Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36
विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली
पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाय कोर्टाने सामने मुंबईअ ब
हाय कोर्टाने सामने मुंबईअ ब आहेर हलवल्यामूळे MI ल बरे वाटले असेल. वानखेडे झेपत नाहि त्यांना.
<< Similar comments at the
<< Similar comments at the same time! >> Matching wave-length or Extra Sensory Perception ?
I guess matching wavelength
I guess matching wavelength
अरेरे.... सरळसरळ ढापला
अरेरे.... सरळसरळ ढापला ब्राव्होला!
मुंबईने बरे झुंझवले गुजरातला
मुंबईने बरे झुंझवले गुजरातला अगदीं शेवटच्या बॉलपर्यंत ! चांगली झाली मॅच व आजची अधिक चांगली टीम जिंकली !!
हो कालची दुसरी मॅच
हो कालची दुसरी मॅच इंटरेस्टींग झाली.... आत्ताची बोअर चालू आहे.... पुढची धमाल होण्याची अपेक्षा आहे!
पंजाबविरुद्धच्या विजयाने दिल्लीचा कॉंफिडंस वाढला असेल पण आज सामना आयपीएल मधल्या सर्वोत्तम बॅटींग लाइनअपशी आहे.
कोणताही स्कोअर त्यांना दडपणाखाली आणण्यासाठी पुरेसा नाहीये..... त्यामुळे टॉस जिंकुन चेस करणे सर्वोत्तम!
गेलच्या लॉ ऑफ ॲव्हरेजच्या रेकॉर्डनुसार आज तो खेळण्याची शक्यता खुप जास्त आहे.... पहील्या ३-४ ओव्हरमध्ये त्याला जास्त मोकळीक न देता काढला तरच नाहीतर तो सुसाट सुटू शकतो.... कोहलीपण बंगलोरचा बॅकबोन आहे
दिल्लीच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.... चिन्नास्वामीवर नवीन स्पिनरचा टिकाव लागत नाही त्यामुळे शमी फिट झाला असेल तर जयंत यादवच्या जागेवर त्याला संधी मिळू शकते
दिल्लीला नेहमीप्रमाणे शुभेच्छा!
धोनी गोलंदाज निवडण्यात चुकला
धोनी गोलंदाज निवडण्यात चुकला वाटते. शेवटच्या दोन ओव्हर्स साठी एकही हुकमी बॉलर नाही
बँगलोर वाल्यांसाठी 'गेल' हा
बँगलोर वाल्यांसाठी 'गेल' हा एक्स्ट्रा खेळाडू आहे. मैदानात ते १०च खेळाडू घेऊन उतरतात वाटते. सलामीची जोडी कोहली-गेल नसून कोहली-डिव्हिलिअर्स आहे या हिशोबानेच डावपेच चालवत असतील.
कारण गेल हा चायनाचा आयटम आहे. चले तो चांद तक वरना शामतक.
आणि गेल सारख्या 'हत्तीला' सांभाळायचे असेल तर इतके तर करावे लागेलच
डिव्हिलिअर्स नुसता सुस्साट्ट
डिव्हिलिअर्स नुसता सुस्साट्ट सुटला आहे.
क्रिकईन्फो चे कॉमेंटेटर्स
क्रिकईन्फो चे कॉमेंटेटर्स मनकवडे आहेत. बॅट्समन च्या मनात काय चाललय वगैरे पण छापतात.
फेफे, आता धोनीच्या मनात काय
फेफे, आता धोनीच्या मनात काय आहे ते सांगणारे जर इथे आहेत तर क्रिकईन्फो चे कॉमेंटेटर्स तर कमीत कमी मैदानात आहेत असे धरून त्यांना संशयाचा फायदा दे
बॅटींग ला धार्जिणे मैदान
बॅटींग ला धार्जिणे मैदान वगैरे सगळे मान्य करूनही डी'कॉक नि नायर दोघांच्याही इनिंग्स कसल्या जबरदस्त होत्या. अॅबे नि कोहली ला अभिमान वाटतील अशा .
RCB ला गेल च्या ऐवजी एक बॉलर
RCB ला गेल च्या ऐवजी एक बॉलर खेळवायची गरज आहे. एकटा वॉटसन किती पुरणार २० ओव्हर्ससाठी ?
छानच झाली मॅच ! यंदाची आयपीएल
छानच झाली मॅच !
यंदाची आयपीएल शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारसं दिसतंय.
डिकॉकने १८०० रु ची कमाई करून
डिकॉकने १८०० रु ची कमाई करून दिली आज .. नाचो !
पैल्यापासूनच आवडतो मला हा प्लेअर.. आपल्या विरुद्ध शतके ठोकायच्या आधीपासूनच, त्याचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर चमकायला लागायच्या आधीपासूनच, मी त्याच्या फ्री फ्लोईंग बॅटींगचा दिवाणा आहे.. मध्यंतरी एक दोनदा त्याचा फॉर्म गंडलेला, पण अश्या स्टाईलच्या प्लेअर्सशी असे होतेच.. फॉर्ममध्ये असतात तेव्हा मात्र आजच्यासारखीच मजा आणतात .. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत आहे हा आणि राहणार
आज हरल्यावर धोनीचा चेहरा फार
आज हरल्यावर धोनीचा चेहरा फार चिंताग्रस्त आणि विचारात पडलेला दिसला ..
