आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा रोहित चालला.
आयपीएल सुरु झाल्यापासून बर्‍याच जणांना शिंग फुटणार होते . सुरुवात झाली म्हणायची

मायबाप Happy

स्वरूप, मयंक आणी ताहीर नाहीयेत. जयंत यादव आणी ड्यूमिनी आहेत. चालसे. बघू आता काय घडतं ते.

क्रिकईन्फो ला सकाळ कडून पत्रकार आयात केले आहेत का? ब्रेकिंग न्यूज सिंड्रोम झाल्यासारखा वाटतो. खूप खाली गेलेल्या, पण चर्चा होतील अशा कॉमेंट्स सतत वर आणत रहातात. उदा. काल चं ते 'जुनं सीएसके' प्रकरण आणी आज हे 'शामी का बरं नाही खेळत?' बरं ह्यावर क्रिकईन्फो ची स्वतःची टिप्पणी काहीच नसते. उगाच कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायची आणी जाणार्या-येणार्या प्रत्येकाला, 'बघ रे जरा चालवून' म्हणून आमंत्रण देत रहायचं.

झहीर.... जबरा पहील्या ३ ओव्हर्स..... मजा आली बघायला!

पण विकेट्स काढल्या पाहिजेत लवकरात लवकर..... नाहीतर शेवटी पिसे काढतील!

पंजाबची बोंब लावली आहे. दोन्ही टीम्स ठिक ठाकच वाटतात.

कसला काढलाय मार्शला मिश्राने. >> वोहराचा जास्त छान होता रे. वोहरा ला अजिबात कळला नाही बॉल कुठे जाणार ते

अमित मिश्रा 3 ओवरमध्ये 11-4
त्याची चौथी ओवर कुठे गेली?
हे असे बरेचदा होते. स्पिनर चालतात तेव्हाच न संपवता नंतर गरज पडेल तेव्हा विकेट काढायला ठेवतात आणि शेवटी स्लॉग ओवरला फास्टर यॉर्कर मारून रन रोखतील, स्पिनरला उगाच मोठे फटके बसतील म्हणून स्पिनरच्या ओवर शिल्लकच राहतात.
अगदी धोनी सुद्धा शेवटी फास्टरवरच जास्त भरवसा दाखवतो. स्पिनर एके स्पिनरनेच शेवटपर्यंत बूच मारणारी टीम एकेकाळी श्रीलंका होती.

>>वोहराचा जास्त छान होता रे.
हो .... पण मी पोस्ट टाकली तेंव्हा तो खेळत होता Wink

मिश्राला चौथी ओव्हर न देण्याचा निर्णय पूर्णतः अनाकलनीय
असो..... आता नीट टिकून खेळा म्हणाव!

<< असो..... आता नीट टिकून खेळा म्हणाव! >> अगदीं तुम्हाला हवं तसंच खेळले ! Wink
डि कॉकच्या खेळाचं रहस्य " He is absolutely fearless" यांत असल्याचं एका समालोचकानं म्हटलं. अगदीं पटलं !

हो भाऊ.... अगदी नीट टिकून खेळले.... नाहीतर पहिली विकेट गेल्यावर वाटलेले की पडझड सुरु होतेय का काय?

आजचा विजय त्यांच्या मोराल बूस्ट साठी आवश्यकच होता.... नंतरनंतर केलेल्या हल्ल्यामुळे तर रनरेट पण चांगला सुधारला.... आता पुढची मॅच RCB शी आहे.... तीही बंगळूरात.... बघू काय होतय ते!

त्या टी शेखरचे आणि द्रवीडचे काय पटत नाही काय?..... द्रवीड, ॲप्टॉन एका साइडला आणि तो शेखर दुसऱ्या साइडला बसले होते..... अजुन कुणाला जाणवले का ते?

"त्या टी शेखरचे आणि द्रवीडचे काय पटत नाही काय?." - द्रविड शी न पटणारे सुद्धा लोक्स आहेत?? असतील बुवा. हापूस आंबा न अवडणारे सुद्धा लोक ह्या जगात आहेत.

