आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<पांड्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती हा हा रोहीतपेक्षा पॉंटींगचा निर्णय दिसतोय.>> पण सचिन ? त्याचा असल्या निर्णयात कांहींच सहभाग नसतो ? मीं पांड्याच्या समर्थनार्थ हें अजिबात म्हणत नाहीय; फक्त, माझी एक शंका व्यक्त करतोय. बघूं ,आज कळेलच.

एक वॉर्नरची विकेट काढली की सामना संपतो..
एक बांग्लादेशचा मुस्तफिजुर सोडला तर कोणी बॉलर प्रेशर टाकू शकत नाही..
सोपा गेम आहे आजचा..
काल म्हटल्याप्रमाणे पोलार्डला नारळ देत गुप्टीलला आत आणले..
आता पांड्याचा प्रयोग करायची गरज पडू नये.. शर्मा पटेल नंतर गप्टील बटलर सेट आहे बॅटींग लाईन ..
आज मुंबई हैदराबादला त्यांच्या घरातच बिर्याणी खिलवणार तर ...

पांड्या बंधू आणि पटेल संघातच.... गप्टीलचा समावेश आणि पोलार्डची गच्छंती!
करण शर्माच्या जागी बिपुल शर्मा

मुंबईची बॅटींग

आज मुंबई हारते

लावा पैज
शर्मा २० च्या वर जाणार नाही , गुप्तिलला ओपनिंगला पाठवयाय्ला हवे अन्यथा मुंबई १६० चा आकडा पार करु शकणार नाही.

शर्मा गेला तरी गुप्तिल खे़ळू शकतो.

पांड्या नावाचा जुगार अगदीच काहीही तयारी न करता खेळला नसणार.. पण तो स्वताच जरा आपल्या रोल बद्दल कन्फ्यूज वाटतो.. हाफहार्टेड खेळतोय.. म्हणून मागच्या सामन्यात पुल सुद्धा त्या एकमेव फिल्डरच्या हातात केला..

पार्थिव पटेल मात्र मला की प्लेअर वाटतो.. त्याच्या जीवावर पॉवरप्ले निघतो.. 30-35 फटाफट मारतो, सेट व्हायला टाईम न घेता.. मागच्या सामन्यात त्याला पहिल्या 6 ओवरमध्ये फक्त 8 चेंडू खेळायला मिळाले इथे सारे गंडले.. नाहीतर त्याने ईतरांवरचे प्रेशर काढले असते..

गुप्तिल गेला...... Happy
पहिलीच आयपीएल खेळत होता बिचारा. खरतर त्याला १ डाउन पाठवायला पाहिजे होते. पण आल्याआल्या त्याला पुढे पाठवणे म्हणजे रोहीत बळीचा बकरा बनवत होता :

"धोनीच्या मनात काय आहे ते सांगणारे जर इथे आहेत तर क्रिकईन्फो चे कॉमेंटेटर्स तर कमीत कमी मैदानात आहेत असे धरून त्यांना संशयाचा फायदा दे" - Happy

स्वरूप, डी-कॉक विषयी अनुमोदन! मस्त खेळला काल तो आणी नायर. झहीर मुरलेला कॅप्टन नसल्याचं कधी कधी कळतं. जसं काल तो म्हणाला की मला २१ रन्स मारल्यावर मला लक्षात आलं की ह्या विकेटवर काय चालेल. मुरलेला कॅप्टन अशा गोष्टी सहसा उघड करत नाही. शामी ने सर्फराझ चा केलेला रनाआऊट अप्रतिम.

रोहीत ने आततायी कॉल देऊन विकेट टाकली. गुप्टील ला टाकलेला बॉल व्हिंटेज भुवी ची आठवण करून देणारा होता.

१२० च्या स्ट्राईकरेटने (या आयपीएल मध्ये जेमतेम ११०) खेळणाऱ्या पार्थिव पटेलच्या जीवावर पॉवरप्ले निघतो हे विधान जरा धाडसाच वाटत नाहीये का तुला मित्रा?

