आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स जुन्या-पुराण्या आठवणींवर रेकमेंडेशन्स टाकतात. >> +१. उथ्थप्पा बद्दल उसासे टाकणारे अजूनही आहेत. This is real fan following.

सर्वोत्तम बॉलर म्हणजे नक्की काय ? मुंबईचे उदाहरण घे. त्यांचा सर्वोत्तम बॉलर मॅक्लेशान नि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बुमराह. पण मॅक्लेशान शेवटच्या ओवर टाकतानाही विकेट घेतो. लायन्स चा दोन्ही कामे ब्राव्हो करतो.

मॉरिस मस्त प्लेयर आहे रे टी-२० / वन-डे चा. प्रश्नच नाही.

शिवल फक्त विचित्र अ‍ॅक्शन वर यशस्वी होणं अवघड आहे. पॉल अ‍ॅडम्स ला त्याच्या त्या अ‍ॅक्शन चं नाविन्य संपल्यावर कसला धुतला होता!

उथप्पा, गंभीर, युवराज, ईरफान ह्यांना बरच फॅन फॉलोईंग आहे.

रहाणे शांतपणे रन्स चा रतीब घालतोय. कसला सॉलिड प्लेयर आहे! आणी क्लासी फटके असतात त्याचे, बघताना मजा येते.

रहाणे शांतपणे रन्स चा रतीब घालतोय. कसला सॉलिड प्लेयर आहे! आणी क्लासी फटके असतात त्याचे, बघताना मजा येते. >> +१. फक्त राहाणे ला नंतर टेंपो वाढवणे जमत नाही हा drawback आहे. कोहली, शर्मा नि राहाणे मधे हा फरक आहे. हेच गंभीर ला पण लागू पडते. हे दोघेही इनिंग सुरू ठेवतात पण कोणीतरी दुसर्‍या बाजूने explode व्हावे लागते.

स्मिथ असला athletic नि फिजेटी प्लेयर आहे राव. सारखे काहि ना काहि अ‍ॅडजस्ट करणे, इथे हात लाव, ते हलव सुरू असते. एकदम जयसूर्या आठवतो. प्रविण कुमार ला दोन पायामधून मारलेला फ्लिक काय खतरू होता.

असामी रहाणेबद्दल सहमत.... फार क्वचित त्याने मारधाड केलीय.... स्पीडलॉक बसवलेली महामंडळाची बस आहे तो.... रस्ता कितीही मोकळा असू दे.... आपला स्पीड ठरलेला.... पण एकदम सेफ प्लेयर..... त्याच्या लिमिटेशन्ससह आपल्याला आवडतो तो!

"च्या लिमिटेशन्ससह आपल्याला आवडतो तो!" - १+

"कोणीतरी दुसर्‍या बाजूने explode व्हावे लागते." - १+

कुठलीही मॅच असो, हे असे अँकर्स खुप महत्वाचे असतात. कोहली, एबी वगैरे अपवादात्मक आहेत. पण अँकर्स असले की एक सुरक्षितता जाणवते.

याच्या लिमिटेशन्ससह आपल्याला आवडतो तो! >> मलाही.

मला वाटते एक अँकर हवा. अर्थात कोहलीही अँकर रोल करत असतो. त्यामुळे रहाणेचा पत्ता कट होत असावा.

" कोहलीही अँकर रोल करत असतो. त्यामुळे रहाणेचा पत्ता कट होत असावा." - रहाणे धवन च्या जागी हवा टीम ईंडिया मधे.

धवन चं नेमकं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे कुणास ठाऊक? पण त्याच्या एकंदरीत वागण्या-बोलण्यावरूण्यावरून, दहातली एखादी मॅच कामगिरी करणे, बाकी वेळा 'मला कुठल्याच कॅप्टन ने कधी मधल्या फळीत खेळायला सांगितलं नाहीये', 'आता त्यांना पण कळेल की धवन आलाय' वगैरे बढाया मारणे, मिशीवर ताव देणे आणी तिन्ही फॉर्मॅट्स मधे ईनिंग ओपन करण्याची क्षमता आपण बाळगुन आहोत असा गैरसमज उराशी बाळगणे असं काहीसं असावं.

