आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेल स्टेनची पत्रिका एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवायला हवी; टी-२०मधे त्याचा कांहींच प्रभाव कां पडत नाहीं ? Wink

स्टेन हा रेअर कमोडिटी - टेस्ट दर्जाचा जेन्युईन फास्ट बॉलर आहे. अशा लोकांना जपलं पाहीजे. किमान आयपीएल सारख्या स्पर्धांपासून तरी. पण 'सबसे बडा रुपैय्या' असल्यामुळे ते शक्य नाही. २-३ वर्षांपूर्वी राजस्थान विरुद्ध हैद्राबादकडून खेळताना (ज्या मॅच मधे दिशांत याङ्निक ने शेवटच्या ओव्हर मधे स्टेन ला २ बाऊंड्रीस मारून मॅच जिंकून दिली होती), स्टेन ने मिडविकेट बाऊंड्रीवर डाईव्ह मारून बॉल अडवायचा प्रयत्न केला होता. तेव्हा कॉमेंटेटर (ईयान चॅपेल?) म्हणाला होता, 'ही आयपीएल आहे, ईथे इतका जीव टाकून फिल्डींग करून दुखापतीचा धोका स्टेन सारख्या बॉलर ने घेऊ नये.'

'ही आयपीएल आहे, ईथे इतका जीव टाकून फिल्डींग करून दुखापतीचा धोका स्टेन सारख्या बॉलर ने घेऊ नये.' >> मला नाहि पटले हे. IPL खेळताना sincerely खेळू नका हे सांगणे लबाडीचे आहे. एक तर खेळा किंवा खेळू नका. पण खेळत असला तर मिळणार्‍या पैशाला जागा.

स्टेन बद्दल मला असे वाटते कि तो फारसा अचूक गोलंदाज कधीच नव्हता. ज्या दिवशी त्याला सूर सापडला कि तो दे दणादण उडवू शकतो. पण तसा सूर् सापडायला जेव्हधा वेळ लागतो तेव्हढा वेळ T20 मधे मिळत नाही. त्याचा वेगाचा अशावेळी फायदा कमी नि तोटा जास्त होतो. परत त्याच्याकडे हुकूमी यॉर्कर नाही जे त्याच्या विरुद्द जाते.

असामी, IPL सारख्या स्पर्धांकडे पहाण्याचा काही माजी खेळाडूंचा / कॉमेंटेटर्स चा दृष्टीकोन सांगितला. IPL, CPL, BBL, Big Bash हे प्रदर्शनीय सामने (exhibition games) आहेत असा एक सूर आहेच.

"तो फारसा अचूक गोलंदाज कधीच नव्हता' - हे मत असेल >> अचूक म्हणजे मॅक्ग्राथ सारखा हुकुमी हव्या त्या टप्प्यावर मारा करत राहाt विकेट घेणारा . That is not Steyn's forte अस मला वाटते. He excels at swinging ball both ways (I can go ga-ga over that outswinger of his) at consistently high pace. That ability is what makes him one of the greatest.

चॅपेल ला सांगा कि IPL नसते तर watson, warner, smith, johnson, faulkner हि नावे तिशी ओलांडल्यावर आली असती ऑसी टीम मधे Wink

असामी, आय थिंक त्याला स्वतःला बर्‍याचदा टेस्ट असली की एक विशिष्ट जोर चढतो. तो त्याचा स्वतःचा एक्स फॅक्टर आहे. तसा जोर त्याला लिमिटेड ओव्हर्समध्ये येत नाही.

बाकी मॅक्ग्राथसारखा अचूक बहुधा कोणीच नसेल. Happy

बाकी मॅक्ग्राथसारखा अचूक बहुधा कोणीच नसेल >> मुरली ! त्याचे काही नाण्यावर बॉलिंग करतानाचा व्हिडियो पाहून साष्टांग नमस्कार घालावासा वाटला. 'बेदी महामूर्ख आहे' ह्याची त्या व्हिडियोनंतर खातरजमा झाली.

तो त्याचा स्वतःचा एक्स फॅक्टर आहे >> हे पटतेय. ३-४ वर्षांपूर्वी एका IPL मॅच मधे पहिल्या ओव्हर मधे स्टेन नंतर दोन बोल्ड काढले होते fast out swinging deliveries वर. साउथ आफ्रिकन बॅट्समन होते दोघेही. त्यतल्या एका नंतर स्टेन ची reaction जांभई देणे हि होती.

एक शक्यता अशीही आहे कीं टी-२० साठीं स्टेन बराचसा 'प्रेडीक्टेबल' ठरत असावा. तो वेग, स्विंग व नेटके चेंडू टाकण्यावरच भर देतो जे कसोटीमधे जपून खेळणार्‍या फलंदाजाला त्रासदायक होतात. टी-२०मधे बेधडक खेळायलाच उतरलेल्या फलंदाजाना अशा गोलंदाजीपेक्षां, 'चेंज ऑफ पेस', ऑफ स्टंपच्या शक्यतो बाहेर, यॉर्कर्स अशा वैविध्यपूर्ण व अनपेक्षित गोलंदाजीने रोखणे किंवा बाद करणे अधिक सोपे जात असावे. स्टेन टी-२०साठीच्या स्वतःच्या गोलंदाजीत हा बदल करण्यात कमी पडत असावा. [ किंबहुना, त्याच्या गोलंदाजीचा वेग हा टी-२०मधे त्याला शापच ठरत असावा !]

