Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Take a bow, ViKo.
Take a bow, ViKo.
क्लास इनिंग कोहली..... सुपर्ब
क्लास इनिंग कोहली..... सुपर्ब सपोर्ट बाय राहुल!
पण बंगलोरची बॉलींग बघता अजुनही ते हा स्कोअर डिफेंड करु शकतील असा भरवसा वाटत नाहीये!
बॉलिंग यथातथा आहेच, पण
बॉलिंग यथातथा आहेच, पण त्यापेक्षा सुद्धा लायन्स ची बॅटींग जबरदस्त आहे.
५ ओव्हर ५० रन्स आणि मॅक्युलम
५ ओव्हर ५० रन्स आणि मॅक्युलम सारखा अजुन उभा आहे.
अॅज आय से मॅक्युलम ला
अॅज आय से
मॅक्युलम ला सांभाळता आले नाही.
१९वी ओवर इक्बाल ला देऊन
१९वी ओवर इक्बाल ला देऊन कोहलीने घात केला. २१ धावा हव्या होत्या वॉट्सनला जर ती दिली असती तर किमान १० च्य वर धावा निघाल्या नसत्या इक्बालने १४ धावा देऊन शेवटच्या ओव्हर मधे अवघ्या ७ धावा ठेवल्या. धावा कमी दिल्या असत्या तर शेवटच्या ओव्हर मधे गुजरात वर प्रचंड प्रेशर आले असते.
त्यात पण पहिला बॉल वॉट्सनने नो बॉल आणि दुसरा बॉल वाईड टाकून हातभारच लावला.
२१ धावा हव्या होत्या वॉट्सनला
२१ धावा हव्या होत्या वॉट्सनला जर ती दिली असती >> काहि फरक पडला नसता. बंगलोरची बॉलिंग हा त्या<चा Achilles heel आहे. २० मधल्या फक्त चार वॉटसन टाकू शकतो बाकीच्या ८०% बोंब लागली आहे. चहल पण चालत नाहिये. शमसी नवीन आहे तोवर सद्दी असेल, अजून २-३ मॅचेस नंतर तोही रुळावर येईलच.
वॉट्सन ने किमान धावा तरी कमी
वॉट्सन ने किमान धावा तरी कमी दिल्या असत्या एकदम १४ देउन शेवट्ची ओव्हर ७ धावावर आणून तर ठेवली नसती.
धोनी नेहमी बेस्ट बॉलरला १९वी ओव्हर देतो जेणे करून त्यात कमी धावा निघाल्या तर शेवटच्या ओव्हर मधे बॅट्समन धावा काढण्याच्या प्रेशरमधे विकेट देतो. (आठवा बांगलादेशबरोबरची मॅच)
वॉट्सन ने किमान धावा तरी कमी
वॉट्सन ने किमान धावा तरी कमी दिल्या असत्या >> आत्याबाईला मिशा असत्या तर वगैरे वगैरे ... बांग्लादेशपेक्षा मुंबई इंडीअयन्स बरोबरची मॅच आठवा जिथे वॅटसन च्या ओव्हरमधेच पोलार्ड्ने सामना संपवला होता कि.
हो पण तो पोलर्ड होता पोलार्ड
हो पण तो पोलर्ड होता पोलार्ड आणि कार्तिक मधे काही फरक तरी करा राव
सह्याद्री समोर पर्वतीच्या टेकडीची तुलना ?
गुजरात लायन्स एक संघ म्हणून
गुजरात लायन्स एक संघ म्हणून या स्पर्धेत उठून दिसतोय व दिवसें दिवस त्यांची कामागिरी सुधारतेय , हें नक्की !
