजाचे रेकॉर्ड्स काही सांगोत.... असतीलही केली त्याने तीन त्रिशतके रणजीमध्ये पण त्याची सध्याची बॅटींग बघून तो किमान ३० उपयुक्त धावाही काढू शकेल अस विश्वास काही वाटत नाही!
फिरकीला अनुकुल पीचवर त्याचे स्कीड होणारे बॉल फलंदाजाला अडचणीत नक्कीच आणतात पण पाटा खेळपट्टीवर त्याची बॉलींग पण मला फारशी इंप्रेस करत नाही!
सरळ सोप्या शब्दात मला तो ओव्हररेटेड खेळाडू वाटतो!
अंगी गिफ्टेड स्कील्स नसताना पण त्यावर मेहनत घेउन यशस्वी झालेली आदरणीय उदाहरणे आहेत क्रिकेटमध्ये आणि त्या पाश्र्वभूमीवर अंगी गुणवत्ता असताना (जे त्याचे रणजीचे रेकॉर्ड सांगतात) त्याला न्याय न देण्याचा दोष पूर्णपणे त्या खेळाडूकडे जातो!
मिलरला नारळ् दिला . मुरली
मिलरला नारळ् दिला . मुरली कॅप्टन झला
पुण्याचे नशिब लय खराब झाले
पुण्याचे नशिब लय खराब झाले आधी पिटरसन, मग डुप्लेसी आता मिचेल मार्श जायबंदी झाले
गुजराती पटेलने गुजरातला खोलला
गुजराती पटेलने गुजरातला खोलला
५ बॉल मधे ४ विकेट गुंडाळला
५ बॉल मधे ४ विकेट
गुंडाळला
गुजरात दिन च्या दिवशी गुजरात
गुजरात दिन च्या दिवशी गुजरात संघाविरुध्द धडाकेबाज गोलंदाजी करून अक्षर पटेलने पाटीदार समाजाचा बदला घेतला
रहाणे लवकर बाद होवूनही
रहाणे लवकर बाद होवूनही पुण्याने चांगली कामगिरी चालवलीय १३०-३ [१६ षटकं]
<< असतीलही केली त्याने तीन
<< असतीलही केली त्याने तीन त्रिशतके रणजीमध्ये पण त्याची सध्याची बॅटींग बघून....>>
नोकरीला लागल्यापासून प्रत्येक वर्षीं फक्त एकाच मुद्द्यावर तूं प्रोमोशन मागतोयस,
" बोर्डात मला ८५% मार्क्स मिळाले होते " !!!
भाऊ, हे मस्त जमलय. धोनी फारच
भाऊ, हे मस्त जमलय.
धोनी फारच मर्यादीत फलंदाज आहे. सगळा मोमेंटम घालवला.
भाऊ जबरी ! जडेजाला फक्त
भाऊ जबरी !
जडेजाला फक्त भारतात खेळताना घ्यायला हवे. ते पण स्वेअर टर्नरवरच. मगच तो ८५% मार्क मिळवतो ( ते ही बॉलिंग मध्ये)
रोहीत शर्मा !!! चॅम्पियन
रोहीत शर्मा !!!
चॅम्पियन !!
मुम्बई ईंडियन्स !!
आयपीएल २०१६ ...
नाचो
Pages