असामी, पेसमध्ये म्हणत होतो. Happy 'बेदी महामूर्ख आहे' ह्याला अनुमोदन आहे, पण तो ह्या बाबतीत नव्हता. आयसीसीने नियम बदलायच्या आधी मुरलीची अ‍ॅक्शन चकिंगमध्ये मोडत होती, हे खरे आहे. त्यांनी तो नियम प्रॉमिनंटली मुरलीमुळे बदलला हेही खरे आहे. बेदीची स्वतःची अ‍ॅक्शन खूप सुंदर होती, त्यामुळे त्याला 'आम्हीही फेकून जास्त विकेट्स काढल्या असत्या' असे वाटत असेल कदाचित. Happy

त्यतल्या एका नंतर स्टेन ची reaction जांभई देणे हि होती. >> Rofl

मुरली च्या अ‍ॅक्शन बद्दल मला सुद्धा बेदी चं मत पटतं (बाकी बाबतीत, असामी चं म्हणणं खरंय). जर बॉल थ्रो करताना, बॅटींग करताना, हात सरळ रहातो, तर बॉलिंग करताना ईतका वाकवून टाकायचा हे चकिंग आहे. त्यामुळे मुरली फेकू (ह्या शब्दाला हल्ली एक नवीनच संदर्भ आहे, तो सोडून द्या) आहे हे माझं मत आहे. एक प्रश्नः हे असले अत्रंगी प्रकार रावणाच्या देशातच का निर्माण होतात? (उदा. हात वाकवून, नाहीतर गोफणीसारखा फिरवून बॉल टाकणे वगैरे)

दुसरा मुरलीधरन म्हणून अवघ्या एकाच सामन्यात फेमस झालेला अजंथा मेंडीस सध्या कुठल्या डबड्यात पडला आहे ? बिचार्‍याला आयपीएल मधे घेतला आणि प्रत्येक फलंदाजाने त्याच्या अंगावरची पीस वेचून वेचून ओरबडून काढल्यानंतर कुठे दिसलाच नाही. Rofl
आता वेळ मुस्तफिजूरची आहे. पहिल्या १-२ सामन्यात चांगली गोलंदाजी केली पण प्रेडीक्टेबल वाटला कालच्या मॅच मधे.
धुलाई सब की होगी Wink

"एकाच सामन्यात फेमस झालेला अजंथा मेंडीस" - नाही. आक्खा एशिआ कप गाजवलेला पठ्ठ्याने. नंतर ची टेस्ट सिरीज पण आपल्याला भारी पडला होता (एकमेव टेस्ट सिरीज जिथे ईंडियाने एकदाच रिव्यू सिस्टीम वापरली). मग सेहवाग ने २०० केल्या आणी मेंडीस ची पीसं काढली. तिथुन त्याच्या पीछेहाटीची सुरूवात झाली.

आयसीसीने नियम बदलायच्या आधी मुरलीची अ‍ॅक्शन चकिंगमध्ये मोडत होती, हे खरे आहे. त्यांनी तो नियम प्रॉमिनंटली मुरलीमुळे बदलला हेही खरे आहे >> बरोबर पण त्या नंतरही बेदी ज्या पद्धतीने डूख ठेवून मुरलीवर भाष्य करत असे ते अतिशय भयंकर होते. मुरली रीटायर झाल्यावर जे गरळ बेदीने ओकले होते त्यामूळे बेदीबद्दलचा आदर पार मोडीत निघाला. १५ च्या नियमाआधी बरेच बॉलर होते जे क्लीन अ‍ॅक्शन समजले जात पण फेकू निघाले असते. १५ डिग्रीज्बद्दल, होल्डींग नि बिशप चा एक व्हिडियो युट्युबवर आहे तो बघितला तर लक्षात येईल. अगदी होल्डींग सारखा टेक्निकॅळिटीज्ला धरून असणारा माणूस पण मान्य करून गेला.

मग सेहवाग ने २०० केल्या आणी मेंडीस ची पीसं काढली. तिथुन त्याच्या पीछेहाटीची सुरूवात झाली. >> सेहवाग ने आम्ही त्याला फास्ट बॉलर सारखे खेळायला सुरूवात केली त्यानंतर त्यात काही मिस्टरी उरली नाही असे म्हणाला.

धुलाई सब की होगी >> त्यात नवल नाही तर धुलाई नंतर ते कसे respond करतात हे मह्त्वाचे आहे. तिथे खसा कस लागतो नि खरा बॉलर कोण आहे हे उघड व्हायला सुरू होते. रहमान तसा वाटतोय खरा.

मांजरेकर म्हणतोय कि १५० पुरे होतील ह्या पिचवर . भलताच विश्वास आहे बंगलोरच्या बॉलिंग वर.

