आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताहीर असेल तर मिश्रा ऐवजी मयांक अगरवाल? ताहीर, नेगी, ड्युमिनी हे ३ फिरकी तरीही असतीलच. आमच्या हेरवाडकरला संधी मिळू दे. गावचा खेळाडू Happy

मुंबई-

सिमन्स, पार्थिव, रोहित, रायुडु, बटलर, पोलार्ड (फिट नसेल तर- अँडरसन), पांड्या, भज्जी, सुचित, बुमरा, मकक्लेनाघन/ साऊदी.

वाईल्ड कार्ड- श्रेयस गोपाल, नितिश राणा

ड्युमिनीला हॅमस्ट्रिंग स्ट्रेन होता २२ मार्चला. फिजिओला त्याने श्रीलंका सामना खेळणे अपेक्षित होतं म्हणजे जास्त गंभीर नसावी (ग्रेड १ स्ट्रेन असेल. जास्तीत जास्त १०-१२ दिवस). त्यामुळे खेळेल बहुतेक. शकिब कोलकात्यातच आहे. टेन्डोला रिलीज केलं आहे. महित नाही कुणी घेतलं ते.

चला आज फायनली आयपीएल सुरु होतय.... पहीला सामना तर काय भारी आहे.... पुणे वि. मुंबई

माझ्या प्लेयींग ११ अश्या असतील:
पुणे: रहाणे, पीटरसन, फाफ, स्मिथ, धोनी, रजत भाटीया, मिशेल मार्श, आर अश्विन, इश्वर पांडे, इशांत शर्मा, एम अश्विन

रहाणे आणि स्मिथ स्लो स्टार्टर आहेत, पीटरसन रस्टी आहे त्यामुळे धावगती वाढविण्याची जबाबदारी फाफ आणि धोनीवर येउन पडते
माझ्या अंदाजाने पुणे १५व्या ओव्हरपर्यंत स्लो आणि स्टेबल प्लॅटफॉर्म देउ शकते पण पुढे मारधाड करणारे धोनी आणि मिशेल मार्श सोडले तर फार कुणी नाही
आर अश्विन सोडला तर बॉलिंग मध्ये फार काही दम दिसत नाही.... पठाणला परत भरात आलेले पहायला आवडेल पण धोनी त्याला कितपत खेळवेल सांगता येत नाही
एम आश्विनला मात्र खेळताना पहायची उत्सुकता आहे!

मुंबई: सिमन्स, रोहीत, उन्मुक्त चंद, बटलर, रायडू, पोलार्ड, हार्दिक पंड्या, हरभजन, सुचिथ, बुमराह, मॅकेल्घन

रोहीत सध्या तरी सलामीला येइल त्यामुळे मधल्या फळीत उन्मुक्त चंदला चांस मिळू शकतो.... सिमन्स, बटलर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत... पोलार्ड कितपत मॅचफीट आहे हे बघावे लागेल... मुंबईचा बॉलींग ॲटेक पण बऱ्यापैकी संतुलीत आहे

कागदावर तरी मुंबईचीच टीम वरचढ दिसत आहे पण रहाणे आणि धोनी हे आवडते खेळाडू पुण्याकडून खेळत असल्याने आपला पाठिंबा पुण्याला!

<, <आवडते खेळाडू पुण्याकडून खेळत असल्याने आपला पाठिंबा पुण्याला!>> पोचला त्याना तुमचा पाठींबा ! मुंबईची हालत खराब. ६०-६ !!

अगदीच वाट लागली आहे मुंबईची.

पुण्याचा असूनही माझा सपोर्ट समहाऊ मुंबईला होता. मे बी जुन्या लॉयल्टी ( सचिन) सोडायला मन तयार नाहीये. पण आता विचार करावा लागेल. Happy

आयपील प्रगत झालेय. ड्रोनचा वापर होतोय.

भज्जी ने चांगले लावून धरलेय.... वर्ल्डकप मध्ये न खेळवल्याचा राग काढायचा मूड दिसतोय गड्याचा!

फलंदाजी पण हरभजन ने केली
गोलंदाजी पण हरभजन ने केली

हार्दिक ने 4 चेंडू 12 धावा मस्त Wink

पहिला डाव भूताचा.
मुंबई लौकिकाला जागली.

तसेच धोनीही लौकीकाला जागला.
बॉर्न लीडर!
कुठलाही संघ द्या. काटक्यांची मोळी बांधावी तसे बांधून दाखवतो. हे अकरा पहिल्यांदाच एकत्र खेळत आहेत असे वाटतच नव्हते. आपल्या लाडक्या तुरुपच्या एक्क्याला आधी बॉलिंग न देता छोट्या आश्विनला भरवसा देणे अशी कप्तानी तोच करू शकतो.

