आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई - एक विकेट गमावून पहिल्या ६ षटकात ६४ ! रोहित- रायुडू जोडी टिकली तर कोलकताचं कांहीं खरं नाहीं !!

पोलार्ड समोर सतीश सारख्याला बॉलिंग द्यायचा चुकीचा निर्णय गंभीरने कसा घेतला आश्चर्य वाटते.. जुगारही म्हणता येणार नाही याला ..

अरे कोणी अजून स्पिनर उरला नसल्यामूळे.

पोलार्ड्चा उनड्डकट ला मारलेला दुसरा सिक्स किती उंच गेला.

मुंबईने पोलार्डवर दाखवलेल्या विश्वासाचं आज सार्थक झालं !
नरैनने 'बोलींग अ‍ॅक्शन' मधे केलेल्या बदलामुळे तो कमी भेदक ठरत असावा.
गंभीर फारच 'ओव्हर रिअ‍ॅक्शन' देत असतो मैदानावर; बघवत नाही कधीं कधी तो तोंड वाकडं करतो तें !!

मुंबईने पोलार्डवर दाखवलेल्या विश्वासाचं आज सार्थक झालं ! >> +१

गंभीर्बद्दल भाऊ तो कधीच मनात एक नि तोंडावर एक ठेवत नाही Wink

MOM perfect दिलय. मला वाटले पोलार्ड च्या खेळीमूळे स्वे होते का काय. रोहोत ची इनिंग की इनिंग होती.

जबरी मॅच !!

असामी, तू फक्त स्कोर फॉलो करतोस की मॅच पहातोस पण ? (असशील, तर ह्या ऑड वेळेला शक्य होतं का? )

पराग मी घरून काम करतोय महिनाभर तेंव्हा मॅचेस बघता येतात. इतर वेळी स्कोर फॉलो करतो.र्तसा ऑफिसमधे एक पंटर आहे जो मोबाईलवर स्ट्रीम करतो पणत्थोडा कानकोंडे होते ऑफिसमधे बघताना.

असामी, मग नारायणला संपवायचा होता, किंवा शिल्लक ठेवायचे झाल्यास उमेश यादवला आणायचे होते. रसेलही परवडला असता.. किंवा मग चावला मॉर्केल यांना बाहेर ठेवायचा निर्णय चुकला म्हणायला हवे .. बरे तो हॉग ही होताना आधीच्या सामन्यांत.. त्यालाही बाहेर ठेवलेय..

गेल्या वेळी दिल्लीने छान गंडवला होता पोलार्डला.. आणि तो असे गंडतोच.. आपल्या पट्ट्यात सापडणारा बॉलरची वाट बघत खेळतो तो.. त्याला ते सतीश आणि उनाडकट आयतेच दिले गंभीरने.. बहुधा तो सेट व्हायच्या आत सतीशची ओवर काढूया म्हटले असेल त्याने, पण पहिला छकडा पडताच गंभीरचा चेहर्‍यावरचे टेंशन दिसून येत होते की आता ही ओवर कशी जाणार याचे..

शेवटी बाद फेरीच्या प्रेशर सामन्यांमध्ये डेथ बॉलिंग कोणाची सरस हा फॅक्टर फार महत्वाचा ठरणार आहे ..

असामी नाही ऐकला .. नारायणची शेवटची ओवर संपल्यावर आता काही उरले नाही सामन्यात म्हणत एका दुसर्‍या अर्जंट कामाला लागलो.. नंतर स्कोअर मोबाईलवर औपचारीकता म्हणून चेक केले तर अपेक्षे आधीच संपलेली..
बाकी इथे कुठे आधी उल्लेख केला की नाही माहीत नाही पण गंभीर माझ्यामते आयपीएलचा बेस्ट कॅप्टन आहे. धोनीपेक्षाही बेस्ट .. आक्रमक आहे, विकेट घेण्यावर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी त्याचे प्लान नेहमी रेडी असतात.. म्हणून आज वेगळे वाटले

<< शेवटी बाद फेरीच्या प्रेशर सामन्यांमध्ये डेथ बॉलिंग कोणाची सरस हा फॅक्टर फार महत्वाचा ठरणार आहे ..>> मला वाटतं साधारण दहा षटकांअखेर जो स्कोअर असेल व येणारे फलंदाज कोण आहेत याचं गणित मांडूनच गोलंदाजीची व्यूहरचना करणं अधिक महत्वाचं. यातही लवचिकता ठेवायला हवी. 'डेथ ओव्हर्स'साठीच तुमचे सर्वोत्तम गोलंदाज ठेवलेत तर फलंदाजही आधींच आक्रमक पवित्रा घेतील व मॅच आधींच हातची जाण्याची शक्यता अधिक.