यापुढे तो टॉस जिंकल्यावर चेस करणेच पसंद करेल असे वाटतेय ..
दुसर्यांदा पहिल्या बॅटींगला चांगली सुरुवात गंडलीय ..
आजचा थिसाराला पुढे पाठवणही जमले नाही.. असेच अजून एकदा झाल्यास त्यापुढच्या सामन्यात धोनीच पुढे आला तर नवल नसावे.
मुंबई पोलार्डवर जरा जास्तच
मुंबई पोलार्डवर जरा जास्तच भरवसा टाकते असे वाटते. प्रत्यक्षात हल्ली तो तितका कामाला येत नाही.
उद्याच्या सामन्यात तरी मुंबईची चार विमाने बटलर, गुप्टील, मॅकलाघन आणि अँडरसन / साऊथी अशी दिसतील अशी आशा. याचा एक फायदा असा होईल की शर्मा आणि पटेल नंतर तिसर्या चौथ्यावर गप्टील आणि बटलर पाठवता येतील (अँडरसन असेल तर तो देखील पुढे पाठवता येईल) आणि पांड्याला जे तिसर्या क्रमांकाचा फलंदाज बनवायचे उपद्व्याप चाललेत ते थांबवता येतील.
मस्त झाली कालची मॅच.....
मस्त झाली कालची मॅच..... राहुल द्रवीडच्या टीमला बंगळूरात जिंकताना बघून बरे वाटले!
कोहली आणि एबी खेळत असताना डीडीची काळजी वाटायला लागली होती पण डेथ ओव्हर्समध्ये मोरीस आणि शमीने मस्त कमबॅक केले..... सर्फराजला रनआउट करताना शमीने केलेला थ्रो अफलातून होता..... दुखापतीतुन नुकत्याच सावरलेल्या खेळाडूचे रिफ्लेक्सेस जर एव्हढे चांगले असतील तर कमाल आहे
मॉरीसच्या जोडीला डेथ ओव्हर्सला कोण हा जो डीडीसाठी मोठा प्रश्न होता तो बहुतेक सुटल्यासारखा वाटतोय
झहीरने पहील्या हफ्त्यातच स्वताच्या चारही ओव्हर्स संपवल्या तरी हरकत नाही
अय्यर काल परत एकदा कमनशिबी ठरला..... वॉटसनने सीमारेषेवर मस्त प्रसंगावधान दाखवले
सॅमसन काल डॉट बॉल्सच्या प्रेशरमुळे विकेट फेकुन रिकामा झाला पण नायरने कमाल केली
क्युडीबद्दल काय बोलावे?..... २००च्या स्ट्राईकरेटने शतक करताना एकही बेजबाबदार फटका नाही..... याला म्हणतात क्लास!
बंगळूरला बॉलींगचे काहीतरी केले पाहिजेल.... ज्याला सांभाळून खेळावे असा एकसुद्धा बॉलर नव्हता काल बंगळूरकडे
विसा दहशत वाटावी असा नाहीये..... तसे रिचर्डसन आणि मिल्ने पण नाहीत..... स्टार्कला लवकरात लवकर तितकीच तगडी रिप्लेसमेंट शोधावी लागेल
केदार जाधव काल पूर्णपणे गोंधळल्या सारखा वाटत होता.... बॅटींगमध्येही आणि कीपींगमध्येही
एबी किपींग करायला तयार नसेल तर एखादी मॅच लोकेश राहुललाही संधी मिळू शकते
<< क्युडीबद्दल काय
<< क्युडीबद्दल काय बोलावे?..... २००च्या स्ट्राईकरेटने शतक करताना एकही बेजबाबदार फटका नाही..... याला म्हणतात क्लास!>> १००%सहमत. त्याचे 'रेफ्लेक्सेस' कमालीचे असावेत; शेवटच्या क्षणीं योग्य 'पोझीशन'मधे येवून इतकी नेमकी फटकेबाजी, 'परफेक्ट प्लेसमेंट' साधणं त्याशिवाय अशक्यच !! अर्थात, << डि कॉकच्या खेळाचं रहस्य " He is absolutely fearless" यांत असल्याचं एका समालोचकानं म्हटलं. अगदीं पटलं ! >. हेंही जोडीला आहेच ! << ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत आहे हा आणि राहणार >> ॠन्मेषजी, अग्रेसर रहाणार !!
स्वरुप, तुमचं अय्यर व सॅमसनबद्दलचं निरीक्षण अगदीं अचूक.