रहाणेची फटकेबाजी बघून मजा आली. तो असे खेळतो तेव्हा ते तूफान प्रेक्षणीय असते. दुर्दैवाने वेस्टईंडिजबरोबर खेळताना त्याला असा सूर गवसला नाही आणि तिथे थोडी वाट लागलेली. असो, तो आता ईतिहास झाला.

पहिला सामना अगदीच गचाळ झाला असला तरी धोनीने सर्वांना अलार्म दिला आहे. त्यांच्या संघातली वीक लिंक बॉलिंग वाटत होती पण ती तितकीही वीक नाहीये हे आज दिसून आले.

कालच्या मॅचचे सगळेच अंदाज चुकले!

मुंबई कागदावर पुण्यापेक्षा क्लिअरली बलाढ्य वाटत होती पण संपूर्ण मॅचमध्ये एखाद क्षण पण तसे वाटले नाही
रहाणेला स्लो स्टार्टर म्हणालो तर गडी पहील्यापासूनच वेगवान खेळला.... पीटरसन अजिबात रस्टी वाटला नाही
ज्या आर अश्विनला गोलंदाजीतला एकमेव आधारस्तंभ म्हण्टलेले त्याच्या वाट्याला केवळ एक ओव्हर असावी इतकी चांगली बॉलींग बाकीच्यांनी टाकली

ज्या सिमन्स आणि बटलर चा फॉर्म भारी आहे म्हंटलेले ते अगदीच स्वस्तात गेले आणि मुंबईच्या संतुलित बॉलींगला केवळ एकच विकेट घेता आली

असो.... या अनिश्चितेतच क्रिकेटची खरी मजा आहे!

पुणे जिंकले.... मज्जा आली!

<<आपल्या लाडक्या तुरुपच्या एक्क्याला आधी बॉलिंग न देता छोट्या आश्विनला भरवसा देणे अशी कप्तानी तोच करू शकतो. >> 'ऑफ-स्पीन'पेक्षां फटकेबाजीसाठी 'लेग-स्पीन' अधिक अडचणीचा ठरतो, हें आतां सर्वमान्यच झाल्यासारखं आहे. धोनीच्या नेतृत्वाला कमी लेखण्याचा अजिबात उद्देश नाहीं पण मार्श, इशांतने काढलेले 'क्लीन बोल्ड', 'एल्बीडब्ल्यू' याचं मला नाहीं वाटत धोनीसुद्धां स्वतःकडे श्रेय घेईल !
आणि हो, अश्विन [लेग-स्पीनर] बरा वाटला तरीही त्याची 'बोलींग स्टाईल' ओघवती नाही वाटली. हल्लींच्या भारतीय लेग-स्पीनर्समधे मला याबाबतींत तरी पियुष चावलाच उजवा वाटतो.

भाऊ,
धोनीचे श्रेय हे की ती टीम, एक टीम म्हणून पहीलीच मॅच खेळतीय असे अजिबात वाटले नाही.... मिशेल मार्श सुद्धा म्हणाला की गेले काही दिवस आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा, एकमेकांसोबत रहाण्याचा विशेष प्रयत्न करतोय..... Team Building.... Team building म्हणजे हेच ना!

इशांत ला सलग तिसरी ओव्हर देण्याचा शहाणपणा करणे .... उगाच कारण नसताना हार्दिकसारख्याला बढती देण्याचा अतिशहाणपणा न करणे.... समोर पडझड चालू असताना आपला स्टार बॉलर राखून ठेवून untested बॉलर वापरुन बघणे इत्यादी इत्यादी टिपीकल धोनी!

काही म्हणा इशांतने चांगलेच impress केले आणि रजत भाटीया या फॉर्मेट मध्ये नेहमीच एक handy खेळाडू ठरलाय... मग ते KKR असो नाहीतर RR

आज कोलकाता वि. दिल्ली

A stable, proven and experienced eleven Vs. Young, enthu, talented eleven

माझ्या प्लेयींग ११:
कोलकाता: गंभीर, उथाप्पा, मून्रो, मनीष पांडे, युसुफ पठाण, सुर्यकुमार यादव, शकीब, आंद्रे रसेल, चावला, मोर्केल, उमेश यादव

नरीन अजुन वेस्ट इंडीजहून आलेला नाहीये.... त्यामुळे मून्रो किंवा हॉग ला चांस मिळायची शक्यता आहे.... बाकी तिघे तर पक्के आहेत .... कोलकाताचे all rounder प्रेम लक्षात घेता मून्रोला जास्त संधी आहे..... त्यांची बॅटींग सखोल आहे आणि गोलंदाजी चतुरस्त्र आहे.... एकुणात कागदावर तर बलाढ्य भासणारा संघ आहे हा!