अय्यर ची विकेट कॉट साहा, बोल्ड शर्मा, गिव्हन बाय रवी होती का?

काल संजू सॅमसनही औचित्यपूर्ण खेळला; लक्ष्य मोठं नाहीय, डि कॉक छान फटकेबाजी करतोय हे लक्षांत घेवून त्याने स्वतःच्या आक्रमक फलंदाजीला चांगला आंवर घातला. पोरगं मॅच्युअर होतंय म्हणायचं. पण त्याचं यष्टीरक्षण बघणं मात्र कठीणच दिसतंय 'आयपीएल'मधे !
<< द्रवीड, ॲप्टॉन एका साइडला आणि तो शेखर दुसऱ्या साइडला बसले होते..... अजुन कुणाला जाणवले का ते?>> द्रविड सहसा गर्दीत बसून खेळावर चर्चा न करतां एकटा बसून एकाग्रतेने खेळ पहात असतो, असं जाणवतं. मला वाटतं कुणाशी न पटण्याशीं त्याचा संबंध नसावा. अर्थात, << असतील बुवा. हापूस आंबा न अवडणारे सुद्धा लोक ह्या जगात आहेत.>> ही शक्यता तर आहेच .

आज दोन सामने व दोन्ही महत्वाचे ! घरीं डबल + १ टेन्शन -

अग, तुमच्या सिरीयल्ससाठी घरांत वेगळा टीव्ही मागा ना; पण तुमच्या महिलामंडळाचा
" राज्यांत आयपीएल सामन्यांच्या टीव्ही प्रक्षेपणावरही आतां बंदी आणावी", हा ठराव कां ?
mishkil.JPG

होहो..... त्या अय्यरला ढापला..... स्नीकोमीटरवर पण काही दिसत नव्हते

संजू नेहमीच जबाबदारी ओळखून खेळत आलाय.... नुसता मारधाड वीर नाहीये तो..... He has some cricketing sense.... काल सामना चालू असताना समालोचक त्याच्याशी बोलत होते तेंव्हा सुद्धा तो मध्ये योग्य वेळ थांबून खेळावर पूर्ण लक्ष देत होता!

सामना संपवायला ड्युमिनी किंवा ब्रेथवॅट ला न पाठवता नेगीला पाठवून त्याला confidence देण्याचा निर्णय ही आवडला

पुढच्या सामन्यात ब्रेथवॅट ऐवजी ताहिरला घ्यावे.... चिन्नास्वामीवर बंगळूरवाले त्याला धूधू धुतील.... तिथे डोकेबाजच बॉलर हवा!

भाऊ.... व्यंगचित्र Happy

<< काल सामना चालू असताना समालोचक त्याच्याशी बोलत होते तेंव्हा सुद्धा तो मध्ये योग्य वेळ थांबून खेळावर पूर्ण लक्ष देत होता!>> व तिथंही बोलताना त्याचा आत्मविश्वास व सहजता जाणवली ! Seems to be a lovable character !

आजची पहिली मॅच कोलकाता वि. हैद्राबाद
या मॅचमध्ये कोलकाताचे पारडे निसंशय जड आहे

त्यांची सलामीची जोडी फॉर्मात आहे (फक्त गंभीरने चांगल्या सुरुवातीनंतर इनिंग पेस करायला पाहिजे).... मनिष पांडे, रसेल पण चांगल्या फॉर्मात आहे..... सुर्यकुमार यादव आणि युसुफ पठाणला अजुन संधी मिळाली नसली तरी त्यांनी याआधी स्वताला प्रूव्ह केलेले आहे
हॉग चांगली बॉलिंग टाकतोय.... त्याच्या जोडीला नरीन आल्यावर मजा येइल पण मग एकसुरीपणा घालवण्यासाठी कुलदीप यादवच्या ऐवजी उमेश यादव किंवा उनाडकटला आत घ्यावे लागेल अणि हॅस्टींगला बाहेर बसवावे लागेल..... मुंरोला अजुन एखादा चांस मिळेल
रसेलला सरसकट मेन बॉलर म्हणून न वापरता सांभाळून वापरले तर तो जास्त परिणामकारक ठरु शकतो