मांजरेकर कसला पनवती आहे राव, ईशांत शर्माबद्दल दोन डॉट बॉल टाकले म्हणून कौतुक केले, पुढचा सिक्स.

जिंकली एकदाची पहिली बॅटींग करणारी टीम!

त्याच्या नेहमीच्या साथीदारांशिवाय धोनी हरल्यासारखा दिसतोय.... या संघातल्या कुणाविषयीच त्याच्या मनात विश्वास दिसत नाहीये.... काल तर गोलंदाजांवर त्याने उघड उघड टीका केली आणि पीटरसनच्या ऐवजी मॉर्केलला आत घेण्याचे संकेत देउन टाकले....
त्याचा नेहमीचा कूलनेस दिसत नाहीये सध्या.... तो थोडासा उतावीळ झाल्यासारखा वाटतोय मला!

बंगलोर काल जरी जिंकले असले तरी मोठ्या धावांच्या आव्हाना समोर दडपणाखाली येवून पुण्याने विकेट टाकल्या.... गोलंदाजीवर बंगलोरला मेहनत घ्यावीच लागेल

पुण्याचा लोचा नेमका पीटरसन मुळे झाला ऐन वेळेस त्याचा पाय लचकला आणि त्याला मैदान सोडावे लागले त्यानंतर स्मिथ मुर्खासारखा पळत होता. मागे विराटकडे बॉल जात आहे ते त्याने बघितलेच नाही किमान त्याच्या समोर असणार्या रहाणे ने तरी सांगायला हवे होते. त्याचे काम होते ते.. धोनीने स्वतःला प्रमोट करून उपयोग झाला नाही उलट त्याने रनरेट फारच स्लो केला एका बाजुने रहाणे तर दुसर्‍याबाजूने धोनी. दोघे टेस्ट मॅच खेळल्यासारखे खेळत होते. पीटरसन अथवा स्मिथ दोघांपैकी एक जरी राहिला असता तर मॅच फिरली असती.
धोनी ऐवजी परेरा यायला हवा होता. जेव्हा एका बाजुने रहाणे हळू खेळत होता तर दुसर्‍या बाजूने बॅट फिरवणारा हवा होता. धोनीला सेटअप व्हायला फार वेळ लागतो. पण त्याने दडपण घेतले आणि त्याने घेतलेले दडपण बघून रहाणेला दुप्पट दडपण आले Rofl
या दडपण दडपण मधे मॅच हारले.

च्यु.......... चिरकुटसारखे हारली मुंबई. अक्षरशः जिंकलेली मॅच गेली. यात मोलाचा वाटा रोहीत शर्माचा आहे. या आळशीला प़ळता येत नाही. स्वतः पण पळत नाही दुसर्‍याला उगाच पळवतो आणि आउट करतो.

स्वरूप, धोनीच्या कूलनेस विषयी: पोट भरलेलं असताना तत्वज्ञान सांगणं जसं सोपं असतं तसच हे आहे. परिस्थिती आटोक्यात आहे / आणता येईल हा विश्वास असेपर्यंतच ते कूल वगैरे असतं. बाकी सब मिडीया का बनाया है| ज्या कारणावरून (वय) धोनीने एकेकाळी सिनियर प्लेयर्स ना बाहेरचा रस्ता दाखवला, तेच 'वय' त्यालासुद्धा आड येतय. फक्त बीसीसीआय च्या राज्यात ह्या गोष्टी बोलायच्या नसतात (अधिक माहितीसाठी लिहा अथवा भेटा: श्री. हर्षा भोगले, डेनी मॉरिसन, अ‍ॅकरमन).

मुंबई हारली नाही, दिल्ली जिंकली. झहीर च्या कॅप्टन्सी आणी झहीर, ताहीर, मिश्रा आणी मॉरीस च्या बॉलिंग ने कमाल केली. कसले दोर आवळले! व्वा!! मस्त झाली विकेंड ची सुरूवात. राहुल द्रविड ला क्वचित एक्साईट झालेलं पाहिलय, त्यात आज चा समावेश आहे.

>>बाकी सब मिडीया का बनाया है|
खर आहे

बीसीसीआयच्या राज्यात नसल्या तरी मायबोलीवर बोलू शकतो की आपण!

अरे काल दिल्लीची मॅच नाही बघता आली.....अर्थात फॉलो करत होतोच क्रिकैंफोवर अपडेट्स.... आणि हॉट स्टारवर हायलाइट्स पाहिल्या रात्री.... द्रवीड खरच एक्साइट झाला होता.... Rare Sight!

कुडोज टू मॉरीस.... कन्सिस्टंटली भारी बॉलींग करतोय डेथ ओव्हर्समध्ये..... मिश्रा पण एक नंबर!
श्रेयस अय्यरचे पण एक-दोन शॉटस काल कडक होते

Those are eating their words who had critisize DD before the word Go.... and even more after first match!

जबरदस्त कोहली. या मॅच मधे पठ्ठ्याने मारलीच सेंचुरी.

मॅच बेंगलोरच्या खिशातच आहे. फक्त फिंच आणि मॅक्युलम यांना पहिले ६ ओवर सांभाळले तर जिंकलेच

Pages