आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंभीर 187 स्कोअर पडल्यावर खूप उडत होता. इथे 160-165 रन्स खूप आहेत. आमच्याकडे तर 187 आहेत. आता आमचे तीन स्पिनर मिळून ह्यांव नि त्यांव.. विमान जिमिनीवर आले !

बरेचदा एव्हढी मोठी धावसंख्या चेस करताना एखादा तरी बॉलर ठरवून टारगेट करतात अधल्या ओव्हरस मधे. इथे एकही केला नाही पण नीट मॅनेज केला चेस. मॅक्लेशान ला वर ढकलण्याची कल्पना जबरी होती. कुलदीप यादव नि हॉज दोघांनाही नीट हाताळण्यासाठी.

पांडे उभ्या बॅटनी पुल कम हूक कसा काय खेळतो देव जाणे.

काल सचिनच्या चेहर्‍यावरचा आनंद बघायलाही मजा आली !
हल्लीं आपल्या खेळाडूंमधे दाढी ठेवायचं खूळ कुठून शिरलंय ? रहाणे व एखादा अपवाद सोडतां सगळेच दाढी ठेवतात. धोनी व कोहलीचं अनुकरण करून त्यांच्या 'गुड बुका'त रहायला ?

ठरवून टारगेट केलेला बॉलर रसेल होता. काय धुतलाय त्याला शेवटच्या दोन ओव्हर्स मध्ये. >> त्या शेवटाच्या ओव्हरस होत्या, तेंव्हा आस्किंग रेट ९-१० असताना समोर कोणीही असेल ठोकणे भागच पडले असते ना. मी म्हणत होतो कि मधल्या ओव्हर्समधे एखादा बॉलर पकडून धुतात कि ज्यामूळे आस्किंग रेट मॅनेजेबल होईल. तसे केले नाही.

हल्लीं आपल्या खेळाडूंमधे दाढी ठेवायचं खूळ कुठून शिरलंय ? >> भाऊ असे खूळ आजकाल येतच असते प्रत्येक खेळात. काही वर्षांपूर्वी रेड सॉक्स च्या खेळाडूंनी असा पण केला कि यंदाची वर्ल्ड सिरीज जिंकल्यावरच दाढी करायची नि ते चक्क जिंकलेही. त्या नंतर बर्‍याच टीं मधे हे खूळ शिरले. तसेही असेल. किवीज पण टी-२० कपमधे असेच दाढी वाढवून होते.

<< मी म्हणत होतो कि मधल्या ओव्हर्समधे एखादा बॉलर पकडून धुतात कि ज्यामूळे आस्किंग रेट मॅनेजेबल होईल. तसे केले नाही.>> पण मुंबईने सुरवातीच्या दहा षटकांत ९-१०चा रेट ठेवल्याचं आठवतं . मला वाटतं कोणते गोलंदाज केंव्हा वापरले जातात यावरही रन-रेट वाढवायची स्ट्रॅटी़जी बदलावी लागत असावी.
<< रेड सॉक्स च्या खेळाडूंनी असा पण केला कि यंदाची वर्ल्ड सिरीज जिंकल्यावरच दाढी करायची >> बाप रे ! म्हणजे पुढचा विश्वचषक जिंकेपर्यंत आपले खेळाडू असेच दिसणार !!! Wink

क्रिकईन्फो ने 'जुनं सीएसके' चं तुणतुणं वाजवून वात आणलाय. एक तर अशी काही आयपीएल ची १०० वर्षांची परंपरा वगैरे नाहीये की जी मोडीत निघालीये आणी त्याच्याविषयी नॉस्टेलजिया वाटतोय, किंवा सीएसके कुठल्या उदात्त कारणाने बाहेर पडलीये. उगाच शिळ्या कढीला ऊत आणतायेत.

तांबे ने रहाणे ला आऊट केलं. मला कळत नाहीये की ह्याबद्दल मला आनंद व्हायला पाहीजे की दु:ख! Uhoh दोघेही माझे आवडते खेळाडू आहेत. Happy

पण मुंबईने सुरवातीच्या दहा षटकांत ९-१०चा रेट ठेवल्याचं आठवतं . मला वाटतं कोणते गोलंदाज केंव्हा वापरले जातात यावरही रन-रेट वाढवायची स्ट्रॅटी़जी बदलावी लागत असावी. >> बरोबर आहे. मॅक्लेशान ला वर पाठब्वून हॉज नि यादव चा लेफ्ट आर्म स्पिन निष्प्रभ करण्याची कल्पना त्यातूनच निघाली असावी. मला चावला ला सुरू वातीपासून टारगेट करतील असे वाटले होते. रोहित लेग स्पिन चांगला रीड करतो नि चावला कॉन्फिडंट बॉलर आहे. त्याची लेंग्थ लवकर शॉर्ट होत जाते.