काल दोन्ही मॅच अनपेक्षित
काल दोन्ही मॅच अनपेक्षित निकालाच्या ठरल्या
ऋन्मेष, मुंबई आणि पोलार्ड
ऋन्मेष,
मुंबई आणि पोलार्ड बद्दलच्या तुझ्या पोस्ट्ला अनुमोदन!
आजचा सामना मुंबई आणि हैद्राबाद या दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल
मुंबईने पोलार्डच्या जागी ॲंडरसनला आणि साउदीच्या जागी गप्टीलला खेळवावे..... हैद्राबादमध्ये करण शर्मा सोडला तर फारसा नामी स्पिनर कुणीही नाहीये, त्यामुळे या सामन्यातुन गप्टीलला उतरवायला काही हरकत नाही.... साउदीची रिकामी जागा नथूसिंग भरुन काढू शकतो आणि बटलरकढून किपींग करुन घेउन पटेलला बसवायला काही हरकत नाही
My11: रोहित, गप्टील, रायडू, बटलर, कोरी ॲंडरसन, हार्दिक पांड्या/उन्मुक्त चंद, हरभजन, कृणाल पांड्या, मॅक्लेघन, बुमराह, नथूसिंग
हैद्राबादच्या संघात फार बदल होतील असे वाटत नाही..... फारफार तर बरींदरच्या जागी मिथुन आत येउ शकेल
My11: वॉर्नर, धवन, हेन्रीके, मॉर्गन, ओझा, हुडा, आशिष रेड्डी, करण शर्मा, भुवी, मुस्तफिझुर, बरींदर/मिथुन
कागदावर तरी मुंबईचे पारडे जड दिसतेय!
मुंबईचे पारडे फक्त "रोहीत"
मुंबईचे पारडे फक्त "रोहीत" चालल्यावरच जड असते बाकी सगळे पोकळे आश्वासनासारखे आहे.
हैद्राबादचे सुध्दा वार्नरच्या खांद्यावर चाल्ले आहे. थोडक्यात एकांगी शिलेदारांचा आज सामना आहे.
My11: रोहित, गप्टील, रायडू,
My11: रोहित, गप्टील, रायडू, बटलर, कोरी ॲंडरसन, हार्दिक पांड्या/उन्मुक्त चंद, हरभजन, कृणाल पांड्या, मॅक्लेघन, बुमराह, नथूसिंग >> पटेल का बसवला रे ? तो नीट त्याचा रोल करतोय दोन्ही बाजूंचा ? मुंबईचा प्रॉब्लेम त्यांचे ४,५ क्रमांकाचे बॉलर्स आहेत. गेल्या वर्षी ती गॅप नीट भरली होती पांड्या, सुचिथ, गोपाल ह्या काँबो ने. यंदा कोणीच नाही.
गप्टीलला ओपनींगला
गप्टीलला ओपनींगला आणायसाठी.... आणि बटलर आहे की कीपर
गप्टीलला ओपनींगला आणायसाठी >>
गप्टीलला ओपनींगला आणायसाठी >> गेले तीन सीझन पटेल ओपन करतो तेंव्हा मुंबई जिंकते हे लक्षात ठेव. Something clicks when he opens. कदाचित डावखुरा असल्याचा फायदा होत असेल. रोहित ला एक नंबर खाली खेचून आणता येईल गप्टिललाही. दोन पआंड्या भावांपैकी एक ठेवला कि काम होऊ शकेल. तसाही कोरी असेल तर तीन फास्ट बॉलर्स होत असल्यामूळे हार्दिक पांड्या ला बसवता येईल.
<< असल्यामूळे हार्दिक पांड्या
<< असल्यामूळे हार्दिक पांड्या ला बसवता येईल.>> धोनी [ विश्वचषक स्पर्धेत] व आतां रोहित दोघेही पांड्यावर फलंदाजी व गोलंदाजीबाबत सातत्याने इतका विश्वास दाखवतात, यामागें कांहीं तरी सबळ कारण असण्याचीही शक्यता नाकारतां येत नाहीं. अर्थात, त्या विश्वासाला पात्र असल्याचं त्याने सिद्ध केलेलं दिसत नाहीं, हेंही तितकंच खरं.
Lets agree to disagree on
Lets agree to disagree on Parthiv Patel..... Lets see what happens in today's match
हार्दिक पांड्याला बाहेर ठेवण्याबद्दल मात्र सहमत!
घ्या मी विश्वचषकापासून बोलत
घ्या मी विश्वचषकापासून बोलत होतो तेव्हा मला खुळ्यात काढलेले
पांड्याला तिसऱ्या क्रमांकावर
पांड्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती हा रोहीतपेक्षा पॉंटींगचा निर्णय दिसतोय.... असेही ऑस्ट्रेलियन कोचेसना पिंच हिटर प्रकार फार आवडतो.....चॅपेल-इरफान पठाण आठवत असेलच!
त्या "चप्पले" मुळे आज इरफान
त्या "चप्पले" मुळे आज इरफान कुठे पोहचला आहे बघा. तो ना धड बॉलर राहिला ना धड बॅट्समन राहिला. ना धड टीम मधे राहिला.
Pages