रसेल, नरीन, हॉग आणि मुंरो हे चौघे खेळतील बहुतेक आज!
पण एकंदरीत they have a balanced squad

दुसऱ्या बाजुला हैद्राबादमध्ये वॉर्नर सोडला तर बॅटींगचा उजेडच आहे.... धवन अजुनही चाचपडतोय .... इऑन मॉर्गन टीममध्ये कशासाठी आहे हा मोठा प्रश्न आहे.... रेड्डी आणि हुडा चांगले स्लॉगर आहेत पण त्याना आधी तितका भक्कम प्लॅटफॉर्म तर मिळाला पाहिजेल
मुस्तफिझुरने मागच्या सामन्यात चांगलेच प्रभावित केलेय.... सरफराजने ज्या पद्धतीने भुवनेश्वर कुमारला धुतले त्याने त्याचा कॉंफिडंस चांगलाच डगमगला असेल..... भरीस भर नेहराजी जखमी होवुन बाहेर गेलेत
त्याच्या जागेवर कदाचित बरींदरला संधी मिळेल

विल्यमसन आणि युवी फिट होवुन संघात परतत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मधल्या फळीचे काही खरे नाही

त्यांनी आज वॉर्नर, मुस्तफिझुर, बॉल्ट आणि हेन्रिकेला खेळवले पाहिजेल

आपला पाठिंबा दोन्ही संघातल्या युवा (including hogg) खेळाडूंना!

आता थोडस पुढच्या मॅचबद्दल

गुजरात वि. मुंबई

सिमन्सच्या ऐवजी गप्टील (एकदाचा) आलाय मुंबईमध्ये.... ऑक्शन झाल्यापासून इतक्या पोस्ट वाचल्यात गप्टील का नाही?.... का नाही म्हणून.... सो एकदाचा आला तो आयपीएलमध्ये
तो स्ट्रेट अवे संघात असेल.... पोलार्डच्या ऐवजी ॲंडरसनला संधी मिळावी
my4: गप्टील, बटलर, ॲंडरसन, मॅक्लेघन

सुचिथच्या ऐवजी नथूसिंगला संधी मिळायची ही शक्यता आहे!

गुजराथमध्ये सगळे चांगले चाललेले आहे.... फिंच जबरदस्त फॉर्म मध्ये आहे.... मॅकल्लम आणि रैनाने पण झलक दाखवलेली आहे.... जडेजाने मागच्या सामन्यात मस्त बॉलींग टाकली.... पण उद्या त्याचे लग्न असल्यामुळे आज तो संघात नसेल.... आजच्या मॅचमध्ये त्याच्या जागेवर कौशिक शिवलला संधी मिळू शकते.... जकातीच्या ऐवजी धवल कुलकर्णी पण संघात येउ शकतो

मला तरी आज गुजरात जिंकेल असे वाटतेय!

मस्त ओढला स्कोअर हैद्राबादने..... मॉर्गन ५०

रसेल आणि चावलाने कसला मस्त कंबाइन कॅच घेतला बाउंड्रीवर... सहीच!

गंभीर चा कॅप्ट्न नॉक ६० चेंडू मधे तब्बल ९० धावा तडकावल्या. १३ चौकार आणि १ षटकार मागच्या मॅचमधे स्लो खेळण्याची कसर या मॅच मधे व्याजासकट वसूल केली.

कोलकताची ओपनिंग पार्टनरशिप प्रात्येक आयपीएल मधे नेहमीच दणकेबाज राहिली आहे. २००७ साली विश्वचषकात भारताला अशी पार्टनरशिप सातत्याने मिळत होती. सलामी उत्तम मिळाल्यावर बाकीच्या फलंदाजांवरील दडपण कमी होते.

मारुन मुटकुन ऑल राउंडर आहे तो हार्दिक पंड्या!

तांबेला पहील्या चेंडूवर विकेट..... ज्जे बात!

६७-४.... मुंबईची हालत खराब

भाऊ,
Similar comments at the same time!

तांबेभाऊना दुसरी विकेट.... मज्जा

Pages