एक गंमतः वॉर्नर आणी धवन आपआपल्या राष्ट्रीय संघांसाठी तिन्ही फॉर्मॅट्स मधे ईनिंग ओपन करतात. हाच ऑस्ट्रेलिया आणी भारत क्रिकेट संघाच्या दर्जातला फरक आहे. Wink

मला वाटते एक अँकर हवा. अर्थात कोहलीही अँकर रोल करत असतो. त्यामुळे रहाणेचा पत्ता कट होत असावा. >> +१. शर्मा नि कोहली पण तोच रोल चोख बजावू शकतात नि त्यापुढे जाऊन स्वतःला explosively explode होत express करू शकतात. त्यामूळे राहाणे चा रोल प्रश्नांकित होतो. पण उद्या समजा रैना सारखे १-२ जण मिळाले तर राहाणे परफेक्ट फिट बनेल. मला स्वतःला राहाणे ला टेस्ट नि ODI पलीकडे खेळवू नये असे वाटते. फार मुष्किलीने तो, पुजारा सारखे perfect test batsman मिळतात. त्यांना करप्ट का करा असा विचार.

मला मात्र 'अँकर रोल' ही संकल्पनाच टी-२०शीं विसंगत आहे असंच वाटतं. २० षटकं तर खेळायचीं असतात; पॅड बांधून या, तुमच्या कुवतीनुसार जमेल तेवढा कमाल स्कोअर करा आणि चालू पडा ! एक बाजू धरून ठेवणं म्हणजे टी-२०त धांवगतीला रोखणंच . ५-६ फलंदाज व दोन-तीन अर्धे-कच्चे कां होईनात ऑलराऊंडर्स जर २० षटकं खेळून काढूं शकत नसतील तर अँकर असा काय फरक घडवून आणणार आहे ?

शेवटच्या दोन षटक श्वास रोखून ठेवणारी होती

मस्त झाली मैच
डिंडा च्या 4 ओव्हर मधे 40 धावा

या मैच मधे सर्वाधिक रनआउट झाले असतील

जडेजा हा बावळट माणूस आहे. हे अनेकदा सिद्ध झालं आहेच म्हणा. पण फक्त धोनीच त्याचा चांगला वापर करून घेऊ शकतो असे दिसते.

"फक्त धोनीच त्याचा चांगला वापर करून घेऊ शकतो असे दिसते." - अन्सॉल्व्ह्ड ट्रिव्हिया क्वश्चनः जडेजा च्या नेत्रदिपक खेळीने जिंकलेल्या ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचे दाखले द्या Wink

करेक्ट. पण मी बॉलिंगबद्दलही (ऑलराउंडर) लिहितोय. तो बॅट्समन म्हणून गजब माणूस आहे. ३ ३०० कसे काढले कोणास ठावूक.

मलाही तो नसला तर आवडेल. Happy

अन्सॉल्व्ह्ड ट्रिव्हिया क्वश्चनः जडेजा च्या नेत्रदिपक खेळीने जिंकलेल्या ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचे दाखले द्या >> फे फे विनोद म्हणून ठिक आहे पण तुला खरच जाडेजा च्या ३-४ वर्षांपूर्वीचा भारतातल्या ODI सामन्यांमधला बॉलिंग performance आठवत नाही ? Lords test match ? आफ्रिकेविरुद्ध खेळलेली दिल्लीतली टेस्ट मॅच ? 'जाडेजाची कॅपॅसिटी काय आहे नि तिचा पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा' हे फक्त धोनीला जमते हे पटले.

केदार मी मागे तुला सांगितलेले कि त्याचे ३०० वेगळ्या तर्‍हेने काढलेले आहेत. त्याचा बॅटींग अ‍ॅप्रोच तिथे वेगळा होता. ते होम ग्राऊंड वर काढलेले आहेत नि रणजीमधे काढलेले आहेत. त्या जोरावर तो आफ्रिकेमधे पण ३०० काढेल अशी माझी अपेक्षा नाही.

असामी, जडेजा बॉलिंग मधे (सपोर्टींग कंडीशन्स असतील) तर वन-डे मधे एक कंटेनिंग ते विकेट टेकिंग बॉलर (४था किंवा ५वा) म्हणून ठीक आहे. द.अफ्रिकेविरुद्ध सगळ्या स्पिनर्स नी (जडेजा, मिश्रा, अश्विन) चांगलीच कामगिरी केली. लॉर्ड्स च्या टेस्ट चा उल्लेख होणार हे माहीत होतं म्हणुनच मी ५ मॅचेस म्हणालो. पण म्हणून एक जेन्युईन ऑलराऊंडर म्हणून, की जो बॅटींग आणी/किंणी/बॉलिंग च्या जीवावर मॅच जिंकुन देईल, जडेजा टीम मधे बसू शकत नाही.