सह्याद्री समोर पर्वतीच्या
सह्याद्री समोर पर्वतीच्या टेकडीची तुलना ? >> वर बांग्लादेश चे उदाहरण तुम्हीच लिहिलेय ना ? तसही पोलार्ड ने काय दिवे लावलेत पहिल्या वर्षी खेळल्यानंतर खर तर ? साधा सरळ मुद्दा हा आहे कि तुमच्या बेस्ट बॉलर ला तुम्ही कोणती ओव्हर देणार ? ह्याचे उत्तर कधीही सेकंड लास्ट किंवा लास्ट ओव्हरच बरोबर आहे हे होउ शकत नाही. धोनी सेकंड लास्ट ओव्हर देतो म्ह्णून कोहलीने द्यायला हवे ह्यात काही अर्थ नाही. सेकंड लास्ट दिली असती तर लायन्स ला एव्हढे लक्षात नसते आले का कि "शेवट्ची ओव्हर अब्दुल्ला किंवा कोहली स्वःत टाकणार तेंव्हा १९ व्या ओव्हर मधे ५-६ रन्स घेऊन काम होउ शकेल." वादच घालायचा असेल तर शेवटच्या २-३ ओव्हर्स फास्ट बॉलर्साठी राखून ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा होता असे होउ शकेल पण रिचर्ड सन ज्या तर्हेने रन्स देतोय ते बघून त्याने काय फरक पडला असता,. शामसीच्ला कदाचित ठेवायचा प्रयत्न करायला हवा होता ? पण मग वॉटसनला १९ वी ओव्हर द्यायचे लॉजिक इथे कोहलीने शामसीबाबत वापरले. मधल्या ओव्हरसमधे शामसीला वापरून रन रेट आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येईल. हे सगळे सिच्युएशनल आहे. त्यावेळी कप्तानाला जे बरोबर वाटले ते तो करणार. इथे कोणी क्रिस्टल बॉल घेऊन बसलेला नाहिये त्यामूळे हे सगळे खयाली पुलाव आहेत. बंगलोरची बॉलिंग हा त्यांचा कमकुवत दुवा आहे हे तीन सलग मॅचेस मधे सिद्ध झालेय. नुसत्या खंडीभर धावा काढून दर वेळी जिंकता येईलच असे दिसत नाही.
बिचारा विराट कोहली.... त्याची
बिचारा विराट कोहली.... त्याची शतकी खेळी वाया गेली!
>> गुजरात लायन्स एक संघ म्हणून या स्पर्धेत उठून दिसतोय
अगदी अगदी भाऊ..... दिल्लीच्या खालोखाल माझ्या आवडीचा संघ बनतोय तो हळूहळू..... रैना अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करतोय एक कर्णधार म्हणून
रहाणेने परत एकदा प्लॅटफॉर्म बनवून दिला पण त्यांना एक चांगला पिंच हिटर पाहिजे.... फाफ, रहाणे, स्मिथ सगळे वेळ घेतात सेट व्हायला!
धोनी वॉज टिपीकल धोनी इन लास्ट ओव्हर!
पुण्याने कोलकत्यासमोर १६१चं
पुण्याने कोलकत्यासमोर १६१चं लक्ष्य ठेवलंय. कोलकत्याने जपून खेळलं तर हा स्कोअर कठीण नाही. पण, टी-२० मधे कुणालाही व कांहींही गृहीत धरूं नये, हें पथ्य पाळणं अत्यावश्यकच !!
उथाप्पा आणि गंभीर दोघेही आउट
उथाप्पा आणि गंभीर दोघेही आउट झालेत लवकर.... आज खरी कसोटी आहे त्यांच्या मिडल ऑर्डरची!
आर.अश्विन हातभर चेंडू वळवतोय.
आर.अश्विन हातभर चेंडू वळवतोय. 'ड्यू फॅक्टर' गोलंदाजाना फारसा नडत नाहीय असं वाटतं. अश्विनला शेवटच्या षटकांसाठीं ठेवणं कदाचित खूप फायद्याचं ठरण्याची शक्यता.
कोलकत्ता- ११९-५ [ १४ षटकं] !
कोलकत्ता- ११९-५ [ १४ षटकं] ! एम. अश्विनही चेंडू हातभर वळवतोय. कोलकत्ता अडचणीत !!!
कोलकता हरतां हरतां ८विकेटस
कोलकता हरतां हरतां ८विकेटस गमावून जिंकले ! फार कौतुकास्पद नाहीं हा विजय .
ॲल्बी मॉर्केल आणि सौरभ
ॲल्बी मॉर्केल आणि सौरभ तिवारीला रिलीज करण्याचा डीडीचा निर्णय योग्य होता हे कालच्या सामन्याने सिद्ध केले.... कोलकाताच्या बाकीच्या खेळाडून्ना काल जरा बॅटींग प्रॅक्टीस मिळाली!
आज जर मुंबईने पार्थिव पटेल आणि हार्दिक पांड्याला खेळवले तर मुंबईच्या थिंकटॅंकबद्दल मलातरी विश्वास उरणार नाही!
"आज जर मुंबईने पार्थिव पटेल
"आज जर मुंबईने पार्थिव पटेल आणि हार्दिक पांड्याला खेळवले तर मुंबईच्या थिंकटॅंकबद्दल मलातरी विश्वास उरणार नाही!" - उडला विश्वास? मुंबईने तीच टीम खेळवली आहे.