रैनाची बातमी नाहि दिसली कुठे. काय झाले ?

यातही लवचिकता ठेवायला हवी >> +१

डु प्लेसिस ऐवजी ख्वाजा हा उत्ताम पर्याय वाटतो आहे.

रैनाने नुसता तो जाणार आहे असं २ दिवसापूर्वी सांगितलं होतं, कधी जाणार ते काही तो बोलला नाहिये..

झी न्यूजवाले महान आहेत..

चला Auction नंतर ज्या दोघांना (गप्टील आणि ख्वाजा) घेतले नाही म्हणून क्रिकइन्फोभर आरडाओरडा झाला होता ते दोघेही आलेत आता आयपीएलमध्ये..... बघू काय उजेड पाडतात ते!

तांबे दिल्लीविरुध्द बॉल अडवताना बोटावर पडला होता ना!
त्यानिमित्ताने शिविल कौशिकला संधी मिळेल का?

स्वरुप, आरड्या-ओरड्याला फार काही कारण लागत नाही. तरी ही दोन जेन्युईन नावं (करंट फॉर्म बघता) आहेत. लोक्स जुन्या-पुराण्या आठवणींवर रेकमेंडेशन्स टाकतात. उत्तम उदाहरण म्हणजे ईरफान पठाण (असामी, प्लीज नोट, पठाण, नॉट खान Wink )

भाऊ सर्वोत्तम गोलंदाज आणि डेथ ओवर स्पेशालिस्ट यांचा आपसात संबंध असेलच असे नाही. शेवटच्या षटकांत कशी गोलंदाजी टाकावी याचे तंत्र किंबहुना कला अवगत नसेल तर भलेभलेही या फॉर्मेटमध्ये धुपले जातात.

<< सर्वोत्तम गोलंदाज आणि डेथ ओवर स्पेशालिस्ट यांचा आपसात संबंध असेलच असे नाही >> एकदम मान्य. मला एवढंच सुचवायचं होतं कीं याबाबतींत असा कोणता फॉर्म्युला नाहीय. जर एखादा फलंदाज ८-१० व्या षटकांतच सुंसाट मारतच सुटला तर त्याला रोखायला डेथ ओवर स्पेशालिस्ट आधीच आणणं भाग आहे. ही लवचिकता मला सुचवायची होती.

झहीर खुप स्मार्ट बॉलर आहे. त्याच्या फिल्डींग आणी बॅटींग मधल्या आळशीपणामुळे त्याच्यावर मी टीका केलीये, पण बॉलिंग मधे तो हात, खांदा, पाठ, पाय वगैरे बरोबर डोक्याच्या आतल्या पाव किलो मेंदुचा जो उपयोग करतो, तो जबरी आहे. परवा च्या मॅच ला त्याची आकडेवारी काहीही सांगो, पण त्याने खुप स्मार्ट बॉलिंग केली, २-३ संधी सुद्धा निर्माण केल्या ज्या कन्व्हर्ट केल्या असत्या, तर... असो.

डिंडा त्या दिवशी निव्वळ पाऊस पडून गेलेला म्हणून चालला. अन्यथा त्याची क्षमता आहे का अशा विकेट्स घेण्याचे?

अशीच बॉलिंग "बेन्नी"ने बांग्लादेश विरुध्द केली होती तेव्हा सुध्दा पाऊस पडून गेलेला आणि बेन्नीला भन्नाट स्विंग मिळत होता.
आता बेन्नीला कोणी बॉलिंग काय बॅटींग सुध्दा देत नाही.

"हो पण तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट नक्कीच नाहिये" - असं ठामपणे नाही म्हणता येणार. गेल्या ४ मॅचेस मधे त्याने १५ नंतर ४ ओव्हर्स टाकल्या आहेत, ज्यात ४५ रन्स देऊन २ विकेट्स काढल्या आहेत. त्यातली बंगळूरू विरुद्ध ची २१ रन्स ची ओव्हर बाजुला काढली तर हेच स्टॅटीस्टीक्स ३ ओव्हर्स मधे २४ रन्स आणी २ विकेट्स होतं.

आकडेवारीच्या पलीकडे जाऊन ईंपॅक्ट जो असतो, त्याचा विचार करता, असं नाही म्हणता येत की झहीर च्या हातात बॉल आहे म्हणजे होपलेस परिस्थिती आहे. किंबहूना असं सतत वाटत रहातं की काहीतरी घडू शकेल.

Pages