आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ, जी मत कहो ना!

>>क्रिकेटच्या धाग्यांवर माझं इंप्रेशनच मुळात 'कार्टून' म्हणूनच आहे !! डोळा मारा
काहीही हा भाऊ Wink

का कुणास ठाऊक, कार्तिक मला नेहमीच overhyped वाटत आलाय.... उथाप्पाला जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा छाप पाडता आली नाही ...... साहा बॅटींगमध्ये मार खातो हे माझे पर्सनल मत!

बाकीच्या सगळ्यांनाच समान संधी आहे.... पण त्यातल्या त्यात सॅमसनकडून जरा जास्त अपेक्षा आहे!

टेस्ट मधे साहा आणी ओझा च आहेत अजुन काही वर्ष तरी. >> साहचे क्पिंग एव्हढे smooth असते कि टेस्ट मधे तरी तोच हवा असे वाटते.

कार्तिक मला नेहमीच overhyped वाटत आलाय.... >> He is team player like Rahane. Never says no to anything and always accommodating and non-complaining. असे लोक मागे पडतात.

श्रेयस अय्यर हा वेळची रणजी पण चांगला खेळलाय. बघूया, IPL form त्याला भारतीय टीम मधे ढकलतो का ..

नेगी गेल्या वर्षी सुरूवातीला चांगला खेळला होता, तसाच खेळला तर जाडेजाला चांगली टफ देउ शकेल.

लेग स्पिनर गोपाल वर लक्ष ठेवा. मागच्या tournament मधे तो underdog होता.

<< लेग स्पिनर गोपाल वर लक्ष ठेवा. >> प्रत्येक लेग-स्पीनरवरच लक्ष ठेवणं हितावह. दर्जेदार लेग-स्पीनर ही आपली कसोटी व इतर सामन्यांसाठीचीही निकडीची गरज आहे. आत्तांच्या टी-२० स्पर्धेत भारत सोडून प्रत्येक मोठ्या संघात एक तरी चांगला लेग-स्पीनर होता. बद्रीने लेग-स्पीनरची उपयुक्तता तर निर्विवाद सिद्ध केली . मला जाणवतं कीं धोनीचा कल स्पीनपेक्षां - विशेषतः लेग-स्पीनपेक्षां - सीमर्सवर अवलंबून रहाण्याचाच असल्याने आपली ही बाजू लंगडी पडत चालली आहे.

गोपाल थोडासा कुंबळे कॉलेज ऑफ स्पिन बॉलिंग कॅटेगरी आहे. कर्नाटक च्या रणजी मॅचेस बघताना तरी थोडं तसं जाणवलं. जर मेंटल टफनेस च्य बाबतीत तो कुंबळे च्या जवळ्पास जरी असेल तर तो एक शुभ संकेत असेल.

असामी, साहा बद्दल सहमत. त्याची बॅटींग अजुन फारशी प्रभाव पाडू शकली नाहीये (१-२ ईनिंग्ज आशा दाखवून गेल्या आहेत), पण किपींग मस्त आहे.

>>गोपाल वर लक्ष ठेवा
तशी हवा मागच्या वर्षी करिअप्पा ने केली होती.... पण केकेआर मध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही आणि जी मिळाली तिला तो न्याय देउ शकला नाही..... यावर्षी तो पंजाब कडून आहे बहुतेक.... बघू काय करतो ते!

गोपाल रणजी चांगला खेळलाय. IPL मधे चांगली बॉलिंग त्याला मिश्रा च्या स्पर्धे मधे आणू शकते. fielding bonus आहे.

पांड्याच्या भाऊ पण hard hitter आहे MI मधे दिसतो का बघू. MI कडे रोहित वगळता भरवशाचा middle order Indian batsman दिसत नाही. रायूडू नि चांद बेभरवशाचे आहेत. बटलर ला कसेही करून आत आणायला हवे. He is extremely destructive. माझे ४ - simmons, butler, pollard, mcleghshan.

अरे आयपीएलमध्ये धोनीला पर्याय शोधू नका. तो जाणार तेव्हा संघात पोकळी सोडून जाणार आहे. तसे पॅकेज नाही भेटणार ..

दिनेश कार्तिक मात्र मला नेहमी गोंधळात टाकतो. कधी फॉर्मात असताना तो एवढा क्लास खेळतो की डिविलिअर्सची सहजता जाणवते. अगदी त्याचे स्लॉग स्वीपही क्लास वाटतात. पण कधी अचानक सुमार वाटतो. हे सुमार वा यथातथा वाटण्याची वारंवारता जास्त असते म्हणून गंडलाय बिचारा.