क्रिकईन्फो ने 'जुनं सीएसके' चं तुणतुणं वाजवून वात आणलाय >> +१

<< तांबे ने रहाणे ला आऊट केलं. मला कळत नाहीये की ह्याबद्दल मला आनंद व्हायला पाहीजे की दु:ख! >> अर्थात आनंदच; रहाणेला खूप बघतो व क्रिकेटच्या सर्व प्रकारांत खूप वेळ पुढेही पहाणारच आहोत. तांबे फक्त 'आयपीएल'वालाच आहे व इथं तरी त्यालाच अग्रक्रम देणं न्याय्य !
पीटरसन व ड्यु प्लेसीस धमाल करताहेत !

भाऊ, तुमचं लॉजिक बरोबर आहे. लेकिन यह दिल कंबख्त लॉजिकली सोचता ही नही! Wink तांबे मुंबईकडून फर्स्टक्लास क्रिकेट खेळतो, फक्त आयपीएल वाला नाहीये आणी श्री. धोनी कृपेनं रहाणे ला टी-२० मधे फारसं पहायला मिळत नाही. असो, बाय लार्ज तुमचं म्हणणं बरोबर आहे.

पिटरसन ची कोरी करकरीत (कुठलच स्टीकर नाही) बॅट पाहताना कसंतरीच वाटत होतं.

"पुण्याच्या टीम मधे कॅप्टन नसलेले कोणी आहे का नाही" - मला एकदम पाकिस्तान ची टीम आठवली. एकाच वेळी ७-८ तरी आजी-माजी कॅप्टन्स खेळतात त्यांच्याकडे,

तांबे ने परत एकदा मस्त बॉलिंग केली.

हो, धोनिला जाडेजा ची बॉलिंग बघून आनंद झाला असेल Happy

ब्राव्हो एकदम प्रसाद त्याचा कोच असल्यासारखा बॉलिंग करतोय. स्लो, स्लोअर नि स्लोएस्ट. मजा आली Happy

<< फक्त आयपीएल वाला नाहीये >> फक्त 'आयपीएल'मधेच पहायला मिळतो, असं म्हणायचं होतं मला. 'आयपीएल'साठी ज्यानी प्रथम हेरला तांबेला त्याला मानलं पाहिजे !!

धोनी लास्ट ओवर वीस रन ठोकले..
फक्त रनच नाही तर मोमेण्टम सुद्धा मिळवून दिले..
फिंच मॅकुल्लमनी अगदीच पिसे नाही काढली तर आजचा सामना रंगतदार होईल असे वाटतेय

<< ब्राव्हो एकदम प्रसाद त्याचा कोच असल्यासारखा बॉलिंग करतोय >> ब्राव्हो एकदम कोहली कोच असल्यासारखा बॅटींग करतोय ! Wink

>>तांबे ने रहाणे ला आऊट केलं. मला कळत नाहीये की ह्याबद्दल मला आनंद व्हायला पाहीजे की दु:ख! अ ओ, आता काय करायचं दोघेही माझे आवडते खेळाडू आहेत. स्मित

कस अगदी माझ्या मनातल बोललास!

>>'आयपीएल'साठी ज्यानी प्रथम हेरला तांबेला त्याला मानलं पाहिजे !!
द्रवीड!

ब्राव्हो एकदम कोहली कोच असल्यासारखा बॅटींग करतोय ! >> Happy

धोनिला खूप कन्फ्यूजन होत असेल ना ? जाडेजा, मॅक्मल्लम, ब्राव्हो, रैना नक्की कुठल्या बाजूला आहेत ह्यावरून. Wink

<< >>'आयपीएल'साठी ज्यानी प्रथम हेरला तांबेला त्याला मानलं पाहिजे !! द्रवीड! >> आतां कशा कशाकरतां मानायचा या द्रविडला !!!
<< धोनिला खूप कन्फ्यूजन होत असेल ना ? जाडेजा, मॅक्मल्लम, ब्राव्हो, रैना नक्की कुठल्या बाजूला आहेत ह्यावरून. >> भरीस घालायला स्वतःबद्दलही 'आपण खरंच 'पुण्या'तून खेळतोय का', हेंही कन्फ्यूजन असेलच त्याला ! Wink

