आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिव्हिलीयर्स !! काय 'क्लीन' व नेटकी फटकेबाजी !! आरसीबी म्हणजे फलंदाजीचा अर्कच दिसतोय - गेल, विराट,डिव्हिलीयर्स,वॉटसन,... !!!

उपखंडातील फलंदाजांच्या मनगटी फटक्यांची नजाकत नसेलही डिव्हीलीयर्सकडे पण eyesight, reflexes, footwork & anticipation याची दैवी देणगीच असावी त्याला !!!

२००७ च्या टी२० वर्ल्डकप च्या भारतीय टीम सिलेक्शन ला जे निकष लावले होते, त्या निकषांप्रमाणे (तरूण खेळाडूंना प्राधान्य) सर्फराज खान, श्रेयस अय्यर, इशान किशन, रिषभ पंत वगैरे मंडळी भारतीय टी-२० संघात खेळायला हवीत. कॅच देम यंग.

हैद्राबाद ची बॅटींग क्लिक झाली तर वॉर्नर, धवन, धवन, मॉर्गन, हूडा आणी ओझा चांगला लाईन-अप आहे. पण मॉर्गन, आणी धवन टी-२० वर्ल्डकप च्या वेळी तरी आऊट ऑफ फॉर्म होते.

मलातर काही फारसा दम वाटत नाहीये हैद्राबादच्या लाइनअप मध्ये.... पण RCB च्या बॉलिंगमध्येही फारसा दम नाहीये

टारगेट फारच मोठे असल्यामुळे जिंकतील RCB!

आरसीबीच्या एवरेज बॉलिंगचा फायदा हैदराबादच्या एवरेज बॅटींग लाईनला उचलता आला नसल्याने वॉर्नर बाद होताच मोठी धावसंख्या चेस करायचे आव्हान संपुष्टात येणार हा मनाशी बांधलेला अंदाज खरा ठरला.

धोनी, कोहली, गंभीर, रोहीत शर्मा, रैना ..
या पाच जणांपैकी 4 कर्णधार पुढे जातील असे टीम कॉम्बिनेशन वघून वाटतेय. फॉर्म काय कसा याचा आता विचार करण्यातही अर्थ नाही कारण स्पर्धा फार मोठी असल्याने तो बदलत राहतो.

आपला अंदाज:
१ केकेआर
२ आरसीबी
३ पुणे
४ मुंबई इंडियन्स
५ दिल्ली (They will bounce back)
६ गुजरात
७ हैद्राबाद
८ पंजाब

अर्थान हे आयपीएल आहे...प्रत्येकी १४ सामन्यांच्या या स्पर्धेत केवळ एकाएका सामन्यानंतर अंदाज वर्तवणे म्हणजे हवेत तीर मारण्यासारखेच आहे!

आयपीएल प्रक्षेपणात, क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूबरोबर समालोचकानी संवाद करणं, हें जाम खटकतं !

आयपीएल मधे फॉर्मॅट थोडेफार बदलावे. कॅप्टन सकट सर्वांना इअरफोन द्यावे जेणे करून प्रशिक्षकांशी डावपेचावर बोलणे होईल. ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचाच इअरफोन चालू करून त्याला योग्य त्या सुचना द्याव्या. जसे फुटबॉल सामन्यांमधे परवाणगी असते. मैदानात प्रत्यक्ष डावपेच आखणे आणि मैदानाबाहेर शांतबसून डावपेच आखणे यात फरक आहे. (हे सर्वप्रथम हँन्सी क्रोनिए ने केले होते)
इअरफोन मधे जर माईक देऊन त्याचे रेकोर्डींग तिसर्‍या अंपायर कडे करावे म्हणजे कोण काय स्लेजिंग करत आहे हे कळू शकेल. आणि योग्य व्यक्तीला शिक्षा मिळण्यात मदत मिळेल.

जसे फुटबॉल सामन्यांमधे परवाणगी असते.>> तुम्हाला हॉकी म्हणायचे आहे का? फूटबॉलमध्ये तरी असे कधी बघायला मिळालेले नाहीये.

फुटबॉलच त्यात प्रशिक्षक स्वतः मैदानाच्या बाजूला उभा असतो आणि प्रत्येक खेळाडुला सुचना देत असतो. फक्त त्याला 'आरडाओरडा' करावा लागतो ते वेगळे Wink इअरफोनची परमिशन नाही आहे.

<< कॅप्टन सकट सर्वांना इअरफोन द्यावे जेणे करून ... >>... सट्टाबाजारात आत्तां बेटींगचे काय 'ऑडस' चालले आहेत हेंही क्षणोक्षणीं कळेल सर्वांना !! Wink

<< ३० एप्रिल नंतरचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर - हायकोर्ट >> म्हणजे धांवांचा आणि पैशांचा पाऊसही नाहीच यंदा महाराष्ट्राच्या वांट्याला !! Wink

शर्मा मुंबई ईंडियन्सचा तेंडुलकर आहे. तो फॉर्मात असताना सारे सुरळीत असते. मजा आणली त्याच्या खेळीने आज. काय मस्त पेस केले इनिंग

Pages