आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< पटेलांच्या पार्थिवची पण फिफ्टी झाली..... कमाल आहे पंजाबच्या बॉलर्सची >> जॉनसनचा विकेट घेतलेलाच चेंडू नेमका 'नो-बॉल' व्हावा !! सचिनची पुण्याई, आणि काय !! Wink

मला हे विकेट गेल्यावर नो-बॉल चेक करण्याच्या सवयीविषयी साशंकता आहे. आऊट नसताना असे किती नो-बॉल्स अंपायच्या नजरेतून निसटतात? ते स्टंप्स मधे लाईट लावतात, तसं काहीसं तंत्र नो-बॉल च्या बाबतीत नाही का वापरता येणार? म्हणजे नो-बॉल (ओव्हरस्टेपिंग चा) पडला की लाईट लागतो वगैरे? किंवा एखादा काँप्युटर प्रोग्रॅम जो बॅकग्राऊंडमधे प्रत्येक बॉल रियल टाईम चेक करेल वगैरे.

अरे " एखादा काँप्युटर प्रोग्रॅम जो बॅकग्राऊंडमधे प्रत्येक बॉल रियल टाईम चेक करेल" हे केले तरी नो बॉल दर वेळी चेक करण्यामधे वेळ जाईल म्हणून करत नाहित. ह्याउलट विकेट गेल्यावर नोबॉल असेनोतर बॅट्समन्साठी सर्वात अन फेयर होते ते म्हणून चेक करणे साहजिक आहे.

सध्याच्या फॉर्मवर हार्दिक ऐवजी त्याचा भाऊ पुढे नको का ?

मोहित शर्माच्या रन अप च्या सुरूवातीला धावताना उजव्या पायावर जोर टाकून काय विचित्र सुरूवात करतो. त्याची बॉलिंग परत सुधारली असे म्हणायचे कि पोलार्ड समोर असल्यामूळे उगाच भास झाला ?

<< मोहित शर्माच्या रन अप च्या सुरूवातीला धावताना उजव्या पायावर जोर टाकून काय विचित्र सुरूवात करतो. >> खरंच खटकतं तें.
<< सध्याच्या फॉर्मवर हार्दिक ऐवजी त्याचा भाऊ पुढे नको का ? >> आज हार्दीक आला २-३ षटकंच शिल्लक असतानाच व अर्थातच बॅट फिरवायच्या सूचना घेवूनच. आज तरी त्याला दोष देणं योग्य नाहीं. तिसर्‍या क्रमांकावर त्याला नाही पाठवलं याबद्दल उलट रोहितचं कौतुकच करायला हवं.

पोलार्डला नारळ द्यायची गरज आहे .. एंडरसन गुप्टील वगैरे असताना याला कशाला पोसताहेत हे अजून समजले नाही. मागचा सामना त्यानेच स्पिनरला चाचपडून घालवला .. आजही कोंबडी पकड चालू होते .. कुनाल पांड्याला का नाही पुढे पाठवले समजले नाही.. आता त्या पोलार्डल्ला गोलंदाजी देऊन संघात राहायची एक संधी देत आहेत.. तो नक्की कोणाचा एवढा लाडका आहे समजत नाही.. मुंबई हा सामना हरला तर नवल नाही.. पण हरू नये असे प्रकर्षाने वाटतेय..

१३९ व मॅक्सवेल आऊट [ बुमराह ] ! आतां १५+च्या सरासरीने ३ षटकांत धांवा करणं पंजाबला फारच कठीण. मूंबई सुस्थितीत.

सहै विरुद्ध रापुसु. नेहरा खेळतोय हैद्राबाद कडून आणी दिंडा रापुसु कडून. दिंडा च्या पुण्याकडून खेळतानाच्या कटु आठवणी आहेत. तब गेल था, आज वॉर्नर है| दिंडा तो फिरभी दिंडा है|

पोलार्ड मुंबईसाठी मिस्टरी होणार आहे. तो ऑल राऊंडर म्हणून आहे म्हणायचे तर आत्तापर्यंत फक्त मोजक्या ओव्हर्स टाकल्या आहेत फक्त. बॅट्स मन म्हणून तो out of form or yet not fully recovered state मधे आहे. मुंबईचा त्याच्यावर विश्वास आहे असे दिसतेय म्हणून सात मधले सहा सामने खेळला आहे. अँडर सन कदाचित अधिक अचूक फिट ठरला असता. पार्थिव खेळल्यामूळे गपटिल सलामीला येण्याची शक्यता वाटत नाही. अँडरसन ला आत आणून बघायला हरकर नसावी.

आजची मॅच बघायला मजा येईल. हैद्राबादची बॉलिंग अजून तरी भारी होते आहे. पुण्याची बॅटींग अजिबात क्लिक होत नाहिये. धोनी ने अजून वर खेळूण काहि फरक पडेल असे वाटते का ?

मिचेल मार्श, सौरभ तिवारी वगैरे त्या जॉबसाठी जास्त सुटेबल वाटतात मला. पडझड झालीच तर धोनी खाली असेलच.

<< पोलार्ड मुंबईसाठी मिस्टरी होणार आहे >> एक सहजचं निरीक्षण-
मुंबईचा पोलार्ड हा प्रथमपासूनचा खेळाडू आहे. सचिनचा तर त्याच्यावरचा भंरवसा स्पष्ट होता व पोलार्डने तो सार्थही ठरवला होता. गेल कोणत्याही संघातून खेळताना जसा कांहींसा उदासिन [indifferent] वाटतो [असेलच असं नाहीं], तसा पोलार्ड वाटत नाही, निदान मुंबई संघातून खेळताना तरी. त्याचा फॉर्म नसला तरीही तो खेळताना [फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण] कसोशीचे प्रयत्न करतो हें जाणवतं. कदाचित त्याच्या या ' सेन्स ऑफ इनव्हॉल्व्हमेंट'मुळे मुंबई त्याच्याबाबत आशावादी असावी .

डिंड्याला 9 आयपिल मधे पहील्यांदाच विकेट आणि मेडन पहिल्याच ओव्हर मधे मिळाली

आयएसआयएस ला atombomb मिळाला यापेक्षा डिंडाला वार्नर चा विक्ट मेडन ओवर मधे मिळाला ही ब्रेकिंग न्यूज आहे

इतका कमी स्कोअर असूनही हैदराबाद पुण्याला सहजासहजी हा सामना जिंकूं देणार नाही असं दिसतंय ; रहाणे शून्यावर बाद !
<< डिंडाला वार्नर चा विक्ट मेडन ओवर मधे मिळाला ही ब्रेकिंग न्यूज आहे >> दिंडाने निदान आज तरी चांगली गोलंदाजी केलीय , हेंही मान्य करायला हवं !

Rofl

डिंदाचे नशिब एक्दम झक्कास होते काल. अगदी त्याने ऐश्वर्याला अथवा चार्लीस थेरोन ला जरी प्रपोज केला असता तर त्यांनी "हा" म्हणटले असते. इतके जबरदस्त होते. Happy

Pages