<< >>'आयपीएल'साठी ज्यानी प्रथम हेरला तांबेला त्याला मानलं पाहिजे !! द्रवीड! >> आतां कशा कशाकरतां मानायचा या द्रविडला !!!
<< धोनिला खूप कन्फ्यूजन होत असेल ना ? जाडेजा, मॅक्मल्लम, ब्राव्हो, रैना नक्की कुठल्या बाजूला आहेत ह्यावरून. >> भरीस घालायला स्वतःबद्दलही 'आपण खरंच 'पुण्या'तून खेळतोय का', हेंही कन्फ्यूजन असेलच त्याला ! Wink

मुंबईविरुद्ध भेदक वाटलेली पुण्याची बॉलींग आज अगदीच सामान्य वाटली

आज धोनीने सोडलेले स्टंपींग बघून धक्काच बसला!

<< >>'आयपीएल'साठी ज्यानी प्रथम हेरला तांबेला त्याला मानलं पाहिजे !! द्रवीड! >> आतां कशा कशाकरतां मानायचा या द्रविडला !!! - १++++++

"आज धोनीने सोडलेले स्टंपींग बघून धक्काच बसला!" - त्याची रिअ‍ॅक्शन पाहून त्याच्या फॅन्स ना मोठा धक्का बसला असेल. Wink

भरीस घालायला स्वतःबद्दलही 'आपण खरंच 'पुण्या'तून खेळतोय का', हेंही कन्फ्यूजन असेलच त्याला ! >> भाऊ एक मे नंतर पुण्याचे 'होम' गेम्स कानपूरला वगैरे खेळले गेले कि अजून काही क्लॅरिटी उरली असेल ती पण गायब होईल बघा Wink

त्याची रिअ‍ॅक्शन पाहून त्याच्या फॅन्स ना मोठा धक्का बसला असेल. >> हाच विचार आलेला माझ्याही मनात Wink

द्रविड ने तांबेला स्काऊट केले नव्हते, ते टॅलेंट स्काऊट ने केले होते. द्रविड ने त्याच्या selection ला backing दिले होते नि टींममधे घेतले होते असे वाचल्याचे आठवते तांबेच्या मुलाखतीमधे.

<< पिटरसन ची कोरी करकरीत (कुठलच स्टीकर नाही) बॅट पाहताना कसंतरीच वाटत होतं.>> पीटरसनची हालतही कांहींशी धोनीसारखीच 'कन्फ्यूजड' झाली असावी; तो इंग्लंडमधे आहे, द. आफ्रिकेत आहे कीं इंडियात, पण कुठे, आहे, ह्याचंच त्याल भान रहात नसावं !!! Wink
आज रोहित शर्माने रिकी पाँटींगच्या मार्गदर्शनाबद्दल त्याची तोंड भरून स्तुति केलीय. त्याचा एक ऑसी माज सोडला तर पाँटींग फलंदाज, क्षेत्ररक्षक व कर्णधार म्हणून [ व आतां तर प्रशिक्षक-'मोटीव्हेटर' म्हणून ] फारच वरच्या दर्जाचा खेळाडू आहे याबद्दल दुमत नसावं.

वीकेंडची सुरुवात आणि डीडीची मॅच..... आत्तापासूनच सरसावून बसलो आहे..... कमबॅक करायला त्यांना पंजाबपेक्षा सोपी टीम मिळणार नाही
टॉस जिंकुन गोलंदाजी घेणे म्हणजे निम्मी लढाई जिंकल्यात जमा आहे..... दिल्लीची गोलंदाजी असेल तर झहीर आणि शमी/ब्रेथवॅट ने फारसे प्रयोग न करता फक्त लाइन जरी टाइट ठेवली तरी पुरेसे आहे.... विजयची पहील्या मॅचमधली खेळी बघता 3M पेक्षा मला तोच जास्त डेंजरस वाटतोय!
मिश्रा आणि ताहिर मधल्या ओव्हर्स गाजवतील हे नक्की आणि मॉरीस हा डेथ ओव्हर्स साठी आयडीयल बॉलर आहे

फलंदाजीत क्यूडी आणि मयांक आगरवाल ला मोकाट सुटु द्यावे पॉवरप्ले मध्ये पण विकेट लवकर पडल्या तर मात्र सॅमसन आणि करुण नायर यांनी किल्ला लढवला पाहिजेल.... मॉरीस आणि ब्रेथवेट १५ ओव्हरनंतर आले तर धमाल करु शकतील
नेगीचा काही अजुन अंदाज येत नाही

त्या संदीप शर्माला सांभाळून खेळले तर बाकी गोलंदाजांना खेळणे फारसे अवघड जावू नये!

Good Luck DD & RD

Pages