समजा पहिल्या ४ विकेट्स स्वस्तात गेल्या असतील, तर ५ व्या बॅट्समन बरोबर जडेजा उरलेल्या चाळीस-एक ओव्हर्स मधला मेजर पोर्शन खेळून मोठी ईनिंग खेळेल आणी मॅच काँपिटीटीव्ह बनवेल किंवा ३ मुक्ख्य बॉलर्स ना धुवायला काढल्यावर, बॅटींग विकेटवर जडेजा समोरच्या बॅटींग टीम चा कोलॅप्स घडवेल असं वाटत नाही.

असो. आयपीएल च्या धाग्यावर परत विषयाकडे येऊ. उद्याच्या २ मॅचेस विषयी काही प्रेडिक्शन्स? बंगळुरू - हैद्राबाद आणी कोलकत्ता-दिल्ली.

फे फे. साधी गोष्ट आहे कि हाताचा बोटावर मोजण्याएव्हढेच खेळाडू असतात जे स्वतःच्या जोरावर सामने जिंकून देउ शकतात. अशा वेळी तुझ्या प्रश्नातून काय अनुमान बांधायचे ?

बंगळुरू - हैद्राबाद >> बःगलोर जिंकेल . They are due for a win.

कोलकत्ता-दिल्ली >> दिल्ली हरेल. कोलकत्ता जास्त सेटल्ड टीम वाटते. शिवाय मुंबैविरुद्धाचा पराभव त्यांना अधिक प्रेरीत करेल.

"अशा वेळी तुझ्या प्रश्नातून काय अनुमान बांधायचे ?" - हेच की जडेजा त्या मोजक्या ऑलराऊंडर्स च्या यादीत बसत नाही. Happy

बंगळुरू जिंकु शकेल असं मलाही वाटतय, कारण एक वॉर्नर आणी एक मुस्तफिझूर किती दिवस पुरणार?

कोलकत्ता चा स्पिन अ‍ॅटॅक चांगला आहे, गंभीर चं होम-ग्राऊंड आहे. दिल्ली पण चांगली खेळतीये. मॉरीस, झहीर, ताहीर आणी मिश्रा बॉलिंग ची बाजू चांगली संभाळताहेत. पण नेगी आणी नदीम च्या जागी अय्यर आणी मयंक / हेरवाडकर आले तर आणखी सॉलिडीटी येईल बॅटींग ला.

झहीर २०-२० पेक्षा ५०-५० मध्ये डेथ बॉलर म्हणून प्रभावी वाटतो. जिथे बॉल जास्त जुना होतो.
लहानपणी आम्हाला यॉर्कर मारू शकणारा, रिव्हर्स स्विंग करू शकणारा, पाकिस्तानी बॉलरच्या तोडीस तोड एक बॉलर म्हणून जहीरचे फार कौतुक होते.

जडेजा तसा युजलेसच आहे. गोलंदाजीत ठराविक खेळपट्ट्यांवरचाच बादशाह आहे तो. आणि फलंदाजीत मी त्याला आजवर कधीच मोजला नाही. कधी कधी मी हरभजनला मोजतो.

बाकी त्या रणजीतल्या ३०० धावा म्हणजे आंतरराष्ट्रीयमधील १०० किंवा ७०-८० धावा असे सरळधोपट गणित कधीच नसते. जर समोरच्या गोलंदाजांचा दर्जा तुम्हाला झेपेल असा असेल तर तुम्ही ३०० काय स्टॅमिना असल्यास हजार धावा माराल, आणि पाच दिवस खेळाल. आणि तिथेच एखादा वर्ल्ड क्लास प्लेअर स्टॅमिना / ईंटरेस्ट / पेशन्स कमी असल्याने २०० मारून आता बस बोलेन.
पण वरच्या लेव्हलला खेळताना एकदा का समोरच्या बॉलरचा दर्जा वाढला आणि तुमच्या फलंदाजी पात्रतेच्या वर गेला की तुम्ही दहा धावाही निव्वळ नशीबानेच बनवू शकतात. तश्याच काहीश्या नशीबावर की वशिल्यावर तो टिकलाय ..