चुकांमधून शिकला तो रोहीत कसला
चुकांमधून शिकला तो रोहीत कसला
सर्वात परफेक्ट टीम कोलकताची
सर्वात परफेक्ट टीम कोलकताची वाटते. बॅटींग मधे उत्तप्पा आणि गंभीर किमान पहिले ६ ओव्हर तरी खेळून काढतात सॉलिड सलामी मिळाली की नंतर सोपे जाते नंतर ७ ते १५ ओव्हर मधे एक दोन विकेट्स गेल्या तर मनिष पांडे , शकिब सारखे सावरून खेळणारे फलंदाज अचुकपणे त्या ओव्हरला येतात नंतर १४ ओव्हर नंतर रसेल, पठाण सुर्यकुमार सारखे उचलून फेकून देणारे फलंदाज येतात त्यामुळे प्रत्येक फलंदाज त्याच्या साजेश्या बॅटींग प्रमाणे अचुक षटकांमधे येतो. त्यामुळे त्यांचा बॅलन्स बरोबर बसतो. यात एखाद दुसरा फलंदाज जरी अपयशी ठरला तरी चालून जाते. कालच्या मॅच मधे उतप्पा आणि गंभीर लवकर गेल्यावर सुर्यकुमारने पट्टा चालवला. नंतर गिअर बदलून स्लो खेळायला लागला. बाकीचे येऊन कॅमिओ करून जात होते. एकाने बाजू लावून धरली होती. आणि दुसर्या बाजूने रसेल पठाण यांनी आडवे तिडवे मारून रनरेट हातबाहेर जाऊ दिला नाही.
गोलंदाजी मधे पण मॉर्कल आणि यादव यांच्या पैकी कुणला मार बसला तर नरेन हॉग चावला सांभाळून घेतात.
नरेन ला मार क्वचितच बसतोय. त्यामुळे त्याचे ४ ओव्हर ची धास्ती गंभीरला नसते तर प्रतिस्पर्धी संघाला असते. त्यामुळे बाकीचे १६ ओव्हर वरच लक्ष द्यावे लागत आहे.
"चुकांमधून शिकला तो रोहीत
"चुकांमधून शिकला तो रोहीत कसला " - शिकायचा कंटाळा आला असेल;) किंवा उगाच नवीन खेळाडू घ्यायचे म्हणजे त्यांची नावं लक्षात वगैरे ठेवावी लागतील ह्या कल्पनेचा कंटाळा आला असेल
जोक्स अपार्ट, पण मुंबई कदाचित ही मॅच जिंकेलही (पंजाब काही फार मोठी दिवे लावत नाहीये), पण टॉप ऑर्डर मधे किमान दोघे (रोहित च्या बरोबरीने) खेळले पाहीजे. कृणाल पंड्या वर अवलंबून नाही रहाता येणार. तो शेवटची आतशबाजी करू शकतो, पण डावाला आकार कितपत देऊ शकेल ह्याची कल्पना नाही.
<< (पंजाब काही फार मोठी दिवे
<< (पंजाब काही फार मोठी दिवे लावत नाहीये),>> मुंबई तरी काय दिवे लावतेय ? मुंबई ६ सामने ४गुण, पंजाब ५ सामने २ गुण !
घ्या रोहीत गेला पहिल्याच
घ्या रोहीत गेला पहिल्याच ओव्हरला.
घ्या रोहीत गेला पहिल्याच
घ्या रोहीत गेला पहिल्याच ओव्हरला. :: कमीत कमी स्वतः रन आऊट नाहि झाला किंवा इतर कोणाला नाहि केला ह्या वेळी. Look at the bright side. He scores only while chasing
हो या वेळी. गेल्यावेळॅस दोन
हो या वेळी. गेल्यावेळॅस दोन जणांना रनआऊट केलेले.
क्राईम मास्टर गोगा सारखे
रनआउट मास्टर रोहा. आया हु तो रनआउट कर के ही जाऊंगा. त्याचा बकरा कोहली जास्त असतो
२०१४ मधे जसं एकदम सिमन्स ने
२०१४ मधे जसं एकदम सिमन्स ने मुंबई ला लेट सर्ज मिळवून दिला होता, तसं काहीसं गुप्तील करेल असं मला फार वाटतय.
तो उस्मान ख्वाजा कुठल्या टीम
तो उस्मान ख्वाजा कुठल्या टीम मधे आहे. ?
विश्वचषकात इतका उत्तम खेळलेला तर त्याला अजुन चांस कसा दिला नाही? आहे कुठली ही टीम ?
उस्मान ख्वाजा नाहीये
उस्मान ख्वाजा नाहीये आयपीएलमध्ये.... पुण्याला चांगला चान्स आहे केपीच्या बदल्यात त्याला घ्यायला
Pages