दिल्ली: क्युडी कॉक, श्रेयस अय्यर, सॅमसन, ड्युमिनी, करुण नायर, नेगी, ब्रेथवेट, मिश्रा, शमी, झहीर, ताहिर

कोलकाताचे ग्राउंड बघता ब्रेथवेट आणि ताहिर ला संधी मिळण्याची शक्यता जास्त वाटते.... मॉरीस हा डीडीचा महागडा खेळाडू असला तरी त्याला आजच्या मॅचला बाहेर बसावे लागेल बहुतेक!
झहीरच्या कप्तानीबद्दल उत्सुकता आहेच
शिवाय यंग इंडियाच्या (अय्यर, सॅमसन, नायर, नेगी) एक कुतूहल आहे!

कागदावर जरी कोलकाता बलाढ्य दिसत असले तरी द्रवीडसाठी आपला पाठिंबा दिल्लीलाच!

स्वरुपजी, कृपया मीं धोनीचं अवमूल्यन करायचा प्रयत्न करतोय असा गैरसमज नको. किंबहुना त्याच्या नेतृत्वगुणांबद्दल शंका घेणंच मूर्खपणाचं. फक्त कालच्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाचा कस लागला नाही, इतकंच मला सुचवायचं होतं. शर्मा इतक्या पेटून गोलंदाजी करतोय, रोहितची महत्वाची विकेट घेतलीय तर त्याच्या त्या जोशाचा फायदा घ्यायला एखादी जास्त ओव्हर देणं , मुंबई दबावाखाली असतानाच नविन लेग-स्पीनर वापरुन बघणं यांत धोनीची विशेष खासियत दिसली, असं खरंच मला नाहीं वाटलं.
<< उगाच कारण नसताना हार्दिकसारख्याला बढती देण्याचा अतिशहाणपणा न करणे....>> हें पटलं. पण रोहितचा मूर्खपणा [ पांड्या क्लिक झाला असता तर तोही 'स्ट्रोक ऑफ जिनीयस' वगैरेही झाला असता ] ही धोनीची गुणवत्ता नाही ना ठरत ! Wink

>>फक्त कालच्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाचा कस लागला नाही, इतकंच मला सुचवायचं होतं

नक्कीच नाही.... पण झलक तर दिसली ना?
अगदी धोनी जरी असला तरी अगदी पहील्याच सामन्यापासून सगळे जमवून आणणे इतके काही सोपे नाही !

आजचा सामना कालच्या सामन्याच्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय ! मुंबई = दिल्ली व पुणे = कोलकत्ता !!!
सिद्धूने आपल्या वैशिश्ठ्यपूर्ण शैलीत दिल्लीच्या फलंदाजीचं विश्लेषण केलं - नाम बडे और दर्शन खोटे !!
'चायनामन' हॉग फिरकीची एक वेगळीच, दुर्मिळ नजाकत दाखवून गेला !

माझी cricinfo वरचीच कॉमेंट इकडे डकवतो:

I think DD will learn their lessons from this match Lesson#1: They should not leave there only experienced middle order batsman Dumini out.... He can play a backbone to this young batting lineup
Lesson#2: Zaheer needs to improve his own performance to justify his place in the team and motivate others
Lesson#3: You can not leave out Tahir on a turning eden gardens
Lesson#4: Carlos Braithwaite is a good slogger for 18-20 overs but still unproven against spin attack
Lesson#5: Someone needs to calm down and teach the young guns to play according to situations
Lesson#6: Test your resources when the result of the match is almost predictable

I hope the wise man (RD) seating there in dugout will take care of it!
We would like to see a different DD in the next match!

कालची मॅचही तशी वन सायडेडच झाली.... संदीप शर्माने बाझला स्वस्तात ढापून सुरुवातीला थोडी रंगत आणलेली पण फिंचने किल्ला लढवला.... डीके पण काल जरा जबाबदारीने खेळताना दिसला
मुरली विजय पण काल झोकात खेळत होता

आता आज बंगळूर वि. हैद्राबाद.... बघू काय होतय ते!

हो ना यार!
पहील्या तिन्ही मॅचेस रटाळ झाल्या
त्यातुन यंदा फॅंटसी लीग पण नाहीये धड!

असो.. चढेल हळूहळू रंग या स्पर्धेला

आज बघू गेल स्टॉर्म येतय का?

Pages