रहाणेबाबत सहमत .. हेच गंभीरलाही लागू यालाही सहमत .. एका वेळानंतर वाटते की याने आता आउट व्हायची वेळ झाली आहे.. अगदी या आयपीएलचेच कशाला तर आपण विंडीजशी वर्ल्डकपला हरलो तेव्हाही नंतर नंतर मी त्याच्या बाद व्हायची वाट बघत होतो ..
मात्र या सर्वात तो काही अप्रतिम शॉट खेळून डोळ्यांचे पारणे फेडतो .. लोकं कोहली सचिन कोहली सचिन करतात, पण बरेचदा सचिनची आठवण मला रहाणेचे काही फटके करून देतात .. काही समोर मारलेले फटके तर स्पिनरच्या पॅडवर टाकलेल्या चेंडूंना लेगला ढकतानाचे फटके

हेच की जडेजा त्या मोजक्या ऑलराऊंडर्स च्या यादीत बसत नाही. स्मित >> पण तसे म्हणत कोण होते ? मी तर फॉअकनरच्या वर जाडेजाला वर पाठवण्यावरून 'रैना लिमिटेड ओव्हर्समधे भारतचा कप्तान का होउ शकला नाही' हे ताडत होतो.

जर समोरच्या गोलंदाजांचा दर्जा तुम्हाला झेपेल असा असेल तर तुम्ही ३०० काय स्टॅमिना असल्यास हजार धावा माराल, आणि पाच दिवस खेळाल. >> एक मिनिट हा. जाडेजा निव्वळ फलंदाजीच्या जोरावर टीममधे येईल असे मी म्हणत नाहि पण माझ्या माहितीप्रमाणे ३ ३०० मारलेला तो एकमेव भारतीय फलंदाज आहेत. अगदी संयमाचा महामेरू समजले जाणारे गावस्कर, बॉयकॉट, हनिफ मेहमद सुद्धा त्या पंक्तीमधे नाहित. जाडेजाच्या समकालीन फलंदाजांमधेही एक सोडा दोन तीनशे काढणारे दोघेच आहेत (तेंव्हा गोलंदाजीचा दर्जा, पिचेस वगैरे मुद्दे बाजूला ठेवू) पाच दिवस खेळून काढलेले किंवा हजार धावा काढलेले एका हाताच्या बोटांवर मोजणारे आहेत. तेंव्हा टी़का करताना सुद्धा एव्हढा वाहत जायची गरज नसावी. Lets admit that 3 times 300 is a something exceptional feat ad he deserves kudos for that.

तुम्ही दहा धावाही निव्वळ नशीबानेच बनवू शकतात. >> तसेच म्हणायचे तर भाऊ गुणवत्तेपेक्षा नशिबाचा वाटा असणे कधीही मह्त्वाचे असतेच. कधीतरी किम ह्युज बद्दल शोधाशोध करून वाच. किंवा भाऊंचे डोके पिकव. कळेल.

पण माझ्या माहितीप्रमाणे ३ ३०० मारलेला तो एकमेव भारतीय फलंदाज आहेत
>>>>>>>

माझे गल्लीतले रेकॉर्ड सांगितले तर ईथले कैक अवाक होतील. कदाचित सचिननेही त्याच्या गल्लीत खेळताना ते रेकॉर्ड केले नसतील. Happy
मुद्दा लक्षात घ्या. जर क्रिकेट रणजी लेवललाच संपले असते तर जडेजा किंवा त्यासारख्यांची गिणती आपण वर्ल्डक्लास फलंदाजांमध्ये केली असती. पण जशी लेवल वाढत जाते तसा गाळ खाली बसत जातो.१

बाकी मी तुमचे विधान कापायला ते म्हटले नव्हते. फक्त जडेजाचा वर विषय निघाला आणि त्याच्या त्या त्रिशतकांचा विषय आला म्हणून जडेजाबद्दलचे आणि त्याच्या त्रिशतकांबद्दलचे माझे मत मांडले.

खरे तर त्याचा हा रेकॉर्ड लपवायला हवा. जगभराचे लोकं त्याची फलंदाजी बघत असतात, अश्यात त्यांना समजले की याने डोमेस्टीक क्रिकेटमध्ये असे पराक्रम केलेत तर उगाच आपल्या डोमेस्टीक क्रिकेटच्या दर्जाचे जगभरात हसे होत असेल Happy

मुद्दा लक्षात घ्या >> मुद्दा एव्हढाच आहे कि ज्या गाळाबद्दल वर तू बोलत आहेस तिथेही ३ ३०० मारणारे मूठभरच आहेत.

डोमेस्टीक क्रिकेटच्या दर्जा >> ह्याच गाळातून सचिन, गावस्कर, कपिल, द्रविद, लक्ष्मण, कुंबळे, राहाणे वगैरे आलेत. तेंव्हा इतरांना ह्या दर्जाचे काय वाटते ह्याबद्दल शंका नसावी.

Pages