श्रेयस अय्यर हा वेळची रणजी पण चांगला खेळलाय >>>> हो आणि सिद्धेश लाड पण...अय्यरने खोर्‍याने धावा काढल्या. लाडने बरोबर हव्या तेव्हा मोठ्या खेळ्या केल्या. तो आहे का आयपीएलमध्ये ?

अय्यरला मुंबईने मागितले होते transfer window मध्ये म्हणे, पण दिल्लीने सोडले नाही त्याला!

बहुतेक बदल्यात उन्मुक्त चंदची ऑफर असेल Wink

उथ्थपा मेक शिफ्ट विकेटकिपर आहे.. त्यामुळे त्याला विकेटकीपर म्हणून धरुच नका.. तो द्रवीड सारखाच विकेटकिपर झालाय.. गरज पडली म्हणून आणि टी-२० मध्ये तसा विकेटकिपर चालून जातोय म्हणून त्याला विकेटकीपरच ठेवलाय.. तेव्हढीच एक बॅट्समन ची किंवा ऑल राउंडरची जागा वाचते म्हणून..

स्टार्क यावर्षी दुखापतीमुळे RCB कडून खेळू शकणार नाही..... Its big blow for RCB..... बहुतेक मागच्या वर्षी त्याच्या समावेशानंतरच RCB सलग जिंकायला लागलेली..... भरीस भर म्हणून फायनल मध्ये खांदा दुखावलेला बद्री पण पहील्या काही मॅचेस unavailable असणार आहे!
असो.... त्यानिमित्ताने मिलने, विसा आणि रिचर्डसन ला संधी मिळेल!

रॉबिन उथप्पा - ३० वर्षे
पार्थिव पटेल - ३१ वर्षे
संजू सॅमसन - २१ वर्षे
दिनेश कार्तिक - ३१ वर्षे
वृध्दिमान सहा - ३१ वर्षे
नमन ओझा - ३२ वर्षे
आदित्य तरे - २८ वर्षे
लोकेश राहुल - २३ वर्षे
शेल्डन जॅकसन - २९ वर्षे
निखिल नाईक - २० वर्षे
अंकुश बैन्स - २० वर्षे
महेंद्रसिंग धोनी - ३४ वर्षे

आता ठरवा धोनीची रिप्लेसमेंट म्हणून कोण येऊ शकेल टीम मध्ये... ते सुद्ध २०१९ नंतरच..

>>ते सुद्ध २०१९ नंतरच..
हाहाहा

सॅमसनचाच चान्स जास्त दिसतोय!

आदित्य टारेने या वर्षी रणजीमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. पंजाबचा उदय कौल ही गेली काही वर्षे चांगली सरासरी राखून आहे.

Injured Joel Paris ruled out of IPL season..... दिल्लीच्या स्क्वॉड मध्ये होता

दिल्ली कडून झहीर (फीट असेल तेव्हा), शामी आणी कदाचित मॉरिस असे तीन फास्ट बॉलर्स खेळतील असा अंदाज आहे. ताहीर, मॉरिस, डी-कॉक आणी ड्युमिनी हे चार द. अफ्रिकन खेळाडू ईंटरनॅशनल कोटा पूर्ण करतील बहुदा. डोमेस्टीक मधे अय्यर, नायर, संजू, झहीर, शामी हे खेळतील असा माझा अंदाज आहे. बाकी मॅच आणी ग्राऊंड च्या परिस्थीतीनुरूप बाकीचे दोन खेळाडू ठरतील.

मिश्रा पण असेल रे!
मला वाटतय पहील्या सामन्यात मॉरीस ऐवजी ब्रेथवेट ला खेळवतील ..... त्याचा आत्मविश्वास आणि कोलकत्त्याचेच ग्राउंड बघता मोमेंटम राखण्यासाठी तो असेल playing11 मध्ये बहुतेक!

मला वाटते ड्युमिनी, डी कॉक, ब्रॅथवेट, कुल्टर-नाईल खेळतील. फायनलच्या खेळीनंतर ब्रॅथ्वे|टला बाहेर ठेवणे अशक्य आहे.

कोलकाता आहे त्यामुळे ताहीरला खेळवतील

माझी प्लेयींग ११:
क्युडी कॉक, श्रेयस अय्यर, सॅमसन, ड्युमिनी, करुण नायर, ब्रेथवेट, नेगी, मिश्रा, झहीर, शमी आणि ताहीर

Pages