एकाच वेळी बरेच काही प्रयोग मुंबईच करू शकते. आता शर्माला मागे का नेला लगेच..
आता पॅनिक न होता 140+ चे टारगेट ठेवावे. हैदराबादच्या कमजोर गोलंदाजीवर विश्वास ठेवावा..

"एकाच वेळी बरेच काही प्रयोग मुंबईच करू शकते" - सहमत.

किती बदलायची बॅटींग ऑर्डर एकाच मॅच मधे! थोड्या वेळानी प्लेयर्स विसरून जातील की आपल्याला अजुन बॅटींगला जायचय की आपली बॅटींग झालीये.

>>झहीर मुरलेला कॅप्टन नसल्याचं कधी कधी कळतं.
अगदी अगदी..... जवळजवळ प्रत्येकच मुलाखतीत तो असे काहितरी बोललेला आहे जे त्याचा नवखेपणा दाखवते..... पण गिरे तो भी टांग उपर टाइप्स कर्णधारांपेक्षा हा असला rawness आवडतो आपल्याला!

>>थोड्या वेळानी प्लेयर्स विसरून जातील की आपल्याला अजुन बॅटींगला जायचय की आपली बॅटींग झालीये.
Rofl

स्वरूप, not putting words in your mouth, पण धोनीपेक्षा असं म्हणायचं आहे का तुम्हाला? Wink

धोनी पण आवडतो रे आपल्याला.... पण आजकाल त्याचे प्रेझेंटेशन स्पीच फार प्रेडिक्टेबल असते आणि डिप्लोमॅटीक ही!

प्रेझेंटेशन स्पीचवरुन आठवले.... धोनी बोलताना कितीवेळा "you know" म्हणतो कुणी मोजलय का? वाक्यावाक्याला त्याचे "you know" असतेच!

धोनी चे कॅप्टन्सी सुद्धा मला प्रेडिक्टेबल वाटते. आणी प्रेझेंटेशन मधे भगवद्गीता डिस्कोर्स / सत्संग ला बसल्यासारखं वाटतं.

पण असो. उगाच वादग्रस्त मुद्दे ईथे नको.

मुंबई ला हवा असलेला धक्का मिळालाय. १६० पर्यंत जाता येईल.

१६० झाले नाहीच शेवटी
मुस्तफिझुर आणि भुवनेश्वर दोघांनी मस्त टाकल्या डेथ ओवर्स

शेवटच्या 4 ओव्हर मधे 24 धावा ते ही 6 विकेट्स हाती असताना
जबरदस्त प्रदर्शन
160 मी म्हणत होतो इथे तर 140 च झाले

आता 140 पैकी 70-80 एकटा वार्नर काढेल

थोरला पंड्या आत्तापर्यंत तरी धाकट्या पातीपेक्षा जास्त सेन्सिबल वाटतोय. >> +१. उंच असल्याचा फायदा घेत बिपुल शर्मा च्या बॉल च्या पिच पर्यंत काय सहज पोहोचला.

स्रानला ऑस्ट्रेलियामधे अशी बॉलिंग टाकता येत नव्हती का राव ?

हर्दिक पांड्याचे काहितरी जबरदस्त गंडले आहे. तो जेव्हढा केअर फ्री आधी खेळत असे तसा आता वाटत नाही. त्याच्या खांद्यावर हात टाकून कोणितरी त्याला समजावायला हवे.

मूंबईचे टॅक्टिक्स आपल्याला कळत नाही. बहुधा त्यांच्या जिंकण्याचे रहस्य हेच असावे. समोरची टीम पण जबरी गोंधळात पडत असणार Wink

मायबाप अहो तुम्ही प्रत्येक सामन्यानंतर त्यात न खेळलेल्याला बसवा असे बोलत असता, सूरपाट्या टीममधे होता का ? Lol

ओ मी नेहमीच पांड्या च्या विरूद्ध होतो विश्वचषकाच्या धाग्यावर माझ्या विरूद्ध सगळे होतात
आता भोगा फळ Wink

"शिखर आज किमान 20 च्या वर तरी जाणारच
डोक्यावर तलवार टांगती असेल तर तो खेळतो" - १०% खेळला (२ वर गेला). बहुदा छोटीशी सुरी असावे डोक्यावर Happy

Pages